मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 1:59 am | मोदक
उद्या त्या डॉक्टरने 500 ची नोट घेतली नाही किंवा उपचार केले नाहीत की समजून जा =))
9 Nov 2016 - 1:03 am | मोदक
>>>>उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे :)
हे विनोदाने लिहिले असले तरी पटले नाही.
9 Nov 2016 - 1:16 am | आनंदी गोपाळ
तुम्हाला पटावे म्हणून लिहिलेले नाही.
9 Nov 2016 - 1:23 am | सुबोध खरे
गोपाळराव
आपण कितीही पैसे आपल्या खात्यात भरु शकता.जुन्या नोटा असतील तरीही 31 डिसेंबर पर्यंत.
पण ते पैसे तिजोरीत जाणार असतील तर 31 डिसेंबर नंतर त्याची किंमत 0.
मी हा प्रश्न माझ्या कर सल्लागाराला आणि आयकर आयुक्त मित्राला विचारुन घेतला आहे.
माझ्या कडे येणाऱ्या रुग्णानी कोणत्याही नोटा दिल्यास त्या मी घेणार आहे.
चिंता नाही.
10 Nov 2016 - 10:39 am | असंका
+१...
पण आता नाही त्यांची इच्छा तर राहू द्या ना.... हे सगळं त्यांना माहित नाही असं थोडंच आहे!
9 Nov 2016 - 1:13 am | पिलीयन रायडर
एवढ्या मोठ्या निर्णयाचा युटर्न येईल असं वाटत नाही. सगळे लोक उद्या जाऊन नोटा बदलणार, बँका २ दिवस बंद आहेत. पुष्कळ यंत्रणा कामाला लागली आहे.
निर्णय का रद्द होइल?
9 Nov 2016 - 1:20 am | मोदक
तू चष्मा घातलेला आहेस का? नाही. म्हणून तू लॉजिकल विचार करू शकतेस.
चष्मे घातले असले की असे काहीतरी लॉजिक सोडून बोलावे लागते
9 Nov 2016 - 1:31 am | आनंदी गोपाळ
मोदक सुबोध बघ.
सुबोध, चष्मा बघ. ;)
आपण कमळ बघू.
सोनोग्राफी चार्जेस, व सर्जिकल चार्जेस, माझ्या सीए ने व्यवहार बंद सांगितले आहेत.
9 Nov 2016 - 1:35 am | मोदक
चेक आणि बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत डॉक्टर, 100% पांढरे व्यवहार करणाऱ्यांना काहीही फरक पडणार नाहीये. (आणि रोजच्या दिनक्रमात बदल करायची गरज भासणार नाही)
असो, आपण सुज्ञ आहातच
9 Nov 2016 - 1:37 am | सुबोध खरे
+100
9 Nov 2016 - 1:39 am | आनंदी गोपाळ
हसू का?
9 Nov 2016 - 1:46 am | सुबोध खरे
आपल्या सीए आणि माझ्या सीए च्या सल्ल्यातील फरक लक्षात घ्या आणिमग ठरवा.
9 Nov 2016 - 8:36 am | वगिश
हसू नका , चांगल्या CA चा सल्ला घ्या .
9 Nov 2016 - 8:47 am | नाखु
असताना वाचलेली म्हण आठवली.
"खाई त्याला खवखवे"
शिलकीतला हातखर्ची नाखु
9 Nov 2016 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll
"खरे" असलेल्या डॉकनी घाबरण्याचे कारण नाही वरील सच्च्या डॉकनी सांगीतले आहेच.
झक्कास.
9 Nov 2016 - 1:59 am | पिलीयन रायडर
व्यवहार का बंद? तुम्हीच म्हणालात ना..
मग अगदी निर्देशही ३१ डिसेंबर पर्यंत पैसे परत देऊ शकता असे असतील तर सगळं बंदच करण्याचे कारण कळाले नाही. तुम्ही १००च्या नोटा / चेक / कार्ड / नेटबँकींग वगैरे थ्रु पण पैसे घेऊच शकता ना?
माझा गोंधळ उडतोय की नक्की तुमचा आक्षेप काय आहे? तुम्हाला काय नाही पटलं ह्या निर्णयातलं?
9 Nov 2016 - 4:37 am | आनंदी गोपाळ
आक्षेप काहीच नाही.
माझ्याकडे मोठी ट्रँजॅक्शन्स असतात. त्यासाठी बँकेचे दरवाजे झिजवायची माझी इच्छा नाही.
http://www.misalpav.com/comment/897289#comment-897289 हे आधीच म्हटलो आहे.
9 Nov 2016 - 7:11 am | अजया
हजारवर रकमेचे चेक घेता येतील की.कॅश डिपाॅझिटची कटकट पण नको.व्यवहार का बंद ठेवायचे?बँक डिटेल्स देऊन आॅनलाइन पैसे घेता येतील.
9 Nov 2016 - 11:25 am | कोकणी
अधिक्रुत फी घेत असाल तर DD स्वरुपातही घेउ शकता, account payee.
रोख रक्कम बाळगायची कट्कट नाही.
9 Nov 2016 - 1:30 am | मोदक
नवीन सिक्युरिटी आणि डिझाईनच्या 500 च्या नोटा पुढील एक दोन वर्षात पुन्हा बाजारात येण्याची अंधुक शक्यता आहे, त्यावेळी यु टर्न ची हाकाटी होईलच.
9 Nov 2016 - 1:33 am | आनंदी गोपाळ
.
9 Nov 2016 - 2:06 am | मोदक
सांभाळून ठेवा, इन्कम टॅक्स वाले देवळांची पण काढून नेतात. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसे
9 Nov 2016 - 11:24 am | सस्नेह
५०० च्या नोटा तर नवीन रुपात उद्याच बाजारत येऊ घातल्या आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/ban-on-rs-...
9 Nov 2016 - 1:31 am | प्रसाद गोडबोले
मी व्यक्तिगत पातळीवर ह्या आतातायी आणि एककल्ली निर्णयाचा निषेध करतो.
अवांतर : आता बिटकोईन आणि अन्य क्रीप्टो करन्सीजचा सिरीयसली विचार करावा लागणार !
9 Nov 2016 - 11:17 am | नाखु
बरे?
9 Nov 2016 - 1:35 am | सुबोध खरे
खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी, गुंठामंत्री यांच्या कडे असलेली कोट्यावधी रुपयांची रोकड त्यांना ना वापरता येईल ना बँकेत भरता येईल.धंद्यात मिळालेली रोकड एकदम बँकेत भरली तर आयकर वाले पुढच्या वर्षी शेंडी धरणार? मागील वर्षी एवढा नफा आणि आता का नाही?
मायावती यांची "माया" आता रद्दी झाली आणि
मुलायम सिंह यांचे "कठीण" झालंय.
निवडणूकीसाठी टेंपो ट्रक मध्ये भरुन ठेवलेला पैसा कोणत्यातरी देवस्थान च्या पेटीत टाकायला लागेल.
सरकार अशा देवस्थानांच्या CCTV वर नजर ठेवून असेल.
एकंदर मोदी साहेबांनी बर्याच लोकांची गोची करून ठेवली आहे.
9 Nov 2016 - 8:38 am | वगिश
Hyat bil n denare doctor pan add kara
9 Nov 2016 - 12:26 pm | सुबोध खरे
चूक आहे
बिल न देता हि जर पैसे बँकेत भरले आणि त्यावर कर भरला तर ते पैसे काळे होत नाहीत.
9 Nov 2016 - 8:11 pm | वगिश
Tumhala nahi ho pratisad, te dusre Doctor ka tension madhe aale asawe tyach reason.
9 Nov 2016 - 11:37 am | पुंबा
+1
9 Nov 2016 - 11:42 am | धोणी
+२०
9 Nov 2016 - 1:45 am | साहना
पॅनिक करण्याची गरज नाही. ५० दिवस आहेत आपल्याकडे पैसे विविध मार्गानी सफेद करण्याचा. बहुतेक छोट्या मंडळींनी आधीच इनकम डिस्कोजर स्कीम वापरून पैसा पांढरा केला होता. मोदींचा निर्णय स्तुत्य आहेच पण त्याच वेळी बिल्डर माफिया आणि राजकीय पक्षा वर त्यांचा हा हल्ला आहे. ह्याचे पडसाद हळू हळू उमटतील.
ज्यांचे नेट वर्थ १०० कोटी पेक्षा जास्त आहे त्यांच्या ओळखी सुद्धा मोठ्या असतात. त्यांच्यासाठी ५० दिवस म्हणजे खूप झाले अर्थांत मोदींच्या निर्णयामुळे सर्वच पैसा सफेद करता येणार नाही अगदी ३०% जरी पैसा सेव झाला तरी चालेल.
एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुंतवणूकदाराकडून खालील माहिती प्राप्त झाली.
१. स्मर्फ ट्रांसकशन्स करणार्यांना आता भारतांत प्रचंड मागणी होईल. काही चतुर मंडळींनी जनधन वगैरे स्कीमच्या निमित्ताने हजारो खाती उघडून ठेवली आहेत त्यांना आता विंडफाल प्राप्ती होईल.
२. मध्यरात्री पर्यंतच्या वेळांत कॅसिनो मध्ये आपली कॅश जमा केली आणि कॅसिनो चालक ओळखीचा असेल तर सुमारे ७०% रक्कम सफेद करता येते. सफेद रकमेवर टॅक्स भरायचा नको असेल तर चिप्स तुम्ही मकाऊ मध्ये जाऊन वटवू शकता. तिथे तुम्हाला डॉलर मिळू शकतात. कॅसिनो मध्ये जुन्या डेट वर ट्रांसकशन्स करता अली तर आणखीन चांगले.
३. देवळे आणि मठ हा सुद्धा एक मार्ग आहे. इथे रोख रकमेत मध्ये भरपूर देणग्या येतात तुम्ही एकतर ५००,१००० च्या नोटा देऊन ७०% रक्कम चिल्लर मध्ये घेऊ शकता किंवा. देणगी म्हणून देऊन भविष्यांत कधी तो पैसे देवळा/मठा कडून वसूल करवू शकता.
४. कॉ-ऑप बॅंक्स.
येथील मार्ग टेक्निकल असल्याने मला समजले नाहीत.
तात्पर्य:
मोदी ह्यांच्या ह्या निर्णयाने सर्वच काळ्या पैश्या वाल्याना हादरा बसला असला तरी मोठे क्रायसिस झाले नाही. मोठे शार्क ह्यातून सुद्धा सहज मार्ग काढतील. मोदींच्या निर्णयाचा एक चांगला परिणाम आहे तो म्हणजे एकूणच काळा पैसा जमा करून ठेवण्याच्या प्रथेतील रिस्क फार वाढली आहे. त्यामुळे कला पैसा कमी ठेवण्याची सवय अनेक लोक जास्त प्रमाणात लावून घेतील. मोदी ह्यांनी असेच निर्णय वेळोवेळी आणि पुन्हा पुन्हा घेतले तर चांगले. सर्व ५००, १००० रुपयांच्या नोटा दर दोन वर्षांनी रद्द बॅटल करण्याचा निर्णय घेतला तर आणखीन चांगला.
कला बाजार आता बिटकॉईन्स, अमेरिकन डॉलर, जास्त रोबस्ट हवाला सिस्टम इत्यादींवर आता जास्त गुंतवणूक करेल.
13 Nov 2016 - 5:03 pm | प्रदीप
भारतात कुठे कॅसिनो आहेत? आणि जे काही आहेत त्यांचा मकाऊच्या कॅसिनोजशी संबंध काय?
9 Nov 2016 - 1:45 am | वरुण मोहिते
पण तरी डोन्ट वरी बी हैप्पी ...कारण सेट टॉप बॉक्स प्रमाणे हा निर्णय पुढे ढकलला जाणार आहे कारण मार्केट क्रॅश होईल. सो आरामसे आधीच 50 दिवस आहेत .
9 Nov 2016 - 2:13 am | एस
इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या तातडीने घेतला याचा अर्थ याची तयारी बऱ्याच आधीपासून सुरू होती. सर्व पोस्ट आणि बँक शाखांमध्ये पुरेशा प्रमाणात १०० वा कमी डिनॉमिनेशन च्या नोटांच्या स्वरूपात रोखता उपलब्ध करून देणे लॉजिस्टिकली अवघड नाही जाणार? सामान्य माणसांना नाही म्हटले तरी त्रास आहेच. माझ्याकडे आत्ता जी थोडी रोख रक्कम आहे ती पाचशेच्या नोटांमध्ये आहे. दोन दिवस तरी मला त्या नोटा बदलून मिळणार नाही. सर्वत्र कॅशलेस व्यवहार अजून प्रचलित नाहीत. तेव्हा आकस्मित आणि अत्यावश्यक खर्चाची तरतूद मी कशी करावी हे कृपया सांगावे.
9 Nov 2016 - 4:05 am | साहना
नोटा बदलून देण्यात येणार नाहीत. फक्त ४००० रुपये पर्यंत बदलून मिळतील. त्यानंतर आपल्याला ते डिपॉझिट करून नंतर काढावे लागतील.
9 Nov 2016 - 8:35 am | अजया
हो.पण ते चार हजार घेण्यासाठी अख्खे गाव बँकेत लाइन लावून उभे असणार आहे.कामधंदा बघावा की लाइन लावायला जावे हा प्रश्न आहेच.
9 Nov 2016 - 2:20 am | स्वाती दिनेश
वाचते आहे.
स्वाती
9 Nov 2016 - 8:15 am | आतिवास
ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, त्यांच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही असं वाटतं. त्यांनी आधीच वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केलेली असते.
त्रास होणार तो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि छोट्या उद्योजकांना.
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.
बरंच लिहिता येईल. पण असो.
9 Nov 2016 - 9:15 am | साती
उगाच टीकेसाठी टीका करता हां तुम्ही अतिवास!
तुम्हाला ना आमच्या मोदीकाकांचं काही म्हंजे काही कौतुकच नाही!
:)
एक मल्ल्या सुटले तरी चालतील, हजारो छोटे उद्योजक अडकले पाहिजेत.
त्या भरवशावरच परवा गरीब बिचार्या अंबानींना करात सवलत मिळाली.
9 Nov 2016 - 2:05 pm | मोदक
अदानी र्हायले.
11 Nov 2016 - 2:30 pm | अन्नू
एक मल्ल्या सुटले तरी चालतील, हजारो छोटे उद्योजक अडकले पाहिजेत. >>>
=)) =)) =))
9 Nov 2016 - 11:30 am | कोकणी
>>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.<<
विजयभाउ सुटलेले वाटतात कारण ते देशाबाहेर आहेत. तुम्ही पण तिकडे जा, नोटा बदलायचा त्रास नाही.
जर अधिक्रुत उत्पन्न असेल, तर ओळख द्यायला लाज कसली?
9 Nov 2016 - 12:24 pm | आतिवास
तरी म्हटलं अजून व्यक्तिगत हल्ला कसा नाही झाला!
ओके सरजी. आपल्या आदेशाचे पालन केले जाईल. :-)
11 Nov 2016 - 6:43 pm | सुबोध खरे
जरासा त्रास झाला तरीही हाकाटी पिटायची कि श्री विजय मल्ल्याना कसं सोडलं?
कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण न करता गोष्टी केल्या तर अंगलट येणायची शक्यता असते.
थोडासा सुद्धा धीर धरण्याची लोकांची तयारी नाही हे पाहून कीव करावीशी वाटते
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/ed-seizes-v...
11 Nov 2016 - 6:57 pm | मोदक
इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर.. मत व्यक्त करायचे आणि त्यावर प्रतिसाद आले की फक्त स्मायली टाकायची व सोडून द्यायचे.
11 Nov 2016 - 7:04 pm | अन्नू
आजकाल मिपावर त्या (पहिल्याच्या) स्माईलीपण दिसत नाहित. कि त्याच्यावर पण सर्जिकल स्ट्राईक झालाय ;)
9 Nov 2016 - 12:30 pm | सुबोध खरे
आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी कोणतेही पॅन कार्ड आधार याची गरज नाही.
9 Nov 2016 - 12:48 pm | शाम भागवत
फक्त के वाय सी नॉर्मस् पूर्ण केलेले असले पाहिजेत.
9 Nov 2016 - 12:50 pm | आतिवास
कारण ती माहिती बँक खात्याशी आधीच जोडली गेली आहे.
9 Nov 2016 - 1:13 pm | मोदक
सहमत. पण मग सरकारने सुरूवात नक्की कशी करणे अपेक्षित आहे..?
9 Nov 2016 - 5:10 pm | आतिवास
केवायसीबद्दल (अपडेट दर दोन वर्षांनी करावा लागतो आणि ऑनलाईन करता येत नाही एवढं सोडलं तर) काही तक्रार नाही. केवायसी नसेल किंवा अद्ययावत नसेल तर पॅन /आधार लागेल - इतकंच म्हणायचं होतं.
9 Nov 2016 - 6:19 pm | मोदक
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.
यात काय विनोद आहे..? विजय मल्ल्याला परत आणण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि नोटांना चलनातून हद्दपार करणे आर्थिक संरचनेमधला बदल आहे. या दोन्ही गोष्टी (आणि अशा अनेक गोष्टी) समांतररीत्या सुरू आहेत.
एक संपवून मगच दुसरी सुरू करावी असे आपले मत आहे का..? किंवा विजय मल्ल्याला परत आणा, मग, राजा आहे, मग १९८४ च्या हत्याकांडाचे निकाल लावा, मग बाबरी मशीद, दाऊद, मग या सगळ्या क्रमाने जेंव्हा कधी पैशाची गोष्ट येईल तेंव्हा चलने बदला असे काही..?
9 Nov 2016 - 6:34 pm | आतिवास
:-)
9 Nov 2016 - 6:49 pm | मोदक
अपेक्षित प्रतिसाद. असो.
:-)
11 Nov 2016 - 8:57 pm | अर्धवटराव
नेमका विनोद काय झाला हे मलाही कळलं नाहि. मिपावर लॉजीकल प्रतिसादांची आब राखुन असणार्या व्यक्तींपैकी आपण एक आहात. त्या प्रतिमेला तडा जातोय. (तरिही आम्हि आपले पंखे असुच).
13 Nov 2016 - 8:17 am | मोदक
अर्धवटराव, हा प्रतिसाद मला उद्देशून आहे का?
13 Nov 2016 - 1:27 pm | अर्धवटराव
प्रतिसाद अतिवास मॅडमसाठी होता.
नोटा गायबल्याचा परिणाम हो.
10 Nov 2016 - 12:18 am | विकास
हा खरच प्रश्न आहे.. कृपया गैरसमज नको..
आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी कोणतेही पॅन कार्ड आधार याची गरज नाही.
म्हणजे नक्की कसे करायचे? (कसे समजणार की कुणाचे पैसे आहेत ते?) कारण या वाक्याचा अर्थ असा होतो की दुसर्याच्या खात्यात आपले पैसे भरायला अथवा आपल्या खात्यात दुसर्यांचे पैसे भरायला पॅनकार्ड लागणार का?
10 Nov 2016 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वतःच्या खात्यात नकद पैसे टाकायला स्वतःच्या फोटो-ओळखपत्राची गरज आहे.
दुसर्याच्या खात्यात नकद पैसे टाकायला, "तशी परवानगी दिल्याचे व पैसे जमा करणार्याचे नाव असलेले" खातेधारकाचे पत्र जरूर आहे. पैसे जमा करणार्याने आपले फोटो-ओळखपत्र बरोबर नेणे जरूर आहे.
हे नियम केवळ या योजनेसाठी नाहीत... स्थायी नियम आहेत.
10 Nov 2016 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणकोणते फोटो-ओळखपत्र मान्य आहे ते पाहण्यासाठी याच लेखावरील इतरत्र दिलेल्या पैसे बदलण्याच्या फॉर्मवर दिलेली यादी पहावी.
9 Nov 2016 - 8:25 am | चौकटराजा
नोटा बदलण्याचा प्रयोग माझ्या माहितीप्रमाणे श्रीलंका या देशात झाला होता. त्यावेळी तेथील बँका तीन दिवस बम्द होत्या. आपल्या खंडप्राय देशात हे शक्य नाही असा मतप्रवाह होता. व त्याला आपल्या खरे म्हणजे आपल्या कडे त्यावेळेस तसे करणे निरनिराळी कार्ड नसल्याने शक्य नव्हते. रस्त्यात मोठा दुभाजक आणला की वहातुकीत नैसर्गिक अशी शिस्त तयार होते त्यासाठी रत्यावर वहाने नीट हाका अशा पाट्या लावून काही साधत नाही .याचे पुरेपुर भान मोदी सरकारला आहे. त्यामूळे श्रीमंत वा गरीब दोन्ही स्तरांवर भ्रष्ट लोकाना नागवे करायचे असेल तर त्याना बॅकेशी संलग्न करणे हा कॉमन सेन्स ही मनमोहन सिम्ग यानी वापरला नाही. मोदींच्या या हल्ल्याने बर्याचे स्तारावरचे लोक अस्वस्थ होणार आहेत. त्यात व्यावसायिक फार मोठ्या प्रमाणात अडकणार आहेत. नोकरदार वर्ग फारसा कर बुडवीत नाही ( तो अगदीच बुडवीत नाही असे नाही). हळू हळू सर्व प्रकारच्या व्यवहाराना बॅन्काच्या कक्षेत आणले जाईल पण त्यासाठी भारत देशावर कॉंग्रेस संस्कृतीचे राज्य येता कामा नये हा यातील राजकीय मतितार्थ आहे. एकाने सिस्टेमिक बदल हवे आहेत असे म्हटले आहे पण दोन हजारावरील सर्व व्यवहार सक्तीने चेकद्वारे करणे हे बोकिल यानी सुचविलेले पाउल आल्यास देशाचा पुरता नजारा बदलून जाईल. वडा पाव विकणारा देखील आयकराच्या पंखाखाली आलेला दिसेल कदाचित .
9 Nov 2016 - 9:50 am | llपुण्याचे पेशवेll
वडा पाव विकणारा देखील आयकराच्या पंखाखाली आलेला दिसेल कदाचित .
काळा पैसा डिक्लेअर करायच्या योजने दरम्यान आयकर विभागाने मुंबईमध्ये रस्त्यावरच्या डोसा, वडेवाल्यांवर धाडी घालून एकेकाकडून १-१ कोटीची कॅश जप्त केली होती.
9 Nov 2016 - 12:58 pm | अनिरुद्ध.वैद्य
मुळात काळ्या पैशाऐवजी, जे २७% पॅरॅलल ईकॉनॉमी आहे, तीवर बराच आळा पडेल.
11 Nov 2016 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयकराच्या दृष्टीने एकदा आवक वैध स्त्रोतातून आलेली असली की, "ती करपात्र आहे का ?", "तिच्यावर किती कर बसेल ?" आणि "तो कर योग्य मुदतीत भरला आहे की नाही ?" हे प्रश्न महत्वाचे असतात. तेथे स्त्रोताचा प्रकार (उदा. वडापावचा धंदा की तेलशुद्धीकरणाचा) गैरलागू असतो.
आवक अवैध स्त्रोतातून आलेली असली तर तो गुन्हा असतो व त्याची पडताळणी वेगळ्या पद्धतीने होते.
विकसित देशांत छोटे व मध्यम आकाराच्या व्यवसायधंद्यांचा वित्तव्यवस्थेत, करव्यवस्थेत व एकंदर अर्थप्रणालीत मोठा सहभाग असतो. भारतात तो कमी असला तरी लक्षणीय आहे. आपल्याकडे पैश्यांच्या व्यवहारांत बॅकेचा उपयोग अटळ झाल्यावर त्याची खरी व्याप्ती ध्यानात येईल.
9 Nov 2016 - 8:27 am | अभिजीत अवलिया
जे लोक हजारो, लाखो कोटींचे घपले करतात (उदा. सध्या जेलची हवा खात असलेले आर्मस्ट्रॉंग साहेब) ते सगळा काळा पैसा नोटांच्या स्वरूपात साठवून ठेवण्या एवढे मूर्ख नाहीत. त्यांचा बराचसा पैसा हा जमीन, शेती, शहरातील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड, फ्लॅट्स, बंगले, देश विदेशात स्थापन केलेल्या बनावट कंपन्या आणि त्याचे भाग भांडवल, शेअर मार्केट, सोने अशा ठिकाणी अगोदरच गुंतलेला आहे.
काही लाख किंवा कोटीचे घपले करणारे सरकारी अधिकारी फार फार तर थोडे अडचणीत सापडतील. पण देशातील एकूण काळ्या पैशाचा विचार करता ह्या सरकारी अधिकाऱ्यांकडे असलेली रक्कम ही तशी किरकोळ असेल. एकूणच ह्या निर्णयाने सोशल मीडियावर जेवढी 'हवा' निर्माण झाली आहे की आता जणू काही सर्व काळा पैसा बाहेर पडलाच तसे काहीही होणार नाहीये.
तसेच 500/2000 च्या नव्या नोटा चलनात आणण्याचे कारण समजले नाही. 100 ची नोट ही देशातील जास्तीत जास्त मोठी न असायला हवी होती.
असो पण ह्या निर्णयाने जो काही नगण्य का असेना काळा पैसा नष्ट होईल त्याचे समाधान म्हणून ह्या निर्णयाचे स्वागत.
9 Nov 2016 - 8:59 am | नाखु
बेहिशोबी व ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांना आता बेनामी संपत्ती (जमीन-शेती-बंगले-बनावट कंपन्यात) ठेवता येणार नाही. प्र्त्येक ठिकाणी पॅनकार्ड आणि ओळ्ख (आधारकार्ड ) अनिवार्य असल्याने मोठ्ठी गोची होणार.
बदल हे हळू हळू होतात.देशातून देवीचा रोग्,पोलिओ जायला किमान ४०-५० वर्षे लागली ही कीड कमी करायला किमान ५-१० वर्षे (मोदींच्या दोन पंचवार्षीक खेळ्या) तर नक्कीच लागतील.
बड्या धेंडावर सक्त वसुली संचनालय आणि आयकर दोघेही लक्ष ठेऊन आहेत्च अगदी लग्न समारंभांवरही.फक्त सगळे कायम जनतेला जाहीर आणि खुले केले जात नाही.
सच्च्या आणि कर्तव्यदक्ष अधिकार्यांनाही हुरुप आणि धाडस येतच असेल ना अश्या निर्णयांनी.
मुढेंच्या पाठीशी ठाम राहिले फडणवीस तसेच या काही सक्तवसुली संचाल्कांच्या पाठीशी मोदी ठाम पणे उभे आहेत.
परिणामांसाठी थोडा धीर धरायला काय हरकत आहे?
9 Nov 2016 - 9:13 am | मोदक
>>>>परिणामांसाठी थोडा धीर धरायला काय हरकत आहे?
१००% सहमत.
9 Nov 2016 - 6:09 pm | पाटीलभाऊ
+१११
9 Nov 2016 - 11:20 am | सस्नेह
अभिजित अवलिया.
ब्लॅकवाले नोटा बाळगत नाहीत, त्याऐवजी स्थावर मालमत्ता शेअर्स, सोने, परकीय चलन / परकीय बॅंकातून गुंतवणूक याचे प्रमाण जादा आहे. सो या निर्णयाने सुमारे 25 टक्के इतकाच काळा पैसा बाद होईल. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांचे फारसे काही बिघडणार नाही.
तरीही या धाडसी निर्णयाने त्यांना जरब नक्कीच बसेल.
9 Nov 2016 - 12:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
अन तेही नसे थोडके?
9 Nov 2016 - 6:17 pm | आनंद
ब्लॅकने घेतलेल्या जमिनी,स्थावर मालमत्ता यांच्या किंमती कमी होतिल, काळा पैसा नस्ल्या मुळे ज्यांच्या कडे व्हाईट पैसा आहे तेच मालमत्ता घेउ शकतिल गिर्हाइक नस्ल्या मुळे भाव कमी होतिल.
10 Nov 2016 - 2:57 pm | नाखु
आग्नेय स्वाहा
9 Nov 2016 - 8:31 am | प्रीत-मोहर
हां मलाही हाच डाऊट आहे.मोठ्या प्रमाणात काळा पैसा असलेले, किंवा देशाबाहेर काळा पैसा असेलेले लोक त्यांच काय?
9 Nov 2016 - 10:54 am | चौकटराजा
काळा पैसा तसा पूर्ण काळा नसतोच कधी. तो खर्च केला की निर्निराळे एक्सपेन्डीचर कर त्यावर भरावेच लागतात. पण आपल्या देशाचे बजेट जे आयकर , फी, व वेगवेगळे वस्तू सेवा कर या सर्वांवर आधारित आहे. म्हणून आय वरील कर ही महत्वाचा आहे . भारताच्या लोकसंख्यंच्या तुलनेत तो अर्त्यंत कमी डोकी भरतात असे वास्तव आहे. पाच लाखाची गाडी घेतली आहे पण आयकर रिटर्नच भरत नाही अशी ही माणसे आपल्याकडे आहेत.
9 Nov 2016 - 9:39 am | संदीप डांगे
Just wait and watch ...!
9 Nov 2016 - 10:05 am | मदनबाण
मोदींचा मास्टर स्ट्रोक... :)
काळा पैसा असणार्यांची झोप मोदींनी उडवली आहेच, पण त्याच बरोबर विरोधी पक्षांना देखील चांगलाच इंगा दाखवला आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे डी-कंपनी आणि पाकिस्तानची पण चांगलीच ठासली आहे,कारण मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आपल्या देशात आणुन अर्थव्यवस्था कमकुवत करण्याच्या त्यांच्या उध्योगांची चांगली पुंगी वाजली आहे ! :)
येत्या काही दिवसात १०० रुं च्या नोटांचा तुटवडा भासु शकेल असे सध्या तरी वाटत असुन, सोन्याची झळाळी वाढेल असे दिसते. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अब कि बार नही, हर बार मोदी सरकार... ;)
9 Nov 2016 - 11:06 am | आनन्दा
हम्म बरे झाले हा मुद्दा काढलात. काळा पैसा हा एकमेव ड्रायव्हर यामागे नाहे. तर बनावट नोटांची उभी झालेली यंत्रणा देखील यामागे आहे.
9 Nov 2016 - 10:22 am | एस
सोने चार हजारांनी वाढले.
9 Nov 2016 - 11:10 am | आनन्दा
त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. भविष्यात ते ४०००० वर पोचले तरी आश्चर्य नाही
9 Nov 2016 - 11:06 am | झेन
पण परीणाम बघण्यासाठी थोडं थांबाव लागेल बहुधा. एक बाळबोध शंका नोएडा असो किंवा बाकी मोठ्या शहरात जागेच्या भावांचा जो फुगा अवास्तव फुगला आहे तो एकदम फुटून अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याचे काही चान्सेस आहेत का ? अमेरीके प्रमाणे.
9 Nov 2016 - 11:06 am | मार्मिक गोडसे
खरोखरच धाडसी निर्णय घेतलाय. आता सोन्यावरही संक्रांत येईल असे वाटते कारण, सुवर्ण योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळाला होता. धातू रुपात सोने खरेदी करणे अवघड करायला हवे, जसे आयात शुल्क अधुन मधून मोठ्या प्रमाणात कमी जास्त करणे ज्यामुळे सोन्याच्या तस्करीला आळा बसू शकेल.
चार हजारांनी नाही, ४% नी. आणि तेही अमेरेकेतील निवड्णूक निकालांमुळे, नोटांच्या बंदीमुळे नव्हे.
9 Nov 2016 - 11:07 am | पैसा
राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी आय एस आय यांची पंचाईत आहे. बाकी धंदेवाल्यांनी /काळा पैसेवाल्यांनी घरात क्याश भरून ठेवायचे दिवस कधीच गेले. बहुतेकांनी सोने, शेअर्स आणि जमीनजुमल्यात काळे पैसे गुंतवलेले आहेत.
9 Nov 2016 - 11:22 am | नाखु
अजूनही सरकारी (खाबू) बाबू यांच्या घरी रोकड असतेच असते.
बरेचदा लाखो रुपये सापडल्याचे येते पेपरात
9 Nov 2016 - 11:23 am | पैसा
म्हणजे ते लोक दहा वर्षे पैसे खात आले असतील तर फार तर एखाद्या महिन्याची कमाई घरात सापडत असेल.
9 Nov 2016 - 11:27 am | संदीप डांगे
बरोबर!
9 Nov 2016 - 11:24 am | संदीप डांगे
सहमत!
9 Nov 2016 - 11:24 am | जयंत कुलकर्णी
ज्या समाजवादी विचारसरणीने आपल्या मनावर गेले सत्तर वर्से राज्य केले आहे त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते किती जणांच्या पचनी पडेल याची माझ्या मनात शंकाच आहे. पण आपले मत नोंदवावे याच एका विचाराने हे मत लिहिण्याचे धाडस करीत आहे. काही गृहितके मी जमेस धरली आहेत ती अचूक नाहीत याची मला जाणीव आहे पण मुलभूत विचार केला तर कदाचित आपल्याला माझं म्हणणे पटावे.
काळा पैसा: ज्यावर सरकारला कुठल्याही प्रकारचा कर भरला जात नाही तो. म्हणजे तो पैसा वाईट असतो असे नाही. काळा पैसा बाजारात खर्च होतच असतो. त्यातील सरकारचा हिस्सा सरकारकडे जात नाही एवढाच काय तो फरक. पण जर हा पैसा देशाबाहेर गेला नाही तर या पैशात या ना त्या प्रकारे व्यवहार होतच असतात व तो खाली झिरपतच असतो. यातील सरकारचा हिस्सा मिळविण्याचे प्रयत्न अपूरे पडले म्हणून या नोटा रद्द करण्याची वेळ आली. ४५ % टक्के पैसे भरुन हा हिस्सा बर्याच लोकांनी पोहोचता केला नाहीए याची कारणे शोधायला हवीत. कदाचित ५ % भरुन लोकांनी सरकारची तिजोरी भरलीही असती. आता हा काळा पैसा जर बाजारपेठेतून काढला गेला तर जवळजवळ ५० % संपत्ती आपण फाडून टाकलीए असा त्याचा अर्थ होतो. हा पैसा आता बाजारपेठेत येणार नाही त्याचे दुष्परिणाम लवकरच आपल्याला पहावयास मिळतील. अगदी साधे उदाहरण द्याचे झाल्यास, समजा एका घरात महिन्याला ४०,००० येत असतील त्यातील २०००० रुपायाच्या नोटा तुम्ही फाडून टाकल्या तर काय होईल ? ते कुटुंब २०००० कमी खर्च करणार म्हणजे त्या २०,००० वर अवलंबून असलेल्या लोकांना ते मिळणार नाहीत. उदा. ते कुटुंब हॉटेलमधे जाणार नाही, कपडे खरेदी करणार नाहीत, गाडी घेणार नाही..इ.इ.इ..... तेच आता आपल्या अर्थव्यवस्थेत होणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे नोकर्या कमी होतील व अत्यंत दुष्ट अशा चक्रात आपण अडकू अशी मला भिती वाटते. मला तर वाटते काळा पैसा जर देशातच राहिला असता तर त्याचे दुष्परिणाम एवढे नाहीत जेवढे या उचललेल्या पावलांनी होईल... (काळा पैसा परदेशी जाणार नाही यासाठी अधिक कडक पावले उचलली असती तर बरे झाले असते)
अर्थात तज्ञांचे मत वाचण्यास आवडेल.
9 Nov 2016 - 11:35 am | संदीप डांगे
जर कोणी असे पैसे फाडून टाकणार असेल किंवा खर्च न करता तसेच ठेवणार असेल तर फरक पडेल. मात्र बदलून घेतले, खर्च केले तर पैसा बाजारात खेळेल. नोटांची ओळख मिटली पण किंमत, मूल्य नव्हे!
अर्थात मला काय म्हणायचं ते नीट मांडता येत नाहीये! क्षमस्व.
9 Nov 2016 - 11:38 am | जयंत कुलकर्णी
डांगे साहेब, कुठलिही संपत्ती ही बाजारात येनकेनप्रकारेण खेळतेच पण ती नष्ट केली तर ती शक्यताच नष्ट होते. नाही का ?