आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी. तो पण त्याचं कंपनीत होता ज्यातून मी सुरवात केली होती जिवनाची. आज तो मोठा झाला पण मला नाही विसरला. परदेशात होता. आता पिंक स्लिप मुळे परत आला. काही महिन्यापुर्वी भेटला होता. त्याने घरी बोलावलं म्हणून गेलो. तर ह्याची अवस्थाच बिकट झालेली त्याला काहीच कळतं नव्हतं काय करावे, जो भेटेल त्याच्या कडून सल्ले मागायचा माझ्या कडून ही मागितला. मी अडाणी काय सल्ला देऊ त्याला. हाच लेखन प्रचंच.
****
ती- त्यांची बायको
तो- वरील मित्र
मी- मीच.
छकुली - त्यांची छोटी मुलगी.
स्थळ- त्यांचेच घर.
****
ती- तु बघतो आहेस ना कसा तुटला आहे तो
मी- वहिनी कळजी नका करु सर्व होईल सुरळीत.
ती- मी पण हेच म्हणतं आहे पण हा.
मी- दादा, असं का करता तुम्ही शिकलेले सवरलेली माणसं तुम्ही.
तो- हा. हा. शिकलेली सवरली माणसं म्हणूनच तर जमीनदोस्त होत आहे, बाबा असते तर !
मी- बाबा असते तर काय ?
तो- त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. दोन वेळचं जेवण तरी भेटलं असतं त्यातून.
मी- दादा, तुला पुन्हा नोकरी मिळेल रे.
छकुली- ये मामा, मला बाहेर जायचं आहे, बाबा कुठंच घेऊन जात नाही आहेत मला.
****
त्यांचा हुंदका फुटला व तो सरळ मला घेऊन बाहेर आला व म्हणाला " तुझ्या रुमवर चलू या." मी त्याला घेऊन माझ्या रुमवर आलो व काय घेणार हे न विचारताच त्याचा पॅग भरला व त्याच्या हाती दिला व बहाद्दुरला सांगितले जा जरा दोन तास फिरुन ये जा.
****
तो- काय उत्त्तर देऊ त्या मुलीला ?
मी- अरे, कमीत कमी तीला तरी बाहेर घेऊन जात जा रे. तीचे काय चुकलं आहे ह्या सर्वात. तीची का आबाळ.
तो- तु म्हणतो आहेस ते बरोबर आहे रे. पण माझं मनचं होत नाही आहे. तीने काही मागितले तर ?
मी- अरे असे काय करतोस. इवलीशी ती मुलगी चॉकलेट व बाहुली सोडून काय मागेल तुझ्या कडून.
तो- तुला माहीत आहे ? माझा जॉब जाऊन १० महिने झाले आहेत. मी आठ महिने तीकडेच जॉब शोधत होतो. मीळाला नाही.
मी- मग.
तो- मला वाटलं होतं की असेच छोटे मोठे वादळ आहे, शांत होईल. पण नाही झालं !
मी- ह्म्म. मग तु भारतात कधी आलास परत ?
तो- मी भारतात परत येण्यासाठी तीकडे गेलोच नव्हतो. मला वाटायचं की मी एवढा शिकलो आहे, जॉब चांगला आहे तीकडेच राहू.
मी- बरं पुढे.
तो- पण आठ महिने विदाऊट जॉब. परिवारासोबत. सर्व जमापुंजी कमी कमी होत गेली.
मी- ह्म्म. पण तु दोनचार वर्ष होतास ना तिकडे. पैसे पण चांगले मिळायचे तुला.
तो- हो. पण दोन वर्षापुर्वी जमा पैशातून घर घेतलं होतं. त्यावेळी भाव खुप वधारलेला होता. पण स्वत: घर ह्या नादात घेतले.
मी- ह्म्म. व आता फुगा फुटला.
तो- हो. जे घर एक रुपया देऊन घेतले होते ते ४० पैशाचे पण नाही राहिले. शेवटी ते पण विकले व जमा पैसे घेऊन इकडे आलो.
मी- ह्म्म. तु इकडे ट्राय नाही केलास जॉब साठी ? इकडे अजून येवढा हाल खराब नाही आहे.
तो- करत आहे रे. पण त्या स्टेटस चा जॉब नाही मिळत आहे.
मी- ह्म्म. तुझे गुंतवणूक केलेले फंड. त्याचा पण हाल खराब असेल.
तो- ५०% पेक्षा खाली आहेत.
मी- तुझ्या पॉलिसच व्यवस्थीत. हप्ते भरतो आहेस ना ?
तो- मागील वर्षापर्यंत आहेत अरे. ह्या वर्षाचे काही खरं दिसत नाही आहे. पण पॉलिसी पुर्ण पण होत नाही आहे. लॉन्ग टर्म वाले आहेत. सर्व.
मी- ह्म्म. हप्प्ते व्यवस्थीत भर. काही काही करुन. त्यामुलीचे भवितव्यासाठी ती गुंतवणूक गरजेची आहे.
तो- हम्म.
मी- तुला कुठली ऑफर आली होती का ?
तो- आली होती. बेंगलोरहून. पण पगार. लेव्हल.
मी- जरा काही काळ लेव्हल व पगार ह्या गोष्टी सोडून तु घरा कडे बघणार का ?
तो- म्हणजे ?
मी- अरे भावा, असं तु कर्ता पुरुष घरात बसून राहिलास तर वहिनीला काय त्रास होत असेल ह्यांची तुला कल्पना आहे का ?
तो- तीला कसला आला रे त्रास दोन वेळचं मिळत आहेच. बाबच्या कृपेने घर स्वतःचं आहे.
मी- रे , असं नसतं. तुला त्रास होत आहे हे तिला पण दिसत आहे व तुला त्रास होत आहे म्हनून तिला पण त्रास होत आहे.
तो- ह्म्म.
मी- तु मला फोटो पाठवले होतेस आठवतं.
तो- हो. आमच्या ट्रीपचे. तिकडे आमचे शेजारी व आम्ही गेलो होतो.
मी- बरोबर. त्यात वहिनी बघ व आता बघ. तुला कळेल मी काय म्हणतो ते.
****
तो हिरमुसला व कुठेतरी स्वतः मध्येच हरवला काही क्षण. चेह-यावरील त्याचे भाव क्षणागनिक बदलत होते, पण ते काळजीचे होते. मला जरा समाधान वाटलं. कमीत कमी ह्यांने विचार करायला सुरवात तरी केली. त्यांने जेवण केले व मी त्याला घेऊन परत त्याच्या घरी आलो व वहिनी शी थोडं बोलायचं हा विचार केला. तो गपचुप आपल्या बेडरुम मध्ये गेला व झोपी गेला.
****
मी- ह्याला आराम करु द्या.
ती- हो. तु चहा घेणार.
मी- ह्म्म. थोडासा. साखर कमी.
ती- ठिक बस.
मी- वहिनी, एक विचारु ?
ती- अरे विचार ना. तु काय परका.
मी- तसं नाही. हा ड्रिंक्स आधीपासूनच घेतो मला माहीत आहे, पण आजकाल जास्त घेतो का ?
ती-सोड रे ह्या गोष्टीला. त्याला त्रास होतो. मी अशी कमी शिकलेली. त्यामुळे मी देखील काही घराला हातभार लावू शकत नाही.
मी- पण तुम्ही त्याला व मुलीला व्यवस्थीत संभाळत आहातच ना. बस एक काम करा तुम्ही.
ती- काय ?
मी- त्याला बेंगलोरहून जॉब ऑफर मिळाली आहे. त्याला ती जॉब जॉईन करायला सांगा.
ती- मी बोलले होते त्याबद्दल. तर भडकला माझ्यावर.
मी- तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. माणसाला आपला लेव्हल व स्टेटस एकदम सोडावसं वाटतं नाही. पण
ती- पण ?
मी- लेव्हल व स्टेटस ह्या नादात घरादाराची आबाळ झाली तर. तुमची मुलगी लहान आहे अजून.
ती- मी खुप समजावले रे. पण ह्या असा हट्टी तुला माहीत आहे. मी उद्या पुन्हा प्रयत्न करते.
****
वहिनी ने काय प्रयत्न केला समजले नाही. पण हा कसाबसा तयार झाला व बेंगलोर ला गेला एकदाचा. जॉब मध्ये सेटल झाल्यावर बायको-मुलीला घेऊन जातो असे सांगून. परत आला दोन महिन्यातच.
****
तो- तुला सांगत होतो मी. तो जॉब माझ्या लेव्हलचा नाही आहे.
मी- काय झालं.
तो- माझ्या पेक्षा कमी शिकलेले. कमी अनुभव असलेले माझे बॉस ?
मी- अरे. असं काय करतोस.
तो- नाही. जमत रे मला.
मी- अरे. हाच तर तुला चान्स आहे. आपला अनुभव व शिक्षण ह्याचा फायदा घेण्याचा.
तो- म्हणजे. मी त्या अडाणी लोकांच्या हाताखाली काम करु. मी तिकडे परदेशामध्ये टिम लिडर होतो. येथे टिमचा हिस्सा ?
मी- अरे. तु भारतात आहेस. तुझी जॉब गेली आहे. तुला आपलं घर चालवायचं आहे फक्त ह्याच गोष्टी तु डोक्यात ठेव ना.
तो- काहीच समजत नाही आहे.
मी- अरे, तुला किती मोठा मोका मिळाला होतो तुला माहीत आहे.
तो- मोका ? ह्यात तुला कुठे प्रगती दिसत आहे. ही तर अधोगती.
मी- एक सांग. मी आपल्या जुन्या कंपनीत एक हार्डवेअर इजिंनियर पासून आयटी मॅनेजर पर्यंत कसा पोहचलो ? तु होतास ना बरोबर.
तो- अरे तुझ्या वरचे सगळेच मुर्ख भरती होते. व तुझा नॉलेज होतं डिग्री नव्हती त्याच्या कडे डिग्री होती नॉलेज नव्हतं
मी- हे तुला कळतं व मी जे तुला आधी सांगितले ते नाही कळाले ?
तो- अरे हो. छे. मी मुर्खासारखा वागलो यार.
मी- हरकत नाही. हे बघ, ह्याच देशानं. ह्याच मातीने तुला लहानाचा मोठा केला. सरकारी शाळेत शिकलास तु पण ना. अनुदान मिळवून ?
तो- हो. मला दोन स्कॉलरशीप मिळाल्या होत्या. दहावी-बारावी.
मी- ते ऋण फेडण्यासाठी देवानं तुला मोका दिला आहे. आपली बुध्दी व शिक्षण येथे वापर. ती कंपनी पुढे जाईल. त्या बरोबर तु पण .देशपण.
तो- हह्म्म.
मी- तुला तुझे अस्तिव टिकवायचं आहे. तर थोडी तडजोड तर करावीच लागेल जिवनाशी.
****
तो परत गेला डिसेंबर मध्येच जॉब वर. परिवाराला घेऊन. मी गेलो होतो जानेवारी मध्ये बेंगलोर ला. त्याला पण भेटलो.
****
मी- कसा आहे नवीन जॉब.
तो- मस्त. आवडलं काम मला.
मी- काय छकुली. काय करत आहेस.
छकुली- मामा, हे बघ माझी नवीन बाहुली व बाहुलीचे नवीन घर.
****
छकुलीचं नवीन घरं व माझ्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला. ह्या मंदिच्या काळात स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
****
प्रतिक्रिया
1 Mar 2009 - 12:42 pm | अवलिया
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो.
हाच प्रश्न मलाही पडतो.
(अडाणी) अवलिया
1 Mar 2009 - 12:44 pm | विनायक प्रभू
कार्टा तत्वज्ञानी झाला.
सुंदर लेखन
1 Mar 2009 - 12:46 pm | दशानन
नाही हो.. सर.
ह्यात तत्व काहीच नाही आहे.. फक्त सत्य आहे.
छोटी शी गोष्ट असते पण लोकांना समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते.
1 Mar 2009 - 12:49 pm | सहज
ऑल इज वेल दॅट एन्डस वेल!
परिस्थीती सगळे शिकवते, एखाद्याला शिकायचे असेल किंवा नसेल तरी. :-)
1 Mar 2009 - 1:19 pm | दशानन
सहमत.
परिस्थीती व वेळ ह्या गोष्टी माणसा सर्व शिकवतात.. अगदी गाढवासमोर झुकणं देखील.
1 Mar 2009 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
छकुलीचं नवीन घरं व राजांच्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला आणी राजांच्या लेखनाची भरारी पाहुन पण :)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
1 Mar 2009 - 1:19 pm | भाग्यश्री
राजे मस्त लिहीले..
अशा परिस्थितीत हेच महत्वाचे!
एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्यांसाठी, अजुन काही नव्हे! :| )
http://bhagyashreee.blogspot.com/
2 Mar 2009 - 8:05 am | शितल
>>एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्यांसाठी, अजुन काही नव्हे! )
=))
1 Mar 2009 - 1:28 pm | मदनबाण
छानचं लिहले आहे राजे तुम्ही...
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
1 Mar 2009 - 1:36 pm | ढ
त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती.
मस्त लिहिलंय राजे.
1 Mar 2009 - 1:51 pm | सुक्या
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
राजे . . एकदम सही बोललात. सर सलामत तो पगडी पचास.
मीही मागे मंदीत अगदी पिझ्झा डिलीवरी चे काम केलेल्या व्यक्तीबरोबर काम केले आहे. कधी कधी वाटते आपल्यावर ही पाळी आली तर हे सारे करायला जमेल?
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
1 Mar 2009 - 2:02 pm | मनिष
साध्या भाषेत सही फंडे!! :)
1 Mar 2009 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते
राजे, योग्य वेळी योग्य सल्ला!!!
पण एकच सांगतो... कळतं सगळं... पण वळत नाही... अशी अवस्था असते. प्रत्यक्ष तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. खूप त्रास होतो.
बिपिन कार्यकर्ते
2 Mar 2009 - 8:27 am | छोटा डॉन
मस्त कथा कम उपदेश ...
आजच्या मंदीच्या काळात तर फारच उपयोगी आहे हे सर्व.
बाकी बिपीनदांशी सहमत ..
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 9:22 am | दशानन
>तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे.
पण करावे तर लागणारच.. ही काय एक-दोन महिन्यात जाणारी मंदी नाही आहे, ज्यांनी आपला जॉब टिकवला ते तरले व ज्यांचा काही ना काही कारणामुळे नाही टीकला तर त्यांना आपल्या स्टेटस ला विसरावेच लागेल नाही तर निभाव लागणे शक्य नाही.
येथे मला उंच झाड व गवत ह्यांची तुलना करणारी कथा आठवते.. महापुरामध्ये / वादळामध्ये झाडे मुळापासून उखडून जातात कारण ताठपणा (येथे घमंड / स्टेट्स) व गवत टिकतं कारण परिस्थीती पुढे नमते घेतं म्हणून.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
2 Mar 2009 - 9:45 pm | चतुरंग
मला ह्या ठिकाणी वपुंचं एक वाक्य आठवतं
"लोक काय म्हणतील? ह्या एका प्रश्नामुळे माणसं स्वतःचं जगणं अशक्य करुन टाकतात!"
चतुरंग
1 Mar 2009 - 6:07 pm | सुनील
मस्त कथा. सुखांतिका असल्यामुळे बरं वाटलं.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Mar 2009 - 7:37 pm | लवंगी
सगळ्यांना लाभू दे.
2 Mar 2009 - 8:06 am | शितल
राजे,
अगदी योग्य समज दिलात मित्राला.. :)
2 Mar 2009 - 8:17 am | अनिल हटेला
सहमत!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Mar 2009 - 8:14 am | घाटावरचे भट
हम्म्म...बेष्ट!
2 Mar 2009 - 9:51 am | मृगनयनी
राजे! मस्त!...
केव्हा... कशाला "प्रायॉरिटी" द्यायची हे प्रत्येकाला समजलेच पाहिजे. ते तुम्ही छानच समजावून सांगितले.
आणि देशभक्ती'चा ही उत्तम डोस पाजलात! :)
:)
( मौजमजेच्या नावाखाली निरर्थक लेख वाचण्यापेक्षा, सकाळी "हे" असं काही वाचलं , की आपल्यालाही आपोआपच प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव होते. आणि लेखामधून स्पष्ट झालेली राजेंची उच्च विचारसरणीही समजते.)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
2 Mar 2009 - 11:02 am | दशानन
जगातील आर्थिक घडामोडी बघता आपलं अस्तित्व टिकवणं किती गरजेचे आहे हे ह्या बातमी वरुन लक्ष्यात येईल.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
2 Mar 2009 - 1:39 pm | नीधप
ह्म्म्म.. म्हणणं सोपं असतं आणि त्यातून जाणं महाकठीण..
तुमच्या मित्राला शुभेच्छा!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
2 Mar 2009 - 1:43 pm | पिवळा डांबिस
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
पिडां
2 Mar 2009 - 10:34 pm | एकलव्य
अंगठाबहाद्दर
2 Mar 2009 - 2:01 pm | झेल्या
फारच साधं सरळ आणि मनाला भिडणारं लेखन.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
2 Mar 2009 - 2:53 pm | जागु
राजे खुपच छान लेख.
2 Mar 2009 - 5:20 pm | पाषाणभेद
फारच छान लेख. आपले अस्तित्व टिकवणे महत्वाचे.
-( सणकी )पाषाणभेद
2 Mar 2009 - 5:26 pm | पाषाणभेद
फारच छान लेख. आपले अस्तित्व टिकवणे महत्वाचे.
-( सणकी )पाषाणभेद
2 Mar 2009 - 5:49 pm | किट्टु
खुपच छान लेख लिहीला आहे... अगदी खुप काही शिकण्यासारखं आहे या लेखामधुन...
--
किट्टु
2 Mar 2009 - 10:20 pm | विकास
कथा एकदम छान आहे. वास्तववादी आहे हे सांगायला नकोच. अर्थात वर आधीच म्हणले गेले आहे त्याप्रमाणे - ज्याचं जळतं त्यालाच कळतं...
3 Mar 2009 - 10:48 am | दशानन
सहमत.
पण स्वतःच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्यात काय वाईट पणा
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D