[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. ४
[खो कथा भाग १ ते ४ - आतापर्यंत... आणि भाग ५]
शालू आणि शशिकांत हे नवरा बायको आहेत. नाशिकमध्ये राहतात. अशोक हा शशिकांतचा लहानपणीचा मित्र आणि अगदी घरातला मेँबर असल्यासारखा आहे. तो मुंबईला राहतो.
खुदीराम नावाचा गुढ इसम पांडव लेण्यांच्या परिसरात राहत असतो. एकदा खुदीरामची आणि शशिकांतची भेट होते. या भेटीत तो शशिकांतला त्याच्याजवळ असलेल्या गुढ आरशाबद्दल सांगतो. आरसा पाहिल्यावर शशिकांतला तो खुपच आवडतो त्याला त्याच्या पुढिल संशोधनासाठी फायद्याच असतो. तो खुदीरामकडे आरशाची मागणी करतो. खुदीराम त्याच्यासमोर दोन अटी ठेवतो -
१. आरशाबद्दल तू कुणालाच सांगायचं नाहीस. सांगितलं तर तुझा मृत्यू अटळ आहे.
२. तुला माझी मदत करावी लागेल.
बोल कबूल आहे? यावर शशिकांत म्हणतो कबूल आहे पण माझा एक मित्र आहे, अशोक. त्याला अशा गोष्टींत इंटरेस्ट आहे. फक्त त्याला सांगतो, चालेल का? खुदीराम म्हणतो ठीक आहे पण याद राख... याव्यतिरिक्त जर अजून कुणाला कळाले तर तुझा मृत्यू अटळ आहे.
ह्या आरस्याबद्दल शशिकांत अशोकजवळ बोलतो व त्याला नाशिकला येण्याची गळ घालतो.अशोकही उत्सुकतेपोटी नाशिकला जातो. नंतर शशिकांत आणि अशोक पांडवलेणीकडे जातात सोबत शालूही असते. शशिकांत जेव्हा पांडवलेणीच्या आसपास खुदिरामला शोधत असतो तेव्हा चुकून अशोक आरशाविषयी शालूजवळ बोलतो व तिला आरसा दाखवतो.नंतर ही गोष्ट शालू शशिकांतला सांगते. हे ऐकून धक्क्याने/ भितीने शशिकांत मरतो. शशिकांतच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत असे वाटुन काही दिवसांनी शालूही आत्महत्या करते.
मधल्या काळात अशोक खुदिरामला गाठतो. खुदिरामकडून तो आरसा मिळवतो. तो आरसा मिळाल्यानंतर अशोकच्या आयुष्यात बराच गोंधळ उडतो. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी अशोक पुन्हा खुदिरामकडे जातो. त्या दोघांमध्ये खूप बाचाबाची होते. शेवटी खुदिराम नरमतो व त्याला सत्य परिस्थिती सांगतो.
खुदिराम: मी खुदिराम तांत्रिक नसून एक शास्त्रज्ञ आहे. हा आरसा माझ्या संशोधनाचा भाग आहे. प्रकाशाच्या विशिष्ट परिवर्तनातून एका मितीतून दुस-या मितीत तो घेऊन जातो. परंतु हा माझा शोध अजून पूर्णत्वाला गेलेला नाही. हा आरसा घेऊन मी माझ्या मुलांवर प्रयोग केला होता परंतु ते कुठल्या तरी मितीत अडकले आहेत. मी जर त्यांना शोधायला गेलो तर मीही कुठेतरी अडकून बसेन म्हणून मी शशिकांत कडे मदत मागितली होती. तोही तयार होता. पण नियतीने घात केला यामागे माझं कोणतंही चेटूक वगैरे नाही. शशिकांत आता जिवंत नाही .त्याचा मित्र म्हणून तू मला मदत कर. तुला करावीच लागेल. कारण ह्या आरश्याच्या चमत्कारात तू अडकला आहेस. एक तर तुला माझी मदत करावी लागेल किंवा अशीच उलथापालथ सहन करत मृत्यूला कवटाळावं लागेल.
बोल काय म्हणतोस?
आशोकः- एवढ सोप नाही आहे हे, माझा मित्र सुध्दा शास्त्रज्ञ होता तो ही प्रकाशासी संबंधित संशोधन करत होता. शशिकांत ने मरणा पुर्वि मला पाठविलेला मेल मी तुझ्याकडे येण्याआधीच वाचला आहे. त्यानुसार तर तु दुस-या मितितुन आला आहेस. "ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही" अस तु शशिकांतला म्हणाला होतास तसेच तु हे सुध्दा म्हणाल होतास की "...तुझ्या दोस्ताकडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच", म्हणजे माझ्या कडुन. आणि आता तु स्वतःला
शास्त्रज्ञ म्हणतोस आणि प्रयोगात तुझे मुले कुठल्या तरी मितीत अडकले आहेत अस सांगतोस आणि माझी मदत मगतोस. तुझ्यावर विश्वास कसा ठेऊ. मला तर वाटत तु माझ्या मित्राला मारुन त्याच संशोधन चोरल आहेस. आणि आता माझा पण जिव घेशिल तुझं इसपित साध्या करण्यासाठी. बोल खर काय आहे. सोडव मला यातुन नाही तर मी मरेलच पण सोबत तुलाही नेईल.
खुदिराम:.................. [ कथा पुढे वाढविण्यसाठी खो देत आहे]
प्रतिक्रिया
23 Mar 2017 - 12:06 am | पिलीयन रायडर
हे काही तरी वेगळंच झालंय ह्या भागात...
आता पुढे नक्की काय लिहतील लेखक?
23 Mar 2017 - 12:15 am | दीपक११७७
बघा तुम्हाला पण उत्सुकता लगली ना. मग.
23 Mar 2017 - 12:52 am | ज्योति अळवणी
झक्कास. मजा आली. पण खो कोणाला?
23 Mar 2017 - 1:41 am | दीपक११७७
पुढचा खो चॅटसवूड यांना देत आहे
Best of Luck चॅटसवुड जी
23 Mar 2017 - 2:02 am | चॅट्सवूड
धन्यवाद दीपकजी : )
हा भाग छान झालाय, लगेच लिहायला घेतो.
23 Mar 2017 - 4:46 am | गवि
कथासूत्र रिकॅप केल्याने आता मजा येतेय. पुढील भाग लवकर येऊदे.
23 Mar 2017 - 7:23 am | अॅस्ट्रोनाट विनय
छान दीपकजी. मजा आली.
23 Mar 2017 - 8:05 am | प्राची अश्विनी
आता सगळ्याचा संदर्भ लागतोय. पुढच्या भागाची उत्सुकता!
23 Mar 2017 - 8:34 am | आषाढ_दर्द_गाणे
चालू असलेल्या 'खो'शैलीतला (आणि तितक्या 'खो'लितला?) नाही वाटला पण आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला भाग!
म्हणजे आधिच्या लेखकांनी कृपया वाईट वगैरे वाटून घेऊ नये. पिकासोसारख्या थोर चित्रकाराला सुद्धा कोणीतरी समजावून सांगितलं कि मगच माझ्यासारख्या पामरास नीट काय ते कळतं.
अर्धे जिगसॉ जुळवून दिल्याबद्दल दीपक११७७ ह्यांना धन्यवाद!
हाच प्याटर्न फुडच्या पाच भागांना वापरलात तरी चालेल.
एक सूचना - कथेला नाव नको ठेवायला एवढ्यात. पाहिजे तर संपली लिहून की मग नावासाठी मतदान घेऊ, कसे?
'खो-खोची गोष्ट' हे आत्ताच बाद करून टाकू.
23 Mar 2017 - 10:44 am | जव्हेरगंज
+1
दिपकभौ, लगे रहो!!!!
23 Mar 2017 - 9:44 am | मोहन
दीपकजी जरा इस्कटून सांगीतल्याने माझी सोय झाली बघा. पण भाग फारच आवरता घेतलाय.
23 Mar 2017 - 11:03 am | पैसा
कथा जरा अजून पुढे सरकायला हवी होती.
23 Mar 2017 - 11:27 am | पुंबा
++१११.. जरा जास्तच लवकर शेवट केल्यासारखे वाटले.
23 Mar 2017 - 11:22 am | टवाळ कार्टा
भन्नाट ट्वीस्ट
23 Mar 2017 - 2:31 pm | बरखा
कथा वाचताना लवकर संपल्यासारखी वाटली. पुढचे भाग जरा मोठे येउद्या. बाकी उत्सुकता अजुनच वाढतिये. ती अशीच टिकवुन ठेवा......
23 Mar 2017 - 3:41 pm | दीपक११७७
धन्यवाद @ पिलीयन रायडर, ज्योति अलवनि, चॅट्सवूड, गवि, अॅस्ट्रोनाट विनय, प्राची अश्विनी, आषाढ_दर्द_गाणे, जव्हेरगंज, मोहन, पैसा, सौरा, टवाळ कार्टा, बरखा
@ मोहन, पैसा, सौरा, बरखा-- बरोबर आहे, भाग जरा छोटा झाला आहे, वाढवता आला असता पण पहिला प्रयत्न होता आणि पोस्ट करायची घाई पण
23 Mar 2017 - 8:09 pm | Ranapratap
दिपकभाऊ छान लिहिता, सगळे संदर्भ पुन्हा जुळले
23 Mar 2017 - 8:23 pm | उगा काहितरीच
मस्त ! धन्यवाद सगळं विस्कटून सांगितल्या बद्दल . आता पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
23 Mar 2017 - 8:47 pm | वरुण मोहिते
वळण आलंय कथेला ...
23 Mar 2017 - 10:28 pm | पिलीयन रायडर
खो कथेच्या वर आता जी अनुक्रमणिका आली आहे आणि इथुनच मागचा भागही पहाता येतोय, त्याने फार मोठी सोय झाली आहे! उत्तम फिचर!
24 Mar 2017 - 12:08 am | दीपक११७७
अनुक्रमणिका आली आहे , त्याने फार मोठी सोय झाली आहे! उत्तम फिचर! छान
23 Mar 2017 - 10:37 pm | आषाढ_दर्द_गाणे
नाही छोटेखानी असला जरी हा भाग तरी प्रत्येक 'खो'ला शब्दमर्यादा होती ना?
24 Mar 2017 - 12:04 am | दीपक११७७
हो शब्दमर्यादा आहे, किमान ५०० शब्द, माझे झाले आहेत ४७८ शब्द.
24 Mar 2017 - 9:37 am | मोहन
चांगल्या खेळाडूला परत खो देता येतो का ?