२०१०-विजयी भव!!!

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
30 Dec 2009 - 8:47 pm

२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे.

माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो. अनेक संकल्प / ठराव मनात केले जातात आणि काहीवेळेस सातत्याच्या अभावी रोजच्या धबडक्यात कोठेतरी जिरले जातात अथवा विरले जातात.

या वर्षासाठी मी मात्र परत एकदा आशावादी आहे, अनेक संकल्प पुर्णत्त्वास नेण्याचा विचार मी मागच्या १०/१२ दिवसापासुन करत आहे.

व्यक्तिस्मरण : आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ति आपल्या आचारांनी विचारांनी आपल्यावर प्रभाव टाकत असतात. अश्या व्यक्तिंची यादी करणे आणि रोजच त्यांच्या दुर्मिळ आणि प्रिय गुंणाचा प्रत्यय घेत जाणे. कोणी व्यक्ति अफलातुन विचार करत असते तर कोणी आपले जीवनच एखाद्या गोष्टीसाठी वाहुन टाकत असते. अश्या मोजक्या व्यक्तींचे नित्य स्मरण करणे.

गुणोपासना : अनेक गुण आपल्यात कमी आहेत आणि त्याचा उत्कर्ष अथवा विकास आपल्यास आपल्याला हवे असलेले सुख, समाधान देईल याची आपल्याला खात्री असते. अश्या गुणांना स्मरत राहणे कोणास ठाऊक त्यांच्या प्रत्यक्ष गुंणाचा विकास आपल्या मनःपटलावर होऊनही जाईल. उदा नम्रता, मृदुता, मैत्री, क्षमा भावना इत्यादी इत्यादी.

साधना : जीवनाचा नेमका हेतु काय आहे हे फक्त त्या इश्वरासच ठाऊक असावे. पण त्यासाठी आपण काही तंत्र वापरु शकतो. उदा ध्यान, व्यायाम, जप, प्रार्थना, योगासने इत्यादी इत्यादी. यावर्षी यासर्वांमध्ये सातत्य आणण्याचा विचार आहे. पाहु या काय ते घडते?

चला आपल्या सर्वांनाही २०१० विजयी असो अशी सद्बभावना.

द्वारकानाथ कलंत्री.

सध्या मुक्काम राजकोट, गुजरात.

जीवनमानराहणीमौजमजासद्भावनाशुभेच्छासमीक्षा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

31 Dec 2009 - 7:39 am | मदनबाण

कंलत्री काका,आपल्यालाही नविन वर्षाच्या शुभेच्छा... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विनायक प्रभू's picture

31 Dec 2009 - 7:44 am | विनायक प्रभू

बर्‍याच दिवसानी मिपावर दिसल्यामुळे कका विजयी भव.

विजुभाऊ's picture

31 Dec 2009 - 9:37 am | विजुभाऊ

कलंत्री काका
तमे घणा दिवसो पछी देखाया. क्या हता ?
अहीं तमने जोईने सारु लाग्यू.
आवता रहेजो.

गुजरात मध्ये मुक्काम केला आहे. काय विशेष? आजकाल मिपावर येणे खुप कमी केलेत. परत एकदा सर्व मिपाकरांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

31 Dec 2009 - 10:21 am | पर्नल नेने मराठे

उदा नम्रता, मृदुता, मैत्री, क्षमा भावना इत्यादी इत्यादी

उदा ध्यान, व्यायाम, जप, प्रार्थना, योगासने इत्यादी इत्यादी.

ह्म्म...
चुचु

मी_ओंकार's picture

31 Dec 2009 - 10:49 am | मी_ओंकार

कलंत्रीकाका आणि सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

- ओंकार.