तर्राट

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 6:59 pm

नमस्कार

आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती

१. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू).

२. गीत लेखन - सिनेमात पाच गाणी आहेत. दोन युगलगीतं आणि एक काळगीत असेल. एक भजन आणि एक शीर्षकगीत. तरी होतकरू नवकवींनी आपली कला दाखवावी.

३. संगीत - वाद्य ओळखता आली पाहीजेत. मुलाखती दरम्यान अनेक वाद्य दाखवता येतील त्यांची नावं सांगता आली पाहीजेत. घरातले डबेवाट्या,वाट्या, चमचे , खिळे, टाचण्या हे देऊन त्याचा दणदणाट करण्यास सांगता येईल. याशिवाय कुणी मूझिक बनवलं असेल तर व्हिडीओ, ऑडीओ अपलोड करून इथं लिंक द्यावी. वादक आपले आपण पकडून आणायचे आहेत. सर्वांना संधी मिळत असल्याने मानधनाची अपेक्षा करू नये.

४. गायक - मुलाखत पर्वतीवर होणार आहे. प्रत्येक पायरीवरून सा लावता आला पाहीजे. आपले व्हिडीओज अपलोड करावेत.

५. अभिनेता / अभिनेत्री - काळी चिमणी धरता आली पाहीजे. तसेच काही प्राणी पकडण्याची चाचणी घेण्यात येईल. ते कुठले हे अकस्मात कळवण्यात येईल. प्राणी पाहील्यावर धरणार नाही असले हट्ट चालणार नाहीत. अभिनेत्रींची चाचणी आम्ही जातीने घेऊन.

६. संकलक : स्वतःची कात्री आणणे. आमचे बबनशेठ टेलर जातीने परीक्षा घेणार आहेत. कात्रीला धार नाही, बोटं दुखतात असली कारणं चालणार नाही.

७. कॅमेरामन - स्वतःचा घरून आणावा. कुणाकडेच नसेल तर स्मार्ट फोनचा चालेल. फोनचा स्टॅण्ड आणि झूम लेन्स आवश्यक. रस्त्यावरून चालत चाललेला बैल या सीनचे शूटींग करायला सांगण्यात येईल. बैल जितका लांब जाईल तितके शूटींग करावे लागेल. मधेच बैलाने वळून शिंग मारल्यास आम्ही जबाबदार नाही. विषय फोडण्याचे खास कारण असे की उमेदवारांना नीट सराव करता यावा. यामधे आपला कॅमेरा कसा बोलतो हे पाहण्यात येईल. उदाहरणार्थ आकाशात तळपणा-या सूर्याचा शॉट आणि त्याचवेळी भात्यावर लोखंड गरम करून घाव घालणारा लोहार. त्याच्या घामाचे थेंब जमिनीवर पडतानाची फ्रेम आणि रस्त्याच्या कडेचा आटलेला नळ असे कलात्मक दाखवता यायला हवे. प्रॉपर्टी आपली आपण आणायची आहे. भाता आणि लोहार देखील स्वतःच धरून आणायचा आहे. बैल आमच्याकडून पुरवण्यात येईल.

इतरही खात्यांविषयी लवकरच कळवण्यात येईल.
आपण त्वरीत कामाला लागावे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. म्हणतात ना शैतान का काम जल्दी का !!

संस्कृतीकलामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 7:01 pm | तर्राट जोकर

हे पण सैराट विशेष मधे टाकावं का?

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 7:05 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

जव्हेरगंज's picture

9 May 2016 - 7:34 pm | जव्हेरगंज

खीखीखी!!!

उगा काहितरीच's picture

9 May 2016 - 7:11 pm | उगा काहितरीच

मला वाटलं तजो बद्दल काहितरी आहे. ;-)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 7:29 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

बैल आमच्याकडून पुरवण्यात येईल.

मी तयार हाय;-)

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 8:08 pm | टवाळ कार्टा

गाय मिळेल या अपेक्षेने जाउ नका =))

पैसा's picture

9 May 2016 - 8:11 pm | पैसा

गाय मिळाला तर?

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 11:19 am | टवाळ कार्टा

मग तो गाय आणि हा बैल...दोघे काय ते बघून घेतील =))

रातराणी's picture

10 May 2016 - 12:39 am | रातराणी

खी खी खी. श्टोरी (डॉयलाग सहित) आणि गाणी दोन्ही देऊ. २-४ बाटल्या दया धाडुन. मानधनाच बगु नंतर. तुमाला मिळाले की दया. घरचं कार्य हाय आपल्या. खोडा घालणं बरं न्हाय दिसत.

खटासि खट's picture

10 May 2016 - 6:58 am | खटासि खट

घरचं कार्य हाय आपल्या. >>>> हंगाश्शी !!

नाखु's picture

10 May 2016 - 9:21 am | नाखु

गुरुजींकडे लग्गा लावावा (त्या साठी टक्याची मदत घ्यावी टक्याची मदत घेतल्यास काम नक्की होते असे चिमण खात्रीने सांगतो)

कॅमेरामन्ला किमान दोनचार तरी (डोक्यावरून कावळे ऊडतात तेंव्हा त्यांना पक्षी कावळ्यांना कसे दिसत असेल असे छायाचित्रण) करण्याचा अनुभव असला पाहिजे.

पटकथा गोधडी कामासाठी आम्ही हातभार लावू पण पहिला मान बॅट्या आणि टक्याचा राहील. उगा मापात पाप नको.

तूर्त इतकेच बाकी सवडीने
हितचिंतक नाखु

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 11:20 am | टवाळ कार्टा

अज्काल गुर्जी अम्च्याशी बोलतपण नैत अशी तक्रार त्यांचे खास चाहते सांगतात

बाबा योगिराज's picture

10 May 2016 - 1:20 pm | बाबा योगिराज

आमच्या कडे धार लावलेल्या 4 वेग वेगळ्या कात्र्या हायेत, पैकी तुमाला कोंचि पायज्येल?
चायना पायज्येल का भारतीय?
अस्सल कानस पायज्येल का साधी पण चालेल?
नवीन आणायची का जुनी पण चालेल?
ब्रँडेड पायज्येल का साधी पण चालेल?
10 लंभर ची पायज्येल का का 12 लंभर ची पायज्येल?
सगळ्यात महत्वाचं तुमाला आमच्या कात्रींन नेमकं काय कापायच हाय?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन लिखित स्वरूपात देणे. (५०० शब्द प्रत्येकी)

आमचे बबनशेठ टेलर जातीने परीक्षा घेणार आहेत.
सनीमा तर्राट असल तर जातीचा काय समंध?
सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बबन शेठ यांना तर्राट राहण्याचा काय अनुभव?
जर त्यांना आमची प वाली रीक्षा घ्यायची असेल तर त्यांच्या तर्राट राहण्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र आणून दाख्वावे लागतील. ज्या मध्ये बबनशेठ किती वर्षापासून तर्राट आहेत, किती प्रकारे तर्राट राहू शकतात, किती वेळ तर्राट राहू शकतात ई. ई. बाबींचा सपष्ट उल्लेख असावा.

आपलाच (तर्राट) संकलक
बाबा योगीराज
बम भोले

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 3:32 pm | मराठी कथालेखक

आयटेम सॉंग नाही का ?

चौकटराजा's picture

11 May 2016 - 2:23 pm | चौकटराजा

दुसर्‍याच्या कानाखाली आवाज काढणार आपण . डावा कान उजवा कान असे आलटून पालटून वापरले की रिदम तयार होईल.
त्यावर झिंगी झिगी अशा ऐवजी गुर्जी गुर्जी असं गाण करायचं !

विशाल कुलकर्णी's picture

11 May 2016 - 3:47 pm | विशाल कुलकर्णी

फेसबुकवर एका सदह्गृहस्थांनी , नामें श्री. रविंद्र कामठे तुमच्या चित्रपटासाठी एक गाणे पण आधीच पाडून आपलं लिहून ठेवलेले आहे. बाकी कॉपीराइट किंवा मानधनासंदर्भातील बोलणी कृपया प्रत्यक्ष श्री. रविंद्र कामठे यांच्याशीच करावीत.

।। तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट
तर तर तर्राट, तर तर तर्राट
मोहाची ही रं लागतीया भन्नाट ।।धृ ।।
चढल्यावर कळली तीची
जादू आहे कसली जबराट ।
येड लागल्यावानी झालंया
धावतंया मन हे कसं सुसाट ।।१।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
पारूचं मन हे आहेच की हो
लय लय लई लई चांभाट ।
खुळ्यावानी झालंय रे मला
आत्ताच जमलंया हे झंगाट ।।२।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
पिरमात पडलीया स्वारी ही
होवूनी जाऊद्या हो थरथराट ।
अख्ख्या गावाला बी कळूद्या
होईल सार्या गावामंधी थयथयाट ।।३।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
उतराया लागली नशा अनं
वाजती डोक्यांमधी घणघणाट ।
सुटलाय की हो चहूकडे
मोहजालाचाच हा घमाघमाट ।।४।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तिकडून हिकडं हिकडून तिकडं
तन मन माझं झालंया पिसाट ।
पारुनं माझ्या बघा हो कसा
घातलाय आज पिरमाचा हा घाट ।।५।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
तर तर तर्राट, तर तर तर्राट ।।
रविंद्र कामठे पुणे
९८२२४०४३३०
नवी कविता एक नवा प्रयत्न
अजय गोगावलेंच्या सैराटच्या प्रेरणेने
काँपीरायटेड
शेअर करायची असल्यास नावासहीत करावी

कृपया मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. अस्मादिक कधीच तर्राट होवून वारल्या गेलेले आहेत.

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 3:49 pm | तर्राट जोकर

तर्राट बोले तो खल्लास कविता. =))

खटासि खट's picture

12 May 2016 - 10:11 am | खटासि खट

__//\\__

शिनेमा म्हनल्यावर सर्वात आदी काय लागतयं ते म्हंजे शिनमा बगनारं पब्लिक.. तेवढ्याकरता आमची जरा फिक्स ठिवा.. वायच जरा वडापाव आन्तो.. बाकी चालू द्या निवांत..

ह्ये ब्येस बोलला बाकि तुम्ही

शि बि आय's picture

11 May 2016 - 6:24 pm | शि बि आय

आवं जागा लिवायचं राहिलं

स्मिता श्रीपाद's picture

11 May 2016 - 6:29 pm | स्मिता श्रीपाद

परीक्षणाच्या प्रतिक्षेत ....

खटासि खट's picture

12 May 2016 - 10:13 am | खटासि खट

हा पण चांगला पायंडा आहे. सिनेमा बनतानाच परीक्षण यायला पाहिजे. तरच ते वाचून त्रुटी दूर करता येतात. सिनेमा बनल्यानंतर चुका काढून उपयोग आहे का ?

दि ग्रेट मराठा's picture

11 May 2016 - 10:31 pm | दि ग्रेट मराठा

छान

वेल्लाभट's picture

12 May 2016 - 12:09 pm | वेल्लाभट

आणखी एक गाणं आम्ही लिवलंय.

तर्राट झालं जी....

अलगुज वाजं मनात
कसंकसं झालंया आज
तल्लफ आली भरात
उठलीच नेहमीची खाज
हो...
आता झणाणलं, या घशामंदी
अन हातामंदी ग्लास आलं जी
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....

चमकून गेलं या सारं
घशामंदी गार गार
झिंगत डोलणार्‍याला
भारीच्च वाटतं सारं
आल मनातलं ह्या व्हटामंदी
अन हातामंदी ग्लास आलं जी
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....

काचंच्या ग्लासात या
आचक्या श्वासात या
नाचर्‍या मनात या भरलं... भरलं..
तुझ गान मनामंदी
घुमतय बारामंदी सूर डीज्जेचा राया सजल
सजलं हे पाय थिरकताना सजलं
रंगलं मन सोनेरी राणी रंगलं
विरलं हे जगण्याचं टेन्शन विरलं
भिनलं हे नसनस तारुण्य भिनलं
आग धडाडलं, स्पीकरामंदी
अन उरामंदी आत आलं जी
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....

अपरीत घडलंया
निपचित पडलया
लाल लाल दिसतंय डोलं.. डोलं
तुटला एक दात, हात पाय दुखतात
मला रं घरी कुनी सोडलं
भरलं बिल रं माझं कुणी भरलं
मारलं मला पिरमानं पुरतं मारलं
सरलं भान हरवून जगणं सरलं
हरलं ह्या जीवनाला सपनं हरलं
खणाणलं या खिशामंदी
अन बायकुचं फॉन आलं जी
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....
तर्राट झालं जी....

- अपूर्व ओक

मूळ गाणं

अलगूज वाजं नभात
भलतंच झालया आज
अलगद आली मनात
पहिलीच तर्नी ही लाज
हो….
अता झणाणलं कालजामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

बदलुन गेल या सार
पिरतीचा सुटलया वार
अल्लड भाम्भावाल्याला
बिल्लोरी पाखरू न्यार
आल मनातलं ह्या व्हटामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं
तुझ गान मनामंदी
घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल
सजल उन वार नाभाताना सजल
रंगल मन हळदीन राणी रंगल
सरल हे जगण्याचं झुरणं सरल
भिनल नजरेन इशचारी भिनलं
आग धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

अपरीत घडलया
सपान हे पडलंय
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजल
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरल
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…

तर्राट जोकर's picture

12 May 2016 - 3:20 pm | तर्राट जोकर

ओक साहेब, कुर्निसात घ्यावा. जहांपनाह, तुस्सि ग्रेट हो.

ही कविता आमचं ऑफिशियल सॉन्ग म्हणून तुमच्या नावासकट आमच्या प्रोफायलात चिकटवण्याची परवानगी भेटंल का..?

वेल्लाभट's picture

12 May 2016 - 5:43 pm | वेल्लाभट

चिकटवा की भौ. चालतंय.
जस्सा हा धागा पायला; असं झनानलं डोक्यात की मग सुचलंच म्हन्जे येकदम.