वड्याचं तेल

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
23 May 2016 - 12:44 pm

‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’
‘नाही साहेब,...’
‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’
‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’
‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’
‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’
‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’
‘....’
‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा ! कामं चुकवून बसून खायला काय तुमच्या बापाची जहागिरी हाय काय कंपनी म्हंजे ?’
‘होय साहेब !’
‘आं ...?’
‘नाही साहेब, म्हंजे होय, पुढल्या महिन्यात ही सगळी बाकी भरून काढतो.’
‘हं...शाणे बना ! चला निघा आता, खुर्ची खोळंबली असेल तुमची. घ्या बोलवून ज्युनिअर्सना आणि घाला चार लाथा ***वर ! कामं करा म्हणावं ***हो !’
‘यस्सर ! गुड डे सर !’
‘^&*/$#..!’
------------------------------------
‘आयला लैच खवळलाय आज खवीस ! जाम खिंकाळतोय. धामणे, बोलवा सगळ्या फिल्डवाल्यांना ! बसतो एकेकाच्या मानगुटीला !’
‘पण आज काय झालंय साहेब ? नेहमी तर सीईओ साहेब चांगले बोलतात.’
‘अहो पालकमंत्र्यांची मिटिंग नाय का झाली काल ? मिनिष्टरसायबानी लै तासलं म्हणे ! मग काय हाण हिकडं डाऊनलोड !’
‘अर्रर्र, मग बराबर ! वड्याचं तेल वांग्यावर ! ....आत्ता फोन लावतो सगळ्यांना !’
-----------------------------------
‘काय गं, मी कधीपासून थांबलोय इथं. कुठं गेली होतीस ? घराची किल्ली तरी ठेवशील का नाही ?’
‘अहो पण तुम्ही आज इतक्या लौकर कसे घरी ? हापिसातल्या लोकांनी हाकललं का काय ?’
‘कळली अक्कल ! हापिसात बसून काय आम्ही टवाळक्या करतो होय ? ते काय आराम घरात बसून टीव्ही बघायचं काम नाय ! डोकं लागतं डोकं. उद्या माझ्या जागी जाऊन बसा हापिसात, मग समजतंय कसं लाथा खाव्या लागतात ते ! मला शिकवतेय अक्कल ..’
‘अहो पण मी कुठं काय शिकवतेय ? एवढं चिडायला काय झालं ?’
‘घोड्याला गाढव झालं ! शॉपिंग करत नुसतं बोंबलत फिरायचं सोडून कामं करा कामं !’
‘अहो, घरातली कामं आवरूनच गेले होते ना शॉपिंगला ?’
‘गप्प बसा ! माहितीय मोठ्या विद्वान आहात तुम्ही. चला घाला आता काहीतरी गिळायला.’
‘.....’
-----------------------------------
‘ए आई, हे बघ मी काय बनवलंय, कागदाचं विमान ! झुईईईई sss’
‘निलेश अभ्यास सोडून कागदं काय फाडत बसलाहेस ? होमवर्क कधी करायचं ?’
‘आई, मघाशीच केलं....’
‘मग स्पेलिंग्ज म्हणत का बसला नाहीस ? काल टीचर ओरडल्या लक्षात आहे ना ?’
‘अगं केलीयेत मी स्पेलिंग्ज कालच.’
‘मग आणि एकदा कर. सारखं खेळ खेळ काय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी समजत नाही ? अभ्यास मागं आहे तुझा. तो अनिल बघ, तुझ्यामागून येऊन फर्स्ट आलाय आता. ‘
‘आई घोडा म्हणजे हॉर्स ना ?’
‘हो आणि गाढव म्हंजे अ‍ॅस ? तुझ्यासारखं ?’
‘अँ अँ sss, मी नाई गाढव, तूच गाढव, जा !’
‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’
‘अँ अँ sss..’
-----------------------------------
‘डोरेमॉन, तुला अक्कल नाही, तू गाढव आहेस ‘
‘....’
‘समजतंय का काही मी बोलतोय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी जरापन समजत नाही बघ तुला.’
‘....’
‘आणि होमवर्क केलस का नाही अजून ? तो किटरेत्सु बघ किती हुशार आहे ? तुझ्यासारखा गाढव नाही.’
‘.....’
‘तुला केमिस्ट्रीचं स्पेलिंग येतं काय ? दाखव बघू म्हणून ?’
‘....’
'करशील का ? आगाऊपणा करशील ? थडाक !'
'.....'
‘बघू नको माझ्याकडे, जा अभ्यासाला बस, शाणा बन जरा. नायतर तुझं काय खरं नाय. उद्याच तुला अंगणात फेकून देणार बघ !’
‘.....’
-----------------------------------

धोरणसमाजप्रकटनप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

23 May 2016 - 12:53 pm | संजय पाटिल

हायला ... धमाल एकदम
सीइओ ते डोरेमॉन भारीये.....

सस्नेह's picture

23 May 2016 - 2:17 pm | सस्नेह

मिनिष्टर ते डोरेमॉन !

रमेश भिडे's picture

23 May 2016 - 4:30 pm | रमेश भिडे

म्हणजे मिनिस्टरने सुद्धा कुणाकडून (घटनाबाह्य-हाक/रास्वसं/मा, घटनाअंतर्गत-मुमं/पं प्र, पक्षांतर्गत-प्रअ वगैरे) तरी बोलणी खाल्ली आहेत काय?

जव्हेरगंज's picture

23 May 2016 - 11:22 pm | जव्हेरगंज

हे खरंतर ओबामांपासून सुरु व्हायला पायजे होतं !

रमेश भिडे's picture

24 May 2016 - 12:07 am | रमेश भिडे

ओबामामाची मामी राहिली. मिशेल बॉस आहे.

संजय पाटिल's picture

23 May 2016 - 12:55 pm | संजय पाटिल

अर्र..
मी पयला हे रायलंच..

रमेश भिडे's picture

23 May 2016 - 12:56 pm | रमेश भिडे

हम्म!

जेपी's picture

23 May 2016 - 1:01 pm | जेपी

=))
तेल बरच खाली पर्यंत पाझरलय..

पिलीयन रायडर's picture

23 May 2016 - 1:27 pm | पिलीयन रायडर

तुझा हातखंडा आहे ग टिपीकल साहेब लोकांचं बोलणं!! पर्फेक्ट वातावरण तयार करतेस!!

एकच नंबर जमलंय!

अरे मधला एक पार्ट राह्यला. मिपावर असतात ना काही वांगी. ;)

मृत्युन्जय's picture

23 May 2016 - 1:39 pm | मृत्युन्जय

चांगले लिहिले आहे . :)

कविता१९७८'s picture

23 May 2016 - 1:42 pm | कविता१९७८

मस्तच ग

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

:)
:(

अनुप ढेरे's picture

23 May 2016 - 1:56 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय!

नाखु's picture

23 May 2016 - 2:09 pm | नाखु

डोरेमॉन त्यानी कुठला वडा शोधायचा तेलासाठी ?????

लेख फर्मास्च..

बिन्तावडीतला नाखु

मन१'s picture

23 May 2016 - 2:11 pm | मन१

:)

पद्मावति's picture

23 May 2016 - 2:21 pm | पद्मावति

:) मस्तं!

जव्हेरगंज's picture

23 May 2016 - 2:39 pm | जव्हेरगंज

काय म्हन्जे कायच कळळ नाय.

कुनी सम्जावेल का?

अभ्या..'s picture

23 May 2016 - 2:41 pm | अभ्या..

नको उगा जव्हेरभाऊ.
तुमचं भरताचं वांगं व्हायचं.

जव्हेरगंज's picture

23 May 2016 - 3:33 pm | जव्हेरगंज

समजली समजली!!!!

उतरंडीवरनं घसरत गेलय तेल.

LOL

बोका-ए-आझम's picture

23 May 2016 - 3:00 pm | बोका-ए-आझम

स्नेहातै अधनंमधनं येतात पण फुल कल्ला करतात!

प्रियाजी's picture

23 May 2016 - 3:17 pm | प्रियाजी

वा! फारच आवडला लेख. वांग पार तेलात भिजून निघाल.

एस's picture

23 May 2016 - 3:19 pm | एस

बरीच काळजी घेऊनही माझ्याकडून एखादे वेळेसतरी असे इकडचा वैताग तिकडे काढणे घडते. परत असे होऊ लागल्यास हा लेख आठवून वेळेत सावरता येईल.

डोमकावळा's picture

23 May 2016 - 6:53 pm | डोमकावळा

झकास... आवडली वांग्यावरची 'तेलप्रक्रिया'.

‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’

बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. नाहीतर आमच्या मातोश्रींनी एव्हाना लाटणं तुटोस्तर सत्कार केला असता.

जव्हेरगंज's picture

23 May 2016 - 9:16 pm | जव्हेरगंज

बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो.

खिक्क! मज्जा म्हणजे दोघांचीही !
बालकांची आणि पालकांचीही ;)

विवेकपटाईत's picture

23 May 2016 - 8:31 pm | विवेकपटाईत

मस्तच. बाकी सरकारी बाबुलोकांना असा अनुभव नेहमीच येत राहतो.

मुक्त विहारि's picture

23 May 2016 - 8:44 pm | मुक्त विहारि

एका कपनीत असातांना, एका सॉफ्ट-स्किल वर्कशॉपमध्ये, हीच "म्हण-कथा", वेगळ्या प्रकारे सांगीतली होती.

पैसा's picture

23 May 2016 - 9:02 pm | पैसा

आवडले

इशा१२३'s picture

23 May 2016 - 9:15 pm | इशा१२३

मस्त!

आनन्दा's picture

23 May 2016 - 9:33 pm | आनन्दा

ह्म्म.. शेवट मस्त आणि वांग्याचा प्रवास पण आवडला.

उगा काहितरीच's picture

23 May 2016 - 9:34 pm | उगा काहितरीच

आवडली....

रातराणी's picture

23 May 2016 - 10:59 pm | रातराणी

लोल :)

निशाचर's picture

24 May 2016 - 1:54 am | निशाचर

आवडलं

अमित भोकरकर's picture

24 May 2016 - 3:56 am | अमित भोकरकर

कथा छान आहे पण एक प्रश्न पडला कि कोणी पालकमंत्री एखाद्या कम्पनीच्या CEO ला का ओरडेल. ZP चा CEO वर ओरडु शकेल फार तर.

अहो, ती गवर्न्मेंट कंपनी आहे समजा.

खटपट्या's picture

24 May 2016 - 4:36 am | खटपट्या

आवल्डं

रेवती's picture

24 May 2016 - 6:25 am | रेवती

हम्म........

कानडाऊ योगेशु's picture

24 May 2016 - 8:49 am | कानडाऊ योगेशु

आवडली पण शेवटाला काळजात थोडी कालवाकालव झाली.!

ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने तिच्या बाहुलीला "खोटे बोलतेस का" म्हणून दरडावले आणि मला हीच कथा आठवली.

अन्या दातार's picture

24 May 2016 - 11:38 am | अन्या दातार

शेवटी पोरांवरच सगळेजण उखडतात राव! :(

बाल्कनीमधे झोपायला लावणं ही खरोखर भयंकर शिक्षा असू शकते.
आमच्या सोसायटीमधे रोज एका मुलाला त्याची आई ही शिक्षा करते आणि तो अगदी केविलवाण्या आवाजात आईची माफी मागतांना ऐकलं की खूप वाईट वाटतं.
बाकी कथा अगदी सत्य आहे, निदान आई-बापाचा रागतरी मुलांवरच निघतो हे हल्ली ब-याच घरातलं चित्रं आहे :(