दस का बीस
तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अॅडव्हान बूकिंग काऊंटर
'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्या माणसाबरोबर संवाद सुरू केला.
मी : अहो, या एवढ्या सीट्स इतक्या लवकर कशा काय संपल्या?
तो : लोकांनी येऊन तिकिटे काढली.
मी : बूकिंग सुरू होऊन अर्धाही तास झाला नाही, तेवढ्यातच दिडशे-दोनशे तिकिटे संपलीही. आश्चर्य आहे!!
तो : अहो, लोकं इथे सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभी होती.
मी : अहो, बघा ना. या पुढच्या रांगेतल्या दोन सीट्स मोकळ्या असतील तर.
तो : नाही हो. बघा ना चार्ट तुमच्यासमोर आहे. एकही सीट खाली नाही.
मी : काहीही काय बोलताय. दिडशे-लोकांना तुम्ही पंधरा-वीस मिनिटात तिकिटे वाटलीही? आणि ते सगळे पसारही झाले? नाही म्हणायला उगाचच मागे रेंगाळणारी दहा-बारा डोकी तरी दिसायला हवीत ना? इथे तर मी एकटाच आहे.!!
तो : काय साहेब. पायजे तर सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर.
इथे मात्र मला खरंचच आश्चर्याचा धक्का बसला. हौशी लोक आहेत ठाण्यात हे जाणून होतो, पण इतकी?! सकाळी सात वाजताच येऊन रांग लावली आणि नऊच्या आत तिकिटं घेऊन सगळीच्या सगळी पसारही झाली. एव्हाना सोबत आलेल्या अर्धांगाचा पेशन्स संपला होता आणि उलट माझ्यावरच ओरडा सुरू झाला.
'आता ते एवढं कॅमेरे चेक करायला सांगताहेत तर, संपलीही असतील तिकिटे.'
'कशाला उगा वाद घालायचा. दळभद्री लक्षण मेलं.'
'नको तिथे शहाणपणा दाखवायचा उगा.'
'घे चल मिळतायत ती तिकिटे. नंतर ती ही मिळायची नाहीत.'
उपलब्ध होती ती तिकिटे घेतली आणि वाटेला लागलो. नाटकाच्या दिवशी प्रयोग सुरू व्हायच्या आधी पाह्यलं तर हे लेकाचे सुरूवातीच्या रांगाची तिकिटे 'अमका ढमका आला नाही म्हणून या जागा खाली आहेत, घेऊन टाका!' म्हणून वाटत होते. मनाशी म्हटलं 'जाऊदे, पुढच्या सीट्स नव्हत्याच नशीबात तर काय करणार.' थोडी रुखरुख लागून राहीलीच तरीही.
******************************
तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : संध्याकाळी साडे सहा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अॅडव्हान बूकिंग काऊंटर
'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाची अॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. पुन्हा एकदा तेच. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून...
नियमाप्रमाणे बूकिंग सकाळी साडे आठला सुरू झाले होते. सकाळी साडे आठ ते अकरा आणि संध्याकाळी साडे पाच ते आठ. मी संध्याकाळी साडे सहाला पोचलो. पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का, काऊंटरवर ठेवलेला बूकिंग चार्टवरील लाल फुल्या पाहून.
'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे यावेळी तरी हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्या माणसाबरोबर संवाद सुरू केला.
मी : अहो, या एवढ्या सीट्स इतक्या लवकर कशा काय संपल्या?
तो : लोकांनी येऊन तिकिटे काढली.
मी : मला माह्यतेय हे नाटक सध्या गाजतेय. पण सकाळच्या सत्रात एवढ्या जागा फुल्ल झाल्याही..? कसं शक्य आहे??
तो : अहो, लोकं इथे सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभी होती. (आज सातचे सहा वाजवले होते त्याने)
मी : अहो, बघा ना. या पुढच्या रांगेतल्या दोन सीट्स मोकळ्या असतील तर. (पुन्हा एकदा हावरेपणा)
तो : नाही हो. बघा ना चार्ट तुमच्यासमोर आहे. एकही सीट खाली नाही.
मी : (मनाशीच) च्यायचा घो ह्यांच्या!! मूर्ख बनवायला मीच मिळतो का दरवेळी यांना.
चरफडतच पुन्हा एकदा मागची मिळाली ती तिकिटे घेतली आणि निघालो. यावेळी बायकोनेही मान्य केले की, ती लोकं जाणून बुजून पुढची तिकिटे देत नाहीत.
योगायोग होतात हे मान्य, पण नेहमी?? अगदी तोच अनुभव सलग दुसर्यांदा आला. या ही नाटकाच्या वेळी प्रयोग सुरू होण्याच्या अर्धा तास आधी 'A' ते 'C' यां रांगा॑ची तिकिटे चक्क मिळत होती करंट बूकिंगला. आधीसारखे कारणही तेच..'लोकं आली नाहीत म्हणून ही तिकिटे उरलीयेत, घेऊन टाका!'
मला एकट्याला आलेला अनुभव नाही हा. अगदी असाच अनुभव माझ्या कार्यालयातील वरिष्ठांनाही आला आहे. सामान्यतः नाटकाच्या वेळी नाट्य रसिक पुढे असलेल्या आसनांच्या तिकिटासाठी आग्रह धरतात. त्यातून तुम्ही आधी बूकिंग करत असाल तर हा आग्रह समजण्यासारखा आहे. त्याचबरोबर नाट्यागृहानेही रसिकांच्या विनंतीचा आदर करून, उपलब्ध असतील तर पुढील रांगातली तिकिटे द्यायलाच हवी, पण इथे अगदी त्याउलट रंगायतन नाट्य रसिकांना चक्क फसवत असल्याचं दिसून येतंय.
एखाद्या हाऊसफूल्ल चालणार्या सिनेमाची चित्रपट गृहाबाहेर तिकिटे ब्लॅकने विकली जातात हे माहिती होतं. पण नाटकासारख्या मर्यादीत प्रेक्षक असणार्या वर्तुळातलं हे 'दस का बीस' काहीसं अनपेक्षित होतं.
पुढच्या वेळी तिकिट काढतेवेळी काऊंटरवरच्या माणसाला विचारेन, 'दस का बीस' हवेयंत का तुम्हाला?
वाचने
14393
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
ऐकावे ते ते नवलच!
देणारे असतात म्हनून घेतात
हे सररास चालतं.
ऑनलाईन बुकींग
In reply to ऑनलाईन बुकींग by धर्मराजमुटके
त्यांच्या कडे मर्यादीत कोटा
In reply to त्यांच्या कडे मर्यादीत कोटा by मराठी_माणूस
एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग
किसणाच्या सात्विक संतापाचे
In reply to किसणाच्या सात्विक संतापाचे by स्पा
बाजार उठवक पां डुब्बा!
In reply to बाजार उठवक पां डुब्बा! by अत्रुप्त आत्मा
आणि आम्हास तुमच्या पांडु
In reply to आणि आम्हास तुमच्या पांडु by सूड
अर्रर्र! प्रेमाची
In reply to अर्रर्र! प्रेमाची by अत्रुप्त आत्मा
आपणांस मुद्दा कळलेला नाही.
In reply to आपणांस मुद्दा कळलेला नाही. by सूड
चालू द्या निरर्थक आत्मकुंथन!
In reply to चालू द्या निरर्थक आत्मकुंथन! by अत्रुप्त आत्मा
तुमची वैचारीक बैठक उथळ आहे.
In reply to तुमची वैचारीक बैठक उथळ आहे. by सतिश गावडे
तो तुमचा आत्मरंजक भ्रम आहे.
In reply to तो तुमचा आत्मरंजक भ्रम आहे. by अत्रुप्त आत्मा
तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त
In reply to तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त by सूड
आता .. सॉरी, अता या दोघांना
In reply to आता .. सॉरी, अता या दोघांना by गवि
सगाच्या रिमोट कंट्रोलला
In reply to आता .. सॉरी, अता या दोघांना by गवि
अवघड आहे.
In reply to तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त by सूड
@तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त
In reply to @तो तुमचा भ्रमरञ्जक संत्रस्त by अत्रुप्त आत्मा
(No subject)
हे नेहमीचेच! सगळे धंदा करतात.
पुढल्यावेळी त्या चार्टचा फोटो
'अमर फोटो स्टुडिओ' बाबतीत
हे खरे आहे
त्या अमेय वाघाच्या भिंतीवर
ऑनलाईन का करत नाही
हाहा..
चायला. गडकरीमधे असलं चालत
In reply to चायला. गडकरीमधे असलं चालत by गवि
यापेक्षाही धक्कादायक म्हणजे,
In reply to यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, by किसन शिंदे
तुम्ही तशी नोंद त्यांच्याकडील
In reply to तुम्ही तशी नोंद त्यांच्याकडील by प्रचेतस
तक्रार पुस्तिकेला कोणी
In reply to तक्रार पुस्तिकेला कोणी by आदूबाळ
ते तर आहेच. देवांनी फेबुवर
In reply to ते तर आहेच. देवांनी फेबुवर by प्रचेतस
च्यायला, इथे धागा काढणे
In reply to तक्रार पुस्तिकेला कोणी by आदूबाळ
मी केलं ब्वॉ!!
In reply to यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, by किसन शिंदे
आग विझवण्याची उपकरणं २८
In reply to आग विझवण्याची उपकरणं २८ by गवि
तीच गोष्ट रोजच्या कामाचा भाग
In reply to तीच गोष्ट रोजच्या कामाचा भाग by किसन शिंदे
इसिलिए तो लौ यु किसना...
In reply to आग विझवण्याची उपकरणं २८ by गवि
(No subject)
कलाकारांचे पण फार काही चालते
नाट्यगॄहांची गैरसोय ही
कधीतरी तुम्हीसुद्धा सकाळी 6
In reply to कधीतरी तुम्हीसुद्धा सकाळी 6 by ज्योति अळवणी
ते पुणेकर असते तर त्यांनी तसे
In reply to ते पुणेकर असते तर त्यांनी तसे by प्रचेतस
इनफ्फॅक्ट फक्त पुणेकरांनीच हे
In reply to इनफ्फॅक्ट फक्त पुणेकरांनीच हे by टवाळ कार्टा
तेच तर म्हणतोय.
अवघड आहे.