डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
15 May 2017 - 12:39 pm

डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?
मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे.

हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात. तीन-चार वर्षे वयाची मुले आपण 'बोर' होत असल्याचे सांगतात, त्यावर उपाय एकच. त्यांच्या हातात मोबाईल पकडवणे वा टीव्ही लावून देणे. हे कार्य त्यांचे आई-वडील अगदी इमाने इतबारे करत असताना दिसतात, कारण असे केले की खुद्द ते मोबाईलची चाळवाचाळव करायला मोकळे होतात.
व्हॉट्सॅपवरील फालतू चुटके, खरेखोटे ज्ञान, व्हिडियो, गुडमॉर्निंगे, ह्याप्पी बर्थडे, मदर डे, अमूक डे - तमूक डे वगैरे बघण्यात वेळेपरी वेळ तर जातच असतो, त्याहीपेक्षा वाईट म्हणजे दृष्टी झपाट्याने खराब होत जाते.

आगगाडीतून प्रवास करताना मी वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी सुद्धा खिडकीतून बाहेरचा निसर्ग वगैरे बघत बसतो, पण तरूण मंडळी आणि अगदी लहान मुले सुद्धा सरसकट मोबाईलात गुंतलेली दिसतात.

मोबाईल, टीव्ही आणि तत्सम साधनांचा डोळ्यांवर नेमका काय परिणाम होतो? त्यातून काय काय समस्या निर्माण होतात ? त्याचे कोणते परिणाम पुढील आयुष्यात भोगावे लागतात ? यावर उपाय काय ? घरात वा कामाच्या जागी कोणत्या प्रकारचे दिवे लावावेत, जेणेकरून डोळ्यांवर कमीत कमी ताण पडेल ? डोळे कोरडे पडणे -- आणि -- सतत पाणी वाहू लागणे -- या दोन्ही प्रकारांची कारणे आणि उपाययोजना काय आहेत ? या आणि अश्या सर्व विषयांवर मिपावरील डॉक्टर आणि अन्य तज्ञ मंडळींनी आवश्यक माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती करतो. सर्व वाचकांनी आपापले प्रश्नही इथे दिल्यास दृष्टीविषयक सर्व माहितीया धाग्यावर मिळत राहील.

चष्मा स्वच्छ करण्याविषयी मला चष्मेवाल्याने सांगितले की वाहत्या पाण्याखाली चष्मा किंचितसे साबण लावून धुवावा आणि मऊ (उदा. बनियानचे कापड) कापडाने टिपून कोरडा करावा. असे करण्यातून काचेवरील धूळ वाहून जाते आणि चष्म्याच्या फ्रेमच्या लहानश्या बिजागर्‍यांवर साठणारी घामाच्या क्षाराची पुटे देखील वेळोवेळी स्वच्छ होत रहाण्याने फ्रेमचे आयुष्य वाढते.

या विषयावर यापूर्वी धागा निघालेला असल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.

जीवनमानअनुभवसल्लामाहितीचौकशीआरोग्य

प्रतिक्रिया

१) सतत स्क्रीनसमोर बसू नका. मोबाईल / लॅपटॉप किंवा टीव्ही बघत असाल तर थोडा वेगळेपणा म्हणून खिडकीतून बाहेर / हाफिसात दूरवर बघा.
२) वेगवेगळे रंग मुद्दाम बघा.
३) २०-२०-२० रुल वापरा. दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फुट अंतरावर बघा. (हे लक्षात ठेवणे खूप अवघड आहे पण जमेल तेंव्हा असे करा)
४) भरपूर गाजर खा.
५) दिवसातून तीन ते चार वेळा डोळे धुवा. शक्यतो कोमट पाणी वापरा. बेसीनच्या नळाला मिक्सर असेल आणि गार व गरम पाणी एकत्र करता येत असेल तर आणखी चांगले.
६) दिवसा न चुकता गॉगल वापरा. रात्री दुचाकीवरून प्रवास करणार असल्यास पारदर्शक गॉगल वापरा. दिवसा प्रवासात झोपणार असलात आय मास्क वापरा. (विमानप्रवासात मिळतो तसा)
७) किमान ६ महिन्यांनी एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या.
८) तरीही आवश्यकता असेल तर डोळ्यांना आराम मिळावा म्हणून एखादे ड्रॉप डॉक्टरांकडूनच घ्या. (मी पूर्वी कधीकधी पोरवाल नेत्रांजन वापरत होतो, पतंजलीचे वापरावेसे वाटले नाही - सध्या कधीतरी एक ड्रॉप वापरत आहे, नांव आठवले की सांगतो.)

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 11:01 am | इरसाल कार्टं

मेलेला माणूसही बोंबलत उठेल एवढे झोंबते हे. मध, कांडा, आले असे काहीतरी असते यात. सगळे मसालेच.

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 11:03 am | इरसाल कार्टं

*कांदा

एस's picture

16 May 2017 - 8:42 pm | एस

अगदी, अगदी!

श्वेत-प्याज-कन्द-रस
अदरक-कन्द-रस
नींबू-फल-रस
शहद

मोदक's picture

16 May 2017 - 10:15 pm | मोदक

?

त्यातले घटक. एकदाच डोळ्यांत टाकलं होतं. आयुष्यात इतक्या अपघातांमध्येही इतक्या वेदना कधीच झाल्या नव्हत्या!

तुम्ही दोघे पतंजली बद्दल बोलताय का?

एस's picture

17 May 2017 - 5:03 pm | एस

होय.

अभिदेश's picture

16 May 2017 - 11:13 pm | अभिदेश

४) भरपूर गाजर खा. ---- खरंच ह्याचा काही उपयोग आहे का डोळ्यांसाठी ?? ...आमच्या नेत्रतज्ञानी पाटी लावली आहे. गाजर खाऊन डोळ्यांचा नंबर कमी होता नाही किंवा चष्मा जात नाही .

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2017 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

गाजर व इतर भडक भगव्या/पिवळ्या रंगांच्या भाज्या/फळांत असलेले कॅरोटिन या द्रव्यापासून मानवी शरीर अ जिवनसत्व (Vitamin A) तयार करते. हे जीवनसत्व, नेत्रपटलाच्या सर्वसाधारण आरोग्यपूर्ण वाढीसाठी आणि (अ) रंग ओळखणे (कलर व्हिजन) व (आ) कमी उजेडात पाहणे (लो लाईट /स्कोटोपिक व्हिजन) या दोन कार्यांसाठी अत्यावश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे विशेषतः लहान मुलांत अंधत्व आणि मोठ्या माणसांत रातांधळेपणा हे दोन विकार उद्भवतात.

डोळ्याला नंबर असणे (refractive error किंवा error of refraction) यामध्ये... डोळ्याचा पारदर्शक पडदा (कॉर्निया), भिंग (लेन्स) आणि डोळ्याची लांबी यापैकी एकात किंवा अनेकांत दोष असल्यामुळे... नेत्रपटलावर (रेटिना) पडणारी प्रतिमा स्पष्ट (फोकस्ड) नसते व त्यामुळे दृष्टी धूसर होते. भिंगे (चष्मा, काँटॅक्ट लेन्स, इ) वापरून, रेटिनावर पडणारी प्रतिमा स्पष्ट करून, असे दोष दूर केले जातात. अर्थातच, डोळ्याला नंबर असण्यामागे कॅरोटिनचा बरा-वाईट संबंध नसतो.

म्हणजे गाजर किंवा इतर पिवळ्या-भगव्या रंगांच्या भाज्या खाणे आरोग्याला (नेत्रपटलाचे आरोग्य, शरीराची वाढ, शरीराची रोगप्रतिकारशक्ती, इ साठी) फायदेशीर असते, पण त्याचा डोळ्याच्या नंबरशी (refractive error) तडक संबंध नाही.

अभिदेश's picture

18 May 2017 - 2:37 am | अभिदेश

धन्यवाद ...

चित्रगुप्त's picture

18 May 2017 - 6:59 am | चित्रगुप्त

आमच्या नेत्रतज्ञानी पाटी लावली आहे. गाजर खाऊन डोळ्यांचा नंबर कमी होता नाही किंवा चष्मा जात नाही .

त्या नेत्रतज्ञांना मुद्दाम जाऊन डॉ. म्हात्रे यांनी दिलेली माहिती सांगा आणि पाटी काढून टाकायला सांगा किंवा पाटीत संपूर्ण माहिती द्यायला सांगा. हल्लीचे डॉक्टर औषध कंपन्यांच्या संगनमताने ' आता तुम्हाला जन्मभर औषध घावे लागेल' या कल्पनेचा पुरस्कार करू लागले आहेत. याला खीळ घालणे आपल्यासारख्या जागरूक लोकांनी केले पाहिजे. आणखी एक म्हणजे अजूनही लोकुला सारखे डोळ्यांचे थेंब पंचवीस रुपयांना मिळत असता मुद्दाम तीनशे चारशे रुपये किंमतीचे थेंब लिहून देतात. या किंमती मुद्दाम फुगवलेल्या असतात आणि त्यात डॉक्टर आणि केमिस्ट या दोघांना भरपूर कमिशन मिळत असते, हे मला खुद्द एका ओळखीच्या केमिस्टाने सांगितले. गेली वीस वर्षे बेताची फी आकारून प्रामाणिकपणे काम करणारे डोळ्यांचे एक वयस्क डॉक्टर आताशा भरमसाठ फी, महागडी औषधे, गरज नसता अन्य महागड्या तपासण्या, जवळच्या केमिस्ट कडून/चष्मे वाल्यांकडून दरमहा हप्ता घेणे वगैरे करू लागले आहेत. MBA विद्येचा असा सर्वत्र झपाट्याने प्रसार होत आहे. आता तर काय लहान मुलांचा ओघ डोळ्यांच्या डॉक्टरांकडे अखंड वाहू लागला आहे. कालच दीड वर्षाचे मूल मोबाईलवर कार्टून बघताना दिसले, त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होते, तरी आईवडिलांना फिकीर नव्हती.

ज्योति अळवणी's picture

16 May 2017 - 9:12 am | ज्योति अळवणी

शक्यतो मोबाईल, कॉम्पुटर, टीव्ही कमी बघावं हाच खरा उपाय आहे.

यशोधरा's picture

16 May 2017 - 12:32 pm | यशोधरा

डोळ्यांचा कोरडेपणा घालवण्यासाठी रिफ्रेश टिअर्स हे ड्रॉप्स दिवसातून 4 ते 5 वेळा डोळ्यांत घातल्यास फरक पडतो, स्वानुभव.

चित्रगुप्त's picture

17 May 2017 - 5:48 pm | चित्रगुप्त

डोळ्यांचा कोरडेपणा घालवण्यासाठी रिफ्रेश टिअर्स हे ड्रॉप्स दिवसातून 4 ते 5 वेळा डोळ्यांत घातल्यास फरक पडतो,

म्हणजे कोरडेपणा त्या थेंबांमुळे (तात्पुरता) बंद होतो की काही दिवसांनी आपोआप नैसर्गिक अश्रू येणे सुरू होऊन औषधाची गरज नाहिशी होते ? मला एका डॉक्टराने आता (कोरड्या डोळ्यांसाठी) जन्मभर डोळ्यात थेंब घालावे लागतील असे सांगितले आहे, ते मला खरे वाटत नाहीये, परंतु नेमके काय करावे हेही कळलेले नाही. कुणाला ठाऊक असल्यास अवश्य कळवा. (सध्या मी Gen Teal drops घालतो आहे)

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 4:07 pm | मराठी कथालेखक

डोळ्यांचा कोरडेपणा कमी होण्यकरिता पापण्यांची उघडझाप वाढवा.. मुद्दाम करत रहा

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 May 2017 - 12:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

स्त्रीयांना मेनोपॉजनंतर ड्राय आय सिंड्रोम हा विकार होण्याची शक्यता असते.यासाठी आहारात बदल,व्यायामाची गरज आहेच.आहारात स्निग्ध पदार्थ जास्त ठेवावेत.

गामा पैलवान's picture

16 May 2017 - 8:36 pm | गामा पैलवान

बायकांना डोळे मारणं सोडून द्या.

संदर्भ : आमच्या अभियांत्रिकीच्या एका गुरुजींनी वर्गास प्रश्न केला होता. How do you take care of your bikes? पुढे उत्तरही स्वत:च दिलं होतं : लडकीयोंको लिफ्ट देना बंद करो.

-गा.पै.

कवितानागेश's picture

17 May 2017 - 6:41 am | कवितानागेश

डोळ्यात थेंब किंवा पाण्यात थेंब घालून त्यात रुमाल भिजवून त्याची घडी डोळ्यावर.

हेमंत८२'s picture

18 May 2017 - 11:46 am | हेमंत८२

माझे काही प्रश्न

१) लेन्स वापराने चांगले असते का? कोणी वापरल्या असतील तर त्याचा अनुभव काय आहे.
२) आजकाल डॉक्टर डोळ्यांची लेसर ने चष्मा घालवण्याची गॅरंटी देतात.. कोणी हे केले आहे का? त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत.
३) मी गेली काही वर्षे क्रिसलच्या ग्लास वापरतो यापेक्षा चांगल्या कोणाला माहित आहेत का?

गेली २० वर्षे चष्मा वापरल्यामुळे या गोष्टीची उत्सुकता आहे.

पद्मावति's picture

9 Feb 2018 - 4:29 pm | पद्मावति

पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. लेन्सचा अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. काही जण लेन्सेस अगदी सहजपणे दिवसभर वापरतात, त्यांना काही वेगळे जाणवत सुद्धा नाही तर काही लोकांना डोळ्यात काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट आहे याची सतत जाणीव होत राहते. मला स्वत:ला लेन्सेस पेक्षा चष्मा वापरणे जास्ती कंफर्टबल वाटते. लेन्सेस वापरायचेच असल्यास डेली डिसपोज़ेबल लेन्सेस वापरा. त्या अगदी हलक्या असतात आणि एकदा वापरुन टाकायच्या असल्यामुळे जंतू संसर्गाची भीती नाही ( लेन्स हाताळणे कमीत कमी होते). कलर्ड लेन्सेस मात्र शक्यतोवर वापरु नयेत ( स्त्रिया आणि मुली आजकाल खूप वापरतात) या कलर्ड लेन्स मुळे दृष्टी अंशत: ब्लॉक होते हा स्वानुभव आहे. अगदीच हौसेखातर वापरल्या तरी ड्राइव करतांना अजिबात वापरु नयेत.

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2018 - 4:37 pm | मराठी कथालेखक

आजकाल डॉक्टर डोळ्यांची लेसर ने चष्मा घालवण्याची गॅरंटी देतात.

हो, हे खूप कॉमन आहे. तोटे काही असल्यास माहित नाही. हे अनेक वर्षापासून असल्याने आता खूप स्थिरावलं आहे. माझ्या माहितीतील एकाने २००२ मध्ये केले होते. जवळपास चौदा-पंधरा वर्षांनी त्याला पुन्हा कमी नंबरचा चष्मा लागला. बाकी काही त्रास नाही. आता हे तंत्रज्ञान अधिकच प्रगत झालंय असं ऐकून आहे.