नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.
कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.
अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
प्रतिक्रिया
3 May 2016 - 10:29 pm | याॅर्कर
त्रुटी म्हणजे जातीय चष्मा बाजूला सारून चित्रपट पाहता येत नाही,कितीही प्रयत्न केला तरी.
बाकि चित्रपट मस्तच आहे,
100 % खात्री देवू शकणार नाही,पण 70 % प्रेमप्रकरणं फेल गेली आहेत गावात.रोजरास धुडगूस चालू आहे नुस्ता.
हे काय बरोबर नाही,तुम्ही अभ्यासू आहात,उच्चभ्रूंना
जातीय उन्माद आहे,तसा राजकिय उन्मादही आहे आणि भगवा उन्माद आहे तसाच निळा उन्मादही आहेच,
हे कोणीही अभ्यासू माणूस नकारू शकत नाही.पण नागराज त्यावर चित्रपट बनवणार नाही याची गॅरंटी मी देतो,नाईलाजाने तो मलाच बनवावा लागेल पण तो प्रदर्शित होऊ दिला जाईल कि नाही याची गॅरंटी मी देवू शकत नाही.
3 May 2016 - 11:30 pm | तर्राट जोकर
मला तरी कोण्या एका जातीबद्दलच आहे असे वाटले नाही. पार्श्वभूमी बघितली तर पुरुषप्रधान, सरंजामीवृत्ती, स्त्रियांना मालमत्ता ठरवणारी मानसिकता अशी आहे. हॉनर किलिंग हा प्रकार फक्त भारतात होत नाही किंवा भारतातल्या एखाद्याच समाजात होत नाही. जगभरात दर साल सुमारे ५ हजार हत्या होतात. त्यातल्या हजारेक भारतात होतात. प्रत्येक जातीत प्रेमसंबंध, आंतरजातीय लग्न टबू आहेत. तुम्ही चष्मा घालताय हा तुमचा चॉइस आहे.
ग्रामिण काय की शहर काय प्रेमप्रकरणे ९० टक्के फेल जातात हो. शहर्/ग्रामिन असा काही भेद नै त्यात. वरचा मी दिलेला सॅम्पलगृपचा निष्कर्ष सर्वमिश्रित आहे.
तुम्ही बनवा हो, प्रदर्शित होऊ दिला जाईल / नाही ह्याची चिंता करु नये. नागराज पिस्तुल्या बनवण्याआधी कोण होता हे बघून घ्या. जिगरात आग असेल तर पुचाट कारणं द्यावी लागत नाही. माणुस करुन दाखवतो.
बाकी, जातायेता उगाच खोचक टिप्पणी करायला फार काही लागत नाही.
4 May 2016 - 12:17 am | आनंदराव
तजो लयच फारमात आलेत.
जाऊ द्या.
जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं.
बाकी आपल्याला सैराट आवडला.
गाणी तर लयच ब्येष्ट.
4 May 2016 - 12:18 am | आनंदराव
तजो लयच फारमात आलेत.
जाऊ द्या.
जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं.
बाकी आपल्याला सैराट आवडला.
गाणी तर लयच ब्येष्ट.
4 May 2016 - 12:18 am | आनंदराव
तजो लयच फारमात आलेत.
जाऊ द्या.
जात नाही ती जात हेच खरं आणि कोणालाच ती जाऊ द्यायची नाही त्ये बी तितकच खरं.
बाकी आपल्याला सैराट आवडला.
गाणी तर लयच ब्येष्ट.
4 May 2016 - 11:32 am | गणेशा
सैराट रविवारी पाहिला .. एकदा पाहण्यासारखा नक्कीच .. अभिनय छान .. सांगित लाजवाब ..
कथा मात्र जास्त मोठी .. पण रिअल्यास्टीक गोष्टी बरोबर दाखवल्या आहेत.. फक्त सिनेमा म्हनुन काहीही कथेत मिसळवलेले नाही..
वयक्तीक रित्या मला सैराट झाल जी हे गाणे खुप आवडले ..
4 May 2016 - 12:53 pm | गामा पैलवान
लोकहो,
मला चित्रपटांतलं फारकाही कळंत नाही. पण जे दाखवलंय त्याचा लोकांवर परिणाम मात्र खोलवर होतो एव्हढंच माहितीये. सैराटच्या निमित्ताने भाऊ तोरसेकरांचा हा लेख आठवला : http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_5.html
सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प. पण जेव्हा कोणी एखाददुसरा वाहवत जातो तेव्हा बळी कोणाचा जातो? माझ्या आजच्या मनोरंजनासाठी भविष्यात संभाव्य बळी गेलेला चालेल का?
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 1:01 pm | तर्राट जोकर
तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या गोष्टी वापरत असल्यामुळे कुणाचाही बळी जात नाही ह्याची खात्री करुन जगत आहात काय? जसे नॉनव्हेज, वेज, कागद, कपडे, इमारती,
इमारती बांधतांनाच कित्येक बळी जातात, तुम्हाला भविष्यात राहायला मिलावं म्हणुन आत्ताच कितीतरी लोकांचे बळी जातात, काय करताव त्येंसाठी?
4 May 2016 - 9:24 pm | खटपट्या
सहमत
पुर्ण चित्रपट पाहुन सर्वांनी मते द्यावीत असे वाटते. मी हा चित्रपट पाहीला. जी मुले हा चित्रपट पहातील त्यांना वास्तवाचे भान येण्याची जास्त शक्यता आहे. प्रेमविवाहानंतरची कुत्तरओढ जबरद्स्त दाखवली आहे.
क्रुपया कोणी चित्रपटाचा शेवट विचारुन नागराज मंजूळेचे कष्ट वाया घालवू नयेत. खाली कोणीतरी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपट पाहील्यावरच शेवट परीणामकारक वाटतो. आधीच शेवट माहीत असेल तर मजा नाही.
थोडक्यात - पहावाच असा चित्रपट...संस्क्रुतीच्या नावाने बोंबा मारणार्यांनी तर पहावाच पहावा...
7 May 2016 - 12:42 am | बोका-ए-आझम
अपेक्षा नव्हती.
रिंकू पाटील हत्याकांड - ४ एप्रिल १९९०
बाजीगर प्रदर्शित झाला - ७ आॅगस्ट १९९३
डर प्रदर्शित झाला - २४ डिसेंबर १९९३
अंजाम प्रदर्शित झाला - १७ एप्रिल १९९४
हरेश पटेल जिवंत असताना मैने प्यार किया release झाला होता. त्यातला हीरो स्वतःची कमाई करुन नायिकेच्या वडिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. ते का नाही पाहिलं त्याने? चित्रपटात दाखवली जाते त्याच्या १०० पटीने हिंसाचार आज बातम्यांमध्ये दाखवला जातो, तोही खराखुरा. पण बातम्यांवर कोणी टीकेची झोड उडवलेली पाहिली नाहीये.
7 May 2016 - 11:39 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
तपशीलात चूक नाहीये. कृपया हे वाक्य पाहावे :
>> पण दोनतीन वर्षांनी शहारुखने तोच हरीश पटेल आपल्या तीन लोकप्रिय चित्रपटातून अप्रतिम रंगवला आणि
>> त्याचा भिन्न नावाने रंगवलेला हरीश पटेल लोकांनी डोक्यावर घेतला. त्
प्रत्यक्षातला घृणास्पद माणूस सिनेमातून नायकासारखा दाखवला तर लोकप्रिय होतो. चित्रपटाचा समाजावरील परिणाम बराच खोलवर जात असावा. त्यास अनेक आयामही असावेत.
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 1:04 pm | काळा पहाड
हा २ मिनिटाचा शेवट नक्की काय आहे?
4 May 2016 - 1:05 pm | तर्राट जोकर
बाकी, गा.पै. एखाद्या चित्रपटामुळे भविष्यात केल्या जाणार्या दहा प्रतिष्ठा-हत्या टळल्या तरी हेतू सिद्ध होईल असे नाही वाटले? नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले? तेही चित्रपट न बघता सांगोवांगीच्या गोष्टीवरुन?
4 May 2016 - 7:57 pm | गामा पैलवान
तजो,
>> नकारात्मक बाजूकडेच का झुकावेसे वाटले?
मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय. रिंकू पाटीलला जाळणाऱ्या हरीश पटेलला नकारात्मक बाजूकडेच का वळावंसं वाटलं?
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 8:04 pm | तर्राट जोकर
अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस जाळून मारावे अशी कोणत्या चित्रपटाने प्रेरणा दिलिय ते सांगाल का? रिंकुपाटील जळीत प्रकरण किंवा अशीच एकतर्फी प्रेमप्रकरणांतून प्रेयसीची हत्या करणे हे पुरुषी मनोवॄत्तीचे निदर्शक आहे की चित्रपटाचे परिणाम ह्यात तुमची गल्लत होत नाही ना?
4 May 2016 - 8:22 pm | बबन ताम्बे
मला आठवते त्याप्रमाणे या घटनेतील गुन्हेगारांवर हिंदी चित्रपटांचा देखील प्रभाव होता. एक चोरी त्यांनी हिंदी पिक्चर स्टाईलने केली होती असे बहुतेक मुनावर शहाच्या आत्मचरीत्रात वाचल्याचे आठवते.
4 May 2016 - 8:39 pm | तर्राट जोकर
असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव होण्याची वाट बघतोय एका सदस्यावर... पण ते फक्त नकारात्मक प्रभाव बघतात बहुतेक. =))
4 May 2016 - 9:39 pm | गामा पैलवान
तजो,
जेव्हा प्रेक्षक एखादी कलाकृती बघतो तेव्हा सकारात्मक की नकारात्मक असा विचार करंत नसतो. जे दिसेल ते स्वीकारतच जातो. त्याचे उचित वा अनुचित परिणाम कालांतराने दृग्गोचर होत जातात. डरसारख्या चित्रपटांमुळे खलनायकी वृत्तीस एक प्रकारची आंतरिक वैधता लाभते. जी बरोबर नाही. सैराट आजून बघितला नाहीये. त्यात उलट संदेश नसेल अशी आशा आहे.
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 9:57 pm | तर्राट जोकर
तेच ना, स्वदेस किंवा तत्सम उत्तम संदेश, वैधता देणारे चित्रपटांनी घडवलेले परिणाम दृग्गोचर व्हायची वाट बघत आहे.
4 May 2016 - 11:31 pm | गामा पैलवान
तजो,
मीसुद्धा तुमच्यासारखीच वाट बघतोय. पण लोकं नेमकी नको तो संदेश का घेतात ते कळंत नाही. :-(
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 11:34 pm | तर्राट जोकर
लोकं चित्रपटाने बिघडतात हा तुमचा दावा आहे माझा नाही.
4 May 2016 - 11:41 pm | गामा पैलवान
तजो, दावा बरोबर आहेच. पण त्यामागचा कार्यकारणभाव उलगडत नाहीये. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
आ.न.,
-गा.पै.
5 May 2016 - 4:49 pm | बोका-ए-आझम
जगात कोणीही चित्रपट पाहून बिघडत नाही किंवा सुधरत नाही. तुमच्या म्हणण्याचा एक अर्थ असा होतोय की समाजातले प्रश्न चित्रपटांनी हाताळूच नयेत, कारण लोक त्यावरून वाईट संदेश घेऊन दुष्कृत्य करतील. लोक एवढे बावळट नसतात. कुणी माणूस जर चित्रपट बघून त्यावरुन गुन्हेगार बनायचं ठरवत असेल तर त्याच्यात मूळ गुन्हेगारी वृत्ती असते आणि म्हणूनच त्याने असा अर्थ काढला असं म्हणता येईल. वीरप्पन, ओसामा, रामन राघव, जोशी-अभ्यंकर हत्याकांडातले गुन्हेगार, यांनी जे चित्रपट पाहिले असतील-नसतील, तेच चित्रपट हजारो लोकांनी पाहिले असतील. सगळेच गुन्हेगार झाले की काय? काहीही बोलता राव! अपेक्षा नव्हती खरं सांगायचं तर तुमच्याकडून!
5 May 2016 - 5:03 pm | सोत्रि
है शब्बास!
दावा करायचा, तो बरोब्बर असल्याचाही दावा करायचा पण तो सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र जाणकारांची! मज्जाच आहे! :)
असो, लगेहात जाणकार कोण कोण आहेत तेही कळेल ;)
- (अजाण) सोकाजी
5 May 2016 - 4:21 pm | कानडाऊ योगेशु
स्वदेश नाही पण जुन्या काळी बहुदा व्ही.शांताराम यांचा सख्खे शेजारी चित्रपटा नंतर हिंदु मुस्लीम दंगे थांबले होते असे ऐकले आहे.
4 May 2016 - 1:08 pm | तर्राट जोकर
१६८ मिनिटांचा चित्रपट बघितल्याशिवाय ती दोन मिनिटे उपयोगाची नाहीत.
4 May 2016 - 7:52 pm | वगिश
चित्रपट न पाहताच प्रतिसाद देणार्यांची दया येते आहे.
4 May 2016 - 8:05 pm | तर्राट जोकर
खरोखर.:(
4 May 2016 - 11:35 pm | शलभ
200 :)
5 May 2016 - 12:23 pm | बोका-ए-आझम
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. लोक चित्रपटांमधल्या फक्त वाईट गोष्टी उचलतात आणि नंतर पकडले गेले की त्यांच्यावर बिल फाडतात. मनुष्यस्वभाव! उद्या मला कुणी काही बोललं तर मी मिपाचं नाव घ्यावं काब्रे?
5 May 2016 - 7:40 pm | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
म्हणूनच वाईट कृत्य घडण्याआधी काही करता येईल का?
आ.न.,
-गा.पै.
5 May 2016 - 3:40 pm | वगिश
अरे आधी चित्रपबघा मगसमाजावरील परीणाम अभ्यासा. मी 100% सांगतो की काहीपरिणाम झाला तर तो सकारात्मकचअसेल.
7 May 2016 - 11:47 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
मीही नेमकं हेच म्हणतोय. चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे. गुन्ह्यांची जबाबदारी चित्रपटांवर ढकलणे हा माझ्या चर्चेचा हेतू नाही.
आ.न.,
-गा.पै.
7 May 2016 - 12:38 pm | अंतरा आनंद
अगदी पटतय. मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा. हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला. हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.
7 May 2016 - 12:42 pm | तर्राट जोकर
=)) =)) पूर्णानुमोदन....
7 May 2016 - 1:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) भारी प्रतिसाद. लंबर एक.
-दिलीप बिरुटे
8 May 2016 - 3:05 am | बोका-ए-आझम
कुंभकर्ण, मेघनाद, शूर्पणखा वगैरे सगळे काढा. उगाचच टेन्शन नको. दादासाहेब फाळके चुकलेच. उगाचच चित्रपटसृष्टीची सुरुवात केली.
7 May 2016 - 12:44 pm | पूर्वाविवेक
सैराट आवडलाय , गारुड केलंय मनावर पण एके ठिकाणी सैराट च्या निमित्ताने जुन्या आठवणी लिहिल्या आहेत त्या वाचल्या. ती बाजूही पटली. त्यासाठी पुढील लिंक पहा. https://www.facebook.com/priya.prabhudesai.9/posts/1066214120115948
7 May 2016 - 12:54 pm | तर्राट जोकर
चित्रपट न पाहताच केलेले परिक्षण, भन्नाट आहे. ह्या ताइंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते नाही कळले.
7 May 2016 - 1:17 pm | पूर्वाविवेक
कुठल्या ताई? कसला नेमका प्रॉब्लेम ? तुम्हाला काय कळत नाहीये ?
का एवढा त्रास करताय जीवाला? पिक्चर हाय तो शेवटी.......... :):)
7 May 2016 - 1:26 pm | तर्राट जोकर
तुम्हीच लिंक दिलीय ना फेबुवरची. ते समग्र लिखाण म्हणजे चित्रपट न पाहता अंदाजे पंचे आपली मते, आठवणींच्या स्वरुपात मांडली आहेत. आता प्रेमप्रकरणांबद्दल प्रत्येकाला आपली मते असण्याचा अधिकार आहे. ज्याच्या नशिबी जसे आयुष्य येते तसे त्याचे विचार होतात. पण त्याला न पाहिलेल्या चित्रपटाशी जोडून नकारात्मक, हिणवल्यासारखे लिहिणे पटले नाही. हिणवणं हा ही विरोधाचाच एक प्रकार असतो. ट्रेलरमधे ताईंना हिरोईनचे उन्नत उरोज दिसले, जे आम्हाला पुरुष असून आख्खा पिच्चर पाहतांना कधी जाणवले नाही.
7 May 2016 - 2:14 pm | पूर्वाविवेक
ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई', मी तिला अनेक दिवसापासून फोलो करते. ती जे लिहिते ते मला आवडत, पटत. तिने आजवर अनेक नव्या -जुन्या हिंदी, इग्रजी सिनेमाची परीक्षणे लिहिली आहेत. तिच्यामुळे मी अनेक जुने सिनेमे शोधून शोधून पहिले. हे माझे व्ययक्तिक मत आहे. असो......
आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'सैराट' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का?
मलाही सैराट अत्यंत आवडला. प्रोमो पण आवडले, पहिल्याच दिवशी बघितला आम्ही. गाणी अजूनही सतत ऐकत आहे.
पण म्हणून या निमित्ताने जर दुसरी बाजू कुणी मांडत असेल तर ती समजवूनही घ्यायची नाही का? इथेही मिपा वर 'सैराट : माझीही एक भर' या लेखावर अंतरा आनंद यांनी लिहिलंय........ 'नक्की बघा. मुलांनाही दाखवा. मुलगी पसंत, सासू हवी, आणि लाडकी सून या मालिकांमधल्या किंवा नुस्त्या पाठांतरावरल्या संस्कारांपेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं सुद्धा.' हे पण पटलं.
कारण सैराट हा मला सिनेमा म्हणून खूप आवडला असला तरी मी दोन मुलींची आई पण आहे. माझ्या आई असलेल्या मनाला दुसऱ्या बाजू विचार करायला भाग पडतात. ही काळजी सैराट बघितला आणि मनात अचानक निर्माण झाली असे नाही, ती असतेच कायम. सैराटच्या निमित्ताने लोक लिहू लागलीत. वेगवेगळे पैलू समोर आले. वाचून ज्या गोष्टी पटल्या त्या मान्य करणे म्हणजे गुन्हा आहे कि काय?
7 May 2016 - 2:34 pm | तर्राट जोकर
त्यांनी जे लिहिले तो लिहिण्याचा अधिकार मी कुठे अमान्य केलाय का? त्यावर मीही त्यांचे लेखन 'माझे न आवडल्याचे मत मांडले' तर जो तुम्ही त्यांच्या "न आवडण्याच्या अधिकारा"साठी पवित्रा घेत आहात तोच माझ्यासाठी का नाही?
आपल्याला वाटते हे लिहिण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. कुणाला काय आवडले? कुणाला काय खटकले ? कुणाला काय दिसले? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मान्य तुम्ही 'प्रिया प्रभुदेसाई' fan क्लब चे सदस्य झाले आहात म्हणून तुम्हाला आवडेल असेच दुसऱ्याने बोलावे का?
7 May 2016 - 5:18 pm | अंतरा आनंद
माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे मला म्हणायचे आहे त्याचा चुकीचा अर्थ घेतलात आपण. हा पॅरा मला असा लिहायला आवडेल
बेगडी संस्कार शिकवण्यापेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेत किती सुंदर होऊ शकतं हेसुध्दा (आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे आपणही बघावं) .
मला वाटतं हे जास्त स्पष्ट आहे.
7 May 2016 - 3:25 pm | पूर्वाविवेक
खिक्क्क .......
बोला बोला हवे ते बोला :) :P
7 May 2016 - 3:29 pm | तर्राट जोकर
;))
7 May 2016 - 8:00 pm | गामा पैलवान
अंतरा आनंद,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
उत्तम कल्पना आहे. फक्त व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची. हाय काय नाय काय!
२.
एकदा का प्रतिभेचा दुष्काळ संपला की अशा अडचणी चुटकीसरशी दूर होतील. चिंता नसावी.
३.
अफगाण मॉडेल? हे कशाशी खातात?
आ.न.,
-गा.पै.
7 May 2016 - 8:21 pm | तर्राट जोकर
अहो, व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची काय गरज आहे, तयारच आहे ना रामायण म्हाभारत? तालिबान्यांसारखे सर्व च्यानेल्वरुन, सर्व थेटरात, सर्व भारतात तेच ८०च्या दशकातल्या रामायण म्हाभारत शिरेली दाखवायच्या
8 May 2016 - 6:52 pm | गामा पैलवान
त्यामुळे काय होईल?
-गा.पै.
8 May 2016 - 8:36 pm | तर्राट जोकर
अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू शकणार नाही.
25 May 2016 - 5:18 pm | गामा पैलवान
लोकहो,
आज एक बातमी वाचण्यात आली : बीड जिल्ह्यातून १३ अल्पवयीन आणि अंबड (जिल्हा जालना) येथून १० प्रेमीयुगुल यांचे पलायन !
थोडक्यात काय की, सैराट पिक्चर चांगलं आहे. फक्त पळून जाणाऱ्यांत आपलं मूल नसेल तरंच.
आ.न.,
-गा.पै.