मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तर्राट

खटासि खट · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती १. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू). २. गीत लेखन - सिनेमात पाच गाणी आहेत. दोन युगलगीतं आणि एक काळगीत असेल. एक भजन आणि एक शीर्षकगीत. तरी होतकरू नवकवींनी आपली कला दाखवावी. ३. संगीत - वाद्य ओळखता आली पाहीजेत. मुलाखती दरम्यान अनेक वाद्य दाखवता येतील त्यांची नावं सांगता आली पाहीजेत. घरातले डबेवाट्या,वाट्या, चमचे , खिळे, टाचण्या हे देऊन त्याचा दणदणाट करण्यास सांगता येईल. याशिवाय कुणी मूझिक बनवलं असेल तर व्हिडीओ, ऑडीओ अपलोड करून इथं लिंक द्यावी. वादक आपले आपण पकडून आणायचे आहेत. सर्वांना संधी मिळत असल्याने मानधनाची अपेक्षा करू नये. ४. गायक - मुलाखत पर्वतीवर होणार आहे. प्रत्येक पायरीवरून सा लावता आला पाहीजे. आपले व्हिडीओज अपलोड करावेत. ५. अभिनेता / अभिनेत्री - काळी चिमणी धरता आली पाहीजे. तसेच काही प्राणी पकडण्याची चाचणी घेण्यात येईल. ते कुठले हे अकस्मात कळवण्यात येईल. प्राणी पाहील्यावर धरणार नाही असले हट्ट चालणार नाहीत. अभिनेत्रींची चाचणी आम्ही जातीने घेऊन. ६. संकलक : स्वतःची कात्री आणणे. आमचे बबनशेठ टेलर जातीने परीक्षा घेणार आहेत. कात्रीला धार नाही, बोटं दुखतात असली कारणं चालणार नाही. ७. कॅमेरामन - स्वतःचा घरून आणावा. कुणाकडेच नसेल तर स्मार्ट फोनचा चालेल. फोनचा स्टॅण्ड आणि झूम लेन्स आवश्यक. रस्त्यावरून चालत चाललेला बैल या सीनचे शूटींग करायला सांगण्यात येईल. बैल जितका लांब जाईल तितके शूटींग करावे लागेल. मधेच बैलाने वळून शिंग मारल्यास आम्ही जबाबदार नाही. विषय फोडण्याचे खास कारण असे की उमेदवारांना नीट सराव करता यावा. यामधे आपला कॅमेरा कसा बोलतो हे पाहण्यात येईल. उदाहरणार्थ आकाशात तळपणा-या सूर्याचा शॉट आणि त्याचवेळी भात्यावर लोखंड गरम करून घाव घालणारा लोहार. त्याच्या घामाचे थेंब जमिनीवर पडतानाची फ्रेम आणि रस्त्याच्या कडेचा आटलेला नळ असे कलात्मक दाखवता यायला हवे. प्रॉपर्टी आपली आपण आणायची आहे. भाता आणि लोहार देखील स्वतःच धरून आणायचा आहे. बैल आमच्याकडून पुरवण्यात येईल. इतरही खात्यांविषयी लवकरच कळवण्यात येईल. आपण त्वरीत कामाला लागावे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. म्हणतात ना शैतान का काम जल्दी का !!

वाचन 7461 प्रतिक्रिया 27