स्ट्राँग स्ट्राँगर स्ट्राँगेस्ट डिस्क्लेमर: हे लेखन केवळ मौजमजेसाठी आहे. कोणाचाही वैयक्तीक नावे घेण्याचा उद्देश नाही. मिपा अन इतरत्र असलेली नावे अन या लेखात असलेली नावे, त्यांच्या स्वभावांचा, वैशिष्ठ्यांचा गुणधर्मासहीत कोणास समान वाटत असतील तर तो योगायोग समजावा. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाही. तरीही काही हेवेदावे, तक्रार अर्ज असतीलच तर ते नाडी (आमचीच) पाहूनच सोडवीले जातील.
नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी
हलकी नाडी भारी नाडी
चढायची असेल तुम्हां माडी
सोडावी लागेल तुम्हां नाडी
जाड नाडी बारीक नाडी
सोडा एखादी साडी
वेगळ्या ढंगातली निराळी साडी
पोलीस दिसला तर करा तडजोडी
घरी मिळेल तुम्हांला शालजोडी
नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी
साहित्यसंमेलनात असते तंबाखूची पुडी
आमच्या येथे मिळते घट्ट बांघायची नाडी
नाडी आधी तपासून पाहून घेणे
नंतर बदलून दिली जाणार नाही, आम्हास दोष न देणे ( - हुकूमावरून)
रंगीत नाडी एकदम मॅचिंग नाडी
फिट्ट नाडी, फ्लेक्झीबल नाडी
नाडी मिळेल हव्या त्या आकाराची
कामात येईल कपडे बांधायसाठी
अहो नाना नाडी तुम्ही घ्याना
अहो तात्या, अहो राजे, ओ बिका
अहो देवा, अहो प्रा., अहो मुक्त अन आनंदी, हर्ष तुम्ही पण, गणपा गणपा तुम्ही पण,
नाडी घेवून जा राहू नका कोणीपण
चतूरंगांचे मोठे पोट
पेशल नाडी बनवायची केली त्यांनी नोट
आणिबाणीचा शासनकर्ता आला
आणिबाणीत न दिसता नाडी घेवून गेला
३३% वाल्यांनो शु..चि डू नका,
तुमची नाडी तुम्हालाच मिळेल बरका
एक स्वाती गात येत होती,
तिची नाडी मिळाली म्हणून नाचत होती
प्राजूताई आपली लवकर येई
तिची नाडी ती घेवून जाई
आली आली जयवी
नाडी हवी म्हणे लाघवी
बाकी सार्याजणींना तुम्ही घेवून या
नाडी घेवून क्रांती घडवा
अ (रूं)दिती सांगू तुला किती लवकर याया,
नाडी घ्यायला किती उशीर करतात या बाया!
तुम्ही सगळे या ना
अगदी झाडून ईथले, "ति"थले पण याना
तुमच्या तुमच्याच नाड्या निवडाना
अहो अहो पका काका
तुमची नाडी तुम्ही घेवून टाका
तु पण येरे तु पाषाणा
तुझी नाडी तु घे ना
नाडी तुझी मस्त
नानाकडून घेतलेली चड्डी बसेल फिट्ट
अभय आला
नाडी घेवून गेला
मदण आला
बाण मारूनी नाडी जिंकला
पुणेरी जन आले
लगबग नाडी ल्याले
पराने धमुल मजा केली
म्हणे तो नाडी आली.. नाडी आली
ठाणेरी जन आले
ठण ठण ठण करत नाडी घेवून लोकलने गेले
पिवळे आले, निळे आले, अगदी काळेही आले
हिरव्या देशातले आले, हिरव्या माजाचे आले,
विरजणवाले आले, लोणी चोळणारे आले
संपादक आले, उप(रे) संपादक आले,
कंपूबाज आले, कंपूबाहेरचे आले, पाट्यावरचे आले, काठावरचे आले,
वाचणारे आले, लिहीणारे आले, प्रतिसाद देणारे आले, न देणारे आले,
वादी आले, दैववादी आले, विज्ञानावाले आले,
अ ते झ अन A to Z वाले सगळे आले
आलेरे आले सगळेच आले
नाडी तपासून पाहू लागले
तरीही राहीले असेल कोणी तर...
नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी
हलकी नाडी भारी नाडी
विज्ञान अन निसर्गाची द्या सोडूनी
म्हटले आहे का कुणी?
"नाडी पाहूनी काय होशी?"
सच्च्या मार्गाने न गेले तर नाडीमय होशी
प्रतिक्रिया
6 Apr 2010 - 8:09 am | प्रकाश घाटपांडे
दगडफोड्या
विल्याष्टिकचा जमाना असतानी नाडी कशाला? आमी विल्याष्टिकच कॉश्चुम डिजाईन कव्हाच काल्ढ्याल हाय.
बाकी येक नाडी मात्र जपाया हवी. ती हाय तव्हर आपन हाये. बाकी नाड्यांना लावा काडी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Apr 2010 - 10:28 am | शशिकांत ओक
नाडीची किमया न्यारी आज समजले मला
चला चला उगाच नकोत टिवल्या अन टपला।
झाडून इथले सगळे लागा नाडीच्या कामाला ।।
चित्रगुप्त हुकुमाने बसेल(का)यमपाश गळ्याला।
पाषाणाचा भेद करूनी काव्य उमलले मला।।
नाडीची किमया न्यारी आज समजले मला
नाडीग्रंथावरील अधिक माहितीसाठी
कविराज पाषाणभेद?
6 Apr 2010 - 1:41 pm | पाषाणभेद
ओकसर, आपली खेळकर वृत्ती मस्तच आहे. आनंद झाला.
6 Apr 2010 - 4:22 pm | टारझन
आत्ता जाणावली का तुला ? कामाल आहे !!
एवढी खेळकर,चिकट,चिवट वृत्ती कभी देखी है ?
- पेप्सिकांत कोक
6 Apr 2010 - 5:23 pm | डावखुरा
मी पुर्ण कवीतेत मला शोधत होतो सापड्लोच नाही...
:)) पण हहपुवा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
"राजे!"
6 Apr 2010 - 6:43 pm | चित्रगुप्त
सोडोनि द्या अन्य सार्या लालसा...
टोचोनि घ्या नाडिच्या सर्वांगा-ला लसा
लावोनि घ्या छंद नाडिचा छानसा
वाहु द्या नाडीप्रेम तुमच्या नस-नसा
येईल मग रंग गालावरि... छान... लालसा.....
7 Apr 2010 - 12:32 am | डावखुरा
पुन्हा एकदा............
हहपुवा =)) =)) =)) "राजे!"