पराक्रमी असा मी : हझल
माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो
ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो
त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली
टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो
आधार लेखनीला खंबीर मेज आहे
सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो?
प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी
अंधार ही अताशा संगे मलाच नेतो
उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो
ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो
ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का अभय आढळे तो?
गंगाधर मुटे
...................................................
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 5:11 pm | निखिल देशपांडे
सहीच..
5 Aug 2010 - 7:20 pm | धनंजय
पहिल्या दोन कडव्यांत नचिकेता आठवला. (कठ-उपनिषदातील निचिकेताचा बाप भाकड गायी दान देतो, त्याबद्दल नचिकेता बापाला जाब विचारतो.)
बाकी अनेक द्विपदी तितक्या मजबूत वाटल्या नाहीत.
मक्ता गमतीदार आणि थिल्लर.
(निरर्थक विडंबन आणि समाजिक टिप्पणी यांची सरमिसळ केल्याने दोहोंचा रसापकर्ष होतो. सामाजिक टिप्पणी तरी गंभीर आहे का? असा प्रश्न उत्पन्न होतो, तिची धार बोथट होते. आणि सामाजिक टिप्पणीच्या गांभीर्यामुळे थिल्लरपणातला हास्यरस काळवंडतो.)
5 Aug 2010 - 7:31 pm | नाना बेरके
आधार लेखनीला खंबीर मेज आहे
सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो?
.. हे कळले नाही
6 Aug 2010 - 11:55 am | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
धनंजयजी, सहमत.
पण गझलेमध्ये एकजिनशीपणा नसतोच.प्रत्येक शेराला स्वतंत्र मुड, आशय असतो.
त्यामुळे तसे होते.