मागील भागावरुन पुढे, खुदिराम प्रथम पुरुषी एकवचनी..
...
शालु आणि शशिकांत दोघ्ंही गेले, निदान् या मितिमध्ये तरी मेले, पण मग इतर मितीमध्ये कुठ्ं जिवंत असले तर् काय्, माझा आणि त्यांचा तिथ्ं कधी सामना झाला तर ते बदला घ्यायचा प्रयत्न करतील ना ? त्यांच्या मरणाला मी उघड् उघड् नसलो तरी जबाबदार् आहेच् ना का मिती बदलली की जबाबदारीतुन् देखिल् मुक्तता होते ? तो नैन्ं छिंदन्ती वाला आत्मा, तो कुठं गेला त्या दोघांचा ? तो मिती बदलु शकतो का, बदलुन् देखिल् पुन्हा नव्या शरीरात् प्रवेश् मिळवु शकतो का ? त्या नव्या शरीराला तो या जुन्या आठवणींच्या आधारे वापरु शकतो का ?
बापरे एक ना अनेक् प्रश्न् मला गेले काही दिवस् छ्ळताहेत्, झोप् नाही, धड् जेवण् खाण् नाही, ही अवस्था फार् वाईट्, मागे बराच् वेळा दोन् मिती प्रवासात् वस्तुमान् आणि वारंवारितेच्ं गणित् चुकल्यान्ं अडकुन् पडलेलो आहे, पण् त्यापेक्षा देखिल् हे वाईट्. यातुन् सुटका होईल् म्हणुन् मी आतापर्य्ंत् पाचही, म्हणजे आता आहे ती, वरची, खालची,डाविकडची अन् उजवीकडची, पाची मिती आणि काळ् बदलुन् पाहिलेत्, पण् हे प्रश्न् माझ्या मनाच्या आणि बुद्धिकेंद्राच्या मुळ् रचनेत स्थापल्यासारखे झालेत्, माझ्या जिवन् मरणाच्या नियमासारखे, जसे मी ते काढुन् टाकु शकत् नाही तस्ंच् झाल्ंय हे पण्.
यावर् उपाय् हवाय्, मला यावर् उपाय् हवाय् काहीही करुन् आणि कोणत्याही किमतीला मला उपाय हवाय्, अगदी त्यासाठी अजुन् काही मरणांना जबाबदार् व्हाव्ं लागल्ं तरी चालेल्. नाहीतर् मग् अस्ं शक्य् आहे, सरळ् मुख्य स्ंघ् गाठायचा, इच्छा मरणाचा अर्ज् भरुन् द्यायचा, आणि वाट् पाहायची, हल्ली तिथ्ं देखिल् बराच् काळ् द्यावा लागतो म्हणे, आई बाबांची हा रस्ता पत्करला तेंव्हा अस्ं नव्हते, ते तिथ्ं गेले, अर्थात् मी देखिल् बरोबर् होतो, मला त्या त्रिमितीय् खोलीत् बसवल्ं आणि मला तो मोठा शरभ् आवडायला लागला होता तेवढ्यात् तिथल्या मॅडम् एक् सर्टिफिकिट् घेउन् आल्या, त्यात् लिहिल्ं होत्ं की आज् या क्षणापासुन् त्या दोघांची जी काही स्ंपत्ती होती ती माझी झाली आहे. माझ्ं वय् लक्षात् घेउन् मला घरी सोडायला एक् चालक् स्ंघान्ं दिला होता, तो आमच्याच् गाडीतुन् मला सोडायला आला.
अरे हो आठवल्ं, तोच् तर् माझा पहिला खुन् होता, त्याला घरात् बसवुन् मी किचन् मध्ये गेलो आणि त्याच्यासाठी ते पिवळसर् र्ंगाच्ं सरबत् बनवल्ं, जे आईन्ं बाबांच्या दोन्ही हत्तीना दिल्ं होत्ं, आणि त्यान्ंतर त्या दोघांच्ं प्रच्ंड् भांडण् झाल्ं होत्ं. तो चालक् ते सरबत् एका घोटात् पिउन् गेला, आणि बरोबर् आठ तासात् स्ंघाचे अधिकारी आमच्या घरी आले, चौकशी करायला. पण् मला पकडुच् शकले नाहीत्, मी सरबत् करण्याआधीच् ग्लास् चिमट्यान्ं धरुन् ट्रे मध्ये ठेवला होता आणि न्ंतर् ट्रे जाळुन् टाकला होता त्या हत्तीच्या विष्ठेबरोबर्.
त्यान्ंतर् मला व्यसन् लागल्ं, खुन् करायच्ं नाही, पुरावे नष्ट् करायच्ं, आता ह्याला माझा नाईलाज् आहे की पुरावे नष्ट् करावे लागतात् कारण् तस्ं केलं नाही तर ते खुन्याला पकडुन् देतात्, आणि हो खुन् केलाच् नाही तर् पुरावा तयार् तरी कसा होणार्, मग त्यासाठी मी खुन् करायला लागलो, पण् ते माझ्ं व्यसन् नाही, म्हणजे काल् ही नव्हत्ं आणि आज ही नाही. मला फक्त् पुरावे नष्ट् करायला आवडत्ं. पण् आता झाल्ंय् काय् माहितिय् का, खुन् मी केले नाहीत्, त्यामुळ्ं त्यांचे पुरावे नाहीत्, पण् मला अस्ं वाटत्ंय् की ते खुन् माझ्यामुळ्ं झालेत् पण् मला त्यांचे पुरावे सापडत् नाहीत् आणि ते सापडत् नाहीत् म्हणुन् नष्ट करता येत् नाहीत्, आणि म्हणुन् मला हा एवढा त्रास् होतो आहे. काल् पासुन् मी जवळपास् पाच् ते सहावेळा नवनवीन् पुरावे तयार् करायचा प्रयत्न् केला, पण् ते देखिल् शक्य् होत् नाहीये, शशिकांतचा हार्ट अॅटॅक, शालुच्ं घाबरुन् पाय् घसरण्ं, हे सगळे काहीतरी नैसर्गिक् कारणांनी मेलेले आहेत्, माझा काही संबंधच नाही तिथ्ं, एक् माझी आणि अशोकाची मैत्री सोडली तर् पुढ्ं काही स्ंब्ंधच् नाही, पण् तरीही या सगळ्याला मीच् जबाबदार् आहे. म्हणजे ही कल्पना नाही माझी तर खात्रि आहे, पण् पुन्हा तोच् पण्, ते का आणि कस्ं हे समजत् नाही, आणि पुन्हा पुरावा नाही म्हणुन् तो नष्ट होत् नाही आणि म्हणुन् माझ्ं चारित्र्य् स्वच्छ होत नाही, याचा अर्थ् मी येत्या निवडणुकीत् स्ंघाध्याक्ष होउ शकत् नाही, ते जेंव्हा माझी मानसिक् आणि आत्मिक् परिक्षा घेतील् तेंव्हा मी सपशेल् नापास् होईन्.
आज् पुन्हा एक् प्रयत्न् करतो, पहिल्यांदा शशिकांत्, त्याला काही त्रास् होता का, बघु त्याच्या मेडिकल् डिटेलस् मध्ये अस्ं काही लिहिलेल्ं नाही, पण् एकदा त्याच्या बायकोन्ं तो शारिरिक् सुख् देउ शकत् नाही अशी तक्रार् केलेली आहे. या बायका पण् ना, कोणत्या गोष्टी कुठ्ं उघड् कराव्या ह्याच्ं काही भानच् नसत्ं यांना. आता मलाच् बघा मी तरी आजपर्य्ंत् कुणाला………
तर शशिकांत तब्येतीन्ं उत्तम् होता काही झालेल्ं नव्हतं त्याला मग मी अस्ं काय् केल्यावर् त्याला मरण् आल्ं असत्ं, भिती दाखवली असेल् त्याला मी, कसली भिती मरणाची का बेइज्जतीची ? कशाला तरी तो घाबरत असेलच् ना, अशी एखादी तरी गोष्ट असेल् जी होउ नये अस्ं त्याला वाटतं आणि म्हणुन् तो घाबरतो. नोकरीची गरज् अशी त्याला नव्हतीच्, त्याच्ंही माझ्यासारख्ंच्, आई बाबांनी इच्छामरण् पत्करलेल्ं आणि सगळी स्ंपत्ती याला मिळालेली. माझ्यावर् निदान् माझ्या प्रयोगशाळेसाठी काढलेल्ं कर्ज् आहे, ह्यान्ं तर् हरतर्हेचे खर्च् टाळलेले दिसतात्, २२ वेळा अॅडव्हान्स् भरुन् मोठी घर्ं, गाड्या आणि दोन् वेळा परमिती प्रवास् बुक् केलेत् आणि सगळी रक्कम् भरायची वेळ् आली तेंव्हा पैसे नाहीत् अस्ं कारण् देउन् सगळ्ं रद्द् केल्ंय्.
त्याच्या एक दोन् हॉटेलच्या बिलांत् मात्र गडबड् दिसते आहे, नाही गेल्या चार वर्षातल्या सगळ्याच् बिलांमध्ये आहे हे, टिपिकल् बायकी ड्रिंक्सची बिल्ं आहेत् ही, हो अगदी हार्मोन्स् एक्स्ट्रा पण् आहेत् त्यात्, फोटो मात्र कसलेच् टाकलेले नाहीत् या हुशार् माणसान्ं, म्हणजे बरोबर् कुणी बाई होती का हा स्वताच् असले चाळे करायचा, हे शोधुन् काढल्ं पाहिजे आता. शेवटी जग कितीही पुढ्ं गेल्ं अगदी ह्या अनेकमिती प्रवासापर्य्ंत् तरी माणसाचे मुळ् शौक् काही बदलत् नाहीत्, पुरुषाला परस्त्री आणि स्त्रीला पुरुषाची फसवणुक् यातुन् कुणी सोडवु शकत नाही हे खर्ं.
पण् जेंव्हा एखादा पुरुष् त्याच्या स्त्रीशी प्रतारणा करतो तेंव्हा ती देखिल् अस्ं काही करत् असेल् याची कल्पना त्याला असतेच् ना, किंवा त्यान्ं ते स्वात्ंत्र्य् तिला दिलेल्ं असत्ंच्. तुम्ही घराबाहेर् पडताना दरवाजा घट्ट् लावुन् घेत् नाही म्हणजे घरातल्या इतरांना बाहेर् पडण्याची मुभा आणि बाहेरच्यांना घरात् येण्याच्ं आम्ंत्रणच् नाही का, दरवाजे घट्ट् लावुन् घेण्याचा नियम् आणि शिस्त् तुम्ही पाळली पाहिजे आधी मग् इतरांबद्दल् बोला.
अरेच्चा हा कोन् पाहिलाच् नाही मी तपासुन् शशिकांतचा, आता त्याचे मित्र, नातेवाईक्, त्यातले पुरुष् आणि बायका असा एक मोठा डाटा तपासायला लावतो आणि झोपतो थोडावेळ्, नाहीतरी मुलांच्ं कारण् देउन् या मितीत् पळुन् आलेलो आहे मी, तो मतकरी का मितीकरी आणि अशोक् त्या दोघांना मी सापडेपर्य्ंत् बराच् वेळ् जाईल्,आणि बहुदा अशोक् एव्हाना मेलेला असेल्, मग पुरावा आणि मग तो नष्ट करण्ं, यावेळी मात्र काम् अगदी व्यवस्थित् कराव्ं बाबा, उगा घोर नको जिवाला.
बराच् वेळान्ंतर् जाग आली, झोप् अगदी मस्त् झाली. उठुन् मी पुन्हा ते पिवळसर रंगाच्ं सरबत् प्यालो, तेच् ते हत्तीना दिलेल्ं, चव फार घाण् आहे त्याची पण् छान् लागत्ं, झोपेतुन् उठल्यावर् तर् एकदम् मस्त्. बहुदा ते हत्ती आणि तो चालक् सगळे झोपलेले नव्हते ते पिण्यापुर्वी म्हणुन् मेले असावे, झोपुन् उठल्यावर् पिल्ं की नाही मरत्, अस्ं मला वाटत्ं. असो.. मॉनिटर्स् समोर् बसलो, हो अनेकवचनच माझ्या लॅबमध्ये एकुण् ४० वेगवेगळे मॉनिटर आहेत्, मला एकच् मोठा मॉनिटर् आवडत् नाही, क्ंटाळवाणा होतो आणि मान वर करुन् पहाव्ं लागत्ं, अरे हो पुढच्या महिन्यातली मितिराईट् च्या डॉक्टरांनी बोलावलं आहे मान् दाखवायला. तर ते मॉनिटरवर् काय् काय् आहे, खालच्या कोप-यात् वेळ् पाहिली, १९ तास् शोधाशोध् करुन् जे सापडल्ं ते १० ओळीत् लिहिलेल्ं आहे,
१. शशिकांत हा इच्छापुरुष् आहे.
२. त्याला त्याची बायको आवडत् नाही.
३. त्याच्या बायकोला तो आवडत् नाही.
४. तिच्या मुलांना तो आवडतो.
५. त्याच्या मुलांना तो आवडतो का नाही हे सांगता येत् नाही.
६. त्याच्या बँकेत् एकुण् ९५ हजार् बिटकॉइन् आणि ९९७५४९५९२७ इतके भारतीय् रुपये पडुन् आहेत्, शेवटचा खर्च् ४० दिवसांपुर्वी.. कॉटन् बँडेज् आणि चिकटपट्टी .. मध्यवर्ती दवाखाना मितिअप्.
७. त्याच्या नावावर् ४५० भारतीय् रुपये इतक्ं कर्ज् आहे… यापुढील् माहिती मिळ्ण्यासाठी मितीअप् मध्ये जावे लागेल्.
८. त्याच्या बायकोच्या मुलांना त्यान्ं प्रत्येकी दोन् घर्ं आणि २ गाड्या दिलेल्या आहेत्, तसेच् त्या २ जणांसाठी त्यान्ं परमिती प्रवासाची प्रत्येकी ५ तिकिट्ं खरेदी केलेली आहेत्.
९. तो अशोकचा मित्र आहे हे त्यान्ं जवळपास् सिद्ध केलेल्ं आहे, अशोकचा त्याच्यावरचा ट्रस्ट् इंडेक्स् ६.५ % इतका आहे, सध्याचा सरासरी ट्रस्ट् इंडेक्स् ४.२% आहे.
१०. क्र्. ५ च्ं कारण् शालुचा म्रुत्यु असु शकेल् अशी शंका आहे, अधिक् माहितीसाठी मितीडाउन् मध्ये जावे लागेल्.
मी दोन् गोष्टी चेक् केल्या, माझा ट्रस्ट् इंडेक्स्, तो ३.९% होता, वाढवायला हवा, कारण् निवडणुक्, कमीत् कमी, ४.७% असायला हवा, तत्कालीन् सरासरीपेक्षा १०% जास्त्. म्हणजे आतापर्य्ंत् अशोकन्ं पिवळसर् रंगाच्ं सरबत्, हो तेच् हत्ती वाल्ं,पिल्ं असेल् आणि तरी तो मेला नाही तर मला किमान् ०.३% तरी मिळतील्, आणि तेच् त्या मतकरीने पिल्ं आणि तरी जिवंत राहिला तर् डायरेक्ट् १% मिळणार् ट्रस्ट् इंडेक्सला. याचा अर्थ अशोक् मेला तरी चालेल् पण् मतकरी जिव्ंत् राहिला पाहिजे, ते सरबत् पिउन.
आणि दुसरी गोष्ट् म्हणजे, मितीअप् आणि मितीडाउनची शोध परवानगी मागितली, क्र्. ५ आणि क्र. १० मधला दुवा हुडकायलाच हवा आहे, तस्ंच क्र. ७ च्ं काय्, का कर्ज् घेतल्ं होत्ं शशिकांतन्ं, एवढे प्रच्ंड् पैसे त्याच्याकडे असताना. पण् ते जरा कमी महत्वाच्ं आहे, आधी ५ ते १०, मग बाकीच्ं. परमिती शोधाची परवानगी मिळेपर्य्ंत् आवरुन् घेतल्ं सगळ्ं, हे परमिती शोध् म्हणजे एक् मोठी भानगड् आहे, सगळ्या अधिकार्यांना कळते कोण् शोधत्ं आहे ते, अर्थात् काय् ते कळत नाही, त्यासाठी अजुन् एक् पायरी वर् जाव्ं लागत्ं, बरोबर् स्ंघाध्यक्ष्. माझी शेवटची महत्वाकांक्षा.
३ तासांनी परवानगी मिळाली, अर्थात् त्यासाठी मला १२० बिटकॉइन् खर्चावे लागले, हे लाच प्रकरण् मला जाम् आवडते, माझ्या व्यसनासाठी फार गरजेच्ं आहे, पुरावे नष्ट करताना फार उपयोगी पडत्ं, आणि ही प्रकरण्ं एवढी पडुन् आहेत् मुख्यस्ंघाकड्ं की पुढची पन्नास वर्षे तरी माझ्ं नाव् त्या यादीत् येत् नाही, तोपर्य्ंत् मी चार् वेळा स्ंघाध्यक्ष् झालेलो असेन्. परवानगीच्या मेल् मध्ये असलेला पासवर्ड् सिस्टिमला टाकला, लाच् देउन् घेतलेला ट्रॅकर् चालु केला, आणि घात् झालाय हे कळाल्ं.. मतकरी मला ट्रॅक् करतोय् मी या मितित् आल्यापासुन् आणि त्याचा प्रायव्हेट् पिंग पण् आला लगेच्..
प्रिय् खुरा, कसा आहेस्, बोलु शकतो का ?
म्हणजे तुला बोलाव्ंच् लागेल्, जर तुला स्ंघाध्यक्ष् व्हायच्ं असेल् तर्..
मी अजुन् सरबत् पिलेल्ं नाही..
अशोकन्ं पिल्ंय् पण् तो अजुन् उठलेला नाही..
मी त्याला उठवु शकतो..
आणि तुझा ट्रस्ट् इंडेक्स् अपडेट् होईपर्य्ंत् जिव्ंत ठेवु शकतो..
सरबताच्या बाटलीवरचे तुझ्या हाताचे ठसे पुसुन् टाकु शकतो..
इच्छा तुझी प्रश्न् तुझा महत्वाकांक्षा तुझी..
प्रतिस्पर्धी तुझा..
.
.
.
एक् न् थांबणा-या टिंबांची मालिका, मला काही लिहिताच् येईना, टिंब्ं स्ंपण्याची वाट् बघण्याखेरीज् माझ्या हातात् काहीच् नव्हत्ं, आणि ती काही स्ंपत् नव्हती. दहा मिनिटांनी स्ंपली एकदाची. अतिशय आन्ंद झाला मला, मी मेसेंजर् ब्ंद् केला आणि शोध् सुरु केला पुन्हा एकदा.
दहा मिनिटात् सगळे दुवे आणि पुरावे, माझी सगळ्यात् आवडती गोष्ट पुरावे समोर् येउ लागले. शशिकांत् आणि शालुचे स्ंब्ंध्, एकत्र फिरण्ं, हॉटेलात् जाण्ं, अशोकच्ं कर्जबाजारी असण्ं आणि शशिकांतन्ं मतकरीला दिलेली लाच् ४५० भारतीय् रुपये,
मेसेंजर् पुन्हा पुन्हा पिंग् करत होता, मला त्याकड्ं लक्ष् द्यायच्ंच् नव्हत्ं. पण् फारच् जास्त् टिंग् टिंग् आवाज सुरु झाला तस्ं पुन्हा मेसेंजर् चालु केला, पुन्हा बरीच् मोठी टिंबाची मालिका होती.. आणि त्याखाली लिहिलेल्ं होत्ं,
मी सरबत् झोपुन् उठल्यावर् पिल्ंय्, चव् छान् आहे.
तुझ्या मेलेल्या प्रतिस्पर्ध्याचा जिव्ंत प्रतिस्पर्धी
अशोक.
म्हणजे मतकरी मेला, माझा १% गेला, फक्त ०.३% मिळणार्, अजुन् थोड्याश्या टक्क्यांसाठी अजुन् काही लोकांना मारुन् वाचवाव्ं लागणार्, त्यातले मारल्याचे पुरावे नष्ट करायचे, जिव्ंत् ठेवल्याचे सांभाळायचे, अरे माझ्या नशिबा फार अवघड् झाल्ं हे सगळ्ं आता. परत मागच्या मितीत् जाउन् मतकरी मरणार् नाही हे बघावं लागेल् आता, आवरा आता इथल्ं सगळ्ं, मॉनिटरवरचा मेसेंजर ब्ंद् झाला, त्याचा सिग्नल ट्रॅक् केला तो मितिअप मधुन् होता, म्हणजे अशोक् माझ्याआधी तिथ्ं गेला आहे, आणि तो शशिकांतला जिव्ंत करायचा प्रयत्न् करेल् शेवट त्याचा ट्रस्ट् इंडेक्स् वाढण्यात् होणार् आणि तो स्ंघाध्यक्ष् होणार्, सगळा पसाराच् स्ंपणार्, वेळ् फार कमी आहे, फार झटकन् सगळ्या हालचाली करायला हव्यात्. बरीच् लाच् द्यावी लागणार् आता, तत्वांच्ं काय् होणार् काय् माहित्, माझी बुद्धिस्ंस्था प्रत्येक् वेळी ब्ंद् करायची लाच् देताना, ती पुन्हा चालु होताना पन्नास् फक्त् प्रश्न् विचारणार् आणि वेळ् खाणार्.
अरे, पण् अशोकचा सध्याचा ट्रस्ट् इंडेक्स् काय् आहे, मी चेक् करायला टाकला पण् आता मला ती माहिती ब्लॉक् आहे, शुद्ध लाचखोरी आहे ही, माझ्याकडे मितिअप् आणि मितिडाउन् शोधाचे पुर्ण अधिकार् असताना देखिल् एवढी छोटि माहिती मला ब्लॉक् कशी होते आहे. म्हणजे अशोक् माझ्यापेक्षा जास्त् मोठा लाचखोर् आहे, मग सुरक्षा व्यवस्था चेक् केली, तिथ्ं अजुन् देखिल् मतकरीच्या मरणाची नोंद् नाही, म्हणजे तो मेला नाही. अशोक मेल्याची नोंद् नाही, मतकरी मेल्याची नोंद् नाही मग काय् चालल्ंय् नक्की, माझ्या खेळात् मलाच् स्ंपवण्याची चाल् आहे का यांची ? शालु आणि शशिकांतच्या मरणाला मीच् जबाबदार् आहे का ? अरे हा मुळ् प्रश्न् अशाअडचणीच्या वेळी पुन्हा का डोक्ं वर् काढतो आहे. माझ्या बुद्धीस्ंस्थेला भ्रष्ट करण्यात् आल्ं की काय् ? काल् मतकरीच्या आरशातुन् इकड्ं आलो तेंव्हा हे अस्ं झाल्ंय का ?
होय्, मतकरीच्या आरशातुन् खोट्ं बोलुन् दुस-या मितित् जाता येत् नाही, आणि गेलात् तर् तुमची बुद्धीसंस्था कुणालाही सहजसाध्य् होते, आणि आता हे कस्ं टाळावं, मी काय् खोट्ं बोललो होतो काल्, अरेच्च्या माझ्या मुलांबद्दल् विचारल्ं होत्ं अशोकला. चला पुन्हा लाचखोरी, मितिलेफ्टचे रेकॉर्ड् बदलुन् किमान् दोन् मुलांना माझी मुल्ं आहेत् हे दाखवावं लागेल्. आणि लाच द्यायचीच् असेल् तर शशिकांतच्या बायकोचीच् मुल्ं माझी दाखवता येतात् का ते पाहाव्ं. आवरा आवरी सोडुन् मी पुन्हा सिस्टिमवर् येउन् बसलो. एक् दोन् अधिका-यांना मेसेज् केले, ट्रस्ट् इंडेक्स् वर् ते सगळ्यात् खाली होते,, म्हणजे माझ्ं काम् निश्चित होणार्. बिटकॉइन्सनी खात्ं बदलल्याचा मेसेज् आला, आणि काही क्षणांतच् अशोकाच ट्रस्ट् इंडेक्स् माझ्या समोर् होता ३.८८% आणि आता माझ्या बुद्धिसंस्थेला आता कुणि भ्रष्ट् करु शकणार् नव्हत्ं. स्पर्धा फारच् अटितटिची होती.. पुन्हा काही बिटकॉइन्सनी खात्ं बदलल्ं, आणि अशोकच्या बुद्धिसंस्थेचा पासवर्ड् माझ्यासमोर् होता. तो वापरुन् मी त्याच्या बुद्धिसंस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न् केला, पण् ते शक्य् होईना. त्याचवेळी पहिला प्रश्न् उभा राहिला, शशिकांत आणि शालुच्या मरणाला मी जबाबदार् आहे का ? अरे हे काय् चालल्ंय् ?
मी माझी लेव्हल् डाउन् केली, तज्ञ् मधुन विद्यार्थी दशेत् गेलो, माझ्या बायोइलेक्ट्रोच्या नोटस् समोर् घेतल्या, उत्तर् सापडल्ं, माझ्या बुद्धिस्ंस्थेनं एक् विशिष्ट विचार वार्ंवारिता ओलांडली की पुन्हा तोच प्रश्न् पुढ्ं येण्याची व्यवस्था अशोक् किंवा मतकरीन्ं केली होती. मला फार् जास्त् तांत्रिक् किंवा फार जास्त् वेगान्ं हालचाली करण्यावर् ब्ंधन्ं आलेली होती यामुळ्ं. मी स्वताला फार मोठा तज्ञ् समजत् होतो, आणि माझे प्रतिस्पर्धि अगदी बेसिकला खेळत होते, मिती आणि यांत्रिकतेच्या अतिशय् मुळ् नियमात् मला अडकवत् होते, ते नियम् जे नियमावलीच्या पहिल्या दोन् पानात् असतात्, आणि मला पुन्हा पुन्हा त्यांची गरज् नाही म्हणुन् मी थेट् नियमावलीच्या शेवटी वाढवण्यात् आलेले नविन् नियमच् वाचतो.
कधी कधी एखादा खेळ् फार बेसिक लेव्हलाच् खेळावा लागतो, आणि हाच विचार् मी पुरावे नष्ट करताना करत असतो, मग तो मी इथ्ं का विसरलो, ह्या उच्च पदावर् आल्याची स्वप्न्ं पडायला लागल्यापासुन् अस्ं व्हायला लागल्ंय् का? माझा मोहन् रानडे झाला आहे. तुम्हाला मोहन् रानडे माहित् नाही.. नीट् वाचा मोहन् रानडे.
वाचलंत का बरोबर , समजलं का नाही , हरकत नाही, तोडुन तोडुन वाचा मग कळेल.. आता तोच झालाय माझा. असो हे स्पष्टीकरण्ं द्यायची वेळ् नाही ही. आता मला हालचाली करायचा वेग कमी करायला हवा किंवा शशि आणि शालुच्या मरणाचा माझा संबंध तरी लावायला हवा, आणि तो पुरावा मिटवायला हवा, म्हणजे ०.३% +०.३% = ०.६%, म्हणजे ४.५% म्हणजे तरी देखिल ०.२% कमीच्, एकतर ते मिळायची सोय् हवी किंवा सरासरी ट्रस्ट् इंडेक्स् ४% व्हायला हवा. जसजसा या संघाध्यक्षपदाच्या जवळ येतो आहे तसतसा गोंधळ वाढतो आहे. गरजा वाढत आहेत. हि सिस्टिम बेकारच अर्थात प्रत्येक नविन संघाध्यक्ष असे काहितरी नियम वाढवतो जे त्याच्या सोईचे असतात आणि मग हे असे घोळ होत राहतात, आणि मी काय सोडणार आहे का, मी देखिल हेच करणार आहे.
पुन्हा लेव्हल बदलली, तज्ञ पातळीत प्रवेश केला, मतकरीच्या मेसेंजरवरच अशोकचे मेसेज होते.. बरेच आणि त्यातले बरेच फक्त टिंब असलेले, मला न आवडणारी टिंबांची मालिका. एकच महत्वाचा वाटला, अशोक म्हणत् होता..
शोध शोध् आणि शोध, आता तुला फक्त् शोधच तुला वाचवु शकतो..शोध तुझा, तुझ्या आत्म्याचा आणि तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या मतिचा, तुझ्या मातीचा आणि तुझ्या मितिचा आणि तुझ्या.
.
.
.
पुढं बरीच टिंबं होती, पण् मी काही खालीपर्यंत वाचायला गेलो नाही एव्हाना मला त्याच्या बुद्धीची आणि सामर्थ्याची खात्री पटलीच होती, त्यानं लिहिलेलं असणार्..
मौतीचा..
इथं कुणीच अमर नसलं तरी शेवट कुणालाच नकोय, अगदी शशि, शालुला आणि मतकरीला देखिल शेवटाचा तिटकाराच असणार, त्या अनादि अनंताचा ध्यास आणि मोह सगळ्यांनाच् आहे, तसे तर सगळेच् मोहन् रानडे इथे. तुमच्या जन्मदात्यांच्या शेवटाला कारणीभुत झाला तरी देखिल तुमच शेवट तुम्हाला नकोच असतो, उलट बाकी सगळ्यांचा शेवट तुम्हाला हवाय, होय सगळ्यांचा म्हणतोय मी, सगळ्याचा नाही, ते टिंब् तो अनुस्वार् नीट वाचा, तुम्हाला सगळं हवं असतं, सगळे नको असतात. पुन्हा तोच मला न आवडणा-या टिंबानं घातलेला गोंधळ…. हे सगळ्ं टाइपताना मला एकदम् जाणवलं की मी हे शेवटाच्ं लिहितोय् की काय्… शेवट आणि तो ही संघाध्यक्ष न होता,
छे शक्यच नाही, एकतर मी माझा शेवट होउ देणार नाही म्हणजे स्ंघाध्यक्ष झालो की तसा नियमच करणार आणि माझा शेवट झालाच तरी तो संघाध्यक्ष् म्हणुनच् होणार्.. . ..
पुन्हा एकदा अशोक आणि मतकरीला ट्रॅक करायला घेतल्ं, प्रवासात आहेत सिस्टिमन्ं कळवल्ं, म्हणजे अजुन् दोघ्ंही जिव्ंत होते आणि आता माझ्याकडे पुन्हा सगळ्यात् मोठा पर्याय् मोकळा होता, मतकरीला मारण्ं, आणि वाचवणं, तो १% मला वेड लावत होता पुन्हा पुन्हा…
प्रतिक्रिया
26 Mar 2017 - 2:55 pm | अभ्या..
चिमित्कार, डेडलाईनच्या आत ५० रावांची कथा आली.
आम्ही आमचे शब्द बेशर्त मागे घेत आहोत.
.
.
आता वाचतो.
26 Mar 2017 - 3:29 pm | किसन शिंदे
शेवट केलाय वाटतं या भागात. वाचून सविस्तर प्रतिसाद मग
26 Mar 2017 - 6:45 pm | प्राची अश्विनी
पिच्चर अभी भी बाकी है .;)
26 Mar 2017 - 4:33 pm | उगा काहितरीच
परत एकदा किचकट झालंय पण उत्कंठा पण वाढली आहे. आता ज्याला खो मिळेल त्याच्यासाठी अवघड आहे. रच्याकने खो कुणाला ?
26 Mar 2017 - 6:46 pm | प्राची अश्विनी
+111
26 Mar 2017 - 7:51 pm | अॅस्ट्रोनाट विनय
तब्बल २५८६ शब्दांची झणझणीत पोस्ट. मस्त. मजा आली वाचायला.
26 Mar 2017 - 8:25 pm | पैसा
मस्त ट्विस्ट आहेत! पुढचा खो कोणाला?
@साहित्य संपादकानो, टायपिंगच्या गडबडीत बरेच हलन्त पडलेत. जरा दुरुस्ती करायचं बघा!
30 Mar 2017 - 12:54 pm | ५० फक्त
पुढचा आणि शेवटच्यभागासाठी खो, प्राची अश्विनी यांना देत आहे,
30 Mar 2017 - 1:46 pm | प्राची अश्विनी
खो स्विकारत आहे .
30 Mar 2017 - 10:01 pm | दीपक११७७
छान लिहीला व मोठा भाग लिहुन मागच्या भागाची भरपाई केली