मोसाद - भाग १२

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 11:23 pm

मोसाद - भाग ११

मोसाद - भाग १२

१५ नोव्हेंबर १९७१. वेळ – रात्री साधारण १० वाजता. भूमध्य समुद्रात वादळ चालू होतं. मुसळधार पाउस पडत होता आणि एक इझरेली मिसाईल बोट अगदी धीम्या गतीने सीरियन किनाऱ्याच्या दिशेने चालली होती. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून बोट सीरियन हद्दीत शिरली. त्याच्याआधी बोटीवरचे सगळे दिवे मालवले गेले. सीरियाच्या लाताकिया बंदराला वळसा घालून बोट पुढे गेली आणि उत्तरेकडे वळली. तुर्कस्तानच्या हद्दीपासून जवळच असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्याजवळ ती थांबवण्यात आली आणि त्यातून काही रबरी मचवे समुद्रात टाकण्यात आले आणि त्या बोटीवरच्या कमांडोनी त्यांत उड्या मारल्या आणि त्यांची तपासणी केली. हवा वादळी असल्यामुळे ही तपासणी अत्यावश्यक होती. ती पूर्ण झाल्यावर बोटीवरच्या एका केबिनचा दरवाजा उघडला आणि तीन माणसं बाहेर आली. तिघांच्याही अंगावर सामान्य माणसांप्रमाणे कपडे होते. संध्याकाळी जेव्हा ही बोट इझराईलच्या हैफा बंदरातून निघाली होती, तेव्हापासून हे तिघेही या खोलीत बसले होते आणि आत्ताच बाहेर निघाले होते. आत्ताही त्यांनी आपले चेहरे अरब माणसांप्रमाणे एका मोठ्या आणि चौकडीच्या रुमालाने झाकले होते. आपली ओळख कुणालाही कळू नये हा त्यांचा प्रयत्न होता हे तर उघड होतं.

तिघांच्याही जवळ अत्यंत खास प्रकारे बनवलेल्या पिशव्या होत्या. त्यात छोटे ट्रान्समीटर्स, नकली पासपोर्ट, पैसे आणि रिव्हॉल्व्हर्स होती. मचवे त्यांना समुद्रकिनाऱ्याजवळ सोडून निघून गेले. शेवटचा टप्पा या तिघाही जणांनी पोहून पार केला. ते जेव्हा सीरियन भूमीवर पोचले, तेव्हा सूर्योदय व्हायला जेमतेम एक तास बाकी होता. किनाऱ्यावर एक माणूस त्यांची वाट पाहात उभा होता. या माणसाचं खरं नाव होतं योनाथन आणि या ऑपरेशनसाठीचं त्याचं नाव होतं प्रॉस्पर. त्याने त्यांच्यासाठी कपडे आणले होते. ते बदलून या लोकांनी आपले जुने, ओले कपडे वाळूत पुरले आणि ते त्याच्या गाडीकडे गेले. ही गाडीही किनाऱ्याजवळच्या झाडीत लपवलेली होती. गाडीमध्ये अजून एक मोसाद एजंट त्यांची वाट पाहात थांबला होता. चौघेही गाडीत बसले आणि एक शब्दही न बोलता ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि काही तासांनी ते सीरियाची राजधानी दमास्कसला पोचले.

चौघांनीही चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक-इन केलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर चौघेही दमास्कसमध्ये फेरफटका मारायला बाहेर पडले. चौघेही मोसाद एजंट्स आणि त्याच्याआधी इझराईलच्या नौदलाचे कमांडो होते. त्यांच्यावर जी कामगिरी सोपवण्यात आली होती, ती अत्यंत जोखमीची होती. त्यांच्या हेर आणि कमांडो अशा दोन्हीही कौशल्यांची परीक्षा घेणारी. या एजंट्समध्ये एक होता डेव्हिड मोलाद. इझराईलच्या अत्यंत घातकी एजंट्सपैकी एक.

या कामगिरीबद्दल त्यांना प्रत्यक्ष मोसाद संचालक झ्वी झमीरकडून विचारणा झाली होती. काही आठवड्यांपूर्वी मोसादच्या मिद्राशा या प्रशिक्षण केंद्रात झमीर, सीझरिआ या मोसादच्या ऑपरेशन्स विभागाचा प्रमुख माईक हरारी आणि हे चार एजंट्स भेटले होते. चौघेही प्रशिक्षित कमांडो होतेच पण त्याव्यतिरिक्त त्यांच्यात अजून एक साधर्म्य होतं. चौघांचाही जन्म उत्तर आफ्रिकेत झाला होता. उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को, अल्जीरिया आणि ट्युनिशिया या देशांमध्ये अरेबिक भाषेबरोबरच फ्रेंच ही सर्वमान्य भाषा होती आणि हे चौघेही अरेबिक आणि फ्रेंचमध्ये निष्णात होते. सीरियासुद्धा पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंच अंमलाखालीच होता. झमीरने त्यांना या कामगिरीबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली.

दोन वर्षांपूर्वी सीरियाहून इझराईलला एक संदेश आला होता. तो दमास्कसमधल्या ज्यू समाजाच्या प्रमुखाने पाठवला होता. १९६५ मध्ये इझरेली हेर एली कोहेनला फासावर लटकवल्यानंतर सीरियामधल्या ज्यूंचा छळ वाढला होता. १९६७ च्या ६ दिवसांच्या अरब-इझराईल युद्धानंतर त्यात अजून वाढ झाली होती. १९७० मध्ये सीरियामध्ये राज्यक्रांती होऊन हाफेझ अल असद सत्तेवर आला होता (सध्याचा सीरियन राष्ट्रप्रमुख बाशर अल असदचा पिता). १९६७ मध्ये इझराईलच्या ताब्यात गेलेला गोलान टेकड्यांचा प्रदेश असदला काही केल्या परत मिळवायचा होता आणि त्याच्या काही सल्लागारांच्या मतानुसार सीरियामधल्या ज्यू लोकांचा छळ करून इझराईलला भडकवणं हा एक प्रभावी उपाय होता. त्यामुळे ज्यूंना मारहाण करणं, त्यांच्याविरुद्ध घडलेले गुन्हे न नोंदवणं, त्यांच्या शिक्षणसंस्था आणि इतर संस्था बंद करणं, त्यांच्या वसाहतींमधला वीज आणि पाणीपुरवठा बंद करणं, ज्यू प्रवाशांना भर रात्री बसमधून किंवा ट्रेनमधून धक्काबुक्की करून उतरवणं आणि सर्वात वाईट म्हणजे लहान ज्यू मुलामुलींना पळवून नेऊन जबरदस्तीने धर्मांतर करणं आणि स्त्रियांवर आणि मुलींवर बलात्कार करणं असे प्रकार राजरोसपणे, सरकारी आशीर्वादाने सुरु झाले होते. त्या संदेशात हेच म्हटलं होतं – ज्यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि युद्धादरम्यान झालेल्या नाझी अत्याचारांबद्दल फक्त वाचलंय त्यांना ते अत्याचार कसे झाले, हे दाखवून द्यायचा सीरियन सरकारने चंग बांधलेला आहे.

सीरियामधल्या ज्यूंनी या अत्याचारांचा प्रतिकार करण्याऐवजी इझराईलमध्ये पळून जायचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली. जेवढ्या जास्त ज्यूंवर आपण सीरियामध्ये अत्याचार करू, तेवढा दबाव आपल्याला इझराईलवर टाकता येईल हे सीरियन सरकारला चांगलंच माहित होतं. त्यामुळे त्यांनी या पळून जाणाऱ्या ज्यूंवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. ज्यूंना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ज्या संघटना होत्या, त्यांत सीरियन गुप्तचर संघटना मुखबारतचे अंडरकव्हर एजंट्स होते. त्यांनी दिलेल्या खबरींमुळे सीरियन पोलिसांना अनेक ज्यूंना पळून जाण्याआधीच पकडता आलं.

या ज्यूंनी या सगळ्या प्रकारामध्ये एक मोठी चूक केली होती. पळून गेलेले जवळपास सगळे ज्यू हे तरुण पुरुष होते. मागे राहिलेल्या लोकांमध्ये वृद्ध आणि स्त्रियांचा, विशेषतः मुलींचा समावेश होता.

झमीर या इझरेली कमांडोंना हे सांगत असताना त्यांचे चेहरे निर्विकार होते. पण त्यांच्या मनात खळबळ माजली होती, हे उघड होतं. या मुलींपैकी काहींनी लेबेनॉनमार्गे इझराईलपर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी त्यासाठी आपली मालमत्ता विकून पैसे उभे केले होते. त्यांना लेबेनॉनपर्यंत घेऊन येणाऱ्या अरब स्मगलर्सपैकी सगळेच पैशाला जागणारे नव्हते. काहींनी पैसे घेऊन दगाबाजी केली होती, आणि या जवळपास १५ मुलींना सीरियन लष्कराच्या ताब्यात दिलं होतं. नंतर त्यांचं काय झालं ते कुणालाही माहित नव्हतं. उरलेल्या जवळपास २० मुली कशाबश्या जीव वाचवून लेबेनॉनमध्ये आल्या होत्या. लेबेनॉनची राजधानी बैरूटमध्ये असलेल्या मोसाद हस्तकांनी या अरब स्मगलर्सची नजर चुकवून लेबेनॉनमध्ये आलेल्या या ज्यू मुलींशी संपर्क साधला होता, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि नंतर त्यांना सुखरूप इझराईलमध्ये पोचवलं होतं.

१९७० च्या हिवाळ्यातल्या एका रात्री बैरूटच्या उत्तरेला असलेल्या ज्युनिएह नावाच्या बंदरात एक इझरेली युद्धनौका शिरली. तिथे कोळ्यांच्या वेशात असलेल्या मोसाद एजंट्सनी १२ सीरियन ज्यू मुलींना या युद्धनौकेच्या कप्तानाच्या हवाली केलं आणि नौका परत इझराईलकडे फिरली.

जेव्हा ही युद्धनौका इझराईलमध्ये पोचली तेव्हा कप्तान आणि बोटीवरच्या इतर नौसैनिकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान गोल्डा मायर तिथे हजर होत्या. पंतप्रधानांना या मुलींनी आपली कर्मकहाणी ऐकवली आणि ते ऐकून त्यांनी ताबडतोब मोसाद संचालक झ्वी झमीरला आदेश दिला – उरलेल्या सीरियन ज्यू मुलींना इझराईलमध्ये आणा.

“ही कामगिरी तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे,” झमीरने मुद्द्याची गोष्ट सांगितली. हे ऐकल्यावर तिथे एकच गदारोळ माजला. या चारही एजंट्सना ही कामगिरी म्हणजे वेळ वाया घालवणं वाटत होतं. एका एजंटने तर आम्ही आमचा जीव धोक्यात घालावा एवढं हे काम महत्वाचं नाही असंही म्हटलं. माईक हरारी सुद्धा या एजंट्सना सीरियामध्ये पाठवायला तयार नव्हता. एकतर एली कोहेनला सीरियामध्ये फासावर लटकून फार वर्षे झाली नव्हती. दुसरं म्हणजे या कामगिरीला किती वेळ लागेल त्याची काहीही शाश्वती नव्हती.

झमीर शांत होता. त्याच्याकडे अधिकार असल्यामुळे या सगळ्यांना जावं लागलं असतं हे तर निश्चित होतं, पण या लोकांनी आपल्या मनाविरुद्ध आणि आपल्या कामगिरीबद्दल नकारात्मक विचार मनात ठेवून जावं अशी झमीरची इच्छा नव्हती. त्याने त्यांना फक्त एका गोष्टीची आठवण करून दिली. जिथे कुठे ज्यू धर्मीयांवर अन्याय आणि अत्याचार होत असतील, तिथे त्यांचं त्यापासून संरक्षण करणं हे मोसादच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक आहे.

या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं – स्मिचा. या हिब्रू शब्दाचा अर्थ होतो पांघरूण किंवा शाल. आणि या गटाला मोसादमध्ये दिलेलं सांकेतिक नाव होतं कोसा नोस्ट्रा.

हे चौघेही मोसादच्या सर्वोत्कृष्ट एजंट्सपैकी होते, तरीही शत्रूच्या प्रदेशात, कुठल्याही राजनैतिक संरक्षणाशिवाय जाताना मनात जी धाकधूक असते ती त्यांच्याही मनात होती. चौघेही दमास्कसमध्ये फिरत असताना हिब्रूचा एक शब्दही उच्चारत नव्हते. फ्रेंच किंवा मग अरेबिकमध्ये त्यांचं संभाषण चाललं होतं. त्यांना सर्वात पहिल्यांदा सीरियन गुप्तचर संघटना मुखबारतचे लोक त्यांच्या मागावर नाहीत याची खात्री करून घ्यायची होती. ते दमास्कसमध्ये आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक घटना घडली. या चौघांपैकी दोघे दमास्कसच्या बाजारपेठेत फिरत होते आणि फिरता फिरता ते एका सराफी दुकानात शिरले. दोघेही फ्रेंचमध्ये बोलत होते. तेव्हा तिथला एक सेल्समन त्यांच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात त्यांना म्हणाला, “तुम्ही बनाई अमेनु (हिब्रू भाषेत याचा अर्थ होतो आपले लोक) पैकी आहात, बरोबर ना?”

दोघेही एजंट्स नखशिखांत हादरले. जर एका दुकानातला सेल्समन त्यांना इतक्या सहजपणे ओळखू शकत असेल, तर सीरियन गुप्तचर संघटना नक्कीच ओळखू शकेल. त्या सेल्समनच्या प्रश्नाचं काहीही उत्तर न देता दोघेही तिथून सटकले आणि गर्दीत मिसळले.

पण यामुळे एक गोष्ट घडली. दमास्कसमधल्या ज्यू समाजाच्या लोकांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये, आपल्याला सीरियामधून बाहेर पडून इझराईलला जायची संधी आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

या दुकानातल्या घटनेनंतर साधारण ४-५ दिवसांनी प्रॉस्परला एक गुप्त संदेश मिळाला. हा संदेश दमास्कसमधूनच आला होता : उद्या संध्याकाळी, काही ज्यू मुली एका छोट्या ट्रकमध्ये तुझ्या हॉटेलपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी थांबलेल्या असतील.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या एजंट्सना खरोखरच एक ट्रक एका अंधाऱ्या गल्लीत पार्क केलेला दिसला. त्याची मागची बाजू कॅनव्हासने पूर्णपणे झाकलेली होती. सर्व ४ एजंट्सनी त्यांच्या हॉटेलमधून चेक-आउट केलं होतं आणि बाहेर पडल्यावर वेषांतरही केलं होतं. आता चौघांनीही अरब माणसांप्रमाणे पेहराव केला होता. त्यांच्यामधल्या दोघांनी ट्रकपाशी जाऊन हलकेच कॅनव्हास कापड उचललं आणि आत पाहिलं. सांगितल्याप्रमाणे तिथे वय वर्षे १५ ते २० या वयोगटातल्या अनेक मुली आणि एक मुलगा होता. या एजंट्सना असंही समजलं होतं की सीरियन सरकारला अशा प्रकारे ज्यू मुलींना बाहेर काढलं जातंय याची कुणकुण लागलेली आहे आणि त्यामुळे हमरस्त्यांवर आणि इतर छोट्या रस्त्यांवरही नाकाबंदी लागू करून वाहनांची तपासणी होते आहे. जर पोलिसांनी अडवलं तर कौटुंबिक सहल किंवा मग गावाकडच्या शाळेतल्या मुली शहर पाहायला आलेल्या आहेत असं सांगायचं त्यांनी ठरवलं. सुदैवाने या मुलींपैकी बऱ्याच जणींना अरेबिक बोलता येत होती.

मोसादच्या सीरियन नेटवर्कपैकी एक जण खरोखरचा ट्रक ड्रायव्हर होता आणि आत्ता तोच ट्रक चालवत होता. त्यांनी दमास्कसपासून उत्तरेकडचा रस्ता पकडला. या रस्त्यावर पुढे तार्तास हे बंदर होतं. तार्तासच्या जवळ असलेल्या एका निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्याजवळ ट्रक थांबला. या किनाऱ्यावर एक छोटी झोपडी होती. या झोपडीमध्ये सगळे थांबले. सीरियन सागरी हद्दीच्या पलीकडे एक इझरेली युद्धनौका येऊन थांबली होती. प्रॉस्परने या नौकेवर रेडिओने संदेश पाठवला. हा संदेश मिळाल्यावर या नौकेतून काही रबरी मचवे पाण्यात उतरवले गेले आणि त्यांनी अंधारात सीरियन किनाऱ्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. या मचव्यांमध्ये इझरेली नौदलाचे कमांडो होते.

हे मचवे सीरियन हद्दीत जेमतेम शिरले असतील-नसतील, अचानक गोळीबार सुरु झाला. प्रॉस्पर आणि इतर एजंट्सना आधी हा गोळीबार त्यांच्यावर होतोय असं वाटलं आणि त्यांनी त्या झोपडीचा आश्रय घेतला. पण लवकरच या गोळ्या त्यांच्या दिशेने येत नसल्याचं त्यांना समजलं. नक्की काय झालं होतं ते कळायला मार्ग नव्हता. पण युद्धनौकेच्या कमांडरने सगळ्या मचव्यांना परत बोलावलं आणि प्रॉस्परला अजून उत्तरेकडे असलेल्या एका दुसऱ्या किनाऱ्याजवळ यायला सांगितलं. त्याने ट्रकमधून उतरलेल्या सगळ्यांना परत ट्रकमध्ये बसायला सांगितलं आणि ट्रक त्या दुसऱ्या किनाऱ्याच्या दिशेने नेला.

सुदैवाने या वेळी असा कोणताही प्रश्न आला नाही. पण नेमका निसर्ग समोर उभा ठाकला. हे लोक जेव्हा त्या दुसऱ्या किनाऱ्याजवळ पोचले, तेव्हा भरती सुरु झाली होती. युद्धनौकेपासून निघालेले मचवे किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊ शकत नव्हते. त्यात धोका होता. त्यामुळे एजंट्स आणि या मुलींना त्या मचव्यांकडे जावं लागणार होतं. त्यांनी तार्तासजवळच्या किनाऱ्यावर ओहोटीची वेळ बघून प्रयत्न करायचं ठरवलं होतं, पण आता भरती सुरु झाली होती, आणि ती संपून परत ओहोटीसाठी एजंट्स थांबले असते, तर कदाचित पहाटेच्या संधिप्रकाशात सीरियन गस्तीदलांच्या दृष्टीस पडण्याचा धोका होता. त्यामुळे पाण्यातून तसंच जावं लागणार होतं. त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स नव्हती आणि या मुलींपैकी काहींनाच पोहता येत होतं.

पण आता दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे भरतीच्या लाटा अंगावर आणि समुद्राचं खारट पाणी नाकातोंडात घेत या एजंट्सनी आणि मुलींनी त्या मचव्यांकडे जायला सुरुवात केली आणि कसेबसे ते गारठलेल्या अवस्थेत मचव्यांपाशी पोचले. या मचव्यांनी त्यांना युद्धनौकेपाशी पोचवलं आणि मग मचव्यांमधले कमांडो, एजंट्स आणि या मुली अशा सगळ्यांना घेऊन ही युद्धनौका इझराईलला पोचली.

इकडे मोसादने सीरियन मुखबारतमधल्या आपल्या अंडरकव्हर एजंट्सकडून या अचानक झालेल्या गोळीबाराबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला, पण काहीच समजलं नाही. शेवटी, काही सीरियन सैनिकांनी समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यावर खात्री करून घेण्यासाठी गोळीबार केला असावा असा निष्कर्ष काढून मोसादने त्याचा नाद सोडून दिला.
______________________________________________________________________________

पुढच्या वेळी कोसा नॉस्ट्राने वेगळी पद्धत वापरायचं ठरवलं. ते जॉर्डनची राजधानी अम्मानहून दमास्कसमध्ये विमानाने आले. चौघाही एजंट्सच्या पासपोर्टवर ते फ्रेंच नागरिक असल्याचा आणि त्यांच्या इतर कागदपत्रांमध्ये ते पुरातत्वशास्त्राचे विद्यार्थी असून सीरियामध्ये अभ्यास आणि उत्खनन यासाठी आलेले आहेत असा उल्लेख होता. त्यांच्या सामानात पॅरिस, रोम, व्हिएन्ना आणि जॉर्डन इथल्या स्थानिक रेल्वे आणि बस तिकिटांचा आणि तिथल्या रेस्टॉरंट बिलांचा समावेश होता. त्यांच्या मनावरचं दडपण यावेळी गेल्या वेळेपेक्षा दुपटीने वाढलेलं होतं. जर मुखबारतला आपल्याबद्दल आणि आपण याआधी सीरिया मध्ये वेगळ्याच नावाने आणि पासपोर्टवर आलो होतो अशी शंका आली तर? पण तसं काही घडलं नाही आणि चौघांनीही गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक इन केलं.

चौघेही दुसऱ्या दिवशी फेरफटका मारायला निघाले असताना त्यांच्या ड्रायव्हरने गाडी नेमकी मार्जेह चौकातून नेली. इथेच १९६५ मध्ये मोसादच्या सर्वश्रेष्ठ हेराला, एली कोहेनला सीरियन सरकारने जाहीररीत्या फाशी दिलं होतं. चौघांसाठीही त्या स्थळाला भेट देण्याचा अनुभव हा प्रचंड क्लेशदायक होता.

त्याच रात्री या एजंट्सपैकी इमॅन्युअल अलॉन उर्फ क्लॉडीला रात्री अचानक जाग आली. एक विचित्र आवाज येत होता. एका क्षणात तो आवाज काय होता, हे त्याला समजलं. कोणीतरी चावीने त्याच्या खोलीचं दार उघडून आत यायचा प्रयत्न करत होतं. संपलं, त्याच्या मनात विचार येऊन गेला. आता एली कोहेननंतर माझी पाळी. पण कसंबसं स्वतःला सावरत त्याने दरवाज्यापाशी जाऊन पीपहोलमधून बाहेर पाहिलं, तर त्याच्याच हॉटेलमध्ये राहात असलेली एक वृद्ध अमेरिकन स्त्री त्याच्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होती. तिने बराच वेळ प्रयत्न करूनसुद्धा तिला दरवाजा उघडणं जमलं नाही, आणि ती शेवटी तिथून निघून गेली. बहुतेक ती चुकीच्या मजल्यावर उतरली असावी किंवा तिचा गोंधळ उडाला असावा.

या अनुभवानंतर एजंट्सनी स्वतःला सावरलं. आपली घबराट उडालेली दिसणं हे जास्त धोकादायक आहे, याची त्यांना जाणीव झाली.

या दुसऱ्या मोहिमेच्या वेळी प्रॉस्पर आणि इतर एजंट्स मुली असलेला ट्रक समुद्रकिनाऱ्याजवळ नेत असताना त्यांना अचानक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. प्रॉस्परने ट्रकमधून उतरून कोंडी का झालीय हे इतर लोकांना विचारलं, तेव्हा त्याला कळलं की अनेक लष्करी वाहनं आणि सैनिक काही कामानिमित्त तिथे आलेले आहेत. त्यांनी त्या क्षणी आपली समुद्रमार्गे जायची योजना गुंडाळली आणि प्रॉस्परने तडकाफडकी लेबेनॉनची राजधानी बैरूटला जायचा निर्णय घेतला. तिथून बैरुट जवळपास १०० किलोमीटर्स तरी दूर होतं. सुदैवाने त्याला सीरिया – लेबेनॉन यांच्या सरहद्दीवर कुणीही हटकलं नाही. बैरुटला पोचल्यावर प्रॉस्परने या ट्रकला जुएनिह या बंदराकडे पिटाळलं आणि बैरुटमधल्या एका एजन्सीकडून एक मध्यम आकाराची बोट भाड्याने घेतली. आपण १५-१६ पाहुण्यांना आपल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त समुद्रात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात आहोत असं त्याने या एजन्सीच्या मालकाला सांगितलं. हे सगळं झाल्यावर मग त्याने आपल्या वरिष्ठांना या बदललेल्या योजनेबद्दल कळवलं. तो ठरलेल्या समुद्रकिनाऱ्यापाशी मुलींना घेऊन पोचला नाही म्हटल्यावर त्यांच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या होत्या. सुदैवाने त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचला आणि त्यांनी त्याला मान्यता दिली.

बैरुटला येताना कोणालाही संशय यायला नको म्हणून प्रॉस्परने या मुलींना सीरियामध्येच ठेवलं होतं आणि तो एकटाच लेबेनॉनमध्ये आला होता. मुलींना घेऊन यायची जबाबदारी क्लॉडीची होती आणि तो दुसऱ्या ट्रकने त्यांना घेऊन येत होता. लेबेनॉन – सीरिया यांच्या सरहद्दीवर एक चेकपोस्ट होतं आणि या चेकपोस्टच्या जवळजवळ १० किलोमीटर्स आधी या मुली दुसऱ्या एका मोसाद एजंटबरोबर उतरल्या. क्लॉडी आणि अजून एक मोसाद एजंट ट्रक घेऊन सरहद्दीवरच्या चेकपोस्टपाशी गेले आणि त्यांनी तिथले सगळे औपचारिक सोपस्कार पूर्ण करून लेबेनॉनमध्ये प्रवेश केला आणि लेबेनॉनमध्ये थोड्या अंतरावर जाऊन त्याने ट्रक झाडीत लपवला.

इकडे या आपापलं सामान घेऊन उतरलेल्या मुलींनी चेकपोस्टपर्यंतचं अंतर तिथल्या शेताडीतून हळूहळू चालत पार केलं. त्यांच्याकडे सामान होतं, त्यांना सवय नव्हती आणि कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांना धीम्या गतीने जाणं भाग होतं. जवळपास ४ तास चालून त्यांनी हे अंतर पार केलं आणि अंधाराच्या आवरणाखाली सीरियाची हद्द पार करून लेबेनॉनमध्ये प्रवेश केला आणि तिथून या सगळ्या मुली क्लॉडीच्या ट्रकपाशी पोचल्या. तिथून प्रॉस्पर त्यांना जुएनिहला घेऊन गेला आणि त्यांना तिथे नवे कपडे देण्यात आले आणि प्रॉस्परच्या मैत्रिणीच्या पाहुण्या म्हणून त्या सगळ्या बोटीवर चढल्या आणि त्यांनी लेबनीज सागरी हद्द पार करून इझराईलच्या हद्दीत प्रवेश केल्यावर एका इझरेली युद्धनौकेने या मुलींना उतरवून घेतलं. प्रॉस्पर ही बोट परत घेऊन लेबेनॉनमध्ये आला आणि त्याने ती परत केली.

दुसऱ्या दिवशी हे एजंट्स ज्या मार्गाने आले होते, त्याच मार्गाने परत सीरियामध्ये गेले – अजून काही मुलींना परत आणण्यासाठी.

एप्रिल १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी या ऑपरेशनची सांगता झाल्याचं जाहीर केलं. सप्टेंबर १९७० ते एप्रिल १९७३ या काळात मोसादने अशा २० मोहिमा काढून अनेक ज्यू तरुण आणि तरुणींना सुरक्षितरीत्या सीरियाच्या बाहेर काढलं. खुद्द मोसादमध्ये हे ऑपरेशन अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे नक्की किती ज्यूंना मोसादने सीरियाच्या बाहेर काढलं, ती संख्या कधीच जाहीर झाली नाही. पण अनौपचारिकरीत्या ही संख्या २०० च्या जवळपास असल्याचं मोसाद अधिकारी सांगत असत.

क्लॉडी उर्फ इमॅन्युअल अलॉनने आपल्या आत्मचरित्रात एक प्रसंग लिहिलेला आहे – तो त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला गेला होता. जेव्हा वधूशी त्याची ओळख करून देण्यात आली, तेव्हा त्याने तिला लगेच ओळखलं. त्याने स्वतः तिला काही वर्षांपूर्वी सीरियामधून बाहेर काढलं होतं.

“कुठून आली आहेस तू? तुझं गाव कुठलं?” त्याने तिला विचारलं.

बिचारी वधू भीतीने पांढरीफटक पडली. आपला भूतकाळ अजून आपला पाठलाग करतोय असं तिला वाटलं असावं.
अलॉनने तिच्याकडे पाहून स्मित केलं, “सीरियामधून आली आहेस ना तू? बोटीतून?”

वधूने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं, आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी आपल्या पतीशी त्याची ओळख करून दिली – “या माणसाने मला सीरियामधून बाहेर काढलं, म्हणून आपलं लग्न होतंय!”

अलॉनच्या मते या कामगिरीसाठी त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पत्करलेल्या सगळ्या धोक्यांचं त्या क्षणी सार्थक झालं होतं!

क्रमशः

संदर्भ
१. Gideon’s Spies - by Gordon Thomas
२. Mossad – the Greatest Missions of the Israeli Secret Service – by Michael Bar-Zohar and Nissim Mishal
३. History of Mossad – by Antonella Colonna Vilaci
४. The Israeli Secret Services – by Frank Clements

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

4 Jul 2016 - 11:55 pm | अत्रन्गि पाउस

आता vachto

अत्रन्गि पाउस's picture

5 Jul 2016 - 12:08 am | अत्रन्गि पाउस

पण सार्थक झालं ....
हा हि भाग अप्रतिम ...

पद्मावति's picture

5 Jul 2016 - 12:14 am | पद्मावति

+१

सतिश गावडे's picture

5 Jul 2016 - 12:33 am | सतिश गावडे

भयानक आहे हे. हे असं काही वाचलं की जाणवतं आपण अतिशय सुरक्षित देशात आहोत.

लेख उत्तम लिहिला आहे हे आता नव्याने लिहायला नकोच. :)

अरिंजय's picture

5 Jul 2016 - 7:45 am | अरिंजय

आपण जरी सुरक्षीत असलो तरी बाहेरच्या हिंदुंचे काय होत असेल याची कल्पना येते. भारतामध्ये मोसाद सारखी संघटना पाहिजे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 9:16 am | कैलासवासी सोन्याबापु

घरचं झालं थोडं प्रकार नको बुआ, पाकिस्तानी किंवा बांग्लादेशी हिंदूंना भरपूर चान्स दिले गेले होते भारतात यायला, त्यांनी आपले इमान पाकिस्तान अन बांग्लादेश चरणी वाहिले, आता त्यांची जबाबदारी घेण्याची भारताला गरज नाही असे वाटते, आत्ता (जसे पाकिस्तानातून) जर कोणी हिंदू परत भारतात यायचे म्हणत असतील तर त्यांची सुद्धा कडक बॅकग्राउंड चेक करून मगच त्यांना भारतात प्रवेश द्यावा, ज्यांना 69 वर्षे अगोदर धर्मापेक्षा भूगोल जास्त प्रिय अन जवळचा वाटला त्यांना आत्ता धार्मिक बंधुभावातून अनुकंपा द्यायची गरज नाही असे भासते मला तरी

सतिश गावडे's picture

5 Jul 2016 - 9:25 am | सतिश गावडे

मला "हिंदू" हा शब्द मुळीच अभिप्रेत नव्हता. आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कधी आपला आणि इतरांचा माणूस म्हणून विचार करुच शकणार नाही का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 3:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

करायला हरकत नाही सगासर किमान आपण भारतीय म्हणून आपले स्वसंरक्षण तरी केलेच पाहिजे, कारण शेजारपाजारची कोवळी कोकरे फट म्हणता काही करतात अन आपलेच सोयरे मरतात :(

सतिश गावडे's picture

5 Jul 2016 - 4:02 pm | सतिश गावडे

स्वसंरक्षण केलेच पाहिजे. ते करणाऱ्या सैनिक बांधवांबद्दल नितांत आदर आहे. मात्र सामान्य नागरीकांनी सैन्य ही केवळ नाईलाज म्हणून स्वीकारलेली व्यवस्था आहे याची जाणिव ठेऊन शेजारी देशांचा घाउकपणे तिरस्कार करु नये अशा मताचा मी आहे.

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 4:08 pm | धनंजय माने

वैयक्तिक मताशी सहमत आहे पण देश भावनेबद्दल विचार करता आपण सज्ज राहायला च हवं. भाई भाई करत कसे अश्व विराजमान केले जातात हे अनेक वेळा अनुभवलं गेलं आहे.

स्मिता_१३'s picture

5 Jul 2016 - 8:20 am | स्मिता_१३

+१

सोनुली's picture

5 Jul 2016 - 1:10 am | सोनुली

खूप छान आहे. आणखी लिहावे

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 6:19 am | कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर! छान मिशन होते हे! आवडले खासे , एकदम हल्लीच आपण सहीसलामत वाचवलेल्या (बलात्कार अधिक शारीरिक विटंबना न होता काढलेल्या) 40 केरळी नर्सेस आठवल्या! आयसिसच्या तावडीतुन

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 1:03 pm | धनंजय माने

जायला बंदी केलेली असताना आमचं आम्ही सेवाकार्यासाठी जातो आहोत म्हणणाऱ्या या नरसोबांबद्दल अज्जीबात सहानुभूति वाटत नाही. या सुद्धा तितक्याच धर्मांधळ्या आहेत.

एक सीरियन शेजारी बसतो. तो सुद्धा तितकाच वैतागला आहे. इस्रायल वाटतो तेवढा सरळ नाहीये.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 3:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

इस्राएल सरळ नाही ह्याच्याशी बाडीस , 70 80 वर्षे अगोदर झालेले अन्याय आजही जे लोकं विकतात त्यांच्याबद्दल काय बोला, बरं ते अत्याचार व्हायची कारणे ही तीच आहेत ज्यामुळे आज मुस्लिमांचा द्वेष होतो, झेनोफोबिया अन इस्लामोफोबिया भावंडच वाटतात

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 4:05 pm | धनंजय माने

सगळ्याच्या मुळाशी 'अर्थशास्त्र आणि राजकारण' हे कारण आहे हे समजलं की लैच चिडचिड होते राव. कारण तोवर सगळं संपलेलं असतंय. ह्या बारक्यांना वाटतंय आपण लै ग्रेट काम करुन मरतोय. धर्म, जात, देश, शिया सुन्नी, हिन्दू-मुस्लिम, खिश्चन काहीतरी नावाची टिकली चिकटवायला द्या. हातात बंदूक द्या आणि करा सुरु.... मागे खफ वर याच साठी बंदूक आणि गोळी चा शोध लावणाराबद्दल निषेध व्यक्त केला होता. भिकारचोट आहे सगळं.

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 4:05 pm | धनंजय माने

सगळ्याच्या मुळाशी 'अर्थशास्त्र आणि राजकारण' हे कारण आहे हे समजलं की लैच चिडचिड होते राव. कारण तोवर सगळं संपलेलं असतंय. ह्या बारक्यांना वाटतंय आपण लै ग्रेट काम करुन मरतोय. धर्म, जात, देश, शिया सुन्नी, हिन्दू-मुस्लिम, खिश्चन काहीतरी नावाची टिकली चिकटवायला द्या. हातात बंदूक द्या आणि करा सुरु.... मागे खफ वर याच साठी बंदूक आणि गोळी चा शोध लावणाराबद्दल निषेध व्यक्त केला होता. भिकारचोट आहे सगळं.

माणूस हाही शेवटी एक प्राणीच आहे, हे का विसरतो आपण? बंदुकी आणि गोळ्या यांच्या शोधाआधी आणि धर्म ही संकल्पना विकसित होण्याआधीही माणूस रक्तपात करत होताच. या गोष्टींमुळे साधनं मिळाली आणि धर्मामुळे अधिष्ठान मिळालं. पण मूळ प्रवृत्ती काही गेली नाही. इतर प्राणी फक्त भुकेसाठी किंवा स्वसंरक्षणासाठी हिंसा करतात. माणूस बुद्धीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक रीत्याही त्याच्यापुढे गेला, आणि उत्कर्षाला सीमा असते, अधःपाताला नसते. त्यातूनच Holocaust सारख्या गोष्टी घडतात.

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 5:57 pm | धनंजय माने

आता जे 'मास' लेव्हल वर सुरु आहे ते तरी टळलं असतं अशी भाबड़ी आशा ओ. दोन माणसांच्या भांडणात किती सामान्य लोक मारले जातात. अकारण!
बाकी खुसपट काढून भांडण करणं हे रक्तात असतंय हे मान्य आहेच.

कविता१९७८'s picture

5 Jul 2016 - 7:16 am | कविता१९७८

मस्तच

प्रचेतस's picture

5 Jul 2016 - 8:41 am | प्रचेतस

जबराट झालाय हा भागही.

नाखु's picture

5 Jul 2016 - 8:51 am | नाखु

फलीत म्हणावे ते हेच "वाचकांच्या" विनंतीला मान देऊन कळफलक धूळ झटकल्याबद्दल अभिनंदन.

आणि "मोसाद" जितकी विलक्षण आहे तितकीच तुमची माहीती आणि कथनशैली लाजवाब..

अखिल मिपा बोका पंखा महास्म्घ पिंचिशाखा

राजाभाउ's picture

5 Jul 2016 - 10:53 am | राजाभाउ

१००% सहमत आहे

देरसे आए दुरूस्त आए बोकाभौ!

थरारक एकदम

बोक्या इज बॅक

सुबोध खरे's picture

5 Jul 2016 - 9:58 am | सुबोध खरे

उत्तम लेख
गुप्तहेर - एक व्याख्या -- स्वदेशाच्या हितासाठी परदेशात गुन्हे करणारा प्रामाणिक गुन्हेगार.

मोदक's picture

5 Jul 2016 - 10:33 am | मोदक

उत्तम लेख... पुभाप्र.

गणामास्तर's picture

5 Jul 2016 - 10:43 am | गणामास्तर

लै भारी. वाट पाहण्याचे सार्थक झाले. पुभाप्र.

भुमी's picture

5 Jul 2016 - 10:48 am | भुमी

पुढचा भाग लवकर येऊ देत.

sohamK's picture

5 Jul 2016 - 10:51 am | sohamK

पु भा प्र ..क्र म श : वाचून बरे वाटले :)

थरारक, अप्रतीम अर्थात नेहमी सारखा.

लोकविनंतीस मान देउन पुढील भाग टाकल्या बद्दल मनापासुन धन्यवाद.

आता पुढचा कधी टाकताय :)

हावरट राजाभाउ

नया है वह's picture

5 Jul 2016 - 12:26 pm | नया है वह

+१

मोहन's picture

5 Jul 2016 - 12:33 pm | मोहन

असेच म्हणतो .

अत्रन्गि पाउस's picture

5 Jul 2016 - 1:06 pm | अत्रन्गि पाउस
स्वीट टॉकर's picture

5 Jul 2016 - 1:06 pm | स्वीट टॉकर

महाकट्ट्याच्या मुहूर्तावर पुन्हा मोसाद सुरू केलंत ते छान केलंत.

इशा१२३'s picture

5 Jul 2016 - 1:14 pm | इशा१२३

नेहेमिप्रमाणेच थरारक.
धन्यवाद आणि पुभाप्र.

इशा१२३'s picture

5 Jul 2016 - 1:14 pm | इशा१२३

नेहेमिप्रमाणेच थरारक.
धन्यवाद आणि पुभाप्र.

शंतनु _०३१'s picture

5 Jul 2016 - 2:47 pm | शंतनु _०३१

.... तेरावा कधी ???
पु ले शु ...!

संत घोडेकर's picture

5 Jul 2016 - 4:06 pm | संत घोडेकर

लेख आवडला

क्रमशः वाचून जिवंत जीव आला.......!!!
सुपरब मालिका......

vikrammadhav's picture

5 Jul 2016 - 6:29 pm | vikrammadhav

लै वाट बघायला लावली !!!
आधी प्रतिसाद वाचले !!! बाकी शांत पणाने वाचतो !!!!

तेरावा कधी ???>>> ;-)

मोहनराव's picture

6 Jul 2016 - 6:16 pm | मोहनराव

सहीच..

पिलीयन रायडर's picture

6 Jul 2016 - 6:50 pm | पिलीयन रायडर

इतका वेळ लावतात का? आँ?

मस्त लिहीलय आणि क्रमशः आहे म्हणुन माफ केलं! ;)

शि बि आय's picture

6 Jul 2016 - 10:35 pm | शि बि आय

भारीच...
खतरा...
अगदी फळफळवणारा...

शि बि आय's picture

6 Jul 2016 - 10:36 pm | शि बि आय

भारीच...
खतरा...
अगदी फळफळवणारा...

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:40 pm | धनंजय माने

बोले तो? म्हणजे आम्हालाही वापरता येईल

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2016 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! बर्‍याच मोठ्या विश्रांतीनंरचे पुनरागमन... पुर्वीइतक्याच ठेसात झाले आहे ! पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2016 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! बर्‍याच मोठ्या विश्रांतीनंतरचे पुनरागमन... पुर्वीइतक्याच ठेसात झाले आहे ! पुभाप्र.

पक्षी's picture

7 Jul 2016 - 3:24 pm | पक्षी

येउद्या अजून...

सस्नेह's picture

7 Jul 2016 - 4:00 pm | सस्नेह

हे वाचल्यानंतर भारत सुदैवी वाटू लागतो.

विनायक प्रभू's picture

7 Jul 2016 - 5:16 pm | विनायक प्रभू

वाचले, आवडले

मी-सौरभ's picture

7 Jul 2016 - 6:04 pm | मी-सौरभ

आधीच्या भागांईतकाच ऊत्कंठा वाढवणारा भाग झालाय हा :)

पु. भा. ल. टा.

@मोदकः ते पीडिएफ चे लक्शात ठेव बरं का

मी-सौरभ's picture

19 Jul 2016 - 5:56 pm | मी-सौरभ

पु. भा. प्र.

जुइ's picture

9 Jul 2016 - 10:48 pm | जुइ

हा भाग ही आवडला.

स्नेहश्री's picture

9 Jul 2016 - 11:04 pm | स्नेहश्री

हा ही भाग मस्तच. पुढचा भाग लवकरात लवकर येवू दे

नरेश माने's picture

14 Jul 2016 - 12:22 pm | नरेश माने

छान झाला आहे हा भाग सुध्दा. पण खुप वाट पाहायला लावलीत. पुढील भाग लवकर येऊद्या.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Jul 2016 - 11:29 pm | माम्लेदारचा पन्खा

नाय म्हनलं नवीन काय !

ज्ञ's picture

14 Jul 2016 - 1:14 pm | ज्ञ

भाग १३ कधी येणार???

सगळे भाग वाचले आहेत व हा देखील वाचला.

मोसादच्या कामगिरींना व तुमच्या लिखाणशैलीला/व्यासंगाला _/\_.

मी पण विचारतोच, तेरावा कधी? :)

सुधीर कांदळकर's picture

16 Jul 2016 - 8:16 am | सुधीर कांदळकर

या ज्यूंनी या सगळ्या प्रकारामध्ये एक मोठी चूक केली होती. पळून गेलेले जवळपास सगळे ज्यू हे तरुण पुरुष होते. मागे राहिलेल्या लोकांमध्ये वृद्ध आणि स्त्रियांचा, विशेषतः मुलींचा समावेश होता.

या गोष्टीचे. याला भ्याडपणा म्हणावे की बेजबाबदारपणा कळत नाही.

urenamashi's picture

17 Jul 2016 - 6:03 pm | urenamashi

Sundar

इनू's picture

25 Jul 2016 - 10:59 pm | इनू

छान लिहिताय.
पु.भा.ल.टा.

पैसा's picture

25 Jul 2016 - 11:04 pm | पैसा

जबरदस्त लिहिलंय

कपिलमुनी's picture

25 Jul 2016 - 11:10 pm | कपिलमुनी

बॅन झाल्याने एक चांगली मालीका अर्धवट राहिली

म्हणजे नेमके काय झाले मुनीवर

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2016 - 7:33 am | पिलीयन रायडर

अहो असं काय.. परत येतीलच ना ते..

हेम's picture

28 Jul 2016 - 4:09 pm | हेम

भाग १३ कधी येणार???

स्नेहश्री's picture

28 Jul 2016 - 5:42 pm | स्नेहश्री

बॅन झालेत ? का बंर? भाग १३ कधी येणार बोका बॅन झाले तर?

मी-सौरभ's picture

28 Jul 2016 - 5:50 pm | मी-सौरभ

म्हणजे आता मोसादचे भवितव्य अधांतरीच आहे.

प्रसाद_१९८२'s picture

28 Jul 2016 - 6:11 pm | प्रसाद_१९८२

बोका यांचे सदस्यत्व तर अ‍ॅक्टिव आहे.
मग बोका बॅन झाले असे का म्हणतायत सर्व?

रुस्तम's picture

28 Jul 2016 - 6:35 pm | रुस्तम

तात्पुरते बॅन झाले होते. चला बरं झालं परत ऍक्टिव्ह झाले. आता लेख लिहिण्यासाठी पण ऍक्टिव्ह व्हावे ही इच्छा..

रघुपती.राज's picture

2 Aug 2016 - 5:44 pm | रघुपती.राज

चन्गले लिहिले आहे

वेदांत's picture

3 Aug 2016 - 12:52 pm | वेदांत

पुलेप्र

मी-सौरभ's picture

11 Aug 2016 - 5:39 pm | मी-सौरभ

पु भा ल टा बोका भाऊ

आनंदयात्री's picture

11 Aug 2016 - 10:54 pm | आनंदयात्री

पुढचा भाग येउद्या बोका ए आझम आता.

Jabberwocky's picture

30 Aug 2016 - 5:18 pm | Jabberwocky

येउद्या अजून..

राजाभाउ's picture

30 Aug 2016 - 6:11 pm | राजाभाउ

बोकोबा, जुनेच भाग पुन्हा पुन्हा किती वेळा वाचणार. टाका आता पुढचा भाग

आनंदयात्री's picture

1 Sep 2016 - 4:31 am | आनंदयात्री

>>बोकोबा, जुनेच भाग पुन्हा पुन्हा किती वेळा वाचणार. टाका आता पुढचा भाग

हा हा हा.
अगदी असेच म्हणतो. मोसादचे नवे भाग येत नाहीत म्हणून आम्ही जुन्या भागांचे पारायणं करत बसतो. पण तरीही जुनेच भाग पुन्हा पुन्हा किती वेळा वाचणार. टाका आता पुढचा भाग!

भटक्य आणि उनाड's picture

30 Aug 2016 - 10:03 pm | भटक्य आणि उनाड

पुढचा भाग येउद्या बोका ए आझम आता...

ओ माझी पीडीएफ पेंडींग आहे हो... लवकर लवकर लिहा की...

पुढचे भाग लवकर टाका हो !!!!

लै वाट बघायला लावताय !!!! गॅप का काय म्हणायचा?????

तेजस आठवले's picture

2 Sep 2016 - 8:45 pm | तेजस आठवले

“या माणसाने मला सीरियामधून बाहेर काढलं, म्हणून आपलं लग्न होतंय!”

ह्या क्षणी त्या मुलीला किती आनंद झाला असेल... हा प्रसंगच किती बोलका आहे... अप्रतिम....
धन्यवाद श्री बोका, कृपया पुढील भाग टाकावेत हि विनंती माझीपण.

चाणक्य's picture

5 Sep 2016 - 6:57 am | चाणक्य

बरेच दिवस 'सावकाश वाचू' म्हणून वाचायची ठेवली होती ही मालिका. आज सगळे भाग वाचून काढले. मी मिपावर आत्तापर्यंत वाचलेल्या मालिकांमधली ही सर्वोत्कृष्ट मालिका. ही मालिका लिहीण्यासाठी तुम्ही भरपूर परीश्रम घेतले असणार यात शंकाच नाहीत. ही मेजवानी आम्हाला दिल्याबद्दल शतशः आभार बोकासाहेब.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 12:04 am | बोका-ए-आझम
सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 12:12 am | सचु कुळकर्णी

धन्यवाद बोका भौ
आता वाचतो भाग १३