ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 7:48 pm

काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट"

घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही. लोकांचे लक्षदेखील अजून या समस्येकडे वेधले गेलेले नाही. किंबहुना ही सार्वजनीक समस्या आहे हेच अजून ज्ञात झालेले नाही. आवाज हा तसा पाहीला तर "बारीक", "अशक्त" मुद्दा म्हणून गौण मानला जाऊही शकतो. पण हा मुद्दा वाटतो तितका "बारीक/अशक्त" नसून त्याचा भरपूर त्रास होतो. जसं लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं यांना आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. बरेचदा गरीब लोक हे आवाजाची शिकार झालेले दिसतात कारण त्यांची वस्ती रेल्वेच्या रूळांच्या, हायवे, विमानतळ आदिच्या बाजूस असते."

याच लेखकाने सर्वात सुंदर उदाहरण दिलेलं आहे ध्वनी हा दिसायला "अशक्त" पण किती भक्कम मुद्दा/समस्या आहे हे पटवून देण्यासाठी.-
थॉर नावाच्या देवास एकदा आमंत्रण दिलं गेलं - एका बलाढ्य राजाच्या अपंग, वृद्ध आईबरोबर लढण्यासाठी. थॉर हा अतिशय बलवान देव असल्याने त्याला विश्वास होता की तो सहज जिंकू शकेल. पण काय आश्चर्य! ना त्याला , तिला उचलता आलं, ना फेकता आलं ना चीत करता आलं. नंतर शेवटी थॉरच्या लक्षात आलं की दिसायला नाजूक आणि अशक्त असली तरी साक्षात वृद्धत्वाबरोबरचा तो लढा होता.
तसाच ध्वनी दिसवयास "नाजूक" पण लढा द्यायला गेलं की त्याची ताकद कळते.

वरील माहीती साभार - http://www.nytimes.com/2010/05/22/books/excerpt-the-unwanted-sound-of-ev...

समाजजीवनमानराहणीबातमीप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Jul 2010 - 7:51 pm | अवलिया

>>ध्वनी दिसवयास "नाजूक" पण लढा द्यायला गेलं की त्याची ताकद कळते.

खरं आहे आवाज दाबला गेला की आवाज येतो.

आळश्यांचा राजा's picture

8 Jul 2010 - 9:47 pm | आळश्यांचा राजा

आवाज दाबला गेला की आवाज येतो

हे आवडलं!

आळश्यांचा राजा

टारझन's picture

8 Jul 2010 - 7:52 pm | टारझन

आणि मी हँग झालो :(

- टारोबा हँगर

पांथस्थ's picture

9 Jul 2010 - 9:35 am | पांथस्थ

N Y Times च्या रिव्ह्यु मधले हे वाक्य आवडले -

A person who says “My noise is my right” basically means “Your ear is my hole.”

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

राजेश घासकडवी's picture

9 Jul 2010 - 10:24 am | राजेश घासकडवी

उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.

खरं आहे. जिथे शांतता आहे, पण अन्न नाही अथवा युद्ध आहे अशा ठिकाणांपासून जिथे अन्न आहे, रक्तपात नाही मग भले गोंगाट असेल अशा ठिकाणी लोक स्थलांतर करताना दिसतात. यडपट कुठले! मला वाटतं या असल्या अज्ञ लोकांच्या दृष्टीने गोंगाटाचा प्रश्न महत्त्वाचा होण्यासाठी या लेखकाप्रमाणेच त्यांचेही हे इतर फडतूस प्रश्न सुटले पाहिजेत अशी त्यांची मागणी असावी.

कवितानागेश's picture

9 Jul 2010 - 10:53 am | कवितानागेश

मला शोर सीनेमा आठवला.
आवाजांचा त्रास या विषयावर मी पानेच्या पाने लिहू शकेन.
आम्हीदेखिल ( 'शोर' प्रमाणेच) काही वर्षांपूर्वी 'रिमिक्स' भजनांचा त्रास होउन, आपलेच घर सोडून दुसरीकडे भाड्यानी राहू लागलोय.
........गोन्गाटाचा त्रास या विषयावर पोलिसंसकट कुणाशीही बोलताना, आम्ही हास्यास्पद होवून जातो!
============
( विपश्यनाप्रेमी) माउ