भांडवलशाही

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जे न देखे रवी...
20 Apr 2010 - 6:34 pm

प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि दुर्बीटणेबैंची भांडणशब्द

भांडवलशाही
मधाळ वाणी॥१॥
कैक आमिषे
ठायी ठायी॥२॥
कुटील निती
पांढरपेशी॥३॥
लाल-शहांची
नुसती वळवळ॥४॥
टवाळ फौजा
हीन व हिणकस॥५॥
हिरव्या नाण्याची
व्यर्थ हि खणखण॥६॥
कोण कुणाचे
कुणा कळेना॥७॥
सोयीतून ही
केवळ अडचण||८||

बाकी चालू देत...

हास्यअद्भुतरसहे ठिकाणविडंबनराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

20 Apr 2010 - 6:39 pm | श्रावण मोडक

बाकी चालू देत...
सहमत!!!

धमाल मुलगा's picture

20 Apr 2010 - 7:00 pm | धमाल मुलगा

खतरा...खतरा....खतरा.....
लै लै झक्कास!!!

कोण कुणाचे
कुणा कळेना॥७॥
सोयीतून ही
केवळ अडचण||८||

क्या बात है!!!! प्रचंड वास्तवदर्शी काव्य!
आजच्या काळातल्या क्रूर आणी किळसवाण्या राजकारणाची चोख आणि परखड मांडणी.

बाकी, जमल्यास रसग्रहण वेळ मिळाला की टाकावे अशी इच्छा होते आहे. :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2010 - 7:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धमालरावांना लवकरच वेळ मिळो; आमेन!

अदिती

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 7:07 pm | इनोबा म्हणे

धन्यु...धन्यु...धन्यु...

आजच्या काळातल्या क्रूर आणी किळसवाण्या राजकारणाची चोख आणि परखड मांडणी.

'आंतरजालीय' हा शब्द राहिला की राव! ;)

बाकी, जमल्यास रसग्रहण वेळ मिळाला की टाकावे अशी इच्छा होते आहे.

टाका, नक्की टाका.

छोटा डॉन's picture

20 Apr 2010 - 7:49 pm | छोटा डॉन

"चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहुदेत" असे म्हणतो.
छान समयोचित ;) कविता, आवडली.

वेळ झाल्यास आणि जमल्यास ह्याचे 'रसग्रहण' टाकु. अर्थात हे सगळे आमची 'रिकामटेकडा' ही फेज कधी येतेय त्यावर अवलंबुन असल्याने सध्या त्याची कसलीच गॅरेंटी नाही आहे.
पाहु नंतर जमेल तसे.

------
छोटा डॉन
नव्या वातावरणात सही काय असावी ह्यावर चिंतनशिबिर चालु आहे, लवकरच निर्णय घेण्यात येईल

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 7:55 pm | इनोबा म्हणे

छान समयोचित Wink कविता, आवडली.

धन्यु

वेळ झाल्यास आणि जमल्यास ह्याचे 'रसग्रहण' टाकु

टाका...वाट बघतोय

अर्थात हे सगळे आमची 'रिकामटेकडा' ही फेज कधी येतेय त्यावर अवलंबुन असल्याने सध्या त्याची कसलीच गॅरेंटी नाही आहे.

शेवटचा नाही आहे अगदी हृदयस्पर्षी वाटला.

धनंजय's picture

22 Apr 2010 - 2:36 pm | धनंजय

:-)

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2010 - 7:59 pm | निखिल देशपांडे

ईनोबा..
जमलय हा विडंबन...
बाकी रसग्रहणाच्या प्रतिक्षेत..

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अश्फाक's picture

20 Apr 2010 - 8:05 pm | अश्फाक

इनोबा म्हणत र्‍हावा म्हणतो...

बाकी चालू देत... छान

राजेश घासकडवी's picture

20 Apr 2010 - 10:24 pm | राजेश घासकडवी

काहीतरी गूढ आणि अर्थगर्भ वाचतोय अशी जाणीव झाली... आणि कवितेचा पदर उलगडून आतले भरीव ठसठशीत अर्थद्वय पाहाण्याची इच्छा होते आहे. कोणी तसे करून चित्रदर्शी वर्णन करेल काय? त्यांना एक दूधघुसळ बक्षिस...(मिल्कशेक बक्षिस, भलतं काही घुसळू नका)

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 10:32 pm | इनोबा म्हणे

आमचे डॉनराव नैतर धमालशेठ करतील चित्रदर्शी की कायसे वर्णन.
तेव्हा ही दूधघुसळ =)) त्यांच्यासाठी तयार ठेवा.

कवितेचा पदर उलगडून आतले भरीव ठसठशीत अर्थद्वय पाहाण्याची इच्छा होते आहे
काय राव गुर्जी ;) पिंजरा बघून आला काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2010 - 10:27 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह वाह. इनोबाजींची प्रतिभा बरेच वर्षांनी प्रकटली>
धन्य धन्य झालो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

आनंदयात्री's picture

20 Apr 2010 - 11:22 pm | आनंदयात्री

>>कुटील निती
पांढरपेशी॥३॥
लाल-शहांची
नुसती वळवळ॥४

अगागागा ...काय हाणलाय काय हाणलाय .. जबहर्‍या !!

बेसनलाडू's picture

20 Apr 2010 - 11:27 pm | बेसनलाडू

प्रवाही झाली आहे कविता. हिरव्या नाण्यांची हे गेयसुलभ नाही; हिरव्या नोटा व्यर्थ हि.. असे हवे. अर्थात नाण्यांऐवजी नोटा आल्यास खणखण नि छनछन व्हायची नाही, फडफड होईल :)
(पर्यायसूचक)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 11:30 pm | इनोबा म्हणे

धन्यवाद बेला.
बघू, काही बदल करुन पाहतो.

श्रावण मोडक's picture

20 Apr 2010 - 11:49 pm | श्रावण मोडक

बेलानी सुचवल्यानुसार
हिरव्या नोटांची
व्यर्थ हि फडफड॥६॥

हे बसतं का पहा. आणि फडफड म्हटल्यावर एक वेगळा जोरही येतोय.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2010 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. विनोबा-जी, एक उत्तम कविता. आता अर्थद्वयाच्या दर्शनाची वाट बघतो. :D

बिपिन कार्यकर्ते