भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.
तरीही लोकांनीच ही चळवळ जिवंत ठेवली पाहिजे, आणि मिपा सारखे लोकप्रिय ब्लॉग्ज या संदर्भात महत्वाची भुमिका वटवू शकतात असं वाटतं म्हणून फारसा गाजावाजा न करता सुरू झालेल्या एका महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष वेधायचा हा प्रयत्न आहे.
आर टी आय इंडिया डॉट ऑर्ग या संस्थळावर / फोरम वर आपण success stories वाचू शकता, तसंच कित्येक चौकश्यांचा पाठपुरावा करू शकता.
या संघटनेने चालू केलेल्या आर टी आय व्हिडीओ कम्युनिटी वर या संदर्भातील व्हिडीओज् देखील अपलोड करू शकता.
माझं खास recommendation: लोकनाद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेला हा व्हिडीओ जरूर पहा!
प्रतिक्रिया
26 Nov 2009 - 2:20 am | Nile
आर टी आय हे भारतीय नागरीकाच्या हातात असलेलं एक ताकदवान अस्त्र आहे. अस्त्र अशाकराता की भ्रष्टाचाराविरुद्धच्या सर्वसामान्यांच्या 'लढ्यात' ह्याचा रोल फार महत्त्वाचा आहे. हळु हळु भारतीय नागरीक, 'यहा पे ऐसा ही होता है' या मानसिकतेतुन बाहेर पडत आहेत असे दिसते. ब्लॉग्स इ. माध्यमातुन सर्वसामान्यांना आपलं म्हणणं मांडण्याचं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुलभ माध्यम मिळालं आहे. आशा आहे याचा सकारात्मक परिणाम लवकर दिसु लागेल.
धन्यवाद या माहिती बद्द्ल बहुगुणी साहेब.
26 Nov 2009 - 2:40 am | स्वाती२
माहितीबद्दल धन्यवाद.
26 Nov 2009 - 3:18 am | गणपा
बहुगुणी अतिशय महिती चांगला दुवा दिलात.
धन्यवाद.
26 Nov 2009 - 3:39 am | विकास
चांगला आणि समयोचित विषय तसे माहीतीपूर्ण संकेतस्थळ.
अधिकृत संकेतस्थळपण माहीतीपूर्ण आहे असे वाटले. (फायरफॉक्स मधे फाँट्सचा प्रश्न उद्भवत आहे).
26 Nov 2009 - 3:42 am | अजिंक्य पोतदार
खूप छान आणि उपयोगी माहिती. धन्यवाद
-अजिंक्य पोतदार
26 Nov 2009 - 3:49 am | धनंजय
धन्यवाद.
26 Nov 2009 - 4:18 pm | धमाल मुलगा
धन्यवाद!!
चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार!
26 Nov 2009 - 4:57 pm | सुनील
एका चांगल्या स्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. RTI च्या अधिकृत स्थळाच्या दुव्याबद्दल विकास यांनाही धन्यवाद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Nov 2009 - 5:24 pm | उग्रसेन
माहितीबद्दल धन्यवाद.
अशोक कामटेंच्या पत्नीनं माहिती अधिकाराचा वापर करुन त्यायनी
माहिती मिळवली. 'टू दि लाष्ट बुलेट' आत्मचरित्राबद्दल त्या काय म्हण्तेत ध्यान करुन वाचा.
बाबुराव
26 Nov 2009 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बहुगुणीजी धन्यवाद.
अदिती