भिगवणचे परदेशी पाहुणे

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in कलादालन
15 Dec 2009 - 11:41 pm

मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.

सर्व हक्क सुरक्षित.

कलाप्रवासभूगोलमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

लवंगीमिरची's picture

15 Dec 2009 - 11:51 pm | लवंगीमिरची

मस्त!!

रेवती's picture

16 Dec 2009 - 12:41 am | रेवती

छान फोटो!
मी शाळेत असताना बाबा आम्हाला फक्त फ्लेमिंगो दाखवण्यासाठी भिगवणला घेऊन गेल्याचे आठवते. त्यावेळी साधारणपणे दोनेकशे फ्लेमिंगो पक्षी होते. बराच वेळ लांबून निरिक्षण केल्यावर हळूहळू जवळ जायला निघालो तर आमची चाहूल लागल्याने सगळे एकदम उडाले. आधी पांढरे दिसणारे उडाल्यावर केशरी झाले त्याचे फार आश्चर्य वाटले होते. सॅन डिएगो झूमधले मात्र तसेही केशरीच दिसत होते.

रेवती

भटकंती अनलिमिटेड's picture

16 Dec 2009 - 12:52 am | भटकंती अनलिमिटेड

रेवती,

हे तुझ्या चित्रात दिसत आहेत ते लेसर फ्लेमिंगो आहेत. आणि भिगवणला दर वर्षी येणारे पाहुणे म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो.

आणि पंखांना येणारा गुलाबी-लाल रंग ही एक प्रकारची बुरशी असते.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

रेवती's picture

16 Dec 2009 - 1:00 am | रेवती

ते लेसर फ्लेमिंगो आहेत.
अच्छा, असे आहे तर....
बुरशीही केशरी रंगाची असते हि नवीन माहिती आहे.
धन्यवाद!

रेवती

धनंजय's picture

16 Dec 2009 - 1:18 am | धनंजय

दुसरे चित्र फारच आवडले. त्यात प्रसंगवर्णनाची गती आहे.

पहिल्या चित्रात धुवट आकाशाचा मोठा भाग मला पटला नाही. वरचा अर्धा भाग कातरून मला तरी चित्र अधिक आवडले.

(रोहित पक्ष्यांचा रंग त्यांच्या खाद्यपदार्थांमधील कॅरोटिनॉइड द्रव्यामुळे असतो. बुरशीमुळे बहुधा नसावा.)

चतुरंग's picture

16 Dec 2009 - 1:28 am | चतुरंग

विकीवरल्या ह्या दुव्यावर असं स्पष्ट लिहिलंय की त्यांचा केशरी रंग हा त्यांच्या खाण्यातल्या 'बीटा कॅरोटीन' मुळे असतो. (हे द्रव्य गाजरांमध्ये मुबलक प्रमाणात असते)

चतुरंग

अनामिक's picture

16 Dec 2009 - 1:18 am | अनामिक

दुसरा फोटू काय भारी आहे राव!

-अनामिक

स्वाती२'s picture

16 Dec 2009 - 2:10 am | स्वाती२

दुसरा फोटो आवडला

टुकुल's picture

16 Dec 2009 - 10:19 am | टुकुल

दोन्ही फोटो आवडले.

--टुकुल

jaypal's picture

16 Dec 2009 - 10:56 am | jaypal

दोन्ही फोटो आवडले
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

16 Dec 2009 - 10:59 am | मदनबाण

दोन्ही फोटो मस्त आहेत,पण दुसरा जास्त आवडला...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

नंदू's picture

16 Dec 2009 - 8:40 pm | नंदू

दोन्ही फोटो आवड्ले.
दुसरा मात्र अप्रतिम आलाय.

नंदू