मुखवटे आणि चेहरे
काल ऐन संध्याकाळी नेट कनेक्शन डाउन झाले आणि डोक्याला शॉट लागला. शेवटी वैतागुन शटर खाली केले आणि चुकला फकिर मशीदीत ह्या न्यायाने आम्ही चौपाटीची वाट चालायला लागलो. लांबुनच एका आईसक्रीमच्या गाडीला टेकुन बसलेला आमचा नानबा दिसला आणि चौपाटीवर आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नाना एक भली मोठी पेन्सील, कागद , खोडरबर आणि टोकयंत्र घेउन बसला होता.
"नानुssssssssडी काय विडंबन करतोयस का टॅक्स रिटर्न ?" मी आनंदाने साद घातली. मात्र "ये रे भाड्या !" च्या ऐवजी "राम राम" ऐकायला आले आणि आम्ही सावध झालो. नान्याचा मुड आज वेगळाच लागल्याचे लक्षात आले.
"काय नानबा ? विडंबन का विडंबन ??" आम्ही कागदात डोकावत म्हणालो.
"धाग्यांची यादी काढतोय ! हे ४/५ उद्या टाकायचे आणि हे ३/४ परवा" नाना हातातला कागद दाखवत म्हणाला. आम्ही उत्साहाने कागदात डोकावलो. कागदावर १) मुंगी होउन साखर खावी पण हत्ती होउन ओझी का उचलु नयेत ? २) जुलाबावर काही घरगुती उपाय आहेत काय ? ३) बायको साडी नेसणारी करावी का ड्रेस घालणारी ? ४) मुलाच्या डोक्यावरचे केस आता कापण्यालायक झाले आहेत तरी माझ्या लहान मुलास कुठे केस कापायला न्यावे ? ५) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ?? अशा काही धाग्यांची एकाखाली एक नावे दिसली.
"हे सगळे एकदम का नाही टाकत ??" मी हलकटपणाने विचारले.
"हे धागे मी टाकणार नाहिये ! लोकांना विषय हवे होते म्हणुन सुचवतोय" नाना थंडपणे म्हणाला.
"लोकांना ? म्हणजे कोणाला बॉ ?" ह्या आमच्या प्रश्नावर नानानी ज्या नजरेने आमच्याकडे बघितले त्यामुळे आमचे शरमेनी सरबत झाले. "हे घे वाच !" नानबाने आता खिशातुन एक चुरगाळलेला कागद काढुन आमच्या हातावर टेकवला. लॉटरीचे तिकिट बघावे त्या उत्साहाने आम्ही तो कागद उलगडून पाहिला. तो कागद म्हणजे एक ग्रुप-चाट ची प्रिंट आउट होती. त्यावर खालील प्रमाणे संभाषण होते :-
..........
सोम्या :- बा*** भां** 'त्या' धाग्यावर येवढा का पेटला आहेस ? पब्लिकला शंका येईल ना भौ.
गोम्या :- घंटा ! माझी खव बघ.. पब्लिक केस उपटायच बाकी राहिलय फक्त.
राम्या :- खी खी खी मायझ* माझ्या कालच्या धाग्यावर अजुन तेल ओतुन या रे कोणीतरी.
गोम्या :- त्या धाग्यावर मी लै शिव्या घालुन आलोय तुला मगाशी. वाचली का माझी प्रतिक्रीया ?
राम्या :- वाचली पण मी आता लॉग-ईन नाहिये, बाहेरुन वाचतोय.
सोम्या :- उद्या कोण टाकणारे धागा ? च्यायला जरा सांभाळून नाहितर परत लाथा मिळायचा.
राम्या :- फाट्यावर मारतो बे आपण सगळ्यांना. चार घुसवुन ठेवलेत. एक उडला तर काय फरक पडतो ?
............
"हम्म्म्म्म... तुला कुठे मिळाले हे नान्या ?
"वैयक्तीक प्रश्न... सो पास !"
हम्म्म्म्म. पण येवढ्या तेवढ्या कारणावरुन तु असा उदास नक्की होणार नाहीस, नक्की काय झालय बॉ तुला ?
"सध्या मिपावर उर्मटपणा वाढत चालला आहे परा."
"आणि आक्रस्ताळेपणा सुद्धा ! झाडं कमी पडायला लागली आहेत नान्या."
"मला फारा वाईट वाटते आहे रे पर्या. ज्या मिपावार विजुभौंसारखे व्यसनमुक्तीचे खंदे कार्यकर्ते कार्यरत आहेत त्या मिपावर दारुच्या समर्थनार्थ लेख यावा ? ज्या मिपावर स्वातीतै, जागुतै सारख्या सुगरणी पाहिल्या, तिथेच स्वयंपाक न करता येणार्या सदस्या दिसाव्यात ?? नवे रुप नवे रुप म्हणायचे ते हेच का काय ?"
"जाउ दे नाना तु नको डोक्याला शॉट लावुन घेउ."
"च्यायला प्रा. डॉ. च्या मिपाची लेखन 'कोलिती' उतरली रे पार. साल्या तु कसे काय हे सगळे सहन करतो ?"
"असे आहे बघ नानबा, मी सकाळी आल्या आल्या आधी कलंत्री काकांचा एक लेख नाहीतर प्रतिक्रीया वाचतो त्यामुळे पुढे कुठलेही लेखन आले तरी ते वाचायची मला मानसीक ताकद मिळते. आणि जाताना मी सामंत काकांचा एक लेख वाचतो मग दिवसभर जे काही (ही) वाचले ते कसे जीवन सुंदर करणारे होते ह्याचा मला साक्षात्कार होतो."
"धन्या आहेस भाड्या. चल आता जरा पाणवठा गाठु आणि मग घरला निघु. "
तर दोस्तहो अशा रीतीने नाना आणि परा पाणवठ्याकडे गेले. तिकडे रात्री ११ च्या सुमारास दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि इकडे मिपा रंगमंचावर ११.३० वाजता एका नव्या आयडी कडुन गो-ग्गोड भाषेत 'मिपा लेखनाचा दरजा' आणि दुसर्या नव्या आयडी कडून 'aajkal samant aani kalantri kaka kuthe asatat ?' असे विचारणारा लेख प्रकाशला.
प्रतिक्रिया
आयला
सुंदर लेख... असे प्रेरनादाई,
तळ्यावरील गप्पा
परा, नेहमी प्रमाणे हुच्च
अत्यंत फालतु लेख ...
<<<आजपासुन माझा मिपावर सन्यास
लेख अत्यंत फालतु आणि
सहमत!!
असेच म्हणतो..
आयला लैच संशयास्पद हालचाली
आपल्याकडे नेट कनेक्शन आहे आणि
पराशेठ
भो* परा, केवळ तुला म्हणून
आमच्या बाब्यांच्या लेखाला का
परा, णाणा आणी त्यांची
न्म्स्कार, हा उर्म्त्पना
एक प्रश्न
पुण्यात कुठे सापडली तुला
>>पुण्यात कुठे सापडली तुला
मराठमोळा
वा वा छान छान ! पर्याच्या
हसून मेले, मरून पुनर्जन्म
उर्मट-कंपूत
प्रकाटाआ
भोचकसम्रांटाचा ईजय असो !!
आपल्याकडे नेट कनेक्शन आहे आणि
चांगला लेख आहे. वाचुन लुफ्त
आयला...