प्रसंगः- वोल्वोचा प्रवास
वेळः अर्थातच कुवेळ
घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे
तर, मी आपला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता. बलराज सहानीचा मुलगा, त्याच्या सिनेमातल्या मुलाला लेक्चर देत होता. त्याच्या तोंडी सुलतान, सुलतान असे काहीसे ऐकू आले आणि थोड्याच अवधीत नेहमीच्या सलमान स्टाईलने शिणिमा सुरु झाला. पैलवाण असावा तर सलमाणसारखा! (हरियाणवी भाषेत 'ण' चा अखंड पाठ सुरु झाल्यामुळे यापुढे तुम्हाला या लेखात औषधालाही 'न' सापडणार नाही)
तर आपला सलमाण पहेलवाण, त्याच्या उंचीपेक्षा जास्त, अशा फसलेल्या ट्रॅक्टरचे चाक लीलया काढून देत होता. अणेक पहिलवाणांना डोक्यावर हात साफ करुन, क्षणार्धात अस्माण दाखवत होता. कुस्ती म्हणजे डावपेच वगैरे काही णसते बरं, सीधा उचलायचा आणि पटकायचा, उचलायचा, पटकायचा! (मला वाटतं, जरीपटका चा अर्थ सुद्धा, जरी कोणी अंगावर आला तरी त्याला पटका, असाच असला पाहिजे) प्रत्येक राऊंडचा निकाल ३० सेकंदातच लावायचा. आता नुसतीच अशी पटकापटकी किती वेळ दाखवणार ? म्हणूण त्याला थोडी इमोसणल स्टोरीची झालर लावायची. तर आमच्या सलमाणभाईणे कुस्ती का सोडलेली असते? तर, त्याची पैलवाणीण बायकु त्याला सोडूण गेलेली असते. ती का सोडूण गेली असते? कारण की, तिचा मुलगा ओ णिगेटिव्हचं रक्त न मिळाल्यामुळे गेलेला असतो. तो का मरतो? कारण की, त्याचे ओ णिगेटिव्हचा अमर्याद साठा असलेले पिताश्री, ऑलिंपिक जिंकायला गेलेले असतात. बायकु पण पैलवाणीण असताना ते एकटेच का गेलेले असतात ? कारण त्यांणी पुरुषार्थ गाजवलेला असतो आणि त्यांच्या पुरुषार्थाचा त्यांना इतका गर्व असतो की मुलगाच ज्ण्माला येणार, याची त्यांणा खात्री असते. तर अशा सलमाणभाईंणा कुणीच पटकावू शकत नसते, पण णियतिणे पटकावले, याचे त्यांणा अतोणात दु:ख होते आणि ते पैलवाणकी सोडतात आणि रक्तपेढी उभी करण्याच्या प्रयासाला लागतात. णोकरी साधी मग पैसे कुठूण आणायचे या पेढीला ? डायरेक्टर हा प्रश्ण सहज सोडवतो. परिक्षित सहाणीचा मुलगा त्याला आमिष दाखवतो. फ्री स्टाईल कुस्ती खेळ आणि बक्षीसाच्या पैशातून ब्लड बँक, हाय काय आण णाय काय! सलमाण तयारीला लागतो. सर्वप्रथम तो आरशात आपले सुटलेले पोट बघतो. ते बघून त्याला धर्मिंदर पेक्षाही वाईट रडू येते. पण कुणी आव्हाण दिले की आमचा गडी पेटून उठणारच्(दुसर्यांणा पटकायला)
तर, खाली धरती असल्यामुळे, वरुण अल्ला मेहेरबाणी करतो. अल्ला मेहेरबाण तो सलमाण फ्री स्टाईल पहेलवाण्! सेमी फायणलला गडी जबरी जखमी होतो. बायक्कु धावत येते. इमोसणमा प्रमोसण! फायणल चा णिकाल अपेक्षेप्रमाणेच लागतो. ब्लडी बँक उभी रहाते. बायक्कु पुण्हा पहिलावाणीण होते. पुन्हा बायकार्थ आणि पुरुषार्थ! पिचकर कॉमेडी म्हणून शेवट कॉमेडीच व्हणार!
तळटीपः- प्रवास संपून आम्ही मार्गस्थ झालो, दुसर्या दिवशी परतीचा प्रवास होता. फार चढली तर, सक्काळी, उताराही त्याचाच लागतो, असे म्हणतात. योगायोग पहा, परतीच्या प्रवासात ढॅणटढॅण झाल्यावर टी. व्ही. कडे पाहिले तर, 'दंगल' सुरु होत होता.
त्या उतार्यावर फायनल किक: 'दंगल' संपल्यावर 'रईस" सुरु झाला !!!
प्रतिक्रिया
25 Mar 2017 - 2:01 pm | उगा काहितरीच
ईश्वर तुम्हाला हा चित्रपट विसरण्यासाठी शक्ती देवो !
25 Mar 2017 - 2:19 pm | एस
हाहाहा!
25 Mar 2017 - 3:05 pm | संजय क्षीरसागर
परीक्षण वाचायला मजा आली !
25 Mar 2017 - 4:12 pm | कंजूस
वोल्वो णाय त्याला विडियो कोच मणतात आणि ते पाण्यासाठीच लोक तिक्ट काढतात असा त्यांचा समज असतो.
ब्लुटुथ हेडफोन्स फाशिलटी हवी.
25 Mar 2017 - 5:19 pm | ऋतु हिरवा
औषधालाही ,न, सापडणार नाही , असे तुम्हि लेखात लिहिले आहे. पण लेखात ३ वेळा ,न, आला आहे.
25 Mar 2017 - 6:06 pm | तिमा
चुका माण्य आहेत. तरी त्या त्या ठिकाणी, ण वाचून हरियाणवी व्हावे, ही विणंती.
25 Mar 2017 - 7:12 pm | जेपी
छाण लेख
26 Mar 2017 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा
@ब्लडी बँक उभी रहाते.››› वारल्या गेलो आहे!
26 Mar 2017 - 12:48 am | ज्योति अळवणी
झक्कास
26 Mar 2017 - 8:26 am | यशोधरा
=))
26 Mar 2017 - 8:48 am | पैसा
मस्त खुसखुशीत!
26 Mar 2017 - 4:30 pm | कंजूस
माण णा माण, मी पयला... असं अगोदर वाचलेलं.
26 Mar 2017 - 9:04 pm | कविता१९७८
मस्तच