सक्काळी सक्काळी जिवाची एवढी 'तगमग' कधीच झाली नव्हती! सोसवेचना!! :T :O :S
हा खून झाला नसता तर दिवसभर कामात लक्ष लागलं नसतं!! ~X( शेवटी एकदाचं हे उतरवलं तेव्हा कुठे तगमग कमी झाली.....
हेलनचे ठुमकते झटके दिल रिझवतायत..
अन् मी उन्मुक्त दंगबावरा
भिरमिटलोय नादखुळ्या प्रत्यंगरेषा धुंडाळत
त्याच त्या मस्कारागहिर्या रंगीतचुका
पबरसिकांचा टकीलाटाहो
रक्तवर्णवारुणीचा खंबा पराभव
अन् प्रति बिंदूचा जादूटोणा
झक (मारली)!
अन् असल्याच शब्दांच्या कविकिरडूंच्या
"गस्त गं, सुस्त गं, पाणी भरलं का गं, मंद कल्पना गं, काहीच सुचतं नाही गं.."
असल्या श्लेष्मल कविता वाचल्या!!
उकळ्या उकळ्या आनंदाच्या कि दु:खाच्या
वाटते सांगावे ह्या लेखणीबहाद्दरांना, नका हो विडंबकांची लावू वाट ..
की या टांगापलटी-घोडेफरार मद्यमनस्कतेचा
विडंबनाच्या भिंतीत चिणून
करावा आणखी एक 'रंगीत' खून??...
(खुनी)चतुरंग
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 6:40 pm | अवलिया
चला तुमचीही लगबग झालीच तर.....
--अवलिया
9 Mar 2009 - 6:41 pm | चतुरंग
एका दमात एरंडेलाची अख्खी बाटली घशाखाली गेली तर दुसर्या मिनिटाला मुक्कामपोस्ट बंद दरवाजा होणारच हो!!
चतुरंग
9 Mar 2009 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते
माझाच खून झाला आहे असं वाटायला लागलंय आता...
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 6:45 pm | चतुरंग
ठकठक ऐकू आली!!
वाटलं बिका आलेत की काय सूक्ष्मदेहाने!! ;)
चतुरंग
9 Mar 2009 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपिनने "आता पुरे..." असा दम मारला आहे त्यामुळे आता मी काहीही प्रतिसाद देणार नाही! ;-)
रंगाशेट, लय भारीच. पण मी असं म्हटलं आहे हे बिपिनला सांगू नका.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
9 Mar 2009 - 6:44 pm | लिखाळ
जोरदार .. मद्यधुंद तगमग आवडली
टकिलाटाहो एकदम उच्च !!!!!
-- लिखाळ.
9 Mar 2009 - 6:54 pm | सहज
:-)
दारु बी चढना आज इतकी तगमग
9 Mar 2009 - 7:06 pm | श्रावण मोडक
चढते ती अशी. मूळ वाचून खल्लास झालो होतो. आता ल्हास...
9 Mar 2009 - 7:45 pm | प्राजु
=)) =)) =)) =))
अगदी ठोकून ठोकून काढून खून केला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Mar 2009 - 8:39 pm | रेवती
हेलनचे ठुमके?
माझं लक्ष आहे बरं का!
रेवती
9 Mar 2009 - 8:57 pm | क्रान्ति
एक तगमग, दुसरी लगबग, पुन्हा तगमग, आता पुढे काय? भगभग तर नाही न?
क्रान्ति
10 Mar 2009 - 2:28 pm | जयवी
पुन्हा एकदा खून........ अन तो ही रंगीत...... चालू द्या .... आजच रंगपंचमी सुरु केलीये तुम्ही लोकांनी तर :)