अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले! ;)
गाल हा सारे खरे ते सांगतो
याचसाठी चुंबने मी टाळतो
बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो?
कोंडली मी वादळे पोटामधे
गुरगुराटाने पहा घायाळतो!
'होल वावर, इज अवर' असता इथे
मी कुणाची वाट कसली पाहतो!
यायची असतेस तेव्हा का मला
घोळ थोडा जाहल्यागत वाटतो
एकही सीधा दिसेना प्रश्न मज,
लाटण्याचा मग सुगावा लागतो!
ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन
कान मी पकडून आता सांगतो!
मी इथे हल्ली गळ्यातच छानसा
लेउन पट्टा चामड्याचा हिंडतो!
चतुरंग
प्रतिक्रिया
27 Jan 2009 - 8:47 am | संदीप चित्रे
हह फुटलो ना.. :)
>> गाल हा सारे खरे ते सांगतो
याचसाठी चुंबने मी टाळतो
>> बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो?
क्या बात है :)
27 Jan 2009 - 9:48 am | आचरट कार्टा
=))
या स्मायलीला सार्थ करण्याची ताकद फक्त मिपा वरच पाहिली!
-----------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
27 Jan 2009 - 2:45 pm | मयुर नेरुरकर
शान ........
>> गाल हा सारे खरे ते सांगतो
याचसाठी चुंबने मी टाळतो
>> बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो
यायची असतेस तेव्हा का मला
घोळ थोडा जाहल्यागत वाटतो
वा वा ......
27 Jan 2009 - 2:58 pm | स्पृहा
गाल हा सारे खरे ते सांगतो
याचसाठी चुंबने मी टाळतो
बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो?
'होल वावर, इज अवर' असता इथे
मी कुणाची वाट कसली पाहतो!
=))
हे सर्वात मस्त!
27 Jan 2009 - 8:12 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
विडंबन उत्तम.. काही ओळीत लयीत घोळ वाटतो आहे..
केशवसुमार.
27 Jan 2009 - 9:23 pm | शंकरराव
तो घोळ तूमच्यासाठीच केला आहे
घुट्मळत रहा
...
रंगा उत्तम विडंबन करतो
तरि केश्या लैत घुटमळतो
27 Jan 2009 - 9:25 pm | प्राजु
हा एक रेकॉर्ड ब्रेक असावा.
एकाच गझलेची ३-४ विडंबने!
हे ही खूप मस्त.
बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो?
पटलं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Jan 2009 - 8:03 am | चतुरंग
चतुरंग