मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५
***
भाग -३
दुसर्या महायुध्दात तेलाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ब्रिटीश सेनांनींनी दूरदृष्टी ने तेल उत्पादक देशांवर आक्रमण करायचे ठरवले आणि त्या योजनेत १ ल्या बटॅलियन ने बगदाद काबीज करून तेथून पॅलेस्टाईनला जाणारी तेलाच्या पाईपलाईनच्या संरक्षणाचे अती महत्वाची कामगिरी बजावली.
दोन वर्षातच या दोन बटॅलियन्सची रवानगी एका महत्वाच्या कामगिरीवर करण्यात आली. ते काम होते इजिप्तचे रोमेलच्या रणगाड्यांपासून संरक्षण. काळ होता १९४१चा उन्हाळा. या लढायांमधे सुभेदार मेजर शिंदे यांना LOM व सखाराम शिंदे यांना एक पदक मरणोत्तर देण्यात आले. याच दरम्यान २री बटॅलियनची गाठ बीर-अल्-गोबी येथे एका जर्मन रणगाड्यांच्य़ा तुकडीशी पडली. यात या बटॅलियन्सचे भारी नुकसान झाले. ८ अधिकारी त्यात ५ भारतीय होते, आणि २४० सैनिक मृत्यूमुखी पडले.
यावेळी बाबाजी देसाई नावाच्या साध्या सैनिकाने जे धैर्य दाखवले त्यासाठी त्याला मरणोत्तर LOM देण्यात आले. याला साधे तरी कसे म्हणावे ? या १८ वर्षाच्या सैनिकाने त्याच्या सेक्शन कमांडरला गोळी लागल्यावर त्या सेक्शनचा ताबा घेतला आणि आक्रमण जारी ठेवले. एवढेच नाही तर जेव्हा माघार घेताना त्याला त्याच्या कंपनीला कव्हरींग फायर देण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्याने ते काम मरेतोपर्यंत केले आणि इतर सैनिकांना सुरक्षितपणे माघार घेता आली. यातच त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पराक्रमाची ही नोंद बघा –
Sepoy Babu Desai of the Mahrattas , only eighteen years old , took command of his section when it's commander was wounded. When the company was held up, he picked up his Bren gun , rushed across the open under heavy fire, and brought the gun into action from the flank, enabling the company to move on again. Then he was wounded in the leg and his platoon commander told him to go back to the Regimental Aid Post to have the wound dressed. But Babu Desai had other views. He rushed the gun that wounded him , killing the gunner and making the others run. Then his leg gave way under him , but still he had to be forcibly placed on a stretcher before he would even consider his own troubles.
बाबू देसाई खेरीज खालील सैनिकांना पण पदे बहाल करण्यात आली.
सुभेदार पांडूरंग चव्हाण
नाईक बाळा खराडे
नाईक सिताराम म्हस्के
नाईक बाबासाहेब इंगळे
लकू जाधव
१९४२ च्या जूनमधे रोमेलच्या आफ्रिका कोअरने अल् अलमीनवर धडक मारली आणि नाझी सैन्य इजिप्तच्या दरवाज्यावर धडका मारू लागले. त्याचे आक्रमण रोखण्यासाठी ११वी इनफंट्री ब्रिगेडला दक्षिण आफ्रिका डिव्हीजनला जोडण्यात आले आणि यांना घाईघाईने टोब्रूकला पाठवण्यात आले.
या ब्रिगेड्मधे ५वी मराठालाईट इनफंट्री होती हे आपल्याला माहितीच आहे. २०जून च्या पहाटे रोमेलच्या रणगाड्यांनी आश्चर्याचा धक्का देऊन टोब्रूकच्या अवती भोवती संरक्षणासाठी विखुरलेल्या मराठा लाईट्वर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या सोबतीला जर्मन हवाईदलाची विमाने होती. या डाईव्ह बॉंबर विमानांच्या हल्यामुळे रोमेलच्या रणगाड्यांना आणि चिलखती गाड्यांना या संरक्षण फळीत जोरदार मुसंडी मारता आली. थोड्याच वेळात टोब्रूकची संरक्षक फळी मोडून पडली आणि दोस्त राष्टांना एका मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. यात ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडचा मात्र पूर्ण सफाया झाला. २ बटॅलियनचा अंत हा असा झाला. पण त्यांच्या शौर्याच्या हकिकती मात्र अजूनही सांगितल्या जातात. या बटॅलियनबद्दल ४ थ्या इन्डियन डिव्हीजनचे कमांडरांनी (मे. जनरल टूकर) यांनी या युध्दानंतर या बटॅलियनच्या रेजीमेंट सेंटरच्या (बेळगाव) कमांडन्ट्ला एक पत्र लिहीले –
प्रिय कमडांट,
मी आपल्याला हे पत्र पूर्वीच लिहीणार होतो पण आपल्या २ बटॅलियनची काही खबरबात मिळेल मग लिहू असे म्हणत थांबलो होतो. पण दुर्दैवाने आजपर्यंत तरी या बटॅलियन बद्दल माझ्याकड्र कुठलिही माहीती नाही. मी तुम्हाला फक्त काय झाले हे सांगू शकतो.
२/५ व्या मराठा लाईटच्या बटॅलियन्स वर २० जूनच्या पहाटे हल्ला झाला. हल्यात शत्रूने धूर ओकणारे बॉंब, अत्यंत विध्वंसक शक्ती असलेली स्फोटके आणि विमानांचा मारा वापरला. जे भूसुरुंग पेरलेले होते त्यांना यशस्वीरित्या टाळून शत्रूसैन्याच्या रणगाड्यांना पुढे मुसंडी मारण्यात यश मिळाले. ते बघितल्यावर आपल्या रणगाडा दलाची तातडीने मदत मागण्यात आली. दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. त्य रणगाड्यांच्या समोर या पायदळाचा निभाव लागला नाही त्यामुळे ती ब्रिगेड जागेवरच गारद झाली. त्यानंतर शत्रूचे ७० रणगाड्यांनी ज्या ठिकाणी २/५ आघाडी संभाळत होती तेथे जोरदार हल्ला चढवला. या बटॅलियनने या हल्याला नेहमीप्रमाणेच मोठ्या शौर्याने प्रत्युत्तर दिले पण रणगाड्यांसमोर त्यांचाही निभाव लागला नाही व त्यांचीही वाताहात झाली.
कळवायला वाइट वाटते की या क्षणी तुमच्या कुठल्याही ऑफिसर अथवा सैनिकांची काहीही खबरबात नाही.
टोब्रूक मेजर जनरल क्लॉपर यांच्या कमांडखाली होते, आणि २/५ मराठा लाईट मधली फळी संभाळत होती. ११ वी ब्रिगेड टोब्रूकच्या शरणागती नंतर १२ तास लढत होती ज्यात मराठा लाईट इनफंट्रीचा मोठा सहभाग होता. तसेच २५ फिल्ड रेजिमेंट त्यांच्या १६ पैकी १४ तोफा नष्ट होइपर्यंत लढत होती. शेवटच्या २ तोफा शेवटी त्यांनीच नष्ट केल्या.
११व्या ब्रिगेड चा नाश हे आमचे कधीही न भरून येणारे नुकसान समजतो. या ब्रिगेड्मधे तुमची बटॅलियन ही नेहमीच शौर्याच्या बाबतीत पुढे राहीली होती आणि त्यांचे नाव यासाठी इतिहासात नेहमीसाठी घेतले जाईल याबद्दल खात्री बाळगा.
टोब्रूकचा परभवाची कारणे हे लढणारे सैनिक हे नसून, संभाळण्याच्या पलिकडे असलेली युध्द्सीमा, रणगाडाविरोधी शस्त्रांचा अभाव आणि मुख्य म्हणजे जी मदत (counter attack of tanks) मागितली गेली होती ती वेळेवर न मिळणे हीच कारणे आहेत.
आपल्या रेजिमेंटच्या कर्नल यांना कृपया ही माहीती द्यावी.
आपला,.......
या युध्दाच्या अनुभवानंतर मराठा लाईट मधून काही बटॅलियन्स मराठा रणगाडाविरोधी रेजिमेंट तयार करण्यात आल्या. त्यातली एक ४ थी मराठा एंटी टॅंक रेजीमेंट इटलीला गेली आणि ५वी मराठा एंटी टॅंक रेजीमेंट भारतात परत गेली.
त्यांचा इटली मधला पराक्रम पुढच्या भागात.... या भागात जो सर्वात जास्त मानाचा असा व्हिक्टोरीया क्रॉस ज्यांनी मिळवला, तो कोणाला मिळतो या विषयी.....
भाग -३ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू......
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 11:25 pm | मराठमोळा
कुलकर्णी साहेब,
लेखमाला छान चालु आहे. तुमच्या लेखामागच्या मेहनतीचे कौतुक वाटते.
आभार. :)
27 Jul 2010 - 11:30 pm | पुष्करिणी
नेहमीसारखाच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख, पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
27 Jul 2010 - 11:46 pm | जयंत कुलकर्णी
वाचकहो/मित्रहो,
मी मागील एका लेखात लेखकांचा लेख संपादन करायचा हक्क शाबीत ठेवल्याबद्दल श्री. नीलकांत यांचे आभार मानले होते. पण संपादकांपैकी काही जण या सुविधेच्या विरुध्द होते त्या मुळे ही सुविधा काढून घेतलेली दिसते. जर मिपाच्या नवीन रुपबदलामुळे ही सुविधा द्यायची राहीली असेल तर मला वाटते २/ ४ दिवसात चालू व्हायला हरकत नाही. पण हा धोरणाचा भाग असल्यास ती चालू होणार नाही व तसे झाले तर त्यामुळे मला इथे लेखन करणे अवघड जाईल. कारण ही सुविधा जबाबदारीने वापरण्यार्यांपैकी मी एक होतो ( माझ्या मते).
जर ही सुविधा चालू झाली नाही तर मित्र हो या इथे आपली शेवटची भेट.
मला ही चुकल्या चुकल्या सारखे वाटेल, पण नाइलाज आहे.
आपला,
जयंत कुलकर्णी.
http://www.jayantpune.wordpress.com
अर्थात ही सुविधा जर यदा कदाचित चालू झालीच तर, किंवा जेव्हा चालू होईल तेव्हा आपण भेटूच. तोपर्यंत
अलविदा ! जर लेखाचे स्वसंपादन अजून्ही करता येत असेल व मला ते कसे करायचे हे कळले नसेल तर कृपया मला सांगावे. त्या परिस्थितीत मी माझे शब्द मागे घेईनच.:-)
28 Jul 2010 - 8:42 am | Pain
जर सगळ्यांसाठी ही बंद केली असेल तर किमान अशा जबाबदार लोकांना तरी ही सुविधा देण्यात यावी.
बहुतांश वेळा प्रस्तुत लेखक, इन्द्राज पवार, पुश्करिणी, रामदास यांच्यासारख्यांच्या लेखनासाठी मी मिपावर येतो .
हे सोडून गेले तर वाचायचे काय ? भाजी खरेदी ? उपवास? बाहेर पाउस पडताना घरात स्तोत्रे ऐकणे ? खातो तसे बनतो ? लग्नानंतर ७ वर्षात विवाहबाह्य संबंध? व्हँपायर आणि वेअरवूल्फबद्दल काडीची माहिती नसणार्या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची भलामण करणारी परिक्षणे ??
28 Jul 2010 - 10:13 am | अभिरत भिरभि-या
जर सगळ्यांसाठी ही बंद केली असेल तर किमान अशा जबाबदार लोकांना तरी ही सुविधा देण्यात यावी.
+१
बहुतांश वेळा प्रस्तुत लेखक, इन्द्राज पवार, पुश्करिणी, रामदास यांच्यासारख्यांच्या लेखनासाठी मी मिपावर येतो .
हे सोडून गेले तर वाचायचे काय ?
+१००१
--
लेखमाला छान आहे .. मराठाकालिन पराक्रमावर बरीच पुस्तके वाचली आहेत. नंतरच्या कालखंडाबद्दल सांगणारे काही वाचायला मिळणे खरोखर मेजवानी आहे.
29 Jul 2010 - 12:30 am | गोगोल
>> दिग्दर्शकाच्या चित्रपटांची भलामण करणारी परिक्षणे ??
:):)
आमच्या ईकडे कोणी मुलगा असल्या मुव्हीज बद्दल बोलायला लागला की सगळे एकमेका कडे पाहून डोळे मिचकावतात. सगळ्यांच्या डोक्यात एकाच विचार चालू असतो .. what a faggot ;)
29 Jul 2010 - 1:27 am | शुचि
फॅगट वगैरे चा अर्थ माहीत नाही मला पण संपादकां नी यात लक्ष घालावं. उगाच शिव्या देणारे प्रतिसाद ठेऊ नयेत इथे. ज्यांनी कोणी ही परीक्षणं लिहीली आहेत त्यांनी चांगला आस्वादात्मक लेख लिहीले आहेत. तुमची इथली प्रॉडक्टीव्हीटी काय आहे? - शून्य आहे शून्य.
बरं शून्य तर शून्य तो वाद नाही. निदान बिनडोकासारखी नावं तरी ठेऊ नका इतरांना फॅगट वगैरे.
29 Jul 2010 - 2:29 am | गोगोल
माझी इथली प्रॉडक्टीव्हीटी अगदीच काही शून्य नाही. पहा बर आठवून .. तुम्ही काढलेल्या उशिरा होणार्या लग्नाचे परिणाम का असा काहीतरी धाग्यवर् प्रतिक्रिया टाकली होती. तुम्ही नंतर तो धागाच उडवून लावला.
बाकी तुम्हाला सात्विक संताप यायला काय झाल ते कळला नाही.
28 Jul 2010 - 11:48 am | महेश हतोळकर
कृपया पुनर्विचार करावा.
28 Jul 2010 - 12:02 pm | जयंत कुलकर्णी
खरंतर माझ्या सारख्यांना संपादनाची सुविधा फारच उपयुक्त आहे. एक तर बर्याच शुध्द्लेखनाच्या चूका ज्या नंतर कळतात त्या दुरुस्त करता येतात. काही माहीती द्यायची राहीली असली तर ती परत देता येते. उदा. मला वरील लेखात एक अत्यंत महत्वाचा फोटो नंतर मिळाला. पण आता तो मी टाकू शकत नाही.
शेवटी जे या सुविधेचा गैरवापर करतात त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. सरसकट ही सुविधा काढून घेणे मला पटले नाही. पाहिजे तर ही सुविधा काथ्याकुट्वरून जरुर काढण्यात यावी. कारण तेथे मतांचा, वादाचा खच असतो व वेळोवेळी त्या मताचा संधर्भ घ्यावा लागतो.
असो मी अशावेळी काय करू शकतो ?
जाणे ! :-)
आपण या बाबतीत काही करू शकलात तर जरूर करा. कारण मला स्वतःला चुका असलेले लेखन मिपावर संधर्भासाठी रहावे असे वाटत नाही.
जयंत कुलकर्णी
28 Jul 2010 - 12:42 pm | Nile
कुलकर्णी साहेब थोडे संयमाने घ्यावे ही विनंती. ही सुविधा पुन्हा द्यावी की नाही यावर मंडळींचा विचारविनीमय सुरु आहे. त्याशिवाय संपादन करताच येणार नाही असे नाही. संपादकांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. काही मोठी चुक किंवा गंभीर मामला असेल तर संपादक तुम्हास आवश्यक ते बदल करु शकतात. तेव्हा आपण संयमाने घेणे व अशा किरकोळ कारणास्तव निरोप घेउ नये ही विनंती.
28 Jul 2010 - 12:50 pm | जयंत कुलकर्णी
प्रिय नाईल,
मी लिहीलेच आहे की ही सुविधा मिळाल्यास मला इथे लिहीण्यात रस आहेच आणि मी वाट बघणारच आहे.
28 Jul 2010 - 9:58 pm | गणपा
सुक्या बरोबर ओले ही जळते.
पण सध्या ओल्या बरोबर सुके जळते अस होत आहे.
२-३ लोकांनी त्यांचे धागे उडवले तर त्याची शिक्षा बाकिच्या १००००+ आयडिज् ना का?
जयंतसाहेबांशी सहमत आहे.
बाकी जयंतसाहेब लेखमाला आवडतेय हे सांगायच राहुनच गेल बघा.
28 Jul 2010 - 9:39 pm | प्रभो
>>तेव्हा आपण संयमाने घेणे व अशा किरकोळ कारणास्तव निरोप घेउ नये ही विनंती.
सहमत्/असहमत दोन्हीही.
माझ्यामते या कारणाने लिहायचे बंद करणारे जयंतसर एकटेच नसावेत.
माझ्या ओळखीतल्या दोन सिनियर सदस्यांनी स्वसंपादन परत चालू होईपर्यंत लेखन न करण्याचे ठरवले आहे. या औषधाचा साईड ईफेक्ट असा होऊ नये एवढीच अपेक्षा.
याचा सुवर्ण मध्य काढता आला तर उत्तम आहे.
लेखकाला कंटेंट संपादनाचे अधिकार मिळावेत पण लेख काढून टाकण्याची अनुमती नसावी. या मताचा मी आहे.
28 Jul 2010 - 4:36 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम लेखमाला.
28 Jul 2010 - 7:25 pm | शुचि
माझ्याकडून तरी पुन्हा "स्व-संपादनाचा" दुरूपयोग = धागा उडवणे होणार नाही. तर मी जबाबदारीने धागे निर्माण करत जाईन. सगळ्यांना शिक्षा नको.
29 Jul 2010 - 2:25 pm | प्रसन्न केसकर
सुंदर लिहिताय तुम्ही. कृपया लिहित रहा!