......आणि मग

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
12 Dec 2009 - 10:49 pm

......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी.
तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री.
जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास.
येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी .....

लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल.
दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल .
चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील. प्रसन्न दिन, मिलनहर्षित संध्या ,आल्हाद निशा भोजनं आपल्या रोजच्या होतिल.
थोड्याच दिवसात त्या घट्ट जन्म-बंधनं बनतिल.

मग संपेल सुटी जाशील तु माझ्या लाडक्या...
दूर-देशी!!

खिळतील मग ती स्वप्नसत्ये .जाइल ती गंधपालवी अन् तु ही आमच्या जीवन चैतन्या....
मनात तुमच्या घेउनी या फुलसाठवणी , उडशिल रे पिल्ला .....
पुन्हा घेण्या गगन भरारी....

कौतुक तुझं करु आम्ही ...."जा बाळा पुढं" असं म्हणुही आम्ही.
पण कुठंतरी जीवनात आमच्या हळवी हाक ठेउनी.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नको बाळा नको ...होउच नकोस मोठा
नाहितर आइंच्या आलं नशिबी तसच होइल आमच्या भाळी.
निजला रहा असाच कुशीत, निरागस हसु घेउनि.

मुक्तकजीवनमानप्रकटनविचारलेखविरंगुळा