क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
19 Jan 2017 - 6:39 am

भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.

सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.

तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.

जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.

तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.

तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.

अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.

एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.

आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.

पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).

तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.

अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.

अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.

हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

जीवनमानदेशांतरअर्थव्यवहारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

उत्तम माहिती दिली आहे. अमेरिकन कार्डांवर जितक्या सवलती मिळतात तितक्या भारतातील कार्डांवर मिळत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. हे चित्र बदलायला हवे. तरच भारतीयांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय रुजू शकेल. इथे असे दिसते की ग्राहक कार्ड वापरायला उत्सुक असतात. पण दुकानदार कार्ड पेमेंट घ्यायला नाक मुरडतात.

नितिन थत्ते's picture

19 Jan 2017 - 11:00 am | नितिन थत्ते

हा हा हा.

जनरली डिस्काउंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स या "आपल्याकडे नसलेल्या" कार्डावर असतात.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 11:11 am | संजय क्षीरसागर

मागे लेखक मला सारखे इकॉनॉमी कॅशलेस व्हायला नको का ? विचारत होते. तेव्हा मी कुठे असता ? विचारलं होतं .

फक्त तुम्ही विचारलेला प्रश्न विषयाशी संबंधित नव्हता त्यामुळे दिलं नाही. आता उत्तर मिळालं असेलच.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 11:43 pm | संजय क्षीरसागर

भारतातल्या लोकांनाच रांगेत उभं राहावं लागलंय. आणि कार्ड आणि नेट बँकींग चार्जेस त्यांनाच भरावे लागतायंत. कार्ड तर काय आम्ही वयात आल्यापासून वापरतो. तस्मात, इकॉनॉमी कॅशलेस असावी हे आपण सांगावं आणि आम्ही कौतुकानं पाहावं अशी परिस्थिती नाही.

या सगळ्याचा मी कुठे राहतो याच्याशी काय संबंध? एक तर भारतातील लोकांना रांगा लावायला लागल्या हे कोणीच अमान्य करत नाहीये. चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही. इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीये आणि कोणाकडून कौतुक करून घ्यायची मला गरज आणि सवय नाही.

मी जरा उशिरा कार्ड्स वापरायला लागलो पण अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत.

संजय क्षीरसागर's picture

20 Jan 2017 - 7:14 am | संजय क्षीरसागर

चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही.....अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत.

भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा . जाहीर आभारप्रदर्शन करू.

इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीये

मग कार्ड कशासाठी वापरतात ? का कार्ड आणि कॅशलेसचा काही संबंध नाही ? फक्त पॉइंटस कलेक्शन आणि रिडमप्शन इतकाच कार्डचा उपयोग आहे ?

गणामास्तर's picture

20 Jan 2017 - 9:11 am | गणामास्तर

भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा .

संक्षी, मागच्या वेळी सुद्धा मी याबद्दल सांगितले होते परंतु त्या धाग्यावर प्रतिसादांच्या रतिबात माझा प्रतिसाद हरवून गेला असावा.
कार्ड चार्जेस हा विषय निघाल्यावर मी नोटबंदीनंतर माझे जुने स्टेटमेंट्स काढून परत एकदा डोळ्यात तेल घालून चेक केले.
एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत.
तसेचं इतर जे प्रायव्हेट बँकांचे कार्ड्स वापरतो त्यांना सुद्धा चार्ज पडलेला नाही.

संजय क्षीरसागर's picture

20 Jan 2017 - 10:15 am | संजय क्षीरसागर

एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत.

आणि सांगतो. धन्यवाद !

रॉजरमूर's picture

9 Mar 2017 - 9:33 pm | रॉजरमूर

...

वसुली जोरदार सुरु आहे .....
ग्राहकांना दोन्ही बाजूनी मार बसतोय.

वगिश's picture

21 Jan 2017 - 9:03 am | वगिश

State Bank of India Credit Card(मला २ वर्षे झाली) , 15000-20000 मासिक उत्पन्न हवे. किंवा सीबील स्कोअर चांगला हवा.

ट्रेड मार्क's picture

19 Jan 2017 - 9:24 pm | ट्रेड मार्क

हा हा हा

कुठली कार्ड्स घ्यायची आणि कुठली नाही हे आपल्या हातात असतं. ट्रुमनभाऊंची खालील प्रतिक्रिया वाचा. त्यांनी फक्त भारतात मिळणाऱ्या आणि वापरलेल्या कार्ड्सचा अनुभव सांगितला आहे. त्यामुळे आता ह्या सोयीसवलती असणारी कार्ड्स भारतात मिळत नाहीत असे अरण्यरुदन तुम्हाला करता येणार नाही. राहता राहिला प्रश्न ही कार्ड तुमच्याकडे नसण्याचा, तर ती घ्यायची का दुसरी कुठलेही सवलत नसलेली कार्ड्स घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे.

गॅरी ट्रुमन's picture

19 Jan 2017 - 1:59 pm | गॅरी ट्रुमन

अमेरिकन कार्डांवर जितक्या सवलती मिळतात तितक्या भारतातील कार्डांवर मिळत नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

मला दोन कार्डांचे खूपच चांगले अनुभव आहेत.

१. एच.डी.एफ.सी रिगॅलिआ कार्डावर खूपच चांगले पॉईंट्स मिळतात. मी २००८ पासून एच.डी.एफ.सी चे क्रेडिट कार्ड वापरत आहे. आणि अर्थातच एकदाही मी बिल भरायला उशीर केलेला नसल्यामुळे बँकेने माझे कार्ड आणि क्रेडिट लिमिट दोन्ही अपग्रेड केल्या आणि २०१४ मध्ये मला हे कार्ड मिळाले. त्यापूर्वी एच.डी.एफ.सी च्या इतर कार्डावर केलेल्या खर्चावर मिळालेले सगळे पॉईंट्स या कार्डावर ट्रान्स्फर झाले. जुने आणि या कार्डावर मिळालेले नवे पॉईंट्स वापरून मी पुढील गोष्टी मिळविल्या---

अ. ऑगस्ट २०१५ मध्ये पिझ्झा हटची ८०० रूपयाची कुपन्स
ब. जानेवारी २०१६ मध्ये आमच्या दोघांची मुंबई ते गोवा विमानाची जाऊन येऊन तिकिटे (एकूण ४ तिकिटे)
क. सप्टेंबर २०१६ मध्ये माझे मुंबई ते दिल्ली विमानाचे जाऊन येऊन तिकिट (एकूण २ तिकिटे)
ड. सप्टेंबर २०१६ मधील दिल्ली भेटीदरम्यान दिल्लीतील एका ठिकठाक "बेड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट" हॉटेलात एका दिवसाचे (ओव्हरनाईट) बुकिंग

या रिगॅलिआ कार्डावर विमानतळावरील लाऊंज अ‍ॅक्सेसही आहे. त्याचाही दिल्ली विमानतळावर वापर केला होता. रिगॅलिआपेक्षाही मोठे असे इन्फिनिआ कार्ड आहे. पण त्यासाठी आपण अर्ज करू शकत नाही. हे कार्ड "इन्व्हिटेशन ओन्ली" आहे. मला वाटते त्यासाठी वार्षिक उत्पन्न वगैरे अटी बर्‍याच जास्त आहेत. त्यामुळे मला त्याचे आमंत्रण अजून आलेले नाही :)

२. अमेरिकन एक्सप्रेसचे कार्डः हे कार्ड मी २०१२-१३ या काळात वापरले होते. त्यावेळी दर महिन्याला २५०+ रूपयांची चार ट्रॅन्झॅक्शन केली की १००० पॉईंट्स मिळत असत. महिन्यातून २५०+ रूपयांचे चार व्यवहार कसेही होत असत. आमच्या दोघांची फोनची बिले आणि वीजेचे बिल हे तीन व्यवहार हटकून २५०+ पेक्षा जास्त असत. तसेच महिन्यातून एखादा चित्रपट तरी बघितला जात असेच. त्यामुळे महिन्यातून हे ४ व्यवहार करायला कसलीच अडचण नसे. तसेच एक वर्ष पूर्ण झाल्यावर लॉयल्टी अ‍ॅडिशन वगैरे पॉईंट्स मिळाले होते. या कार्डाची माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या वर्षी १००० रूपये की अशी काहीतरी फी होती. हे सगळे पॉईंट्स एकत्र करून मी साडेसात हजाराचे एक आणि एक हजाराची दोन गिफ्ट सर्टिफिकिटे घेतली होती. त्यातून बायकोचा मोबाईल फोन घेता आला :)

अमेरिकन एक्सप्रेसने २०१३ मध्ये २५०+ रूपयांऐवजी १०००+ रूपयांचे चार व्यवहार असा बदल केल्यावर मी कार्ड परत केले. मध्यंतरी ते कार्ड परत घेतले आहे. यावर पेटीएमचे १००० रूपयांपेक्षा जास्त केलेले चार रिचार्जही चालतात. त्यामुळे हे चार पेटीएम रिचार्ज पहिल्यांदा करायचे आणि मग फोन बिले, वीज बिल, उबर इत्यादी भानगडी पेटीएमवरून भरायच्या. अमेरिकन एक्सप्रेसकडून पॉईंट्स घ्यायचे आणि पेटीएमकडूनही सवलती घ्यायच्या. हाकानाका :) एक वर्ष झाल्यावर ते सगळे पॉईंट्स वापरून किमान ६ हजार रूपयांचे स्टेटमेन्ट क्रेडिट घेता येणार आहे.

२००८ मध्ये मी अमेरिकेतून भारतात परत आलो. त्यावेळी मला क्रेडिट कार्ड घेणे अगदी अत्यावश्यक होते असे अजिबात नाही. पण आपण कधीनाकधी होमलोन घेणार तेव्हा त्यासाठी चांगला सिबिल स्कोअर बनवावा या उद्देशाने मी क्रेडिट कार्ड घेतले. त्यातून सिबिल स्कोअर चांगला झालाच आणि असे इतर फायदेही झाले. तसेच मी कार्ड आहे म्हणून स्वाईप करा आणि विनाकारण काहीतरी विकत घ्या असे करणारा नसल्यामुळे भरायला जड जाईल इतके बिलही कधी आले नाही.

अमेरिकेत असताना (२००२ ते २००७) सुध्दा मी क्रेडिट कार्ड भरपूर वापरत असे. त्यावेळी शून्य क्रेडिट हिस्ट्री असतानाही आणि मी विद्यार्थी होतो तरीही अमेरिकन एक्सप्रेसचे कार्ड मिळाले होते आणि त्यासाठी डिपॉझिटही ठेवावे लागले नव्हते. त्यातून क्रेडिट हिस्ट्री चांगली बनवून मग एका वर्षासाठी ०% ए.पी.आर वगैरे ऑफर २००६ पर्यंत यायला लागल्या होत्या. अशा कार्डांवरील पॉईंट्स एकत्र करूनही मी अ‍ॅमॅझॉनची १०० की १५० डॉलर्सची तर स्टारबक्सची १० डॉलर्सची सर्टिफिकिटेही मिळवली होती. मला वाटते की २००७-०८ च्या आर्थिक संकटानंतर अशी कोणालाही कार्डे देणे अमेरिकन बँकांनी बंद केले आहे.

सुबोध खरे's picture

20 Jan 2017 - 10:19 am | सुबोध खरे

रिगालीया कार्ड असं आहे होय?
मला ते दोन वर्षपासून घ्या म्हणून मागे लागले होते. पण मलाच माझी पत मर्यादा (credit limit) वाढवून नको होती. उगाच हरवले/ फिशिंग झाले तर अजून जास्त पैसे का भरा म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पण आता माझे प्लॅटिनम कार्ड मुदत बाह्य झाले आणि त्यांनी मला स्वतःच रीगालिया कार्ड पाठवले आहे. ते प्रीमियम लाउंजचे कार्डही त्यात आहे. जुने सर्व पॉईंट या कार्डावर बदली हि झालेले आहेत. (२२०००+ असावेत)
आता ते रीडिं करून घ्यायला हवेत.

ट्रेड मार्क's picture

19 Jan 2017 - 10:05 pm | ट्रेड मार्क

तेवढ्या प्रमाणात सवलती व फायदे आत्ता लगेच मिळाल्या नाही तरी हळूहळू मिळतील. मला खात्री आहे की जेव्हा अमेरिकेत लेस कॅशचे वारे वाहू लागले तेव्हा अमेरिकेतही विरोध झालाच असेल.

भारतात जसे जसे लोक्स कार्ड वापरू लागतील तश्या ऑफर्स वाढतील.

अनरँडम's picture

20 Jan 2017 - 12:33 am | अनरँडम

मला खात्री आहे की जेव्हा अमेरिकेत लेस कॅशचे वारे वाहू लागले तेव्हा अमेरिकेतही विरोध झालाच असेल.

विरोध झाला नाही. अमेरिकन परंपरेला अनुसरून ज्यांना कार्ड वापरणे फायद्याचे ठरले ते कार्ड वापरू लागले. काही अमेरिकन लोक फक्त रोखीनेच व्यवहार करतात. अमेरिकेत रोकीने पेट्रोलपासून अगदी घर विकत घेण्यापर्यंतचे व्यवहार केले जातात.

आणखी दोनचारजणांनी त्यांचे अनुभव मांडले की तुलना करता येईल.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 12:38 pm | संजय क्षीरसागर

आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार्‍यापेक्षा कर्जच न घेणार्‍याची पत जास्त आहे .

सुबोध खरे's picture

20 Jan 2017 - 10:05 am | सुबोध खरे

आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार्‍यापेक्षा कर्जच न घेणार्‍याची पत जास्त आहे .
संक्षी साहेब
आपले मत पटले नाही. (आपण वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ असूनही) .
मी आतापर्यंत भरपूर कर्जे घेऊन ती फेडलेली आहेत. १९८९ पासून माझे क्रेडिट कार्ड वापरात आहे परंतु आजतागायत मी त्यावर एक पैसाही व्याज भरले नाही कि एकदाही त्याचे बिल भरण्यात दिरंगाई झालेली नाही. त्यामुळे आता मी घर घेण्यासाठी जेंव्हा नव्या कर्जासाठी अर्ज केला तेंव्हा माझा सिबिलचा स्कोअर काढला तो ८५० कि ८६५ असा काही तरी आला आहे. हा बऱ्यापैकी उच्च आहे असे ऐकले आहे.
आपण कर्ज घेतलेच नसले( उदा. शेतकरी) आणि तर आपला सिबिल चा स्कोअर किती येईल ती कल्पना नाही पण तो फार चांगला नसावा आणि त्यामुळे अशा माणसाला कर्ज घेणे जास्त कठीण जात असावे.

कर्ज नसलेल्या व्यक्तीला कसलंच ओझं नाही त्यामुळे त्याची प्रतिष्ठा जास्त आहे अशा अर्थानं म्हटलंय.

अप्पा जोगळेकर's picture

20 Jan 2017 - 10:56 pm | अप्पा जोगळेकर

कर्ज हे ओझं आहे हे विचार कालबाह्य होऊन सुद्धा बराच काळ गेला. नीट नियोजन केलेले कर्ज बहुतकरुन फायदेशीर ठरते.

ट्रेड मार्क's picture

21 Jan 2017 - 1:24 am | ट्रेड मार्क

माझ्यामते आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही.

उदा. एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला शून्य कर्ज आहे पण एका व्यक्तीने कर्ज काढून का होईना एक चांगल्या वस्तीत फ्लॅट घेतला आहे. यात कोणाची प्रतिष्ठा जास्त आहे?

त्यामुळे कर्ज काढून सुद्धा जी व्यक्ती ते कर्ज वेळेत फेडू शकते त्याची प्रतिष्ठा जास्त असते.

आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही.

प्रश्न मालमत्तेचा नाही, कर्ज नसण्याचायं. क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही. त्यामुळे माझा सिबील स्कोर निघणं शक्य नाही. पण माझी बॅलन्सशीटस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटस इतके स्ट्राँग आहेत की कोणतीही बँक सिबील रेटींग फाट्यावर मारुन मला हवं तितकं कर्ज (त्यांच्या नॉर्मसमधे) द्यायला एका पायावर तयार होईल, नव्हे आहेच. म्हणजे ज्याला कर्जच नकोयं त्याची फिनान्शियल पत (किंवा प्रतिष्ठा) कर्जबाजारी व्यक्तीपेक्षा जास्त आहे.

आता प्रतिष्ठा थोडी बाजूला ठेवून, डोक्यावर कर्जाचं ओझं असणारा आणि नसणारा यांच्या जगण्यातला फरक बघा. मी कधीही डोळे उघडल्याशिवाय उठत नाही. वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी माझा नाममात्र संबंध आहे. मी घड्याळ वापरत नाही. सकाळी बेसिक गोष्टी आवरल्या की योगासनं करुन मी कामाला नाही, खेळायला जातो. खेळून झाल्यावर मूड असेल तर काम करतो नाही तर पत्नी समवेत भटकायला जातो किंवा गाणी वाजवत बसतो. काम हा माझा छंद आहे कंपल्शन नाही आणि तरीही सगळी कामं वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. इथलेच काही सदस्य क्लायंट आहेत त्यांना कल्पना आहे, त्यामुळे वेगळ्या पुराव्याची गरज नाही . अगदी फारच मूड असेल तर तीला घेऊन सरळ जवळच्या रिसॉर्टला दोन/तीन दिवस ट्रीपला जातो. मजबूत भूक लागल्याशिवाय मी कधीही जेवत नाही आणि जेवण हा जवळजवळ तासभर चालणारा रसोत्सव असतो, नुसता आयटम टिकमार्क झाला असं नाही. इएमायची भानगडच नाही त्यामुळे आनंद हीच जीवनाची दिशा आहे. इतके वाजले, उद्या उठायचंय म्हणून आता झोपा हा प्रकार नाही. गडद्द झोप आल्याशिवाय झोपत नाही आणि दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन आला तरी घरचे झोपलेत म्हणून सांगतात, उठवत नाहीत. मला रेग्युलर बेसीसवर कोणतीही मेडीकल टेस्ट करायची कधीही गरज भासलेली नाही आणि काहीही पथ्यपाणी करायला लागत नाही. कर्ज नाही त्यामुळे भविष्यकाळाची फिकीर नाही. सगळं जीवन मनसोक्त जगायला उपलब्ध असलेला निव्वळ वर्तमान काळ आहे. याशिवाय हवी ती वस्तू हव्या त्या वेळेला घेण्याची क्षमता आहे.

आता कर्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं , का अक्कलहुशारीनं असलेल्या साधन संपत्तीत आवश्यक ती खरेदी करत कर्जमुक्त आणि स्वच्छंद जगायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे.

संक्षी
आपल्या दुसरया टोकाला मी आहे.
मी आतापर्यंत गेल्या दहा वर्षात सात कर्जे घेऊन त्यातील सहा पूर्ण फेडली आहेत. सातवे कर्ज राहत्या घराचे आहे आणि त्यावर करात वजावट मिळत असल्याने ते फेडायची मला घाई नाही. कर्ज घेऊन त्यातून भांडवल निर्मिती किंवा नफा मिळवता येतो आणि तो सुद्धा कायदेशीर रित्या.
एक उदाहरण. पाच वर्षपूर्वी माझ्याकडे थोडे पैसे होते( २ लाख) त्यात ८ लाख कर्ज घेऊन मी पनवेल ला एक छोटे घर घेतले (ज्याची किंमत १० लाख रुपये होती.) याच कर्जाचे व्याज म्हणून मी जवळ जवळ दीड लाख रुपये भरले. म्हणजे मला हे घर साडे अकरा लाखाला पडले. या घरातुन मला सरासरी पाच हजार ( सुरुवातीला चार आणि शेवटी साडेसहा हजार रुपये) भाडे मिळत असे.यातील ७५०/- रुपये सोसायटीला मेंटेनन्स गेला तर ४२५०/- रुपये महिना मला भाडे मिळाले. म्हणजे साधारण अडीच लाख रुपये मला पाच वर्षात भाडे मिळाले. पाच वर्षात हे कर्ज मी संपूर्ण फेडले आहे.
याचा अर्थ कर्ज घेऊनही मला नक्त नफा साधारण एक लाख रुपये झाला. आजमितीस या घराचे मूल्य ३५ लाख रुपये आहे.
याचा अर्थ काय "सुविनियोगात समृद्धी". या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला. जर मी हे कर्ज घेतले नसते आणि पैसे साठवून घर घेतो म्हणालो असतो तर हेच घर मला स्वतःच्या पैशाने कधीही विकत घेणे परवडले नसते. हीच परिस्थिती माझ्या राहत्या घराची आहे. २००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे. (निश्चलनीकरणामुळे कमी झालेली किंमत गृहीत धरून). मी तेंव्हा कर्ज घेतले नसते तर आजही मी रस्त्यावरच(दुसऱ्याच्या घरात भाड्याने) असतो. आज ते कर्ज सहा लाख रुपये बाकी आहे. मारवाडी हिशेबाने ९ टक्के कर्जावर ३० % करमुक्तीने मला ते ६.३ % दराने कर्ज पडते मग कर्ज फेडण्याची घाई करण्याचे कारण नाही.
आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे.

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 6:20 pm | संजय क्षीरसागर

२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे.

त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल ! आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे.

या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला.

पूर्णपणे स्वेच्छेनं काम करुन सुद्धा, माझ्या मुलाला (गरज असल्यास) सध्याच्या किंमतीत मी नवं घर घेऊ शकतो. आणि घर घेऊन दिल्यावर सुद्धा माझ्या जीवनशैलीत कणमात्र फरक पडणार नाही कारण मला भविष्याची कधीही चिंता नाही. भविष्य ही कल्पना आहे आणि केवळ वर्तमानच जगायला आणि उपभोगायला उपलब्ध आहे. वर्तमानात धमाल करत जगण्याची कला जमून गेली आहे.

आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !

सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे.

या क्षणात समोर असलेल्या प्रसंगासाठी आवश्यक असेल तेवढा पैसा बिनदिक्कत खर्च करण्याचं कौशल्य मी शिकलो आहे. आणि कारण पुन्हा तेच आहे : मला भविष्याची कधीही चिंता नाही. तस्मात, सिबील स्कोर माझ्यासाठी व्यर्थ आहे.

गॅरी ट्रुमन's picture

23 Jan 2017 - 10:39 pm | गॅरी ट्रुमन

त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल !

वर डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या आकड्यांबरोबर खेळून बघू. २००४ मध्ये १८ लाखांचे घर असेल तर त्याच्या २०% म्हणजे ३.६० लाख इतकी इक्विटी स्वत: डॉक्टरांनी त्यात टाकली असेल आणि १४.४ लाख इतके कर्ज घेतले असेल. आज घराची किंमत सव्वा कोटी आहे आणि डॉक्टरसाहेबांनी लिहिलेल्या दुसऱ्या प्रतिसादाप्रमाणे ६ लाख कर्ज अजूनही शिल्लक आहे.म्हणजे डॉक्टरसाहेबांची त्या घरातील इक्विटी १.२५ कोटी वजा ६ लाख बरोबर १.१९ कोटी इतकी झाली आहे. म्हणजे २००४ ते २०१७ या १३ वर्षात त्यांची त्या घरातील इक्विटी १.१९ कोटी भागिले ३.६० लाख बरोबर ३३ पटींनी वाढलेली आहे. १३ वर्षात ३३ पटींनी इक्विटी वाढली म्हणजे दरवर्षी सुमारे ३१% ने वाढ झाली. तुमच्या घराची आजची किंमत १.५० कोटी आहे तर डॉक्टरसाहेबांच्या घराची आजची किंमत १.२५ कोटी आहे. आकडेमोडीच्या सोयीसाठी २००४ मध्येही हे गुणोत्तर तेवढेच असेल हे गृहित धरू. म्हणजे डॉक्टरसाहेबांच्या घराची किंमत २००४ मध्ये १८ लाख असेल तर त्यावेळी तुमच्या घराची किंमत १८ लाख गुणिले ६ भागिले ५ = २१.६ लाखच्या आसपास असेल. म्हणजे तुमची घरातील इक्विटी १.५० कोटी भागिले २१.६ लाख = जवळपास ७ पटींनी वाढली. म्हणजे १३ वर्षात दरवर्षी सुमारे १६% ने वाढ झाली.

तेव्हा डॉक्टरसाहेबांना हे जास्तीचे ’लिव्हरेज’ मिळाले कर्ज घेतल्यामुळेच. तसेच समजा २००४ मध्ये एखाद्याकडे एकरकमी टाकायला २१.६ लाख नसतील पण साडेतीन-चार लाखच असतील तर मग काय करायचे? कर्ज नकोच असेल तर ज्या वेगाने घरांच्या किंमती वाढत आहेत त्यापेक्षा जास्त वेगाने उत्पन्न वाढले पाहिजे आणि कधीनाकधी १००% इक्विटी टाकता येईल अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. सर्वांचे उत्पन्न दरवर्षी १६% पेक्षा जास्त वेगाने वाढत नसते. तेव्हा कर्ज घेतले नाही तर स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न मृगजळाप्रमाणे दूरदूर पळत राहिल हीच शक्यता अनेकांच्या बाबतीत होईल. तेव्हा तुम्हाला शक्य झाले ते सगळ्यांना शक्य होईलच असे नाही

आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे

त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.

सगळेच आकडेमोड करत बसले असते. तस्मात, कॅलक्युलेशन्सना अर्थ नाही.

त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही

उद्या नाहीच असं जगण्याचा ज्याचा अनुभव आहे तोच स्वप्नवत जगतो, बेफिकीर जगतो. आजचा दिवस मनमानी करत जगू शकतो आणि त्याचा प्रत्येक दिवसच आजचा दिवस असतो. इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही.

ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.

तुमच्या कल्पनेतला गरीब मी तरी नाही. गाडी, फ्लॅट, सहली, खेळ, विविध व्यासंग, नातेवाईक आणि मित्रांबरोबरची गेटटुगेदर्स, संगीत, योगा, प्राणायाम, स्विमिंग, लेखन, फारच मूड असेल तेव्हा दारुकाम आणि हे काय कमीये म्हणून जीवनाचा अल्टीमेट आयाम, अध्यात्म ! त्यामुळे वेळेपासून सर्वस्वी मुक्त जीवन.... आणि यातला कुठला ही छंद भर वर्कींग डेला, फुल वर्कींग अवर्समधे मन मानेल तसा करण्याचं साहस. भोंगळ संत वचनांची मला कधीही गरज भासत नाही. आणि उपलब्ध असलेला पैसा समोर असलेल्या प्रसंगावर मनमुराद खर्च करायचं कौशल्य असल्यानं मी कायम श्रीमंतच असतो.

त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही.

कर्ज घेणारा वर्तमान भविष्यासाठी गहाण ठेवून असतो. त्यामुळे सगळा स्वच्छंद ज्यानं भविष्यकाळ शून्य केला, त्यालाच उपलब्ध असतो.

असो, हा सगळा अनुभवाचा भाग आहे. चर्चा करुन काहीही साध्य होत नाही. साहस करायला डायरेक्ट दिवसाचं काँपोझिशनच बदलायला लागतं . सो, तुम्ही कॅलक्युलेशन्समधे जगा, मी वर्तमानाची मजा घेतो. अर्थात, तुम्ही मजेत जगतायं असं वाटत असेल तर चर्चेला अर्थ नाही कारण प्रत्येकाचं जगणं त्याच्या अभिव्यक्तीतून दिसतं. आणि मला आहे त्यापेक्षा अजून श्रीमंत होण्यात रस नाही. त्यामुळे तुमची कॅलक्युलेशन्स माझ्या उपयोगाची नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

24 Jan 2017 - 10:25 pm | गॅरी ट्रुमन

तुम्ही किती श्रीमंत आहात की गरीब आहात यात इतर मिपाकरांना काही इंटरेस्ट असायचे कारण नाही.

म्हणणे एकच. तुमच्या विधानांचा सगळा डोलारा घर विकत घेण्यासाठी लागणारे पैसे गाठीला आहेत या गृहितकावर अवलंबून आहे. या गृहितकाला आधार कोणता? आणि ते मुळातले गृहितकच गंडलेले असेल तर तुमचे वरकरणी कितीही प्रभावी वाटणारे आर्ग्युमेन्ट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल. आज मुंबईत अगदी लहान घर घ्यायचे झाले तर एखाद कोटी रूपये आणि नवी मुंबई/डोंबिवली इथे घर घ्यायचे झाले तर किमान ४५-५० लाख रूपये लागतात. या घरांच्या किंमती अवास्तवपणे वाढल्या आहेत त्याला आय.टी बूम जबाबदार आहे की अन्य काही कारण जबाबदार आहे याने काही फरक पडत नाही. दिवसाच्या शेवटी सत्य परिस्थिती हीच आहे. तेव्हा घर घ्यायचे असेल तर तितके पैसे मोजणे गरजेचे आहे.

समजा एखाद्याकडे ५० लाख रूपये नसतील--स्वतःकडे जे काही असेल नसेल ते सगळे विकले तरी आणि फक्त १०-१२ लाखच उभे राहू शकणार असतील तर त्या माणसाने कर्ज न काढता घर कसे घ्यायचे ते सांगा. मुळात तेवढे पैसे गाठीला असतील तर दुपारी २ ते ४ (की ६) काय मी २४ तास झोपा काढायला तयार आहे आणि हवे तेवढे स्वच्छंदीपणे जगायला तयार आहे. अगदी दर आठवड्याला वेगवेगळ्या रिझॉर्ट्समध्ये जाईन, दर महिन्याला परदेशी टूरही करेन. हाकानाका. पण तेवढे पैसे नाहीत तेव्हा माझ्या सारख्याने काय करायचे की घराचे स्वप्न विसरायचे?

गणामास्तर's picture

24 Jan 2017 - 10:43 am | गणामास्तर

हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !

मी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुमचं एकंदरीत सगळं रुटीन रोचक वाटल्यामुळे तुमचे प्रतिसाद नीट वाचतोय.
वरती एके ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी तुमचा नाममात्र संबंध आहे, तर प्रत्येक रात्र शनिवार आणि प्रत्येक दिवस रविवार वाटण्यामागे कारण काय? तुमच्या लेखी शनिवार रविवार हे दिवस काही वेगळे असतात काय ?

संजय क्षीरसागर's picture

24 Jan 2017 - 6:42 pm | संजय क्षीरसागर

फक्त आत्ताचा क्षण आहे . शनिवारची रात्र हा वार नसून मूड आहे. उद्याची फिकीर नसलेली चितदशा समजावी म्हणून तसं म्हटलंय . तत्सम, रविवार सुद्धा हॉलिडे मूड आहे . आजमधे जगणाऱ्याची चित्तदशा समजावी म्हणून तसं लिहीलंय.

१ ते ४ मध्ये कोण करणार तुम्हाला फोन ?

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 1:40 pm | संजय क्षीरसागर

पण तुला लगोलग कॉल बॅक करतो की नाही !

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Jan 2017 - 12:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

संक्षी, तुमचा नुसता फुलटॉस नाही तर नो बॉल वाटतोय मला. तुमच्या वैयक्तिक उदाहरणचं सरसकटीकरण कसं काय केलं जाऊ शकतं? तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय? समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात? शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल?

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 1:38 pm | संजय क्षीरसागर

आणि व्यक्तिगत नक्की आहे पण तसं घेऊ नका. मी जगण्याचा एक अंदाज लिहीलायं.

तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय?

इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.

समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात?

तेच उत्तरे. इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे, ती धंद्याचं साहस करु देत नाही.

शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल?

माझ्या बघण्यात तरी अजून नाही. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सांगा, भेटायला नक्की आवडेल.

संदीप डांगे's picture

23 Jan 2017 - 6:36 pm | संदीप डांगे

इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.

>> अगदी सहमत. माझे तर मत असे आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे.

एकच सांगितलं : आम्ही आमची उमेदीची वर्ष घालवून जे कमावलं ते सगळं या बिल्डर लोकांनी लुटलं!

सुबोध खरे's picture

23 Jan 2017 - 7:18 pm | सुबोध खरे

इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.
एकदम चूक
मी नोकरीत असताना घराचे आणि दवाखान्याचे अशी दोन्ही कर्जे घेतली आणि मग नोकरी सोडली.
धंद्याला लागलो असताना मला कोण कर्ज देणार होते?
दवाखान्याचे कर्ज लगेच फेडले( व्यावसायिक कर्ज चढ्या दराने होते).
घराचे कर्ज वर म्हटल्याप्रमाणे अजून चालू आहे. २००४ साली इ एम आय १४,३५०/- हा डोक्यावर भार होता. आज तो नगण्य आहे. हाच कर्जाचा सर्वात मोठा फायदा असतो. जसा जसा काळ जातो तसे तुमचे उत्पन्न वाढत जाते आणि इ एम आय डोईजड असण्याऐवजी सहज भरता येईल असा होत जातो.

सुबोध खरे's picture

23 Jan 2017 - 7:21 pm | सुबोध खरे

धंद्याचं साहस
शब्द चपखल आहे
ते
ज्याला करायचा आहे तो ते साहस करतो. ज्याला धंदा करायचा नाही तो साले पाले लावत राहतो. मग इ एम आय सारख्या सबबी समर्थनासाठी सोप्या जातात.
जाता जाता -- सबब हि गोष्ट सर्वात लंगडी असूनही जगात सर्वात जास्त चालणारी बाब आहे.

रियल इस्टेट बेसुमार वधारली. ज्यांनी त्यापूर्वी घरं घेतली होती त्यांना गृहकर्जाचा हप्ता फक्त रिलेटीवली कमी झाला कारण सगळ्या देशात जास्त पैसा खेळायला लागला. हा कर्तृत्वाचा नाही तर निव्वळ नशीबाचा भाग आहे. बिल्डरनी बांधकामाचा खर्च प्लस नफा हा विचार फाट्यावर मारला. आयटी पब्लिकला कडून किती इएमआय खेचता येईल गुणीले मॅक्सिमम टर्म या हिशेबानं फ्लॅट विकायला सुरुवात केली. महिना सत्तर/ ऐंशी हजार हप्ता म्हणजे वर्कींग कपलला `इटस ओके यार' वाटतं आणि मग बिल्डर फ्लॅटची किंमत दोन कोटी करतो (त्यामुळे तुमच्या आणि माझ्या फ्लॅटची किंमत उगीचच स्वप्नवत वाटते आहे).

समजा आयटी बूम आलाच नसता तर तुमचा हप्ता त्याच्या फुल टर्मसाठी, जवळपास पहिल्या हप्त्या इतकाच हेवी वाटला असता. थोडक्यात, पैसा बेसुमार वाढला नसता, तर लोनची फुलटर्म तुम्हाला इएमआय लाईनीवर (म्हणजे रोजचा दिवस एकसारखा) ठेवायला पुरेसा होता.

आजच्या घडीला तुम्ही सत्तर हजाराचा इएमआय बसणारं कर्ज घ्याल कां असा विचार करा. मग इएमआयमुळे आयुष्य कसं गहाण पडत असेल याचा अंदाज येईल.

कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुम्ही लकी आहात कारण बूम येण्यापूर्वीच्या किंमतीला फ्लॅट मिळाला आणि .....मी लकी आहे कारण मी इएमआयच्या फंदातच पडलो नाही आणि कधी पडणारही नाही !

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Jan 2017 - 8:43 pm | हतोळकरांचा प्रसाद

संक्षि, ते आयटी बुम वगैरे ठीक आहे, पण हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा?

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 10:06 pm | संजय क्षीरसागर

ठीक नाही, परफेक्ट आहे !

हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा?

तुमच्याकडे सध्या नक्की किती पैसे आहेत, काय वाट्टेल ते झालं तरी आयुष्यात भविष्यकाळ निर्माण होऊ देणार नाही असा दृढ निश्चय तुम्ही आत्ता या क्षणी आणि आयुष्यभरासाठी करु शकता का ? तुम्ही निकड म्हणून फ्लॅट घेतायं की रेंट आणि हप्ता अ‍ॅडजस्ट होईल या हिशेबानं (उगीच) इनवेस्टमेंट म्हणून, उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का? यावर ते सगळं अवलंबून आहे.

खरं तर वर सांगितलेले सगळे फॅक्टर्स एका वेळी जमवले तर फ्लॅट आणि आपले सोर्सेस सरळ आमने सामने होतात आणि व्यावहार होतो.

मी आत्तापर्यंत असे चार व्यावहार केलेत. आयुष्यातल्या अगदी पहिल्या फ्लॅटचा, दुसरा बहिणीसाठी फ्लॅट घेतांना, तिसरा माझं ऑफिस घेतलं तेव्हा आणि चौथा सध्याचा फ्लॅट घेतला तेव्हा.

बघा काही उपयोग झाला तर !

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Jan 2017 - 10:22 pm | हतोळकरांचा प्रसाद

नाही ब्वा! असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ! मुळात सगळं लिक्विडेट करायचं म्हणजे काय करायचं हेच नाही कळलं. साधारणपणे 50-55 लाखाचा फ्लॅट घेण्यासाठी काय लिक्विडेट करावं? लोक लोन/ईएमआय कडे वळतात कारण कोणाकडेही घर घेण्यासाठी इतके पैसे नसतात. कसेतरी 20% जमा होतात, तेव्हा 80% लोन घेऊन घर घेतलं जातं. दृढ निश्चय वगैरे आणता येईल पण पैशाचं सोंग आणायचं कसं?

गॅरी ट्रुमन's picture

23 Jan 2017 - 10:45 pm | गॅरी ट्रुमन

लोक लोन/ईएमआय कडे वळतात कारण कोणाकडेही घर घेण्यासाठी इतके पैसे नसतात. कसेतरी 20% जमा होतात, तेव्हा 80% लोन घेऊन घर घेतलं जातं. दृढ निश्चय वगैरे आणता येईल पण पैशाचं सोंग आणायचं कसं?

मी या अनुभवातून काही काळापूर्वीच गेलो असल्यामुळे हा अनुभव नक्की कसा असतो हे मला चांगलेच माहित आहे. सगळी इन्व्हेस्टमेन्ट --- शेअर्स, म्युच्युअल फंड, युलिप इत्यादी विकूनही मुळातले २०% कसेबसे उभे केले होते. वरचे ८०% कुठून उभे करणार होतो? खरे सांगायचे तर संक्षींचा सल्ला अजिबात व्यवहार्य नाही.

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 10:47 pm | संजय क्षीरसागर

असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ!

जे वास्तविक आहे ते काहीच्या काही कसं असेल ? मी स्वतः असे चार व्यावहार केलेत आणि मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही की पुढचा विचार करायला लागला नाही . आणि पैश्याचं सोंग वगैरे भानगड तर जन्मात कधी केली नाही ! उलट माझ्या ज्या मित्रांकडे करोडो रुपये आहेत ते अजून रुटीन गाडाच ओढतात आणि कायम मला एकच प्रश्न विचारतात. `आयला, असं जगायला तू नक्की किती पैसे जमवले आहेत ? '

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2017 - 10:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा शिष्य बनवाल काय गुरुदेव? अगदी मनापासुन. सालं एक आयुष्यं मिळालय, पुनर्जन्मं मिळाला तरी माणसाचाचं मिळेलं ह्याचा काही भरवसा नाही. तुमच्या सारखं ब्लडप्रेशर नॉर्मलला ठेवणारं आयुष्यं जगायची इच्छा नक्की आहे. मार्गं दाखवाल काय? रिस्कं घ्यायची आणि कष्टं करायची आपली तयारी आहे. फक्तं महिन्याला नोकरी करायचं अथवा धंदा करायचं कारण इएमायसाठी पैसा कमावणं ह्याच्यापेक्षा चांगलं आयुष्यं जगता यावं, आईवडीलांना, बायकोपोरांना (अजुन दोन्ही नाहीत) चिंतारहित आयुष्य देता यावा असा हा मार्ग दाखवण्याचं पुण्यकर्म कराल का? आयुष्यभर आभारी राहिन.

संदीप डांगे's picture

24 Jan 2017 - 12:28 am | संदीप डांगे

संजयसरांच्या प्रतिसादाला सहमत.

आयटी पब्लिकला कडून किती इएमआय खेचता येईल गुणीले मॅक्सिमम टर्म या हिशेबानं फ्लॅट विकायला सुरुवात केली. महिना सत्तर/ ऐंशी हजार हप्ता म्हणजे वर्कींग कपलला `इटस ओके यार' वाटतं आणि मग बिल्डर फ्लॅटची किंमत दोन कोटी करतो (त्यामुळे तुमच्या आणि माझ्या फ्लॅटची किंमत उगीचच स्वप्नवत वाटते आहे).


हेच लिहणार होतो पण तुम्ही आधीच लिहिले आहे. :)

२००७ ते २०१३ हा कालखंड चमत्काराने भरलेला आहे त्यामुळे त्याला रेफरन्स पॉईन्ट ठेवू नये.
२००४ ला घेतलेले अठरा लाखाचे घर २०१६ ला सव्वा कोटीचे होणे हा चमत्कार आहे, थंबरुल नव्हे.
२०१३-१४ साली घेतलेली ३० लाखाला घेतलेली घरे आज फारतर ३५-३८ लाख देऊ शकतात. अजून पुढे पाच वर्षांनी फार तर ४५-५० लाख देतील. आता बोला!

आज पस्तीस हजार इएमआय कोणी राहत्या घरासाठी भरत असेल तर त्याचे घराचे सर्व उत्पन्न किमान ९० हजार हवे, आणि हे ९० हजार दरवर्षी किती वाढेल हे किती टक्क्याने पगारवाढ होते, महागाईदर काय, नोकरीत प्रमोशन मिळण्याच्या किती संधी आहेत ह्या वेरियेबल्स वर अवलंबून आहे.

आजचे अंदाजे २०१७ ते २०३२ चे गणित मांडूया:
१. ३५ लाखाचे कर्ज. ३५ हजार इएमआय पुढची पंधरा वर्ष.
२. पगार ९० हजारः पुढच्या पंधरा वर्षात (दरवर्षी अपेक्षित १० टक्के पगारवाढ ) पंधरा वर्षांनी साडेतीन लाख रुपये.*
३. घराची किंमत ४० लाखः पंधरा वर्षाने (दरवर्षी अपेक्षित दरवाढ ६ %) होइल ९५ लाख
तर ३५ हजार असणारा इएमआय हा आज पगाराच्या ४०% पासून हळूहळू कमी होत १०% पर्यंत राहिल. हा दरवर्षी २% कमी होत जाईल.

तर डॉक्टर आणि संक्षी यांची घरे नॉर्मल दरवाढ राहिली असती तर फारतर जास्तीत जास्त ४० लाख किंमतीची राहिली असती. जी आज सव्वा ते दिड कोटीची आहेत. आज २०१७ मध्ये घेतलेल्या घरांच्या किंमती २०३२ मध्ये फारतर अडीचपट होतील. आठ पट नाही.

*(आता ज्यांचे पगार आज ९० हजार आहेत ते पंधरा वर्षांनी साडेतीन लाख होतील काय हा मोठा प्रश्न आहे. २००४ मध्ये १० हजार पगार असणार्‍याला आज ३५ हजार पगार असायला हवा. आमच्यासारख्या फास्टेट ग्रोथ पोटेन्शियल असलेल्या क्षेत्रात ते शक्य होउ शकते. २००६ ला ६ हजार रुपये महिन्यावर लागलेला माझा मित्र आज दिड लाख रुपये महिना कमवतो. पण त्याच्याच ऑफिसातला तेव्हा ८ हजार रुपये महिना वाला मदतनीस २०-२५ पर्यंत तरी पोचलाय का ते माहिती नाही.)

आता घरांच्या किंमती आणि लोकांचे पगार यांचे समिकरण जबरदस्त बिघडलेले आहे. एकाच्या पगारात घर शक्यच नाही. पत्नीला त्यासाठी नोकरी करावीच लागते. ह्याबद्दल मागे कुठल्या तरी धाग्यावर लिहिले आहे. त्यामुळे घरांचे इएमाय ही वेठबिगारी होत आहे हे माझे मत आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायही आजच्या नोकरदारांपुढे नाही हे दुर्दैव आहे, ज्याला कोणीही काहीही करु शकत नाही. घरांच्या किंमती वाढतच राहतील त्यामुळे घरे गुंतवणुकीची उत्तम साधने आहेत ह्या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर येणे श्रेयस्कर.

बाकी, दिलेल्या लिंकचा अभ्यास करुन अभ्यासू लोकांनी आपली मते कळवावीत ही विनंती.
http://www.jagoinvestor.com/2009/12/returns-of-real-estate-in-india.html

डिस्क्लेमरः वरच्या गणितांत काही भूलचूक झाल्यास माफी असावी. फार काटेकोर आकडेमोड नाहीये ती.

ट्रेड मार्क's picture

24 Jan 2017 - 2:34 am | ट्रेड मार्क

घराची किंमत एकरकमी देऊ शकतील एवढे पैसे किती लोकांकडे उपलब्ध असतात? अगदी २००४ साली, दुसरी कुठली प्रॉपर्टी विकल्याशिवाय, १८ लाख रुपये एकरकमी उभे करणे ही अवघड गोष्ट होती. हे संक्षीसरांनी कसे केले हे त्यांनी, किंवा आधीच्या प्रतिसादात जे लिहिलंय ते ज्यांना समजलं असेल त्यांनी, आमच्यासारख्या गरिबांना समजावून सांगितले तर उपकार होतील.

मी २००४ साली नोकरी सुरु करून फार काही वर्ष झाली नव्हती, आई वडिलांकडून पैसे घेणे म्हणजे त्यांची म्हातारपणासाठी केलेली बचत आपण काढून घेण्यासारखे होते. मग कर्ज न घेता घर घेणे हे कसे साध्य करता आले असते हा प्रश्न आहे.

लेखात घरात पैसा न गुंतवता बाकी मार्केट्स मध्ये म्हणजे सोने, शेअर ईई मध्ये गुंतवणे फायदेशीर आहे असे लिहिले आहे. पण किती लोक हे दोन्ही फक्त गुंतवणूक म्हणून पाहतात? शेअर मार्केट मध्ये गुंतवणे हे किती लोकांना सोयीस्कर आणि फायदेशीर वाटू शकते?

अजून एक प्रश्न, जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली? त्यांनीच वर म्हणलय " उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा.

रच्याकने: ट्रुमन म्हणतात तसे, माझे २०% कसे गोळा केले ते माझे मलाच माहित आहे... १००% गोळा करणे म्हणजे....

संजय क्षीरसागर's picture

24 Jan 2017 - 2:57 am | संजय क्षीरसागर

जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली?

मी गुंतवणूक वगैरे प्रकार करत नाही, खर्च करतो. घराची गरज वाटली म्हणून प्राइम लोकॅलिटीमधे (म्हणजे आजूबाजूला गर्द झाडी आणि दिवसभर संपूर्ण शांतता ) सगळे पैसे (स्वतःचे) लावून घर घेतलं.

उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा.

तेच तर मी केलं !

चिनार's picture

24 Jan 2017 - 10:26 am | चिनार

संक्षी भाऊ...

वरील सर्व प्रतिसादात तुम्ही म्हणत आहात तसे जर खरंच जगत असाल तर तुम्हाला सलाम !!

मी अगदी असाच जगतो. लिहीलंय ते आणि जगणं यात कणमात्र फरक नाही. आणि हे सगळं पुरता कुटुंबवत्सल असतांना. आमची एकत्र फॅमिली आहे. आई, भाऊ, मी, बायको आणि मुलगा. पार रोजच्या किराण्यापासून ते हॉस्पिटलपर्यंतचे, संगोपनापासून ते इन्कमटॅक्सच्या काँप्लीकेटेड केसेसचे, लेखनापासून ते साधनेपर्यंतचे सगळे फर्स्ट-हँड अनुभवेत. नुसता कल्पनाविस्तार असता तर स्वतःच्या प्रतिसादांमुळेच नॉनप्लस झालो असतो. विचार आणि आचारातली तफावत लिहीतांना उघड होते.

साधी माझ्या लेखनाची आणि प्रतिसादांची टायमींग्ज पाहिलीत तर तुम्हाला समयमुक्ती दिसेल. आणि कंटेंट भावला तर आयुष्य बदलायचं साहस येईल !

संदीप डांगे's picture

24 Jan 2017 - 7:40 am | संदीप डांगे

अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व तो मला मान्यच आहे. माझा प्रतिसाद लिहिण्याचा उद्देश इतकाच की डॉक्टर साहेबांनी याधीही बहुतेक एकदोन वेळा हे 18 लाख ते सव्वाकोटी च्या घराचे उल्लेख केले आहेत. त्यामागे आपल्या घराच्या गुंतवणुकीत आपल्याला कसा उत्तम फायदा झाला याबद्दल त्यांना सांगायचे असावे पण अनैसर्गिक वाढीने तो फायदा झालाय हे पुढे यावे व इतर वाचणारानी हुरळून न जाता यामागचे गणित समजून घेऊन निर्णय घ्यावे यासाठी प्रतिसाद दिलाय.

स्वतः राहण्यासाठी घर घेतले जात असेल तर ही कर्जाची वेठबिगारी अपरिहार्य आहे. पण गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.

माझेही अकोल्यात घर आहे जे मी अवघ्या 4 लाखात घेतले, आज त्याची किंमत 25 लाख आहे. अर्थात ते पूर्ण माझ्या व वडिलांच्या सेविंग मधून घेतले. तेव्हा मी हि नोकरीला लागून 3 वर्षे झालेली व पगार अगदी फार नव्हता. आज ते 25 लाख असलेलं घर कितीही गरज असली तरी विकू शकत नाही कारण ते एकमेव राहते घर आहे. सो त्याची किंमत कितीही वाढली तरी शून्यच! :-)

दुसरं असं की नैसर्गिक वाढ राहिली असती तर ते घर आज फारतर 7 ते 8 लाखात मिळाले असते जे घ्यायला कर्ज काढायची गरज राहिली नसती, कारण 3 वर्षात 4 लाख रोख जमवले तर पुढच्या आठ वर्षात अजून 5 लाख जमवणे अवघड नसते. पण आज 25 लाखाचे घर घेऊ म्हणता कर्जशिवाय शक्यच नाही.

तस्मात, संजय सरांचे सर्वच विचार मला पटलेत असे नव्हे. पण त्यात अजिबात तथ्य नाही असेही नव्हे. अनैसर्गिक वाढीने सगळ्यांचे हात दगडाखाली आलेत इतकेच, अन्यथा ते म्हणतायत तेही शक्य असते. नॉर्मल परिस्थितीत दहा वर्षे ते पंधरा वर्षे काम करून साठवलेल्या पैशातून घर घेणे शक्य झाले असते असे माझे मत, अर्थात हे पूर्ण चुकीचेही असू शकते, माझा ठाम दावा नाही.

संदीप डांगे's picture

24 Jan 2017 - 7:48 am | संदीप डांगे

दुसरं असं की त्यांच्या व तुमच्या-माझ्या वयात, कमाईत अंतर आहे. 2004 मध्ये घर घ्यायच्या वेळेस ते नुकतेच कमाईला लागलेले नसतील, 2004 मध्ये घर घेण्यासाठी पैसे जमायला किमान त्यांच्याकडे पंधरा वर्षे असतील असा अंदाज..

सो 1990 साली नोकरीला लागून घर घेणाऱ्यांची व 2005 नंतर नोकरीला लागून घर घेणाऱ्यांची सरसकट तुलना नाही होऊ शकत. 90-95 च्या दरम्यान चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांनी दहा वर्षात विनाकर्जाची घरे घेतलेली मीही पहिले आहे. तेव्हा काळ वेगळा होता, आता कठीण आहे.

सुबोध खरे's picture

25 Jan 2017 - 9:38 am | सुबोध खरे

डॉक्टर साहेबांनी याधीही बहुतेक एकदोन वेळा हे 18 लाख ते सव्वाकोटी च्या घराचे उल्लेख केले आहेत. त्यामागे आपल्या घराच्या गुंतवणुकीत आपल्याला कसा उत्तम फायदा झाला याबद्दल त्यांना सांगायचे असावे पण अनैसर्गिक वाढीने तो फायदा झालाय हे पुढे यावे
मुदलातच खोट आहे.
२००४ साली मी घर घेतले ते स्वतःला राहण्यासाठी गुंतवणूक म्हणून नव्हे. त्यामुळे त्यातून फायदा झाला हे म्हणणे मुळातच चूक आहे.
राहते घर हि गुंतवणूक नाही हे अर्थशास्त्राचे प्राथमिक गृहीतक आहे. तेंव्हा त्यात फायदा कसा झाला हे सांगून मी किती "शहाणा" आहे हे मला (आपल्या गृहीतकाप्रमाणे ) सिद्ध करण्याची मुळीच गरज नाही.
अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.यात आपला आकस दिसून येतो.
कारण हेच घर मी एका गरजू तरुण इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाला (LECTURER) भाड्याने दिले होते आणि चार वर्षात त्याने आपले पैसे जमवून तेथेच जवळ एक छोटेसे घर विकत घेतले.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 9:48 am | संदीप डांगे

सरळ साध्या प्रामाणिक मांडणीला आकस, वितंडवाद इ इ बिरुदं चिकटवायला सुरुवात झाली की मी आजकाल माघार घेतो... तुमचं चालु द्या... :-) :-) शुभेच्छा!

सुबोध खरे's picture

24 Jan 2017 - 1:33 pm | सुबोध खरे

समजा आयटी बूम आलाच नसता तर तुमचा हप्ता त्याच्या फुल टर्मसाठी, जवळपास पहिल्या हप्त्या इतकाच हेवी वाटला असता. थोडक्यात, पैसा बेसुमार वाढला नसता, तर लोनची फुलटर्म तुम्हाला इएमआय लाईनीवर (म्हणजे रोजचा दिवस एकसारखा) ठेवायला पुरेसा होता.
माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच. तो ५० % दराने वाढतहि नाही कि ५% पेक्षा खाली येत नाही. तो मानवी अस्तित्वाशी संबंधित असल्याने एका स्थिर स्थितीत राहतो.
मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही. राहते घर हे asset नसते.
त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही. मी जर बांद्र्याला घर घेतले असते तर ते मला डोईजड झाले असते म्हणून मी पनवेलला घेतले.
रच्याकने -- पनवेलचे घर हे आय टी बस्ट झाल्यानंतरच घेतलेले आहे.
माझ्या बँकेत कमीत कमी एक वर्षाचा इ एम आय जाईल इतके पैसे मी आपत्कालीन स्थिती किंवा इतर परिस्थिती यासाठी मुदत ठेव म्हणून ठेवलेले आहेत.
केवळ वादासाठी इ एम आय हा डोइजडच असतो हे म्हणणे हा आपला दुराग्रह असल्याचे जाणवते.

माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच.

बरोबरे पण आयटी बूममुळे रियल इस्टेट बेसुमार वधारली. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, बूमपूर्वी घेतलेले फ्लॅट आता स्वप्नवत किंमतीचे वाटतात आणि सध्या फ्लॅट घेणं स्वप्नवत वाटतं.

मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही.

त्याच सुमारास मी ही राहातोयं तो फ्लॅट घेतला. पण तेव्हाची किंमत आणि आताची किंमत यात कोट्यावधी रुपयांचं अंतर पडलंय ते ग्लोबलायझेशनमुळे.

त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही.

म्हणजे तुम्ही निकड नसतांना कर्ज काढून, इनवेस्टमेंट म्हणून (किंवा पुढे लागेल म्हणून) दुसरं घर घेतलं. माझा एक फंडा आहे, पैसा ही खर्चासाठी वापरायची गोष्ट आहे, गुंतवणूकीसाठी नाही. याचा अर्थ हप्ते भरणारा स्वच्छंद जगू शकणार नाही असं नाही, त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो.

आता दुसरा फ्लॅट घ्यायचा झाला तरी मी आहे तो सर्व पैसा एका वेळी नव्या फ्लॅटसाठी खर्चून टाकीन कारण मला भविष्याची कणमात्र चिंता नाही. आणि मजा म्हणजे दरम्यानच्या काळात मनसोक्त जगून मिळवलेला पैसा नव्या फ्लॅटसाठी पुरेसा आहे. कदाचित तुमच्यासारखे धोरणी व्याही मिळाले तर त्यांना (माझ्या मुलाच्या हिश्श्याची) निम्मी रक्कम लग्न झाल्याझाल्या देऊन टाकीन. म्हणजे पुन्हा निम्मी रक्कम उरेलच. आणि नवदांपत्यानं स्वाभिमानानं सगळं स्वतः मॅनेज करायचं ठरवलं तर तोही प्रश्न येणार नाही. या उप्पर मुलगा एकत्र कुटुंबात वाढला आहे, सूनही तशीच मिळाली तर सगळे आनंदानं एकत्र राहू, मग तर विषयच संपला!

सुबोध खरे's picture

24 Jan 2017 - 6:22 pm | सुबोध खरे

त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो.

त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो.
हे आपल्याला कुणी सांगितले?
हाच तो "दुराग्रह". इ एम आय भरणारा माणूस हा आयुष्य आनंदात जगूच शकत नाही हि आपण स्वतःची केलेली ठाम (गैर) समजूत आहे.
आजही माझे कर्ज मी एकरकमी फेडू शकतो पण जर मला काही लाख रुपये ६.३ %( ९% वजा २.७%) (३०%) कर सवलत व्याजाने वापरता येतात तर मी ते कर्ज का फेडावे. तेच पैसे मी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ठेवले तर मला ८.१ टक्के करमुक्त व्याजही मिळते शिवाय दीड लाखापर्यंत कर वजावट सुद्धा मिळते. (हा आर्थिक व्यवहार मी आपल्याला समजावून द्यावा अशी माझी लायकी नाही)
मी कॉर्पोरेट रुग्णालयातील नोकरी सोडून व्यवसाय चालू केला त्याचा सर्वात मोठा फायदा मला हाच झाला कि सोमवारची सकाळ हि माझ्या रविवार सकाळ इतकीच प्रसन्न असते. मला विचारणाऱ्या कोणत्याही माणसाला( मिपाकराना सुद्धा) मी हेच सांगतो कि माझ्या कडे भरपूर वेळ आहे.आणि सुदैवाने त्याचा उपभोग करण्यासाठी पुरेसा पैसे हि मिळतो.
आपण जगतो तेच आयुष्य हा आपला दुराग्रह सोडून इतर दृष्टीने विचार करायचा प्रयत्न करून पहा एवढीच विनंती आहे.

जरा सध्याच्या बव्हंश तरुणाईकडे पाहा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. हे आपल्याला कुणी सांगितले?

पैसा हा माझा व्यावसाय आहे. पैश्यामुळे लोकांची काय परिस्थिती आहे ते मी जवळून बघितलंय. मला कुणी सांगायची गरज काय ? लोकांची बँक स्टेटमेंटस त्यांच्या जगण्याचा पॅटर्न दाखवतात. सध्याच्या किंमतीत कर्ज काढून फ्लॅट घेणारा आयुष्य भविष्यकाळाला गहाण टाकून आहे. अणि इएमआय त्याला कायम घेरुन आहे.

ट्रेड मार्क's picture

24 Jan 2017 - 9:33 pm | ट्रेड मार्क

तुम्ही जे करताय आणि सांगताय ते छानच आहे. कोणाला असं राहायला आवडणार नाही? तुम्ही म्हणताय की उद्याचा दिवस नाही असं समजून आत्ता खर्च करायचा. हा विचार म्हणून मस्तच आहे पण पैसे आणणार कुठून?

उदा. द्यायचं झालंच तर, २००१ साली १८ लाखांचा फ्लॅट खूप आवडला होता पण अगदी मला स्वतःला विकले असते तरी ते कर्ज काढून सुद्धा शक्य नव्हते मग रोखीची तर बातच सोडा. २००८ साली मला ६० लाखाचा एक फ्लॅट आवडला होता. पण अगदी माझ्याजवळचे काहीही विकले असते तरी शक्य नव्हते.

तर तुम्ही हे कसं करता ते आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं तर आम्हाला पण मदतच होईल. पाहिजे तर स्वतंत्र धागा काढा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jan 2017 - 9:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

मीही नेमकं हेच विचारलं होतं वर! जीवन जगण्याची प्रवृत्ती आणि आर्थिक नियोजन याची गडबड होतेय का?

अवांतर: उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला. हल्ली अमेरिकन लोकांना सेविंगचे महत्व कळाल्याचे ऐकिवात आहे.

संजय क्षीरसागर's picture

24 Jan 2017 - 10:49 pm | संजय क्षीरसागर

हे तुम्हाला मंजूर आहे की नाही ते बघा .

मग पैश्याविषयी नवा दृष्टीकोन तयार करायला माझा पैसा हा लेख वाचा. तसं जगायची हिंमत एकतर या क्षणी होते किंवा मग आयुष्यभर होत नाही.

उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला.

तो लेख समजला तर मी पैसा खर्च करतो उधळत नाही हे लक्षात येईल. आणि अमेरिकन कर्जबाजारी होऊ शकतो पण माझ्याबाबतीत ती शक्यताच नाही कारण मी कर्जच घेत नाही इतकी उघड गोष्ट कळायला अडचण येणार नाही.

ट्रेड मार्क's picture

25 Jan 2017 - 2:43 am | ट्रेड मार्क

इएमआय आयुष्याची कोंडी करतो - याच्याशी अंशतः सहमत. कारण इएमआय जर खूप असेल, म्हणजे घरात येणाऱ्या सकल उत्पन्नाचा शक्य तेवढा मोठा भाग इएमआय फेडण्यात जात असेल, तर कोंडी होते. पण अगदी सहज परवडेल एवढा इएमआय असेल तर कोंडी व्हायचा प्रश्न येत नाही.

तुम्ही दिलेल्या लिंकमधला पैसा हा लेख आणि प्रतिक्रिया वाचला. पैश्याच्या मागे पळू नये या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खूप पैसा मिळवायचाय म्हणून २४ तास व ३६५ दिवस राबू नये हे खरंच आहे. पण मग पण मग जो काही मिळवायचाय किंवा काम करायचंय त्या अनुषंगाने स्वच्छंदीपणाला थोडाफार लगाम येतोच. उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो. पण एखाद्या मीटिंगमध्ये आहे आणि चला फिरून येऊ म्हणून मी मीटिंग मधून बाहेर पडू शकत नाही. तसेच तुम्ही पण क्लायंट समोर बसलाय, महत्वाचं काही बोलतोय आणि तुम्हाला मूड आला म्हणून त्याला ऑफिसमध्ये सोडून लॉन्ग ड्राईव्हला जाऊ शकत नाही. किंवा क्लायंटचे रिटर्न भरायचा शेवटचा आठवडा आहे आणि तुम्हाला काम करावंसं वाटत नाहीये म्हणून तुम्ही हातातलं काम सोडून रिटर्न काय भरू पुढच्या वर्षी असा म्हणून त्यादिवसापासून १ महिना परदेशी सुट्टीवर जाऊ शकत नाही.

त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये. उलट मी तर म्हणीन आधीच्या अनुभवांवरून आणि भविष्याचा थोडा अंदाज घेऊन खर्च/ गुंतवणूक केली तर मनासारखे आयुष्य जगता येते.

बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे मनुष्याच्या स्वच्छंदीपणाला आवर घातला जातो. पण अर्थात जबाबदारी ही जो घेतो नेहमी त्याच्याच मागे लागते हे स्वानुभवावरून सांगतो. हे विधान तुम्हाला उद्देशून नाहीये त्यामुळे गैरसमज नसावा.

तर तुम्ही म्हणताय ते तत्वतः ठीक आहे आणि बहुतेक सगळे मिपाकर ते आचरणातही आणतात. कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 12:01 am | संजय क्षीरसागर

वाचायला सोयीचं व्हावं म्हणून प्रतिसाद पुढच्या पानावर दिला आहे.

तुषार काळभोर's picture

19 Jan 2017 - 12:43 pm | तुषार काळभोर

२००६ ला (जेव्हा क्रेडिट कार्ड्स अन् कर्जं अक्षरशः कुणालाही मिळत) मी शेवटच्या वर्षाला असताना एक पार्टटाईम जॉब करत होतो. महिना रु १०,००० पगारावर मला सिटीबँकेचं एक कार्ड (२५,००० मर्यादा), आयसीआयसीआयचं एक कार्ड (७५,००० मर्यादा) अशी दोन कार्ड मिळाली होती. क्रेडिट कार्ड वापरण्याची अक्कल व अनुभव नसल्याने हळूहळू बिल फुगायला लागलं. मित्रांबरोबर हॉटेलात जेवण झालं, की ष्टाईल मारून मी कार्ड स्वाईप करायचो व कॉण्ट्रीची कॅश माझ्याकडे घ्यायचो (जी बिल भरायच्या आधी खर्च होऊन जायची). घरच्यांना लक्ष्मी रस्त्यावर कपडे घेताना कार्ड स्वाईप करायचं व पैसे माझयकडे घ्यायचे.(परत... जे बिल भरायच्या आधी खर्च होऊन जायचे!)
असं करत करत २००९ मध्ये सिटीचं बिल ३७,००० झालं व आयसीआयसीआयचं ४५,०००! मग सेटलमेंट केली (जी माझी क्रेडीट कार्डांच्याबाबतीत आतापर्यंत झालेल्या चुकांमधील सर्वात वाईट व मोठ्ठी चूक!!) - सिटी बँक २२,००० रुपये व आयसीआयसीआय ३७,००० रुपये.
याचे परिणाम काय झाले ते मला २०१२ मध्ये कळलं, जेव्हा माझं एसबीआयच्या क्रेडीट कार्डचं अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट झालं! कारण वाईट्ट सिबील स्कोर !
मग मी स्वत: ऑनलाईन माझा सिबील क्रेडीट स्कोर पाहिला तर त्यात त्या दोन कार्डांचा इतिहास होता आणि स्कोर कुडन्ट बी अनी वर्स!!
मग २०१५ मध्ये एसबीआयमध्ये एफडी ठेऊन क्रेडिट कार्ड घेतलंय व डोळ्यात तेल घालून त्यावर आता खर्च व (ड्यू डेटची वाट न बघता, बिल जनरेट झालं की लगेच) बिल भरणं चालू आहे.

*अवांतर : दोन महिन्यांपूर्वी सिटीबँकेचा फोन आला होता, तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे, आम्ही तुम्हाला क्षयज्ञ कार्ड ऑफर करतो. पण मी तेव्हा नकार देऊन अजून काही महिने वाट पाहायचं ठरवलंय.

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2017 - 12:43 pm | मराठी कथालेखक

भारतात बहुसंख्य जनतेला कॅशलेस होण्यासाठी क्रेडिट कार्ड नव्हे तर डेबिट कार्ड हाच पर्याय आहे.
अनेकांकडे उत्पन्नाचा , नोकरीचा पुरावा नसतो.
रुपे नेटवर्कचा प्रचार आणि प्रसार, रुपे नेटवर्कला जोडलेले डेबिट कार्ड आणि अतिशय कमी ट्रान्सॅक्शन चार्जेस या उपायांनीच कॅशलेसचा प्रचार होवू शकतो. पण सध्यातरी आपण कॅशलेस म्हणजे व्हिसा आणि मास्टरकार्ड नेटवर्कला श्रीमंत बनवत आहोत.
मी स्वतः कोणतीही वार्षिक फी नसलेले एक क्रेडिट कार्ड वापरतो पण पेट्रोल भरताना यावर चार्जेस लागतात म्हणून त्याने पेट्रोल टाकत नाही, तिथे कॅश किंवा सध्या डेबिट कार्ड वापरतो. या कार्डावर १०० रू खर्च केल्यावर १ पॉइंट मिळतो. हे पॉइंट्स फक्त टाटाच्या क्रोमा , स्टार बझार अशा ठिकाणी रिडीम करता येतात (१ पॉइंट = १ रुपया) . २०१६ मध्ये मी सुमारे ६००० पॉइंट्स रिडीम केलेत !!

दुसरे एक क्रेडिट कार्ड आहे त्याला २०० रु वार्षिक फी आहे..पण मला वाटतं वर्षाला ठराविक रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास (बहूधा २०,००००) वार्षिक फी लागत नाही , पेट्रोल पंपावर विशिष्ट कॉम्बिनेशन असेल (म्हणजे HPCL चा पंप आणि ICICI चे POS ) तर जास्टीचे चार्जेस लागत नाहीत उलट २.५% कॅशबॅक मिळते. हे कार्ड (आणि कारही) माझ्या पत्नीकडे असते.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 1:12 pm | संजय क्षीरसागर

पण कार्डांच्या नांवाबद्दल गुप्तता कशासाठी ?

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2017 - 3:19 pm | मराठी कथालेखक

गुप्तता कुठे.. ते उघडच आहे
पहिले Tata SBI card आहे.. तुम्ही सहसा स्टार बझार वा क्रोमा मध्ये गेलात की कुणीतरी सेल्समन तुमच्या मागे लागतो ते हेच कार्ड !!
दुसरे अर्थातच ICICI चे

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 5:17 pm | संजय क्षीरसागर

.

नितिन थत्ते's picture

19 Jan 2017 - 2:05 pm | नितिन थत्ते

आता क्रेडिट कार्ड वापरणे सुद्धा किफायतशीर होईल कारण आता कॅश हॅण्डलिंग* वर चार्जेस लावणार आहेत.

*म्हणजे काय ते ठाऊक नाही पण बहुधा कॅश काढणे किंवा भरणे यावर चार्जेस लावणार असतील.

कैवल्यसिंह's picture

19 Jan 2017 - 8:25 pm | कैवल्यसिंह

मला (अडाण्याला) कुणीतरी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड याच्यातील फरक समजावून सांगेल का?

डेबिट कार्ड हे तुमच्या एका बँक खात्याशी (सेविंग वा करंट) लिंक असते. खात्यात असलेल्या शिलकेप्रमाणे तुम्ही खर्च करु शकता. तुम्ही खर्च केलेली रक्कम जेव्हा तुमच्या अकाऊंटमधून तात्काळ कमी होते आणि व्यापार्‍याच्या अकाउंटला जमा होते (प्रत्यक्ष त्याच्या अकाउंटला जमा होण्यात काही अवधी लागतो पण तो भाग वेगळा), यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आज जितका खर्च करायचा आहे किमान तितकी रक्कम तुमच्या खात्यात असणं आवश्यक आहे
क्रेडीट कार्डंच तस नसतं. तुमचं एक क्रेडीट अकाउंट असतं , तुमची जी पत आहे त्याप्रमाणे क्रेडीट लिमिट निश्चित होते. त्या लिमिटपर्यंत तुम्ही महिनाभरात खर्च करु शकता, यावेळी तुमच्या बॅक खात्यात शुन्य रक्कम अस्ली तरी त्याने काही फरक पडत नाही. पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डचे बिल आले की तुम्ही ते भरायचं. हे म्हणजे घराजवळच्या वाण्याकडे उधारीचं खातं असण्यासारखं आहे, तुमची पत पाहून तुम्हाला किती रकमेपर्यंत उधार देता येईल याचा विचार वाण्याने केलेला असतो त्या मर्यादेपर्यंत खरेदी करत रहा आणि पुढच्या महिन्याला पैसे द्या.. मग पुन्हा उधारि करा...

कैवल्यसिंह's picture

22 Jan 2017 - 7:44 am | कैवल्यसिंह

धन्यवाद.. पन मग यापैकी फायदेशीर काय ठरते? कोणते कार्ड वापरायला चांगले आहे व कमी त्रासदायक ठरनाऱ्या आहेत?

मराठी कथालेखक's picture

23 Jan 2017 - 5:10 pm | मराठी कथालेखक

माझ्या दूसर्‍या प्रतिसादात मी डेबिट कार्डच्या तुलनेने क्रेडिट कार्डचा फायदा लिहिला आहे. तो वाचा काही शंका असल्यास व्यनी करा कारण पुन्हा कधी धाग्यावर येईनच याची खात्री नाही.
डेबिट कार्डाचा मोठा फायदा हा की ते सहज मिळते, त्यासाठी उत्पन्नाची अट नसते. तुमच्या बॅक अकाउंटला ठराविक मिनिमम बॅलन्स असायला हवा (अगदी चेकबूकसारखे समजा ना.. फक्त डेबिटकार्डचे पेमेंट हा तात्काळ क्लिअर होणारा चेक आहे असं म्हणू शकता). त्यातही राष्ट्रीयकृत बँकेत वा सहकारी बँकेतही ही रक्कम (मिनिमम बॅलन्स) खूप लहान असते (शक्यतो १००० रुपये). बहूतेक सर्वच बँका डेबिट कार्डासाठी वार्षिक शुल्क आकारतात. (बहूधा रु १०० + सर्विस टॅक्स इतके असते.. पण कुणाचे वेगळेही असू शकते). पण ATM कार्ड आणि डेबिट कार्ड आता बहूतांशी एकच असते म्हणून तुम्ही शुल्क टाळावे म्हणून डेबिट कार्ड घ्यायचे नाकारले तर ATM ची सूविधा पण मिळणार नाही. आणि काउंटरवरुन पैसे काढावे लागतील. शिवाय खर्चाला लागतात म्हणून तुम्ही बर्‍यापैकी रक्कम काढून ठेवली तर तुम्हाला त्या रकमेवर सेविंग मध्ये मिळणारे व्याजपण मिळणार नाही. समजा तुम्ही वर्षात प्रत्येक दिवशी तुमच्याकडे सरासरी रु ५००० इतकी कमी रक्कम जरी रोख हवी अशा प्रकारे रक्कम काढत राहिलात तरी ५००० वर सेविंगच्या दराने एका वर्षात मिळणारे (४% दसदशे) व्याज म्हणजेच २०० रु व्याजाला तुम्ही मुकणार. शिवाय बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी वेळ घालवणे, बँकेपर्यंत जाण्याकरिता येणारा खर्च हा वेगळा.

अनरँडम's picture

19 Jan 2017 - 10:20 pm | अनरँडम

मी फक्त अमेरिकेतच क्रेडिट कार्ड वापरले आहे. अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरण्यासाठीचे इन्फ्रास्ट्र्क्चर पूर्णपणे तयार झालेले आहे आणि इथे आयडेंटिटीची चोरी हा धोका सोडल्यास क्रेडिट कार्ड वापरणे हे अत्यंत सोयिस्कर आहे. पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो.

अमेरिकेते क्रेडिट कार्डचा वापर हा सरकारी धोरणातून नागरिकांवर लादला गेलेला नाही. ग्राहक आणि विक्रेता दोघांचा फायदा होत असल्याने (म्हणजे त्यांना क्रेडिट कार्ड वापरल्याने पैसे मिळतात म्हणून नाही तर कॅश वापरण्याच्या गैरसोयीमूळे नॉन-मॉनेटरी ट्रान्सॅक्शन कॉस्ट कमी होत असल्याने) क्रेडिट कार्डचा वापर सार्वत्रिक झाला. त्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चरही हळूहळू विकसीत झाले. (जेथे अत्यंत गरीब लोक राहतात (कृष्णवर्णीय, मेक्सिकन) अशा भागांमध्ये अजुनही कॅशच मोठ्या प्रमाणात वापरली जाते.) भारतात ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही रोख व्यवहार केल्याने (कर बुडवून) फायदा होतो म्हणून सोय असूनही क्रेडिट कार्ड वापरले जात नाही. तर भारत सरकारने पहिल्यांदा करप्रणाली आणि तिचे अंमलबजावणी यात सुधारणा केली पाहीजे. पण अशा सुधारणा हळुहळू होतात. लोकांना चटकण दिसत नाहीत. म्हणून नोटाबंदीसारखे (वाचाळ) मध्यमवर्गियांना कमी त्रासाचे कार्यक्रम शून्य गृहपाठ करून राबवले जातात.

ट्रेड मार्क's picture

19 Jan 2017 - 10:36 pm | ट्रेड मार्क

मी तुलना कुठेच केली नाहीये कारण ती होऊ शकत नाही. अमेरिकेत १००% कार्ड्स वापरतात असा सुद्धा माझा दावा नाही.

लेखाचा उद्देश फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून माझा कसा फायदा झाला हे सांगण्याचा आणि ज्यांना शक्य असेल आणि इच्छा असेल त्यांना पण करून घेता यावा एवढाच आहे. भारतात क्रेडिट कार्ड कसं वापरावं हे मी अजिबात सांगत नाहीये कारण सध्याचा तिथला अनुभव मला नाही. भारतात हे होऊ शकतं आणि व्हावं असं मात्र मला मनापासून वाटतं.

नोटबंदीवर इतरत्र बरीच चर्चा/ वादावादी झाली आहे त्यामुळे परत इथे चर्चा करण्याचा अजिबात हेतू नाही. मध्यमवर्गीयांना वाचाळ म्हणण्याचा उद्देश मात्र मला समजला नाही.

अनरँडम's picture

19 Jan 2017 - 10:40 pm | अनरँडम

आणि तुम्ही केली असे माझ्या प्रतिसादात ध्वनितही होत नाही. मध्यमवर्गिय आंजावर चर्चा करतात, फेसबुकवर चर्चा करतात म्हणून वाचाळ म्हटले. तुम्हाला पटत नसल्यास सोडून द्या. वाचाळ म्हणजे वाईट असे काही नाही.

अनरँडम's picture

19 Jan 2017 - 10:42 pm | अनरँडम

'लेख रँडमली वाचला का?' हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.

ट्रेड मार्क's picture

19 Jan 2017 - 11:47 pm | ट्रेड मार्क

हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.

मान्य आणि क्षमस्व

पण एकूण तुमचा प्रतिसाद सकारात्मक वाटला नाही. एक तर प्रतिसादाचे हेडिंग "संत्रे सफरचंद तुलना" हेच म्हणताय की मी तुलना केली पण चुकीची केली. पुढे "पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो." हे पण विषयाला सोडूनच आहे कारण लेखाचा उद्देश हा नाहीये.

बाकी वाचाळ असण्याबाबत - मी हे लिहिलेलं सगळं स्वतः केलंय आणि मग सांगितलंय. बाकी कोणी वाचाळ आहेत आणि का आहेत हे तुम्ही का सांगताय ते कळलं नाही.

असो. पण सकारात्मक चर्चा करायची असेल तर नक्कीच करूया पण कृपया ती विषयाला धरून असावी.

अनरँडम's picture

20 Jan 2017 - 12:30 am | अनरँडम

तुम्ही तुलना केलेली नाही. तुमच्या लेखाचा उद्देश्य तुम्ही प्रथमच स्पष्ट केला आहे. त्या उद्देश्याला पूरक असेच माझे मत आहे की अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरणे हे निश्चितच (व्यक्तिगत अनुभव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीही) फायदेशीर आहे (आयडेंटिटी चोरीचा मुद्दा सोडल्यास). पण कोणी (तुम्ही नाही) या फायद्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात (ढोबळपणे कारण काही लोकांना क्रेडिट कार्ड वापरणे भारतातही फायदेशीर ठरू शकेल.) सामान्यीकरण केल्यास ती तुलना चुकीची ठरेल.

तुम्ही तुमच्या लेखाच्या शेवटी पूर्ण अर्थव्यवस्थेसंदर्भात काही विधान केले आहे ("अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच.") त्यासंदर्भात माझा प्रतिसाद पाहील्यास तो विषयाशी संबंधित कदाचित वाटू शकेल.

चित्रगुप्त's picture

20 Jan 2017 - 1:38 am | चित्रगुप्त

माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख.
तुमच्या वडिलांना वर्षभर अमेरिकेत रहाता आले, ते कोणत्या व्हिसावर ? व्हिजिटर्स व्हिसावर एका वेळी सहा महिनेच रहाता येते ना? आम्ही दर वर्षी भारतातून अमेरिकेत येतो, आणि सहा महिन्यांच्या आत परततो, म्हणून विचारत आहे. तुमचे स्वतःचे/वडिलांचे ग्रीन कार्ड झालेले आहे किंवा कसे ?

ट्रेड मार्क's picture

20 Jan 2017 - 4:29 am | ट्रेड मार्क

लेखाचा उद्देश माहिती देण्याचा आहे आणि कोणाला करता आला तर उपयोग करता येईल हा फायदा आहेच. फारसं काही न करता एका व्यक्तीचं विमानाचं तिकीट फुकट मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे.

माझे वडील टुरिस्ट विसावरच आले होते. पण ६ महिने पूर्ण व्हायच्या आधी अजून ६ महिने वास्तव्य वाढवण्यासाठी अर्ज करता येतो. याची फी साधारणतः $३५० प्रतिव्यक्ती असते. पण अडचणीच्या वेळेला असा अर्ज करून मुक्काम वाढवता येतो. जाण्यायेणाचा त्रास आणि विमानाची तिकिटं यापेक्षा कमी पैसे लागतात. पण हे एकसारखं करू नये आणि सलग एका वर्षापेक्षा जास्त टुरिस्ट विसावर राहू नये असं म्हणतात. पुढच्यावेळेला येताना इमिग्रेशन ऑफिसर अडवू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2017 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक शंका.

अमेरिकेन आयकराच्या अधिकारात येऊ नये यासाठी (काही विशिष्ट कारणे सोडता) अमेरिकेत एका वर्षात १८० दिवसांपेक्षा कमी वास्तव्य असणे आवश्यक आहे असे वाचले होते. हे फार महत्वाचे आहे, कारण अमेरिकेत आयकर ठरवताना करदात्याचे सर्व जगातले (ग्लोबल) उत्पन्न (सर्व जगातले उत्पन्न, मग त्या उत्पन्नाचा अमेरिकेशी काही संबंध असो वा नसो, किंवा अमेरिकेतले उत्पन्न शून्य असले तरी) करपात्र धरले जाते.

मात्र हे १८० दिवस सद्य वर्षातले नसून त्यांचे मोजमाप खालीलप्रमाणे होते :

१८० = सद्य वर्षातील वास्तव्याचे दिवस + (गेल्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ३) + (गेल्या वर्षांच्या अगोदरच्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ६)

या नियमांने, अमेरिकेन आयकराच्या अधिकारात अडकायचे नसल्यास, भेटीची पहिली २-४ वर्षे सोडली तर, इतर प्रत्येक वर्षात १२० दिवसांपेक्षा (अंदाजे ४ महिने) अमेरिकेत वास्तव्य शक्य होत नाही असा समज होता.

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेत करपात्र न होता, तेथे ६ महिने (वास्तव्याचे पहिले वर्ष सोडून) किंवा १२ महिने (कोणत्याही वर्षात) वास्तव्य कसे शक्य होते हे जरा समजावून सांगू शकाल का ?

माहितीसाठी आगावू धन्यवाद !

डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ते वर्क व्हिसावर येणाऱ्यांसाठी. आयकराच्या कक्षेत टुरिस्ट येत नाहीत. सरकारच्या दृष्टीने टुरिस्टने येथे काम करणे नियमाविरुद्ध आहे. जर का त्या प्रवाश्याचे त्याच्या मूळ देशात उत्पन्न असेल तर त्याने तिथे आयकर भरणे आवश्यक असते. त्यामुळे तो अमेरीकेत आयकराच्या कचाट्यात सापडत नाही. मुळात आयकर भरण्यासाठी SSN/ ITIN असणे आवश्यक आहे, तो असेल तर आयकर खाते तुमच्यावर नजर ठेवू शकते. टुरिस्ट व्हिसावर SSN मिळत नाही, ITIN बहुतेक मिळेल पण तो तुम्हाला मेन टॅक्सपेयर ठरवत नाही.

माझ्यामते टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्यांना प्रत्येक वर्षात ६ महिने कुठल्याही अडचणीशिवाय राहता येते. मी माझ्या वडिलांच्या वेळेला CPA (CA) ला विचारलं होतं आणि त्यांनी मला वडिलांचा ITIN काढून माझ्या टॅक्स रिटर्न मध्ये एक dependent म्हणून दाखवता येईल असं सांगितलं.

त्यादृष्टीने बघता माझे वडील इथे Dependent म्हणून येतात. त्यांचा व्हिसा काढताना मी त्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा आणि इतर जे काही खर्च लागतील ते मी करणार आहे असं शपथपत्र देतो. त्यामुळे ते इथे राहिले त्याचा खर्च मला माझ्या आयकरात दाखवता येतो. पण त्यात सुद्धा एक अट आहे. जर का हा खर्च दाखवायचा असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचे आरोग्यविम्याचे डिटेल्स देणे बंधनकारक आहे. जर आरोग्यविमा नसेल तर त्यासाठी पेनल्टी भरायला लागते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2017 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

डिपेंडंट्सना ही सवलत आहे हे माहीत नव्हते.

सामान्य वाचक's picture

20 Jan 2017 - 9:17 am | सामान्य वाचक

क्रेडिट कार्ड चांगले आहे.

मी hdfc आणि icici अशी 2(फुकट) कार्डे वापरते

परवाच hdfc चे पॉईंट्स redeem करून 4000 रु जमा करून घेतले

आणखी एकदा मुंबई ते frankfurt विमानाचे तिकीट घेतले

Payback चे पण बरेच पॉईंट जमले आहेत

याशिवाय पण कार्डचे फायदे असतात

जसे की icici कार्ड ने महिन्यातल्या एका मंगळवारी bigbasket वर 400 रु(किंवा25%) डिस्काउंट मिळतो
बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये, दुकानात, वेबसाइट्स वर डिस्काउंट असतो.

अजया's picture

20 Jan 2017 - 10:03 am | अजया

मी पण HDFC regalia क्रेडिट कार्ड वापरते. शक्यतो परदेशाची तिकिटं काढायला माझा या कार्डाचा वापर होतो. त्यामुळे बरेच points जमतात. त्या कार्डाबरोबर मिळणारा विमानतळावरचा लाउंज अॅक्सेस अनेक देशात मिळतो. ते फिचर फार उपयोगी पडते. आत्ता जुनमध्ये ट्रॅव्हल कंपनीने झुरिक एअरपोर्टवर एक सफरचंद आणि एक ज्युस पॅक देऊन आणुन टाकलं फ्लाइटच्या चार तास आधी. त्यात माझं आणि नवर्याचे वेगळे फ्लाइट होते. पण थँक्स टु क्रेडिटकार्ड लाउंज फॅसिलिटी ,मला व्यवस्थित स्विस पाहुणचार मिळाला! वेळही मस्त गेला.
क्रेकाचे आॅनलाइन शाॅपिंग कुपन आणि इतर फायदे मी अजुन फारसे वापरलेले नाहीत.

मराठी कथालेखक's picture

20 Jan 2017 - 11:33 am | मराठी कथालेखक

क्रेडिट कार्डचा (डेबिट कार्डच्या तुलनेने) अप्रत्यक्ष फायदा हा की महिन्याचा खर्च विचारात घेवून तुम्हाला सेंविग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची गरज नाहि.
माझा पगार महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी होतो, मग त्यातली काही रक्कम खात्यात ठेवून (ही रक्कम : थोडी कॅश काढता यावी , पण यातली बरीचशी केवळ अधून मधून मार्केट खाली जाईल तसे काही शेअर्स /mutual funds व units खरेदी करता यावेत व ठरलेल्या दिवशी mutual fund व्हावी SIP यासाठी असते ) बरीचशी रक्कम liquid fund मध्ये गुंतवतो. (शक्यतो tata floater fund , दुसरा एखादा चांगला सुचवल्यास आभारी असेन). दहा तारखेला माझा गृहकर्जाचा हप्ता जायचा असतो. त्या आधी दोन तीन दिवस जर शेअर मार्केट वर असेल असेल तर काही शेअर्स विकून टाकतो (profit booking) ..हे असे शेअर्स असतात ज्यात मला खूप दीर्घकाळ गुंतवणूक्क करायची नसते, किंवा काही mutual funds मधून गुंतवणूक कमी करायची असे ठरवलेले असेल आणि त्यांचा NAV थोडा वधारला असेल तर काही units विकून टाकतो. आणि यातलं काही शक्य नसेल तर liquid funds काही units विकून गृहकर्जाच्या हप्त्याची सोय करतो.
दहा तारखेलाच माझ्या पहिल्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट येते (Tata SBI) माझा जास्तीत जास्त खर्च याच कार्डावरुन असतो त्यामुळे बिलाचा आकडा मोठा असतो. पुर्वी मी स्टेटमेंट आले की लगेच एक-दोन दिवसात पैसे भरुन टाकायचो (डोक्याला टेन्शन नको ही भावना). पण पैसे भरण्याची मुदत ३० तारखेपर्यंत असते तेव्हा आता मी २५-२६ तारखेला पैसे भरतो. त्यावेळीही वरील प्रमाणेच शेअर्स, म्युच्युअल फंड वा लिक्विड फंड मधून पैसे काढतो.
सेविंग मध्ये ४% दसादशे व्याज मिळते पण लिक्विड फंड मधला परतावा साधारण वार्षिक सुमारे ८.५% च्या आसपास असतो. सोयीसाठी ८% धरला तरी ८-४=४ % चा फायदा मिळतो. कल्पना करा की क्रेडीट कार्ड असल्यामुळे तुम्ही वर्षभरात सरासरी १०,००० रु सेविंग अकाउंट मध्ये न ठेवता लिक्विड फंड मध्ये ठेवलेत तरी तुम्ही सरळ ४०० रुचा नफा कमावला आहे.

ट्रेड मार्क's picture

20 Jan 2017 - 9:06 pm | ट्रेड मार्क

पैसे मिळवण्याचा हा पण एक मार्ग आहे. याला बरंच प्लॅनिंग आणि सतत निरीक्षण आवश्यक आहे. तुम्ही नेटाने हे करताय याचे खरंच कौतुक आहे.

एकेकाळी मी सुद्धा शेअर मार्केटमध्ये सक्रिय होतो. नुसते शेअर्सच नाही तर derivatives, commodity, forex (फार नाही) यात पण सहभाग होता. पण आता फारसा उत्साह राहिला नाही. जे शेअर्स आहेत ते आहेत व derivatives, commodity तर पूर्णपणे बंद झालंय.

चिनार's picture

20 Jan 2017 - 12:48 pm | चिनार

ट्रेडमार्क भाऊ..
कारच्या आणि मोबाईलच्या तुलनेसाठी जश्या वेबसाईट्स आहेत तश्या क्रेडिट कार्डासाठी आहेत का?
असल्यास कळवावे..

ट्रेड मार्क's picture

20 Jan 2017 - 8:59 pm | ट्रेड मार्क

अमेरिकेतल्या कार्ड्ससाठी

https://www.creditkarma.com/credit-cards/search-cc : इथे तुम्हाला रजिस्टर करून तुमचा क्रेडिट स्कोअर (जो फारसा अचूक नसतो) कळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळतील आणि त्याचे फायदे सांगितले जातात.

http://www.creditcards.com/
http://www.comparecards.com/

भारतातल्या कार्ड्ससाठी

https://www.bankbazaar.com/credit-card.html
http://www.paisabazaar.com/credit-card/