क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अॅप्रायझल आठवलं :< 8} ~X(
असो..
ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे
टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे
त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी!
मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे
आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे
माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे!
नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!"
सुंदर रिसोर्सच्या नावे ठरवून ठेवती माया,
निश्चिंत, होउनी म्हणती ; मरतील, मरो मरणारे!