तेव्हाच विसापुर बघुन तिकडे जायच नक्की केल.
पण ह्या ना त्या कारणाने ते पुढे ढकलतच गेल.
मग एके दिवशी काही मित्रानी बाहेर जाउन खा खा खादाडी करण्याचा कार्यक्रम करुया का अस विचारल होत.
त्यावर मी माझ्या वाढलेल्या ढेरीकडे बघत त्याआधी एक किल्ला बघुन येवु मगच खादाडी करु अशी एक "पोट"सुचना (:D) दिली.
चारजण तयार झाले. आणि मग रविवारी सकाळी ७ चा मुहुर्त (मीच) ठर(व)ला. आणि मीच ७:३० ला निगडी चौकात गेलो. (पर्फेक्ट आयएसटी :D )
तिथुन निघालो. वाटेत आजुबाजुच्या वातावरणाचा लुफ्त लुटत.
देहुरोडचा गजबजलेला भाग क्रॉस केला आणि एक थोडासा चढ लागला की डाव्या बाजुला टेकड्या आणि डोंगररांगा दिसतात. त्याच एका टेकडीच्या पायथ्याला काही खासमखास दोस्त (ज्याचा कट्टा मराठीत शॉर्टफॉर्म जीडी असा होतो :D ) अशा शाळकरी ५-६ मित्रानी सकाळच महत्वाच काम करता करताच गोलमेज परिषद भरवली होती :D (फक्त ते इन्डीयन ष्टायलीत बसले हुते, मेज नव्हत). ते कदाचित आज दिवसभर काय हुंदुड्या घालायच्या ह्याच प्लॅनिंग करत असतील. ते पाहुन मला एकदमच आमच्या आंतरजालिय कंपुचीच आठवण आली. भविष्यात कंपुबाजीला किती चांगले दिवस येणारेत हे पाहुन उर भरुन यायच्या आतच पुढे गेलो.
एकदा देहुरोडचा गजबजलेला भाग पार केला की पुढे चारपदरी जुना मुंबई-पुणे महामार्ग. त्यामुळे गाडी चालवताना कस निवांत वाटत. ते निवांतपणाच सुख उपभोगत कार्ला फाट्यावरुन गाडी वळवुन मळवलीकडे कुच केल. पुढे लोहगड दिसत होताच. गाड्या भाजे गावात लावल्या. आता तिथे पार्किंगची चांगली व्यवस्था केली आहे. तिकडेच एका टपरीवजा हॉटेलात चाय बिस्कुटाचा कार्यक्रम उरकुन एक दो एक करत निघालो गायमुख खिंडीकडे. ह्याच रस्त्यावर जाताना भाजे लेण्याच्या जवळच एक निर्मल बालग्राम दिसत. बरीच मुल आहेत. ते अनाथाश्रम असाव अस वाटत.
पुढे चालत राहिलो. वाटेत येणारी काही झाड पहात ओळखत निघालो. काही झाडांची ओळ्ख पटली काहींची नाही. मग लक्षात आल की बरीच झाड फुलली आहेत. त्यांची नाव माहिती नाहितच पण फोटो काढायला काय हरकत आहे म्हणून फोटो काढत काढत निघालो. खरतर झाडांनी रंगपंचमी खेळली आहे असाच भास होत होता. :)
मग थोडासा चढ लागला. ह्याच रस्त्यावरुन आम्ही मागच्या वेळी दुचाकी नेण्याचा पराक्रम केल्याची आठवण आली. (दुचाकी राजाची आणि चालवणारा राजाच. (राजे नव्हे)) वाटेत एक वेगळा पक्षी दिसला.
फोटो काढायला फोकस करेपर्यंत तो उडुन जात होता. ५ मिनटानी तो प्रयत्न सोडुन दिला आणि हाशहुश करत पुढे पुढे जात राहिलो. शॉर्टकट शॉर्टकट आहे म्हणुन एका ठिकाणी घुसलो आणि पुढे पुढे जात राहिलो आणि अजुन पुढे गेलो तर समोर एक दरी. :D
मग रस्ता चुकल्याच लक्षात आल. आणि मग डाव्या बाजुच्या झुडुपातुन घुसलो. कस बस परत योग्य रस्त्याला आलो. तिथे एक टपरी आहे त्या काकांकडे लिम्बु सरबत पिउन फ्रेश झालो. त्यानाच कन्फर्म करण्यासाठी विसापुरचा रस्ता विचारला. (सलामीलाच रस्ता चुकल्यावर हे गरजेच असत भो)
मग त्यानी मी म्हणत असलेला रस्ता न घेता दुसराच एक रस्ता सुचवला. घोड्याचा पुतळा ही त्या रस्त्यावरील महत्वाची खुण आहे असही सांगितल. त्या पुतळ्यापासुन डावीकडे वळा अशी सुचना त्यानी दिली. रस्ता नीट आहे का अस माझ्या सुटलेल्या पोटाकडे बघत मी त्याना विचारल. त्यावर ते काका बोलले सोपा रस्ता आहे बिनधास्त जा.
मग आम्हीबी बिनधास्त निघालो की.
एक ठिकाण अस आल कि सरळ गेल की लोहगड आणि डावीकडे त्या मामानी सांगितलेला रस्ता.
मग तिथुन डावीकडे वळालो. आणि लोहगडाकडे पाठ करुन निघालो पुढे.
हा लोहगड असा दिसत होता.
हा विसापुरचा कडा
हे वाटेत दिसलेल एक फसवं फळ. हे लांबुन करवंदासारखच दिसतं.
पुढे गेल्यावरच हे विसापुरच दर्शन. हे दोन डोंगर जवळपास काटकोनात मिळतात. त्या खबदाडातुनच रस्ता आहे. (अर्थात हे आम्हाला फार उशीरा कळाल)
हा आला खुणेचा घोड्याचा पुतळा.
आणि हाच तो डावीकडे वळलेला रस्ता.
आता आम्ही खुश. कारण रस्ता सापडला. मग त्याच रस्त्याने पुढे चालत गेलो. थोडसच पुढे गेल्यावर एक ओढ्याचा रस्ता डावीकडे दिसला पण तो मध्येच झाडाझुडुपामध्ये घुसत असल्याने आम्ही त्याचा अन्नुलेख केला आणि मोठा तोच रस्ता कुठेही न सोडता चालत राहिलो.
अस अर्धा तास चाललो असेल पण गडाचे तासलेले कडेच सगळीकडे दिसत होते. मनातल्या मनात जळ्ळ मेलं लक्षण (माझच रस्ता चुकण्याच :D ) अस म्हणत पुढे जात राहिलो. अचानक एका डावीकडच्या पानगळ झालेल्या झाडावर एक घार की गरुड दिसल. मोठ्या रुबाबात बसलेला तो पक्षी पाहुन कॅमेरा त्याच्यावर फोकस करेपर्यंत त्या पक्ष्याने आपले मोठे पंख पसरुन एक डौलदार भरारी घेतली आणि तो दिसेनासा झाला. खरच त्याचा फोटु मिळाला असता तर लय भारी वाटल असत.
अजुन १०-१५ मिनट चालल्यावर मी ग्रुपमधल्या बाकीच्या मित्राना हळुच सुचीत केल की आपण रस्ता चुकलो असण्याची शक्यता आहे. मग एका जागी थांबुन पाणी पिउन तसच पुढे जाउन असा निर्णय झाला.
तसच पुढे जात राहिलो. आताशा आमची गडाची जमिनीवरुनच नुसतीच प्रदक्षिणा सुरु झाली आहे हे लक्षात आल कारण गडाने वळण घेतल आणि अर्थात आम्ही पण.
मग वाटेत एक दोनचारच घर असलेल गाव होत. तिथे गेलो आणि एका आज्जीबाईना विचारल की विसापुरला जायच आहे रस्ता कुठुन आहे.
त्या आज्जीने उत्तर द्यायच्या आतच घरातुन चिल्लीपिली गँग बाहेर आली. त्यातल्याच एकाने चला रे ह्यास्नी रस्ता दाखवुन येवु अस बाकीच्याना सांगितल.
मग आम्हा चार जणाना रस्ता दाखवायला ते ५ जण आले. (३ मुल आणि २ मुली)
इथे मात्र मला आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला गुर चारायला घेवुन जायचा प्रोग्राम आठवला.
आमची गुर ३-४ आणि चारायला नेणारे गुराखी मात्र ६-७ :D
मग त्याना वाटेतच काही प्रश्न विचारले उगाचच टाइम पास म्हणुन. त्या पोरानी पण भारी उत्तर दिलीत.
आवडता हिरो सलमान खान हे सगळ्यान इन्टरेस्टिंग उत्तर होत. :)
अंगावरचे मळके कपडे, काही फाटलेले, पायात चप्पलदेखील नाही पण मनात उत्साह मोठा आणि चेहर्यावर खुपच समाधानी भाव असे होते ते ५-६ जण. माझ्या मनात विचार की ह्याना शाळा किती लांब पडत असेल? हे नीट शिकत असतील का? ह्यांच्या घरी काही इमर्जन्सी असेल तर हे कसे पार पाडत असतील? ह्यांच्या घरी कोणी नोकरी करत असेल का? नसेल तर ह्यांच शेतीत भागत असेल का?
ह्या मुलांच फ्युचर काय?? असे काहिसे विचार येत होते.
पण कदाचित आपली आणि त्यांची सुखाची फुटपट्टी वेगळी असेल. आपली पट्टी तिकडे चालत नसेलच.१०-१५ मिनटानंतर त्यानी एक रस्ता दाखवुन ह्याच रस्त्याने पुढे जा वाट सापडेल अस सांगुन आमचा निरोप घेतला. आम्ही त्याना खाउसाठी थोडेसे पैसे दिले. ते घेवुन पोट्टे धुम सुटले.
हा त्यांचा फोटु. फोटो काढतो म्हणल्यावर लाजत लाजत तयार झाले सगळे. :)
त्यानी सांगितलेल्या रस्त्यावरुन गेलो तर परत झाडझुडुपातुन फाटे फुटलेले अनेक पायवाटा. मग देवाच नाव घेवुन आणि किल्ला जास्त लांब जाणार नाही अशी वाट पकडुन आम्ही चालतच राहिलो.
एव्हाना आमची किल्ल्याची प्रदक्षिणा पुर्ण होत आली होती अजुन रस्ता सापडत नव्हता.
सुदैवाने पुढे काही माणसांचे आवाज आले मग एका झुडुपातुम घुसुन पुढे जावुन पाहिल तर तिथेही काही ट्रेकर मंडळी वाट शोधत असलेली दिसली. मग आम्ही त्याना आलेल्या बाजुने वाट नाहिये अस सांगितल. इतक्यातच त्याना वर जाणारे काही लोक दिसले आणि मग ती झुडुपात अद्रुश्य असलेली वाटदेखील.
आता आम्ही फार डोक न लढवत त्याच वाटेन निघालो. सोबत तो ग्रुप होताच.
पुढे झुडूप कमी झाले वर मोडतोड झालेल्या पायर्या आणि दगडांची वाट दिसली.
अर्थात ही वाट आम्ही सुरवातीला शोधत असलेल्या वाटेपेक्षा वेगळीच होती. पण आम्हाला किल्ल्यावर पोचल्याशी मतलब होता. मग थोडासा चढ लागला. थांबत थांबत रस्ता पार करत निघालो.
वाटेत पाण्याच्या प्रवाहामुळे कोरला गेलेला पहाड दिसला.
मग दिसली हनुमान गुहा. खरतर ह्या दोन गुहा आहेत. बर्याच प्रशस्त गुहा आहेत.
हा त्या गुहेपासुन वर जाणारा पायर्यांचा रस्ता.
फक्त तेवढ्याच पायर्या सुस्थितीत आहेत.
शेवटी एकदाच किल्ल्यावर पोचलोच. रस्ता चुकल्यामुळे जवळपास ८-१० किमी जास्तीच चालण झाल होत.
पण किल्यावर पोचल्यावर ते श्रम विसरुन गेलो.
एका ठिकाणी बसुन थोडासा नाश्ता केला.
मग किल्ला बघत फिरलो.
किल्यावर फारस काही नाहीये. एक तोफ दिसली. काही ठिकाणी शिल्लक असलेली तटबंदी, पाण्याचे बरेचसे टाके, एक बुरुज आणि किल्ल्याच्या मध्ये असलेल्या टेकाडावर जंगल.
फिरताना काही मोठी मोठी हाडकं दिसली किल्ल्यावर. ती बघुन इकडे जंगली जनावर असतील काय अशी क्षणभर भिती वाटली होती.
तिथल्याच एका स्वच्छ अशा टाक्यामध्ये हात पाय धुतले. पाय सोडुन बसलो. मग जरा फ्रेश वाटल.
किल्याचा विस्तार बराच आहे.
आता परतीचा रस्ता तोच असेल ज्या रस्त्याने आलो तोच असेल तर आमची वाटच लागणार होती. कारण कडाक्याच्या उन्हात भरपुर चालुन आम्ही थकलो होतो. पाणी संपत आल होत आणि आम्हाला अजुन लोहगडदेखील करायचा होता. मग किल्ला बघतच वरुन कुठे रस्ता दिसतो का (जो लोहगडाच्या जवळ घेवुन जाइल) हे पाहिल. कुठे काहीच दिसल नाही. अचानच्क एका ठिकाणाहुन झुडुपातुन काहीजण बाहेर आलेले दिसले. मग तो रस्ता शॉर्टकट हे लक्षात आल. वरुन पाहिल तर रस्ता बराच घसरणीचा दिसत होता पण वाटेत बरेच दगड धोंडे असल्याने उतरायला जमेल अस लक्षात आल.
मग काय तिथुन दगडांवर जपुन पाय देत सावकाश उतरलो. आणि पुढे जाउन बघतोय तर काय खुणेचा घोडा :D
मग लक्षात आल जाताना ओढ्याची वाट म्हणून ज्या वाटेचा आम्ही वाटेचा अन्नुलेख केला तीच ती जवळची वाट. मग ह्या घोड्याने आम्हाला घोडा लावला अस मनाशी घोकत घोकत लोहगडाकडे कुच केली. पायथ्याच्या गावाशी पाणी भरुन घेतल. कोल्ड्रिन्क पिउन लोहगडावर जाउन सगळ बघुन आलो.
मग तिथुन परत पार्किंगपर्यंत चालत आलो. तेव्हा मात्र पायानी संप पुकारण्याचा इशारा दिला होता.
असा एक वाट चुकत चुकत केलेला हा ट्रेक.
हा एक कोलाज केलेला फोटु.
अजुन काही फोटो आहेत ते खालील लिन्क वर.
प्रतिक्रिया
21 Mar 2010 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकासराव, फोटो आणि वर्णन एकदम झकास.
पोरांचा फोटो तर एकदम स्सही..!
काही फोटोंचा आकार खूप मोठा झाला आहे तर काहींचा खूप लहान. मांडणी व्यवस्थित नसल्यामुळे चांगल्या लेखनाची मजा जाते असे वाटते.
-दिलीप बिरुटे
21 Mar 2010 - 6:08 pm | अरुंधती
फोटो सहीच! पण जरा त्यांच्या मांडणीचं बघा ना परत.... विस्कळित वाटतंय!
पलाश पुष्पांचा, फसव्या करवंदांचा, हनुमान गुंफांचा (वाटलं, ओलं फडकं घेऊन स्वच्छ पुसावं त्या गुंफांवर खडूनं खरडलेलं), मुलांचा व भेळेचा फोटो लई आवडले!
:)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
21 Mar 2010 - 10:04 pm | अनिल हटेला
झकासरावांचा ट्रेक एकदम झक्कास....:)
पोट्ट्यांचा फोटो लै आवडला....
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
21 Mar 2010 - 11:21 pm | उल्हास
पोट्ट्यांचा फोटो लै आवडला....
वर्णनही सुरेख
22 Mar 2010 - 6:52 am | हर्षद आनंदी
रस्ता चुकण्याची मजा ट्रेक मध्ये काही औरच...
ध्येय समोर दीसत असताना, रस्ता नाही म्हणुन जी तडफड होते ती अनुभवण्यात अर्थ आहे. रस्ता सापडल्यावर जी शांतता लाभते ती अवर्णनीयच..
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||