ये,बैस ना जराशी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
7 Jul 2017 - 10:18 am

ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!

हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!

कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!

येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!

स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!

आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलरतीबाच्या कविताशृंगारकवितागझल

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Jul 2017 - 11:55 am | प्राची अश्विनी

आहाहा! क्या बात! तुमच्या गझलांची fan झाली आहे.

आपण लिहितो ते भावत असल्याचं रसिक अवर्जून कळवतात,शाबासकी/शुभेच्छा देतात,ही कुठल्याही कवी/लेखकासाठी एक विलक्षण समाधानाची,आनंदाची बाब आहे!
आपली लेखणी,रसिकांशी कुठेतरी relate होवू शकते,त्यांना ती आपलीशी वाटते,ही जाणिवच तिला सतत चालते ठेवते!
प्रतिसादाबद्दल अनेक आभार!

चष्मेबद्दूर's picture

7 Jul 2017 - 7:30 pm | चष्मेबद्दूर
चष्मेबद्दूर's picture

7 Jul 2017 - 7:31 pm | चष्मेबद्दूर

+१११

मनःपूर्वक धन्यवाद चष्मेबद्दूर!

सौन्दर्य's picture

8 Jul 2017 - 9:28 am | सौन्दर्य

शेवटच्या दोन ओळी एकदम खास. गझल फार छान लिहिली आहे.
एक शंका, 'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?

सत्यजित...'s picture

9 Jul 2017 - 12:40 am | सत्यजित...

>>>'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?>>>अगदी बरोबर सौन्दर्यजी! भट साहेबांनी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे...'सूर्य येणारे मला कवळून गेले!'

अवांतर—या सुंदर गझलेची आठवण झाली,म्हणून मतला देतो आहे...

'कोण जाणे कोण हे जवळून गेले!
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!!'

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2017 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा

कातिल!

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 2:21 pm | मुक्त विहारि

आवडली...

जेनी...'s picture

8 Jul 2017 - 4:07 pm | जेनी...

:)

सत्यजित...'s picture

9 Jul 2017 - 12:41 am | सत्यजित...

ह्म्म

संजय पाटिल's picture

8 Jul 2017 - 4:59 pm | संजय पाटिल

वा वा क्या बात!

आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!

क्या बात है... क्लास!

सानझरी's picture

8 Jul 2017 - 9:30 pm | सानझरी

झकास! !

सत्यजित...'s picture

9 Jul 2017 - 12:19 am | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

पद्मावति's picture

9 Jul 2017 - 1:16 am | पद्मावति

आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!

क्लास्स्स!!!

सत्यजित...'s picture

9 Jul 2017 - 6:15 am | सत्यजित...

डोकावतेस जेंव्हा अरश्यात,नाहल्यावर
क्षणभर छबी तरळते अरश्यात चांदण्याची!

मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा शेरही सुंदर आहे..

फक्त दोन्ही ओळींत 'अरश्यात' शब्द वापरण्याऐवजी आणखी काही सुचते का पाहा. (मला गझल, कवितेतलं फार काही कळत नाही. सहज सुचवलं).
स्वल्पविरामानंतर एक 'स्पेस' द्या :)

पैसा's picture

12 Jul 2017 - 12:55 pm | पैसा

ऐन्यात

वकील साहेब's picture

9 Jul 2017 - 7:43 pm | वकील साहेब

अप्रतिम खूपच छान.

नावातकायआहे's picture

10 Jul 2017 - 5:14 am | नावातकायआहे

मस्त!

"आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!"

खूपच छान....

अनुप ढेरे's picture

10 Jul 2017 - 9:58 am | अनुप ढेरे

मस्तं!

राघव's picture

10 Jul 2017 - 4:35 pm | राघव

सगळेच शेर छान.

स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!

आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!

या ओळी खास आवडल्यात. पुलेशु. :-)

सत्यजित...'s picture

10 Jul 2017 - 8:27 pm | सत्यजित...

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

पैसा's picture

12 Jul 2017 - 12:59 pm | पैसा

आवडली

मारवा's picture

13 Jul 2017 - 9:07 am | मारवा

"आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!"

या ओळीवरुन हा शेर आठवला

किसने भिगे हुए बालोसे ये झटका पानी
झुम के आयी घटा टुटके बरसा पानी

छतावरील वा बाल्कनीतील प्रेयसी

न्हाउनिया केस ओले वाळवणारी प्रेयसी

या थीम्स फारच रोमॅंटीक आहेत नेहमी आवडतात

सत्यजित...'s picture

14 Jul 2017 - 12:20 am | सत्यजित...

पैसा,मारवा...धन्यवाद!

मारवा, आपण दिलेला शेरही सुंदर आहे!