मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. पूर्वी दहा बारा वेळा गेलोय, तरी दिल्ली तशी माझ्या साठी नविनच.
तिथे असलेल्या गुजराथ भुवन किंवा महाराष्ट्र भुवनच्या स्वस्त आणी मस्त अॅकोमोडेशनल फॅसीलीटीज मी
आधीच यूज केल्या असल्यामूळे अॅकोमोडेशनची काळजी नव्हती.सकाळी साडेदहाच्या सुमारास स्टेशनावरुन
मी सरळ गुजराथ भुवनला पोहोचलो.
नव्या नियमा प्रमाणे माझ्या सरकारी आईकार्डाची झॅरोक्स घेवून मी काउंटरवर लाइनीत उभा राहीलो.
अर्ध्या तासानी नंबर आला.रीसेप्शनीस्टनी रजीस्टर माझ्यापूढे केले. नाव, अॅड्रॅस, फोन नंबर वगेरे डीटेल्स भरुन
मी रजीस्टर परत केले.आणि झालं.....माझ नाव पाहून जणू काही ती दचकली .
'सर, आप यहां नही रह सकते...'
'क्यूं नही रह सकता....! ' मी विचारले.
आप महाराष्ट्रीअन हे. सो आपको यहां जगह नही मिल सकती.तिच्या काड काड हिन्दी पूढे मी फाडफाड
गुजराथीत बोललो.क्यों नही मिलेगा...! में बडोदा- गुजराथसे आया हूं.मेरी मातॄभूमि गुजराथ हे,गुजराथ
गवर्नमेन्टके सेक्रेटरियेटमे पिछले अठ्ठाइस सालोंसे सर्विस करता हूं... एक तास तिच्याशी झीगझीग करुन ही
शेवटी 'सॉरी सर.. हम आपको रुम नही दे सकते, आप महाराष्ट्र भुवनमें ट्राय करे ' चं एकरी उत्तर घेवून बाहेर पडलो.
तिथून तीन चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्रभुवनावर पोहोचलो.गुजराथभुवनवर केलेला सगळा प्रॉसीजर, ' झॅरोक्स पासून रजीस्टर भरे पर्यंतचा ' आटोपला.
' सर, तुम्हाला येथे रुम मिळू शकणार नाही.' रजीस्टर पूढे येतांच रिसेप्शनीस्ट वदली.
अहो बाई, मी महाराष्ट्रीयन माणूस आहे..इथे नाही तर जाणार तरी कुठे...!
आपण महाराष्ट्रीयन आहात ते बरोबर, पण बडोदे-गुजराथचे रहिवासी आहात.त्यामूळे आम्ही आपणास येथे
रुम देवू शकत नाही.आपण गुजराथ भुवनाचा कॉन्टॅक्ट करा.एक तासा नंतर पण पॉझीशन जसच्या तशीच होती.
शेवटी चारपाच तासाच्या भटकंती नंतर मला तिथल्या स्वामिनारायणमंदिरात जागा मिळाली.जशा तशा परिस्थितीत चार दिवस तिथेच काढले.
पूढच्या आठवड्यात परत दिल्लीला जायचय...विचार करतोय, काय कराव......
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 9:05 am | स्पंदना
शेवटी स्वामी कामी आले!!
1 Aug 2010 - 11:19 am | भारतीय
लहानपणी एक गोष्ट ऐकली होती.. प्राणी विरुद्ध पक्षी अश्या लढतीत बिचार्या वटवाघळाची परवड होते अशीच काहीतरी...
1 Aug 2010 - 11:52 am | बिपिन कार्यकर्ते
धोबी का कुत्ता!!!