लॉन-वरचं लगीन!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
20 Apr 2017 - 12:36 pm

https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0
नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "

स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.

या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे!
हलकल्लोळ आता उडणार आहे.
जो तो येऊन गप पडल्या,
भटावर आता चिडणार आहे.

दोन तास लेट झाला
आकराची वेळ छापून !
आइस्रकिम जरी "तयार होतं"
वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून)

केटरिंग आणी भटजिंचीही
अवस्था अशी-एक आहे.
काम ठरताना चालंलेली नोट
आज मात्र "फेक" आहे.

लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!

तेव्हढ्यात एक लहान मूल,
आइस् करीम घेऊन येते.
"काका.. आयश्लिम खानार? " म्हणून
थंडावा देऊन जाते.

मग मनात विचार येतो..
इथे लहान होऊनच रहायला हवं.
त्याच्या निरागस नजरेनी,
सगळं चालंलेलं पहायला हवं!

मग सगळे त्रास सु सह्य होऊन,
अॅक्सेप्टन्स वाढेल.
आणी फार तर तिथला 'राग',
तो कवितेतून काढेल!

सोप्पं होऊन जाइल सगळं
त्रास हवेत विरून जाइल!
शब्द उरले नाहित.. तरी,
काव्य तळाशी राहिल!
==============
अत्रुप्त...

कविता माझीजिलबीशांतरससंस्कृतीकवितासमाजमौजमजा

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

20 Apr 2017 - 1:32 pm | विनिता००२

वा वा!!

एस's picture

20 Apr 2017 - 2:06 pm | एस

कविता आवडली.

Dr prajakta joshi's picture

20 Apr 2017 - 4:34 pm | Dr prajakta joshi

छान

सावत्या's picture

20 Apr 2017 - 4:40 pm | सावत्या

छान!!!

पद्मावति's picture

20 Apr 2017 - 5:28 pm | पद्मावति

आवडली कविता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 6:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे.
रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!

नाहि, त्यांचे यजमान रागावतात.

गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))

प्रचेतस's picture

20 Apr 2017 - 7:13 pm | प्रचेतस

ते पण बोबड्या बोलणाऱ्या

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2017 - 9:55 pm | अत्रुप्त आत्मा

गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा घुसला उंट!
जाता जाता यशो तैं नी टपली मारून केला स्टं... टं! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/baby-soldier-sticky-out-tongue-smiley-emoticon.gif

वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी फक्त सांगितलं, नजरेस आणून दिलं तर स्टंट काय? हे बरंय! =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2017 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा

आं Sssssssssss https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

अभ्या..'s picture

21 Apr 2017 - 4:14 pm | अभ्या..

कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं....
कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं...
.
कसं बसतंय एक मानूस अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2017 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-character-smileys-230.gif
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! =))

राघवेंद्र's picture

21 Apr 2017 - 12:34 am | राघवेंद्र

वा वा गुर्जी !!!

एकदम मस्त

प्रमोद देर्देकर's picture

20 Apr 2017 - 7:38 pm | प्रमोद देर्देकर

काय अभ्यास काय अभ्यास!

आता गुल्जी लागाव्णाल आनि दूत्त दूत्त बोलणार

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2017 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या कवितेत पण आईशक्लीम आजच्या कवितेत पण आईशक्लीम. ;)!!!

कंजूस's picture

20 Apr 2017 - 6:41 pm | कंजूस

व्वाव्वा!!

सतिश गावडे's picture

20 Apr 2017 - 9:56 pm | सतिश गावडे

वाहव्वा वाहव्वा. इनशादेव. माशादेव.

नूतन सावंत's picture

21 Apr 2017 - 10:06 am | नूतन सावंत

<> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote
छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.

वेल्लाभट's picture

21 Apr 2017 - 1:09 pm | वेल्लाभट

उत्तम!!!!!!!!!

दशानन's picture

21 Apr 2017 - 1:19 pm | दशानन

गुर्जी! दर्शन द्या ;)

सूड's picture

21 Apr 2017 - 1:30 pm | सूड

अवघड आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2017 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक ,प्रतिसादकांचे आभार. :)