(रांधण्याची शिकवणी)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
4 Mar 2009 - 8:31 pm

पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले! ;)

मी म्हटलं चुकून,
मलाही शिकव ग रांधायला.
तर म्हणते कशी
माझ्या मनातलं बोललात.
कितीतरी दिवसात
बघा गवार निवडली नाहीत
रसाच्या भाजीसाठी!
* * * *
म्हणे,
आधी थोडंच तेल जेमतेम
मग
हिंग हळद मिरची.
जिरं टाकून ठेवा आचेवर
नंतर
ठेवणीतला अनवट गरम मसाला.
म्हटलं
राग राग करुन
स्वयंपाक शिकवतात का ?
म्हणे,
तुम्हाला म्हणजे उरक कसा
बिलकूल नाही गडे.
जिथेतिथे बघावं
तर तेल अन हळदीचे सडे!

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Mar 2009 - 8:38 pm | अवलिया

ठ्ठो!!!

हुच्च!!!
:)

--अवलिया

राघव's picture

5 Mar 2009 - 12:12 pm | राघव

मस्त लिहिलेत रंगराव!

रंगदादा से बातां: तुमच्याकडे विडंबन करणे शिकायला यावे म्हणतो .. कसे? :?

(विद्यार्थी)मुमुक्षु

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 8:40 pm | लिखाळ

तुम्हाला म्हणजे उरक कसा
बिलकूल नाही गडे.
जिथेतिथे बघावं
तर तेल अन हळदीचे सडे!

कमाल आहे.

मिसळणाचा डबा हळूच उघडला पाहिजे.. नाहितर मोहरी-हळद-तिखट एकत्र होतं :)
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2009 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला हे एक गृहस्थ आहे भो मिपावर...आली कविता की कर दळण.
यांच्याच धाकाने माझ्यातला कवी मेला...:)

तुम्हाला म्हणजे उरक कसा
बिलकूल नाही गडे.
जिथेतिथे बघावं
तर तेल अन हळदीचे सडे!

च्यामारी...हहपुवा झाली ! :)

-दिलीप बिरुटे

हा धाक नसून प्रेरणा समजावी! म्हणजे वडिलधार्‍याचा प्रेमळ धाक असतोना तसे! ;)
तुमच्या कविता येऊद्यात हो प्राडॉ.

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2009 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चारोळी,आरोळी, मुक्तछंद...काही तरी टाकतोच.
फक्त तुम्हाला कामामुळे मिपावर कधी यायला जमणार नाही तेवढे कळवा...:)

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

5 Mar 2009 - 9:08 am | छोटा डॉन

बिरुटेसरांची प्रतिक्रिया म्हणजे कवीचे प्रामाणीक प्रतिपादन वाटले.
चालु द्यात, मज्जा येते आहे ...

बाकी रंगाशेठ, समजा बिरुटेस्रांनी कविता टाकली आणि दैवयोगाने तुम्ही इथे नसाल तर "विडंबन खतरे मे है " म्हणुन आम्ही स्वतःच ह्यात उतरु व एक विडंबन लिहुन टाकु.

आणि हो, विडंबन मस्त ह्यात वादच नाही.
शॉल्लेट मज्जा आली, चालु द्यात ...

------
( हंगामी विडंबक + स्वयंपाकी ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

शितल's picture

4 Mar 2009 - 9:22 pm | शितल

>>>यांच्याच धाकाने माझ्यातला कवी मेला...
=))

भडकमकर मास्तर's picture

5 Mar 2009 - 12:32 am | भडकमकर मास्तर

ह्येच मन्तो...
... ब्येष्ट कविता आहे...
फक्त मूळ कवितेतलं श्रुंगाराचं ( किंवा इथे अजून कसलं) सेकंड डायमेन्शन कुठे सापडतंय का पाहत होतो... :)
तसं काही झालं असतं तर अजूनच मजा आली असती...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

4 Mar 2009 - 8:50 pm | सहज

झकास विडंबन रंगाशेठ.

शितल's picture

4 Mar 2009 - 9:24 pm | शितल

सहमत..

क्रान्ति's picture

4 Mar 2009 - 8:58 pm | क्रान्ति

बहुतेक रोज होत असेल रांधण्याची अशी शिकवणी! मस्तच केलय विडंबन. नंतर तेल हळदीचे सडे पण स्वच्छ करावे लागत असतील ना?
क्रान्ति

रामदास's picture

4 Mar 2009 - 9:07 pm | रामदास

बिये किंवा एमेच्या अभ्यासक्रमात येणार तुमची विडंबनं.
चला या निमीत्तानी लोकं वाचतील अडगळीतल्या कविता

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 9:20 pm | विनायक प्रभू

अरे भौ रंगा
कीती करतोस रे दंगा
विडंबन करुन
रामदासांना दाखवला ठेंगा

चित्रा's picture

4 Mar 2009 - 9:54 pm | चित्रा

तुम्हाला म्हणजे उरक कसा
बिलकूल नाही गडे.
जिथेतिथे बघावं
तर तेल अन हळदीचे सडे!

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले :)
काय खरं नाही!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 10:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले
काय खरं नाही!

खरंच डोळ्यासमोर चित्रं आलं, पण कोणाचं खरं नाही? ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

चित्रा's picture

4 Mar 2009 - 11:46 pm | चित्रा

असे नक्की कोणाचे खरे नाही, ते खरे खरे सांगून का बरे पुढच्या वेळी चांगलेचुंगले (आयते) खाण्याचे आमंत्रण चुकवू? ;)

संदीप चित्रे's picture

4 Mar 2009 - 11:50 pm | संदीप चित्रे

आवडलं रे..
>> माझ्या मनातलं बोललात.
कितीतरी दिवसात
बघा गवार निवडली नाहीत

>> तुम्हाला म्हणजे उरक कसा
बिलकूल नाही गडे.
जिथेतिथे बघावं
तर तेल अन हळदीचे सडे!

हे तर विशेष आवडलं :)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 11:55 pm | बिपिन कार्यकर्ते

खरं आहे.... आली कविता की कर विडंबन... आणि ती पण एकदम कडक.... कौनसी चक्की का आटा खाते हो, ठाकूर?

बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू's picture

5 Mar 2009 - 12:36 am | बेसनलाडू

फार मस्त!
(स्वयंपाकी)बेसनलाडू

नंदन's picture

5 Mar 2009 - 1:17 am | नंदन
प्राजु's picture

5 Mar 2009 - 8:54 am | प्राजु

बाकी शिकवणी पूर्ण झाली की सांगा.. येतो आम्ही ती रसा भाजी खायला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जयवी's picture

5 Mar 2009 - 4:32 pm | जयवी

कहर आहे अगदी :) ह ह पु वा !!

केशवसुमार's picture

8 Mar 2009 - 10:19 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
जोरात चालू आहे..चालू दे..
(अंमळ उशिरा प्रतिसाद देणारा) केशवसुमार