दस का बीस

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
22 May 2017 - 5:19 pm

तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर

'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्‍या माणसाबरोबर संवाद सुरू केला.

मी : अहो, या एवढ्या सीट्स इतक्या लवकर कशा काय संपल्या?
तो : लोकांनी येऊन तिकिटे काढली.
मी : बूकिंग सुरू होऊन अर्धाही तास झाला नाही, तेवढ्यातच दिडशे-दोनशे तिकिटे संपलीही. आश्चर्य आहे!!
तो : अहो, लोकं इथे सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभी होती.
मी : अहो, बघा ना. या पुढच्या रांगेतल्या दोन सीट्स मोकळ्या असतील तर.
तो : नाही हो. बघा ना चार्ट तुमच्यासमोर आहे. एकही सीट खाली नाही.
मी : काहीही काय बोलताय. दिडशे-लोकांना तुम्ही पंधरा-वीस मिनिटात तिकिटे वाटलीही? आणि ते सगळे पसारही झाले? नाही म्हणायला उगाचच मागे रेंगाळणारी दहा-बारा डोकी तरी दिसायला हवीत ना? इथे तर मी एकटाच आहे.!!
तो : काय साहेब. पायजे तर सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर.

इथे मात्र मला खरंचच आश्चर्याचा धक्का बसला. हौशी लोक आहेत ठाण्यात हे जाणून होतो, पण इतकी?! सकाळी सात वाजताच येऊन रांग लावली आणि नऊच्या आत तिकिटं घेऊन सगळीच्या सगळी पसारही झाली. एव्हाना सोबत आलेल्या अर्धांगाचा पेशन्स संपला होता आणि उलट माझ्यावरच ओरडा सुरू झाला.

'आता ते एवढं कॅमेरे चेक करायला सांगताहेत तर, संपलीही असतील तिकिटे.'

'कशाला उगा वाद घालायचा. दळभद्री लक्षण मेलं.'

'नको तिथे शहाणपणा दाखवायचा उगा.'

'घे चल मिळतायत ती तिकिटे. नंतर ती ही मिळायची नाहीत.'

उपलब्ध होती ती तिकिटे घेतली आणि वाटेला लागलो. नाटकाच्या दिवशी प्रयोग सुरू व्हायच्या आधी पाह्यलं तर हे लेकाचे सुरूवातीच्या रांगाची तिकिटे 'अमका ढमका आला नाही म्हणून या जागा खाली आहेत, घेऊन टाका!' म्हणून वाटत होते. मनाशी म्हटलं 'जाऊदे, पुढच्या सीट्स नव्हत्याच नशीबात तर काय करणार.' थोडी रुखरुख लागून राहीलीच तरीही.

******************************

तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : संध्याकाळी साडे सहा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर

'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. पुन्हा एकदा तेच. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून...
नियमाप्रमाणे बूकिंग सकाळी साडे आठला सुरू झाले होते. सकाळी साडे आठ ते अकरा आणि संध्याकाळी साडे पाच ते आठ. मी संध्याकाळी साडे सहाला पोचलो. पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का, काऊंटरवर ठेवलेला बूकिंग चार्टवरील लाल फुल्या पाहून.
'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे यावेळी तरी हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्‍या माणसाबरोबर संवाद सुरू केला.

मी : अहो, या एवढ्या सीट्स इतक्या लवकर कशा काय संपल्या?
तो : लोकांनी येऊन तिकिटे काढली.
मी : मला माह्यतेय हे नाटक सध्या गाजतेय. पण सकाळच्या सत्रात एवढ्या जागा फुल्ल झाल्याही..? कसं शक्य आहे??
तो : अहो, लोकं इथे सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभी होती. (आज सातचे सहा वाजवले होते त्याने)
मी : अहो, बघा ना. या पुढच्या रांगेतल्या दोन सीट्स मोकळ्या असतील तर. (पुन्हा एकदा हावरेपणा)
तो : नाही हो. बघा ना चार्ट तुमच्यासमोर आहे. एकही सीट खाली नाही.
मी : (मनाशीच) च्यायचा घो ह्यांच्या!! मूर्ख बनवायला मीच मिळतो का दरवेळी यांना.

चरफडतच पुन्हा एकदा मागची मिळाली ती तिकिटे घेतली आणि निघालो. यावेळी बायकोनेही मान्य केले की, ती लोकं जाणून बुजून पुढची तिकिटे देत नाहीत.

योगायोग होतात हे मान्य, पण नेहमी?? अगदी तोच अनुभव सलग दुसर्‍यांदा आला. या ही नाटकाच्या वेळी प्रयोग सुरू होण्याच्या अर्धा तास आधी 'A' ते 'C' यां रांगा॑ची तिकिटे चक्क मिळत होती करंट बूकिंगला. आधीसारखे कारणही तेच..'लोकं आली नाहीत म्हणून ही तिकिटे उरलीयेत, घेऊन टाका!'

मला एकट्याला आलेला अनुभव नाही हा. अगदी असाच अनुभव माझ्या कार्यालयातील वरिष्ठांनाही आला आहे. सामान्यतः नाटकाच्या वेळी नाट्य रसिक पुढे असलेल्या आसनांच्या तिकिटासाठी आग्रह धरतात. त्यातून तुम्ही आधी बूकिंग करत असाल तर हा आग्रह समजण्यासारखा आहे. त्याचबरोबर नाट्यागृहानेही रसिकांच्या विनंतीचा आदर करून, उपलब्ध असतील तर पुढील रांगातली तिकिटे द्यायलाच हवी, पण इथे अगदी त्याउलट रंगायतन नाट्य रसिकांना चक्क फसवत असल्याचं दिसून येतंय.

एखाद्या हाऊसफूल्ल चालणार्‍या सिनेमाची चित्रपट गृहाबाहेर तिकिटे ब्लॅकने विकली जातात हे माहिती होतं. पण नाटकासारख्या मर्यादीत प्रेक्षक असणार्‍या वर्तुळातलं हे 'दस का बीस' काहीसं अनपेक्षित होतं.

पुढच्या वेळी तिकिट काढतेवेळी काऊंटरवरच्या माणसाला विचारेन, 'दस का बीस' हवेयंत का तुम्हाला?

नाट्यप्रकटनविचारमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2017 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा

ऐकावे ते ते नवलच!

देणारे असतात म्हनून घेतात
घेणारे असतात म्हनून देतात
.
कीती त्रास करुन घेशील किसना?
आपण एक रांगेच्या नाट्यगृहासाठी आंदोलन उभे करुयात काय?

एस's picture

22 May 2017 - 5:30 pm | एस

:-) हे सररास चालतं.

धर्मराजमुटके's picture

22 May 2017 - 5:32 pm | धर्मराजमुटके

ऑनलाईन बुकींग ट्राय केलेत काय कधी ? बुक माय शोवर ? तिथे काय परिस्थिती आहे ?

मराठी_माणूस's picture

23 May 2017 - 10:39 am | मराठी_माणूस

त्यांच्या कडे मर्यादीत कोटा असतो असे वाट्ते.
एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 11:54 am | किसन शिंदे

एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.

हा अनुभव घेऊन झालाय. त्यामुळे त्या भानगडीत पडत नाही.

किसणाच्या सात्विक संतापाचे आम्हास नेहमीच काैतुक वाटत आलेले आहे

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2017 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा

=)) बाजार उठवक पां डुब्बा! :D

आणि आम्हास तुमच्या पांडु प्रेमाचं!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2017 - 9:00 pm | अत्रुप्त आत्मा

अर्रर्र! प्रेमाची प्रतिक्रिया दिली पांडूने,आणी ह्यांनी ग्रुहीत धरली आमच्यावर..!
असो..! नको त्या बाटलीला हवं ते बुच बसलं! :p
चालायचंच! =))

आपणांस मुद्दा कळलेला नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2017 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

चालू द्या निरर्थक आत्मकुंथन! :p

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 3:02 pm | सतिश गावडे

तुमची वैचारीक बैठक उथळ आहे.

(मार्केटमध्ये नवीन आहे. लगेच फॉरवर्ड करा.)

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2017 - 7:06 am | अत्रुप्त आत्मा

तो तुमचा आत्मरंजक भ्रम आहे. ;)

(मार्केटमध्ये जुना आहे. तस्मात् , .तसाच्च ठेवा! :p )

तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त आत्मा आहे.

आता .. सॉरी, अता या दोघांना कसें थोपवावें बरें..?

टवाळ कार्टा's picture

24 May 2017 - 3:08 pm | टवाळ कार्टा

सगाच्या रिमोट कंट्रोलला मिपाकर बनवा :ड

किसन शिंदे's picture

24 May 2017 - 3:45 pm | किसन शिंदे

अवघड आहे. :D

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2017 - 8:39 pm | अत्रुप्त आत्मा

@तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त आत्मा आहे.››› हा तुमच्या अकलेचा वैचारिक खात्मा आहे! :p

जेनी...'s picture

1 Jul 2017 - 4:27 pm | जेनी...

=))

हे नेहमीचेच!
सगळे धंदा करतात.

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 5:51 pm | टवाळ कार्टा

पुढल्यावेळी त्या चार्टचा फोटो घे आणि त्या नाटकाच्या प्रमोशनच्या चेपु भिंतीवर टाक....आणि नाटकाच्या दिवशीच्या चार्टचा फोटोपण ;)

'अमर फोटो स्टुडिओ' बाबतीत असेच होत असल्याने अद्याप पाहिलेले नाही. फोनवर बुकिंग घ्यायला नाही म्हणत नाहीत हे मात्र विशेष वाटले.
असेच फोन बुकिंग करून मागची सीट म्हणून मी गेलोच नाही, पण पुढ्च्या वेळेस परत बुकिंग घ्यायला तयार होते!

कवट्या महांकाळ's picture

22 May 2017 - 6:15 pm | कवट्या महांकाळ

हे खरे आहे
हाच अनुभव मला पुण्यात "अण्णा भाऊ साठे" नाट्यगृह इथे आला आहे
"साखर खाल्लेला माणूस"नाटकासाठी
फक्त करंट बुकिंग ला तिकीट मिळत होती का नाही हे मी पाहिलं नाही पण सकाळी ९ च्या बुकिंग ला ८:४५ ला गेलो असताना पहिल्या १०-१२ रंग भरल्या होत्या
विचारल्यावर म्हणाले कि कलाकारांनी बुक केली आहेत म्हणे तिकिटे ! ऐकावं ते नवलच !! आणि इतकी का बुक केली विचारल्यावर काही उत्तर नव्हतं त्याच्याकडे.

त्या अमेय वाघाच्या भिंतीवर याची लिंक चिकटवा.

अनुप देशमुख's picture

23 May 2017 - 11:45 am | अनुप देशमुख

ऑनलाईन बुकिंग करत चला. थोडा पैसा जातो पण हि झंझट वाचते.

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 3:09 pm | सतिश गावडे

मलाही साखामा पाहायचे होते. पण जेव्हा पाहावं तेव्हा बुकमायशो हाऊसफुल सांगायचे.

मग एक दिवस प्रशांत दामले यांच्या वेबसाईट वरुन बुकींग केले. सहाव्या रांगेचे तिकीट मिळाले. तरीही ऐनवेळी थेटरात काहीतरी घोळ झाला. मात्र हा घोळ माझ्या पथ्यावर पडला आणि काउंटरवर मला तिसऱ्या रांगेचे तिकीट मिळाले.

आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले नाटक मी तिसऱ्या रांगेतून पाहिले. प्रशांत दामलेंचा अभिनय इतक्या जवळून पाहणे ही पर्वणी होती.

चायला. गडकरीमधे असलं चालत असेल असं वाटलं नव्हतं.. धक्कादायक.

ते दुसरं नवंकोरं काशिनाथ घाणेकर नाट्यगृह छत कोसळून महिनोन् महिने बंद पडलं होतं. ते झालं का आतातरी चालू?

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 3:35 pm | किसन शिंदे

यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, रंगायतनमधील आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते आणि आता कालच्या नाटकावेळी प्रवेश केल्यानंतर मेटल डिटेक्टरच्या डाव्या बाजूस असलेले आग विझवण्याचे उपकरण एक्सपायर्ड असल्याचे आढळून आलेय.

तुम्ही तशी नोंद त्यांच्याकडील तक्रारपुस्तिकेत करायला हवी होती.

आदूबाळ's picture

23 May 2017 - 4:04 pm | आदूबाळ

तक्रार पुस्तिकेला कोणी हिंगलून विचारत नै. आग लागलीच तर तक्रारपुस्तिका पहिली जळेल. (जिथं मंत्रालयातल्या फायली जळतात, तिथं...)

फोटो काढून चेपुवर किंवा वत्स अ‍ॅपवर हाणायचा. अखिल भारतीय लाईक-शेअर-आणि-फॉर्वर्ड महामंडळाचे कार्यकर्ते आपोआप व्हायरल करतील.

प्रचेतस's picture

23 May 2017 - 4:08 pm | प्रचेतस

ते तर आहेच. देवांनी फेबुवर व्हायरल केलंही आहे आधीच.

अभ्या..'s picture

23 May 2017 - 4:10 pm | अभ्या..

च्यायला, इथे धागा काढणे म्हणजे त्याच मोहिमेचा एक भाग आहे होय?
चाबरायक़ीकिसन्या

सूड's picture

23 May 2017 - 4:23 pm | सूड

मी केलं ब्वॉ!!

आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते

याला म्हणतात हाडाचा अॅडमिन बॉस... नाटकाला गेले तरी नजर बरोब्बर मुद्द्याच्या गोष्टीवर... प्रणाम घ्या हो किसनद्येवा...

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 5:37 pm | किसन शिंदे

तीच गोष्ट रोजच्या कामाचा भाग असल्यामुळे म्हणा किंवा एखादी घाणेरडी सवय म्हणा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर अशा गोष्टींकडे माझे लक्ष हमखास जाते.

इसिलिए तो लौ यु किसना... ;-)

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 5:37 pm | सतिश गावडे

asdf

कलाकारांचे पण फार काही चालते नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाबद्दल असे वाटत नाही. बघावे तेव्हा तेच किती ती अस्वच्छता, कसली ती गैरसोय वगैरे तक्रारी मिडियातून करीत असतात. फेबूवर, वॉअ‍ॅ वर पोष्टी व्हायरल करणे हे दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीनी योग्य ठरेल असे वाटते.

पाषाणभेद's picture

23 May 2017 - 5:47 pm | पाषाणभेद

नाट्यगॄहांची गैरसोय ही नित्याचीच बाब झाली आहे. ही नाट्यगॄहे सार्वजनिक मालमत्ता असल्याकारणाने दुर्लक्ष होत असावे. ही कुण्या एन.जी.ओ. असलेल्या संस्थांकडे वार्षिक कराराने द्यावीत.

ज्योति अळवणी's picture

23 May 2017 - 6:03 pm | ज्योति अळवणी

कधीतरी तुम्हीसुद्धा सकाळी 6 वाजल्या पासून रांग लावून त्यांचं पितळ उघड पाडून बघा... सहज सुचलं, म्हणून सांगितलं हो!

ते पुणेकर असते तर त्यांनी तसे केलेही असते.

टवाळ कार्टा's picture

23 May 2017 - 8:12 pm | टवाळ कार्टा

इनफ्फॅक्ट फक्त पुणेकरांनीच हे असे उपद्व्याप केले असते =))

प्रचेतस's picture

23 May 2017 - 8:15 pm | प्रचेतस

तेच तर म्हणतोय.
-
चिंचवडकर प्रचेतस

दुर्गविहारी's picture

24 May 2017 - 11:03 am | दुर्गविहारी

अवघड आहे.