नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.
कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.
अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
प्रतिक्रिया
29 Apr 2016 - 11:20 am | सतीश कुडतरकर
MI SAATVILAA ASTANA MAJHYAPEKSHA VAYANE 2 VARSHE MOTHE ASLELYA MULACHYA CHITTHYA TYACHYA PREYASILA DYAYACHO. THODKYAT KABUTAR HOTO.
29 Apr 2016 - 3:29 pm | lakhu risbud
तजो यांच्याशी सहमत !
28 Apr 2016 - 10:23 pm | तर्राट जोकर
हे एक राहिलंच, अस्मादिक तीसर्या वर्गात असल्यापासून एकनिष्ठ रामाच्या एकाग्रचित्ताने एका सुंदर बालिकेचे (तीसर्या वर्गातली) एकतर्फी प्रेमी होते. अकरावीपतुर एकतर्फी सांभाळलं पण खुलासा झाल्याने प्रियतमेच्या भावबंधांनी सोप्या भाषेत भेटगांठ घेतल्याने प्रकरण थांबले. त्याबद्दल सविस्तर लिविनार, मज्जा होती तीपन एक. आमचे मातोश्री पाटीवर तीचे नाव मी गिरवीत बसल्याचे पाहुन ... असो. ट्रेलर काफी. पिच्चर बादमें.. =))
28 Apr 2016 - 10:51 pm | वैभव जाधव
तर्राट जोकर सेठ, चित्रपट मंजुळे यांचा असला तरी झी मराठी ची निर्मिती आणि मार्केटिंग आहे. काही लोकांमध्ये आर्थिक फायद्या तोट्याबाबत शिक्षण कमी पडत असावं ;)
- खरं दुखणं आणि ठसठस वृत्त!
28 Apr 2016 - 10:57 pm | दिग्विजय भोसले
झणाट गाणी!!! मस्त हाईप निर्माण झाली आहे.
काय खतरा कडवं हाय हे,किती खोल अर्थ दडलाय.
सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या
दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला
काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला
चांदणीला अवताण धाडतुया रोजं रातिला
झोप लागना सपानं जागवाया लागलं
पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं
याड लागलं गं याड लागलं गं
28 Apr 2016 - 11:41 pm | चैतू
तर्राट जोकर १+
28 Apr 2016 - 11:43 pm | श्रीरंग
"याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे."
अंकल.. फारच वहावत गेलात की स्तुती करण्याच्या नादात. झी च्या सर्व मराठी चॅनेल्सवर मिनिटागणीक चाललेल्या जाहिराती पहा. वारेमाप खर्च म्हणजे काय ते दिसेल.
3 May 2016 - 10:21 am | बोका-ए-आझम
त्यामुळे स्वतःच्या चॅनेल्सवर ते जाहिरात करणारच. पण त्यासाठी त्या चॅनेल्सना काही उत्पन्न मिळालं असेल असं वाटत नाही. असलं तरी ते transfer pricing स्वरूपातलं असणार. म्हणजे झीच्या एका कंपनीने झीच्याच दुस-या कंपनीला पैसे देणं. एका खिशातून पैसे काढून दुस-या खिशात टाकण्यासारखं.
29 Apr 2016 - 12:06 am | श्रीरंग_जोशी
वर्षानुवर्षे हिंदी चित्रपटांची प्रदर्शनपूर्व हवा अनुभवल्यावर मराठी चित्रपटांची तशी हवा पाहून कौतुक वाटत आहे. आज प्रथमच युट्युबवर सैराटची गाणी पाहतोय. ग्रामीण महाराष्ट्रातला उत्साह छान प्रतिबिंबित केला आहे.
सादरीकरणावर जयम सारख्या तेलुगु चित्रपटाचा प्रभाव वाटतोय.
वरच्या या प्रतिसादातला मजकूर चेपूवरही वाचला होता. यात केलेला दावा अन मिपावर पूर्वी केला गेलेला एक दावा आठवला - 'वाढत्या वयात शामची आई वाचून मुले साने गुरुजींसारखी बनण्याचा धोका असतो'.
अशा भाबडेपणाची गंमत वाटते.
सैराटला शुभेच्छा!!
बादवे समाजमाध्यमांतून होणार्या प्रचारासाठीही भरपूर पैसे खर्च केले जातात जे प्रत्यक्षपणे दिसत नसतात.
29 Apr 2016 - 12:11 am | तर्राट जोकर
हैल... लै भारी प्रतिसाद. आवळ्ळला आप्ल्याला.
29 Apr 2016 - 11:05 am | राजाभाउ
हे लै भारी आहे. हाहापुवा.
29 Apr 2016 - 1:13 am | आनन्दिता
याड लागलं , सैराट झालं दोन्ही गाणी प्रचंड आवडली. गेले काही दिवस सतत ऐकतेय. ती सिंफनी खरंच कमाल आहे.
या गाण्यांचं मेकींग पाहिल्यापासुन तर ती अजुन जास्त अपील होतायत.
मलाही ती मुलगी खूप आवडली. या चित्रपटाच्या प्रोमो मधुन गाण्यांमधुन जो काही " स्टुपिडली इनोसन्स" दाखावण्यात येतोय तो खरा वाटतोय, छान वाटतोय.
29 Apr 2016 - 1:18 am | अविनाश लोंढे.
पहिल्यांदाच कोणत्यातरी मराठी चित्रपटाची एवढ्या आतुरतेने वाट बघतोय ! खूप शुभेच्छा !!
29 Apr 2016 - 5:04 am | रेवती
झिंगाट हे गाणं ऐकून कुठंतरी चाल ऐकल्यासार्खी वाटली पण ते लक्षात येत नव्हतं.
कोणाला जोगवामधील लल्लाटी भंडार हे अजय अतुलचच गाणं आठवतय का?
त्याची आठवण येईल इतपत जवळ जाणारी चाल आहे का?
29 Apr 2016 - 7:13 am | सतिश गावडे
डीट्टो. मलाही चाल कुठेतरी ऐकल्यासारखी वाटत होती. फक्त नेमकं गाणं आठवत नव्हतं.
29 Apr 2016 - 12:25 pm | तर्राट जोकर
मला तर येई वो विठठले आरतीची चाल चोरली आहे असे वाटले. ;-)
29 Apr 2016 - 11:11 am | मित्रहो
आपल्याला गाणी आवडली, भारी आवडली. झिंगाट मधला जो ठेका आहे तो जोगवा सारखा आहे. गाण वेगळे आहे पूर्णपणे वेगळ आहे. झिंगाट गाणे मला आवडल ते त्यातल्या शब्दांसाठी. ते तुजसाठी, मजसाठी असले फालतू प्रकार घरी ठेवून तुज्या नावाच इनिशल गोंदल, किंवा उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट, करून दाढी भारी perfume मारून. सर्वसाधारण भाषेतल्या शब्दात आणि तशाच भावनेत लिहलेय. याड लागल मधली सिंफोनी LA मधल्या स्टुडीयोत जाउन रेकॉर्ड करण्यात आली आहे. जगातल्या उत्तम वादकांनी त्यात वाद्ये वाजविली. यु ट्युब वर सुंदर विडोयो आहे. आताच बया का बावरल हे पण मस्त आहे.
वर कुणी तरी किशोर अवस्थेतील प्रेमावर टिका केलीय. प्रेम तेंव्हा नाही करायचे तर काय अर्ध्या गवऱ्या मसनात गेल्यावर करायचे. आम्ही तर तेंव्हाच केल होत बा. आज त्या गोष्टी बायकोला सांगताना हसायला येत. नंतर सोडूनही दिल. आमच्यातल्या काहींचे प्रेम प्रकरण शेवटपर्यंत टिकले. लग्नेही झाली नंतर.
आजच हिंदू मधे सैराटचा रिव्ह्यू वाचला. 'Sairat is not an easy watch especially for last one hour.But it’s a brilliantly crafted film that demonstrates not just the writer-director’s control over the medium but his acute awareness of and anger towards a system that strangles hope with ruthless cynicism.' ही नकारत्मकता मात्र आवडत नाही. समस्या आहेत कठीण आहेत पण सार संपलय असच नाही. कदाचित त्याचमुळे चित्रपट बघनार नाही.
29 Apr 2016 - 3:19 pm | वेल्लाभट
बघून ठरवा ना! रिव्ह्यू वाचून कशाला मतं बनवता?
किशोरवयात प्रेमही करून बघितल्यावरच कळतं... गोष्टी, कविता वाचून कुणी ठरवतं का, करावं की नाही.
सहज म्हटलं हं मी हे. तुमचा प्रतिसाद सुरुवातीला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वाटला आणि शेवटाला एकदम 'सगळ्यांसारखा विचार' वर आला.. म्हणून.
29 Apr 2016 - 5:49 pm | मित्रहो
फक्त रिव्ह्यू वाचूनच नाही तर त्याचा ट्रेलर पण मला त्याच प्रकारचा वाटला. असो बघून ठरवायला हवे हे खरे. चित्रपट वाइट आहे वगेरे मी अजिबात म्हणत नाही. उलट गाणी आणि ट्रेलरमधली काही दृष्य भारी आवडली. तलावात उडी घेतली हे पडद्यावर कसे दाखवता येउ शकते याचे उत्तम उदाहरण आहे.
रिव्ह्यूसुद्धा चित्रपटाची वाहवा करनाराच होता. रिलीजच्या दिवशी हैद्राबादला एका मराठी चित्रपटाचा रिव्हयू इंग्रजी वृत्तपत्रात येणे हीच मोठी गोष्ट आहे.
29 Apr 2016 - 11:41 am | चेक आणि मेट
भारी आहेत गाणी!
नागराजचा सिनेमा रिअॅलिस्टिक असतो,पण
हिराॅईन मोठी वाटते म्हणजे दहावीला आहे असं वाटत नाही.असो ते महत्वाचं नाही.
2008 पासून नागराज या कथेवर काम करत होता,नाहीतर आजकाल एका महिन्यात मराठी चित्रपट बनवून प्रदर्शित करतात.
संगीत अप्रतिम आहे,त्यामुळेच चित्रपट उठावदार दिसेल.
नखरे करण्यार्या मोठ्या कलाकारांना असे सिनेमे म्हणजे जोरदार चपराक आहे.
टीनेजरचं प्रेम हा प्रसिद्धीचा विषय असला तरी सादकरीण भन्नाट आहे.
हॅट्स ऑफ नागराज आणि अजयला.
29 Apr 2016 - 11:47 am | क्रेझी
सैराट बद्दल नकारात्मक पोस्ट यायला सुरूवात पण झाली व्हॉट्स-अपला ह्यातच त्याचं यश कळून येतं :)
29 Apr 2016 - 12:00 pm | दिग्विजय भोसले
नकारात्मक पोस्ट टाकणारे सुसंस्कारी आहेत ओ,त्यांची पोरं सनी लिओनी बघत असतील त्याचा ठाव यांना लागणार नाही,पण नको त्या ठिकाणी पचकून सो काॅल्ड वृत्ती दाखवायची सवय असते त्यांना.
बाकि, वरणभात सिनेमे पाहण्यापेक्षा हा सैराट तडका लय भारी!!!
29 Apr 2016 - 2:53 pm | याॅर्कर
सैराटची नकारात्मक समीक्षा करणे म्हणजे ज्याला सातबारा काय असतो हे माहित नाही आणि चालला कृषीमंत्री व्हायला,अशातला प्रकार हाय सगळा;-)
29 Apr 2016 - 8:52 pm | महासंग्राम
म्हणजे नेमक कायू म्हणायचं आहे तुम्हाला जर स्पष्ट कराल का ???
29 Apr 2016 - 9:31 pm | सतिश गावडे
कशाला विचारत आहात? उत्तर तुम्हालाही माहिती आहे. :)
एका साध्या चित्रपटावरील चर्चेच्या निमित्ताने आजही लोकांच्या मनात जात किती खोलवर रुतून बसली आहे हे स्पष्ट दिसत आहे.
चर्चा उघड उघड दोन गटांमध्ये विभागली गेली आहे.
मेरा भारत महान !!
29 Apr 2016 - 10:46 pm | तर्राट जोकर
गावडेसर, काही रोचक प्रतिक्रिया: https://www.facebook.com/sanjay.s.ranade?fref=ufi
30 Apr 2016 - 9:27 am | महासंग्राम
हो तुमच म्हणन बरोबर आहे गावडे सर पण कलाकृती मध्ये जात कशी येते तेच कळत नाही रच्याकाने काल सैराट पाहिला वरण भात, वरण भात करत फिरणार्यांची लैच ठासली आहे त्यात.
1 May 2016 - 11:12 am | दिग्विजय भोसले
मै क्या बोल रहा हूँ और तुम क्या बोल रहे हो |
मी चित्रपटाची स्तुतीच केली आहे,सरंमजामशाही मलाही पटत नाही.
वरणभात म्हणजे बुळबुळीत रोमँटिक सिनेमे असं म्हणायचयं मला,
एक सांगू का आमच्या घरी रामदासनवमी साजरी होते,नऊ दिवस दासबोधाचं पारायण होतं तसेच घरातील बरेचजण वारकरी आहेत,मला शास्त्रीय संगीताची आवड आहे.मला वरणभातही खूप आवडतं.
बाकि तुमने मेरा आडनाव देखके गलत मतलब निकाला,
तसाच मी असतो तर चित्रपटाला विरोध केला असता ना!
1 May 2016 - 9:09 pm | रेवती
तुमचं नाव व आडनाव खूपच भारदस्त आहे.
29 Apr 2016 - 9:44 pm | चंद्रनील मुल्हेरकर
म्हणजे नेमक कायू म्हणायचं आहे तुम्हाला जर स्पष्ट कराल
का ???>>>>>>>>>> " तु मला लै आवडतोस" असं स्पष्ट सांगण्याऐवजी " मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे" असे वाकड्यात सांगणारे चित्रपट.
29 Apr 2016 - 10:02 pm | तर्राट जोकर
स्वप्निल जोशीवाले सिनेमे म्हणायचे असेल ... =))
रच्याकने, गेल्या वीस वर्षात सामाजिक आशय असलेले त्याचवेळी तुफान गाजलेले मराठी सिनेमे कोणते ह्याची लिस्ट काढीन म्हणतो यानिमित्ताने. कुणाकडं नाव असतील तर सुचवा.
29 Apr 2016 - 12:17 pm | ऋषिकेश
त्सल्या फॉरवर्ड लिहिणारे स्वतःच्या लहानपणी शाळेत गांधारी बनून फिरत होते का डाउट येतो
29 Apr 2016 - 12:18 pm | तर्राट जोकर
सौ चुहे खाको बिल्ली चली हजको हा प्रकार आहे ...
29 Apr 2016 - 12:31 pm | साहेब..
सैराट पाहणार आहे.
सैराट मध्ये एक गावाकडचा बाज आहे.
(शहरात राहून गावठी असलेला) - साहेब..
29 Apr 2016 - 12:34 pm | पिलीयन रायडर
एवढी काय चर्चा झाली बुवा म्हणुन पाहिलं तर इथेही नेहमीचे कलाकार नेहमीचेच मुद्दे आणताना पाहुन आनंद झाला.
उद्या पिक्चर अगदी मनापासुन आवडला नाही तरी म्हणायची चोरी होणार असं दिसतंय एकंदरित!
29 Apr 2016 - 12:46 pm | तर्राट जोकर
अर्रे तुम घबराते कयकू, भारतात शेकड्याने पिच्चर रिलीज होतात, काही गाजतात, काही वाजतात, काही आवडतात काही नाही आवडत. सैराटची हाईप नै आवडत कोणाला तर नै आवडत. आता आवड आवड है, उसमें क्या शर्माना, छुपाना.
29 Apr 2016 - 2:48 pm | पिलीयन रायडर
नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच आहे".."गुप्ते, कुलकर्णी नाइतर इनामदारांचेच संगीत आवडणार".."पुण्या मुंबईच्या लोकांना नाहीच आवडणार.." वगैरे वगैरे मतं ऐकुन बिचकायला झालं ना राव!
एक साधा पिक्चर.. त्याची २ गाणी.. त्यावरुन मुददा पार जात आणि पुणे-मुंबई वर जाईल असं जन्मात वाटलं नव्हतं...
असो.. जोगवाची गाणी आवडली होतीच.. तशीच ही दोन गाणी आहेत.. साधारण एकाच ठेक्याची.. इतकेच साधेसे म्हणणे होते.
(तळटीपः- अजय- अतुल ह्यांचे आडनाव माहित नाही. गाव माहित नाही. संगीत फक्त माहिती आहे.)
29 Apr 2016 - 2:49 pm | अभ्या..
अजय अतुल गोगावले
29 Apr 2016 - 2:55 pm | पिलीयन रायडर
ओके! धन्यवाद!
29 Apr 2016 - 3:05 pm | तर्राट जोकर
काय झालंय ना तै, सोशलमिडियावर चित्रपटाच्या विरोधात दोन प्रवाह आहेत आणि ते ठळक आहेत. एक प्रवाह थेट जातियवादी आहे, त्यात स्पष्टपणे 'मंजुळेला नेहमी मराठ्यांच्याच पोरी दिस्तात का, आमच्या पोरीबाळी रस्त्यावर पडल्यात का' वाला अतिजहरी अपेक्षित थयथयाट आहे. दुसरा प्रवाह सोज्वळ, साजुकतेचा आव आणून 'माजघरी संस्कार हरवले तर' ची कुजबूज काळजी करणारा आहे. त्यात एक क्षीण असा तिसरा प्रवाहही आहे ज्यात 'ह्यॅ, एवढं काय डोक्यावर घेताय, काही क्रांतीकारी नैये त्या चित्रपटात, नेहमीचेच तर आहे सगळं, पोरंपोरी पळून जाण, प्रेमात पडणं, संघर्ष, काय तीर नाय मारलाय मंजुळेने'.
असे तीन प्रकट प्रवाह ह्याच विवक्षित चित्रपटाबद्दल (तेही तो न बघताच) निर्माण होतात तेव्हा त्याच्या गंगोत्री कुठे आहेत हे कळणं अवघड नाही. केवळ 'चित्रपट आहे, चांगला आहे वाईट आहे, आवडला, नाही आवडला, झालं' असा अॅप्रोच नाही.
दिग्दर्शक कुठेतरी त्रासदायक काम करत आहे, ते कुणाला त्रासदायक आहे हे कळलं तर दुखणं यागळं आहे हे लक्षात येते.
बाकी अजय-अतुल ग्रामीण बाज ठेवतात, महाराष्ट्रीय लोकसंगित म्हणजे कोळीगीते, देवीचा गोंधळ इतकंच नाही हे त्यांच्या संगितातून कळते, ती त्यांची शैली आहे. प्रत्येक संगितकाराची एक शैली असतेच. ए आर रेहमान असो वा हिमेश रेशमिया, की शंकर जयकिशन वा खय्याम, पंचमदा वा इल्लयराजा, एम एम क्रीम. धाटणीबाज संगित असतं. कोणाची आवड कशात असते, नसते हे आपण कोण ठरवणारे? पण खोचक कमेंट्स कळतात. असो.
29 Apr 2016 - 3:12 pm | पिलीयन रायडर
असेल असेल..
मी सोशल मीडियावर म्हणाल एक ह्या लेखावरच्या प्रतिसादांव्यतिरिक्त काहीही वाचलेले नाही. म्हणुन मला जास्तच आश्चर्य वाटले असेल.
अजय अतुल विषयी बोलायचं झालंच तर ते दोघे त्यांच्या कामात अव्वल आहेत ह्यात वादच नाही. त्यांचे "माऊली" गाणे माझे फार आवडते गाणे आहे. पण म्हणुन त्यांच्याविषयी चकार शब्द काढायचा नाही असं नसतं ना. "अप्रतिम" च्या खाली एकही मत आलं तर लोक अंगावर धावुन का येत आहेत ते कळत नाही. तुम्ही नक्की कोणत्या खोचक कमेंट बद्दल बोलताय माहित नाही. पण एकंदरित सगळेच तलवारी घेउन उभे आहेत. पिक्चर/गाणी आवडलेलेही आणि न आवडलेलेही.. असोच..
29 Apr 2016 - 3:20 pm | तर्राट जोकर
ती लोकं गाणी बनवतात, वाजवतात, लोकं ऐकतात, डोक्यावर घेतात, तेंचे पिच्चर हिट होउन तेंना चिक्कार पैसे मिळतात. तलवारबाज नपुंसक तलवारबाजी करतात. चालायचंच. =))
29 Apr 2016 - 3:21 pm | हाडक्या
+१ हो तजो.. सहसा तुमच्याशी सहमत व्हायला होत नाही पण इथे अगदी थोडक्यात व्यवस्थित मुद्दा मांडलाय तुम्ही.
29 Apr 2016 - 3:30 pm | lakhu risbud
तजो यांच्याशी दुसऱ्यांदा सहमत !
29 Apr 2016 - 3:36 pm | तर्राट जोकर
चक्क चक्क??? आज सुर्य कुणीकडे? =))
29 Apr 2016 - 10:45 pm | काळा पहाड
नै कळ्ळं आमाला. जरा इस्कटून सांगा ना.
अच्छा म्हणजे लोकांनी त्यांची वाईट्ट वाईट्ट मतं प्रकट करू नयेत अशी तुमची इच्छा आहे तर. फक्त चांगली मतंच प्रकट करूया तर मग.
बाकी चित्रपट तर बघणारच. पण टीव्हीवर. कॅप्टन अमेरिका आणि द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी मधेच बजेट संपणार. तेव्हा आमची चित्रपट विषयक मतं तीन महिन्यांनी.
2 May 2016 - 1:41 am | बोका-ए-आझम
आईशपथ खरं. हगवणे बंधूंच्या ( हे आडनाव पण खरं आहे) वाड्यात राहायचे ते लहानपणी. कुटुंबाच्या मूळ गावाबद्दल कल्पना नाही.
2 May 2016 - 9:00 am | lakhu risbud
पुण्या जवळच्या भूगाव/भूकुम चे असतील ते,
आत्ता नाव सूर्यवंशी लावतात त्यांच्यातील बहुतेक लोक.
लई मालदार पार्ट्या हायेत, जमिनिंला भाव किती आलाय बघितलं का ?
6 May 2016 - 9:32 pm | पांथस्थ
ह्याला दुजोरा!
3 May 2016 - 10:56 am | सामान्य वाचक
काहीही लिहिण्यात अर्थ नाही
ती प्रतिक्रिया कुठल्या चष्म्यातून पहिली जाईल याचा नेम नाही
बाकी प्रचेतस यांच्याप्रमाणेच मत आहे
इंग्लिश चित्रपट पाहणे खूप बरे
आणि त्या चित्रपटांवर टीका केली तरी कुणी काही म्हणत नाही
29 Apr 2016 - 2:10 pm | मार्मिक गोडसे
दोन्ही गाणी ०.२२ से. पासून् पुढे ४- ५ से. ऐका. दोन्ही गाण्यातील ठेक्यात काही साम्य वाटते का?
29 Apr 2016 - 2:14 pm | तर्राट जोकर
गोडसेसाहेब, ठेका गावठीच आहे. ९९ टक्के भक्तीगीतांचा ठेका एकच आहे आणि कोळीगीतांचाही, तसेच लावणीचा आणि बर्याच लोकगीतांचा. तुमरा केहना का है नेमका?
2 May 2016 - 1:34 am | बोका-ए-आझम
वारक-यांचा ' रामकृष्ण हरी ' हा ठेका आणि डिस्को ठेका हा एकच. केशवराव बडग्यांच्या कार्यक्रमात ते स्वतः हे वाजवून दाखवत असत.
29 Apr 2016 - 3:49 pm | तर्राट जोकर
बघा अभ्याभौ, बोललो होतोकी नै... थेटरात राडा.
29 Apr 2016 - 3:54 pm | मराठी कथालेखक
multiplex मध्ये राडा ? स्थळ ?
29 Apr 2016 - 4:04 pm | तर्राट जोकर
राडा बोले तो ये
स्थळः सिटी प्राईड पुणे.
29 Apr 2016 - 5:58 pm | बाळ सप्रे
धन्यवाद.. राड्याचे दर्शन घडवल्याबद्दल.. सणासुदीला रस्त्यावरून जाणार्या डीजेवाल्या मिरवणूकींची आठवण यावी असा राडा दिसतोय..
थोडक्यात चित्रपट कितीही चांगला असला तरी किमान २-३ महिने हा चित्रपट सिनेमागृहात जाउन पाहू नये असंच वाटतय सध्या..
29 Apr 2016 - 6:01 pm | तर्राट जोकर
चित्रपट कितीही हिट गेले तरी आजकाल दोन तीन महिने राहतात का ते ठवूक नाही. बाहुबली अपवाद होता. तिसर्या आठवड्यात बघणे उत्तम. अर्थात हा राडा फक्त एक-दोन गाण्यापुरता असेल असे वाटते.
29 Apr 2016 - 6:21 pm | अनुप ढेरे
चित्रपट बघायची खूप इच्छा आहे. पण दंग्यात बघता येणारे नाही नीट. २-३ महिने नाही पण २-३ आठवड्यांनीच बघावा असं वाटतय.
फॅंड्रीसारखं होऊ नये असं वाटतय. जाहिरातींवरून पब्लिकला तो सिनेमा टाईमपास सारखा दंगा पिक्चर वाटला होता बहुधा. पण प्रत्यक्ष सिनेमातला विषय खूपच गंभीर होता. पब्लिक मग नको तिथे हशे/शिट्ट्या टाकत होते.
30 Apr 2016 - 9:06 am | नाखु
या वाक्याने माझ्या मनातले लिहिल्याबद्दल धन्यवाद
तसंच काहीस्म किल्ला च्या जाहीरातीवरून मुलांना शाळासारखे प्रेम प्रकरण आहेका असे वाटले आणि सिनेमात तसे नसल्याने अगदी गंभीर प्रसंगातही लोक शिट्ट्या मारीत होते.हाच अनुभव मी अगदी प्रकाश बाबा आमटे सिनेमात (अगदी म्ल्टीप्लेक्स ला घेतला आहे,अदिवासी स्त्री वर पोलिस अत्याचार करतो तेंव्हा टाळ्या आणि शिट्ट्या पाहिल्या आहेत ) आणि मी अश्या सूज्ञ मराठी प्रेक्षकांची प्रगल्भता पाहून धन्य झालो.
अति अवांतर : अमराठी प्रेक्षक मराठी सिनेमा जास्ती निगुतीने पाहतात आणि दर सिनेमात फक्त मनोरंजन शोधीत नाहीत असे माझ्या अमराठी मित्रांकडूनच समजले.
असो साठमारीत (आणि इथेही जात-उकीरडा प्रतिसादात) हा प्रतिसाद सिनेमा (बाबतच) होता म्हणून टंकले.
आधिक उणे माफी.
अनुप स्नेही नाखु
29 Apr 2016 - 7:02 pm | सत्याचे प्रयोग
सकाळी ९ च्या शोला फुल्ल धिंगाणा घातला लोकांनी प्रथमच अनुभव आला असा
29 Apr 2016 - 6:34 pm | अभ्या..
अगदी अगदी,
आमच्या हिकडं अॅडलॅबचा आणी प्रभातचा रस्ता ब्लॉक चक्क. सगळं पब्लिक सैराट.
29 Apr 2016 - 8:24 pm | सतिश गावडे
हे राडा घालणारं पब्लिक नेहमीचंच राडा घालणारं पब्लिक असेल ना?
29 Apr 2016 - 10:03 pm | तर्राट जोकर
नेहमीचंच म्हणजे?
29 Apr 2016 - 3:54 pm | मराठी कथालेखक
आताच थोड्यावेळापुर्वी फॅनची तिकिटं घ्यायला मल्टीप्लेक्सला गेलो तेव्हा सैराट हाऊसफूल्ल चाललाय अस दिसलं.
मी वगळता बाकीचे सगळेच जण सैराटच्या तिकिटांचीच मागणि करत होते.
आणि सैराटमध्ये फारसा रस नसतानाही तिकिटबारीवरील ते दृश्य सुखावलो.
संगीत अजून अगदी नीट ऐकलं नाही. पण एकूणात अजय-अतुलचं संगीत अनेकदा आवडतंच (मी कुणाचाही भक्त नाही , हिंदी मध्ये SEL चा चाहता आहे पण तरी त्यांचीही काही गाणि नाही आवडली तर नाही आवडली असंच म्हणतो).
29 Apr 2016 - 11:40 pm | हेमंत लाटकर
शालेय मुलांच्या प्रेमप्रकरणावर आधारित पिक्चर काढून मुलांच्या मनावर वाईट संस्कार होत आहेत. अभ्यास करण्याच्या वयात प्रेम त्यावरून मुलात भांडणे या गोष्टीत वाढ होत आहे.
30 Apr 2016 - 1:18 am | पुणेकर भामटा
लवकर चांगल्या डाॅक्टरचा सल्ला घ्या, अपचन आरोग्याला हानीकारक असते।
आपला नम्र पुतण्या,
भामटा।
30 Apr 2016 - 12:27 pm | मितभाषी
उच्च कलाकृती. हॅट्स ऑफ नागराज. चला हवा येउ द्या मधे अरविंद जगताप ने म्हटल्याप्रमाणे नागराज हा दिवानखान्यातला मनिप्लांट नाही तर पडक्या भिंतीवर आपसूक उगवणारा , कुणाच्या खतपाण्यावर अवलंबून नसणारा "स्वयंभू" आहे. हे परत एकदा सिध्द झाले.
30 Apr 2016 - 4:23 pm | विवेक ठाकूर
वॉट अ ग्रेट सिंफनी ! आणि मराठी मनाला भावेल असा, ग्रामीण मातीचा (फोक) स्वर पाश्चात्य ऑरकेस्ट्रेशनमधून इतक्या प्रभावीपणे मिळवणं. ते ही नोटेशन्स न लिहीता येणार्या संगीतकारांनी... अजय-अतुल केवळ सलाम!
30 Apr 2016 - 5:34 pm | rahul ghate
उत्सुकते पोटी १स्त दिवस 1st day 1st show , आणि सर्व नकारात्मक प्रतिक्रिया देणार्यांची कीव वाटली , अतिशय वास्तवदर्शी कथा चं प्रकारे रंगवली आहे , खरच शेवटचा १ तास चित्रपट बघायला कठीण आहे ,
30 Apr 2016 - 8:15 pm | सिरुसेरि
सैराट मधील गाण्यांचे संगीत व सादरीकरण , चित्रिकरण अप्रतीम आहे . अजय-अतुल , यांतील कलाकार , दिग्दर्शक नागराज मंजुळे , निर्माते झी टिवी या सर्वच टिमने आपापली कामगिरि चोख बजावली आहे .
साउथमध्ये ग्रामीण बाज असलेले चित्रपट खुप पुर्वीपासुन बनत असल्याने कदाचित सैराट मधील गाण्यांवर साउथची छाप वाटु शकते ( उदाहरणादाखल खालील लिंक्स ). पण सैराट मधील गाण्यांनी स्वताची वेगळी , तोडीस तोड , सरस ओळख निर्माण केली आहे . सैराट मधील गाण्यांचे सादरीकरण , चित्रिकरण खुप संयमित , वास्तववादी आहे .
https://www.youtube.com/watch?v=A0BPkm95-dc
https://www.youtube.com/watch?v=_Mjr3rDvQtg
https://www.youtube.com/watch?v=H6rUress3Q8
1 May 2016 - 1:20 am | खटपट्या
मराठ्यांनो....जे वास्तव आहे ते स्विकारा अन् चुका सुधारुन प्रगती करा !!!!
- अमरजित पाटील.(९८५०९८१००९)
"सैराट"ने मराठा समाजातील सरंमजामशाही मानसिकता आजही कायम असलेले वास्तव अधोरेखित केले आहे."सैराट"ला केला जाणारा विरोध हा सरंमजामशाही मानसिकता आज बदली गेली नसल्याचा पुरावाच आहे.
मराठा समाजात पोरीने जातीबाहेर प्रेम अथवा लग्न केले तर पोटच्या पोरीचा मुडदा पाडणारी अनेक प्रकरणे घडली आहेत.घडत आहेत.हे कडवट सत्य कितीही नाकारायचे नाटक केले तरी वास्तव बदलत नाही.आपल्या देशात जातीव्यवस्था जरी ब्राम्हणांनी निर्माण केलेली असली तरी ती कट्टरपणे जोपासण्यात मराठ्यांचा नंबर बराच वरचा आहे.आणि हिच सरंमजामशाही मानसिकता मराठा समाजाच्या सामाजिक,सांस्कृ
तिक,शैक्षणिक,अर्थिक अशा अनेक क्षेत्रातील अधोगतीचे कारण आहे.
नागराज मंजुळेंनी मराठा समाजाच्या या ठसठसत्या बेंडावरतीच नेमके भाष्य करणारे "सैराट" सादरीकरण केल्यामुळेच अनेक मराठ्यांना र्मिच्या झोंबल्या आहेत.मराठा समाजाची सार्वजनिक वागणूक कायम दुटप्पी राहिली आहे.उदा :- आम्हाला शरद पवार मराठा आहेत म्हणून अभिमान असतो, पण याच शरद पवारांच्या घरातील "सोशल इंजिनियरींग" आम्ही मरेपर्यंत स्विकारायला तयार नसतो.दुसरे उदाहरण म्हणजे,आम्हाला ओ.बी.सी.मधून आरक्षण पाहिजे पण आम्ही आमचा वर्णवर्चस्वातून आलेला उच्चपणा सोडायला तयार नसतो.येवढेच काय ? आपल्याला या वास्तवाची ठसठसणारी जखम उघडी करुन दाखवली तरी आम्ही त्याला सरंमजामशाही मानसिकता दाखवत शिव्या घालणारच...मग तो नागराज मंजुळे असो वा अमरजित पाटील !!!
निळू फुले म्हणतात त्यावर माझा कायम विश्वास आहे. "समाज कधी तमाशाने बिघडत नसतो अन् किर्तनांने सुधरत नसतो."हे एक सार्वकालिक सत्य आहे.
1 May 2016 - 6:18 am | तुषार काळभोर
पण असली अस्मितेची गळवे सगळ्यांनाच असतात. जातीय व धार्मिक अस्मिता (सगळ्यांच्याच) ठेचायला हव्यात. कारण त्यात एकाची समर्थनीय व दुसऱ्याची निंदनीय असा भेद करता येत नाही.
बाकी, निळू फुलेंचं वाक्य
"समाज तमाशाने बिघडत नाही अन किर्तनाने सुधारत नाही", हे मिपावरच्या काही 'अलोकनाथांना' कसे समजावून सांगता येईल?
@खटपट्या: यातला एकही शब्द वैयक्तिक तुमच्यासाठी नाहीये. मी फक्त मिपावर कधीकधी (आजकाल बऱ्याचदा) दिसणारी सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्वस्तरीय असहिष्णुता पाहून वैतागलोय.
1 May 2016 - 7:59 am | खटपट्या
नो प्रोब्लेम पैलवान, आय कॅन अंडरस्टँड...
1 May 2016 - 6:25 am | अविनाशकुलकर्णी
असे वाच्नात आले कि...............
तेलगू मधील बारा वर्षापूर्वी आलेल्या प्रेमिस्ते चित्रपट आहे त्या वर हा शिणेमा आधारित आहे
1 May 2016 - 7:33 am | हेमंत लाटकर
टाईमपास आणि सैराट या दोन पिक्चर मधील शेवट एकदम भिन्न आहे.
1 May 2016 - 8:48 pm | तर्राट जोकर
सैराट चित्रपट परिक्षणः
आधी अधीर झालुया | मग बधीर झालुया
[ह्या चित्रपटाचे परिक्षण लिहू नये असे मी ठरवले आहे. प्रत्येकाने मिळेल तेव्हा मिळेल तसा मूळ चित्रपटच बघून घ्यावा. नको असलेल्यांना बघण्याची काही एक आवश्यकता नाही. वरणभातावर एक चमचा तूप अजून ओतून घ्या आणि टीवी चे रिमोट हाती घ्या.]
जमले तर भाष्य लिहीन कधीतरी उशिरा. आता जाता जाता एवढेच. की मंजुळेने एक नवाच प्रकार निर्माण केला आहे चित्रपटसंस्कृतीत (इतर भाषेत झाला असल्यास नै माहित). प्रेक्षक हे सिनेमाचा भाग बनवणे तेही चित्रगॄहात येण्याच्या कैक काळाआधीपासून आणि मग चित्रपटाला प्रेक्षकांचा भाग बनवणे थिएटर सोडल्यानंतर कैक काळ. -अर्थात संवेदनाशील मनांस लागू.
2 May 2016 - 12:58 am | बोका-ए-आझम
त्या मानाने सैराट ठीक आहे. फँड्रीची कथाच जबरदस्त होती. कदाचित म्हणूनच नागराज मंजुळेनं तेव्हा संगीत हा एवढा महत्त्वाचा मुद्दा केला नव्हता. सैराटच्या कथेत तसं नाविन्य नाहीये. फँड्रीला मी ५ पैकी ५ मार्क दिले होते. सैराटला ५ पैकी ३. पण सैराटची गाणी मस्त आहेत. पंजाबी गाण्यांना ठेका धरणाऱ्यांना आवडेल असं संगीत आहे. ज्याचे पाय आपसूक ताल धरणार नाहीत त्याचा काहीतरी problem आहे किंवा मग तो औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे.
बाकी मिपालोकनाथांचा त्रागा बघून गंमत वाटली. १९७२ च्या बाॅबी पासून आपल्याकडे teen ager प्रेमकथा येताहेत. राज कपूरने हिंदीत केलेलं चालतं आणि नागराजने मराठीत केलेलं चालत नाही? मुळात ज्याला बिघडायचं आहे तो शिवमहिम्नस्तोत्र आणि रामरक्षा वाचूनही बिघडू शकतोच की.
2 May 2016 - 1:11 am | तर्राट जोकर
बर्याच अंशी सहमत. रसग्रहणाबद्दल टेस्टबड्स वेगळ्या असू शकतात.
बाकी मिपालोकनाथांचा प्रश्न नाही. कुणीतरी फेसबुक फॉरवर्ड इकडे चिटकवलं. ती मुलगी रीअल लाईफमधे ७वीत असतांना सिलेक्ट झाली, तीला वजन वाढवून यायला सांगितले ती आठवीत असतांना शूटींग झालं, ही बातमी मोडून्तोडुन अफवा झाली की "हिरोईन फक्त सातवीतली आहे" म्हणजे सातवीतल्या पोरापोरींचे लफडे दाखवले काय इ. इ. खरे तर ती दोघं मस्त एफवायबीएला म्हणजे सज्ञान दाखवलीत. फुफाटा उडवणारे साप समजून काठी धोपटत बसलेत.
बाद्वे, हिरवीनला नववीत ८१% पडले म्हणे, यंदा दहावी. मिपालोकनाथो, प्रेमात पडुनही मार्क चांगले मिळतात. =))
2 May 2016 - 8:16 am | नाखु
मग या आलोकनाथांना थ्री इडीयट कसा पचला...
सिनेमातला विद्यार्थी अमिरखान तर त्यावेळी फक्त ४०+ होता.....
चालायचेच सम आर एक्वल स्म आर मोअर एक्वल...
2 May 2016 - 12:30 pm | बबन ताम्बे
भारी शब्द शोधून काढलाय :-)
2 May 2016 - 9:55 am | लई भारी
नुसते प्रोमो बघून चित्रपट न बघता चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही आहे.
विषय तोच असला तरी त्याची ट्रीटमेंट जबरी आहे.
ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी शेवट सांगणाऱ्या पोस्टस पासून दूर राहावे.
बाहेर आल्या नंतर सुद्धा कितीतरी वेळ डोक्यातला भुंगा जात नाही. काय होतंय कळत नाही. आणि ही जादू प्रोमो मध्ये जे दाखवले आहे त्याच्या पलीकडच्या चित्रपटाची आहे.
2 May 2016 - 11:42 am | लालगरूड
‘सैराट’ बघून पौगंडावस्थेतील मुले बिघडतील
अशी भीती आता काही
समाजहितचिंतकांना वाटू लागलीय म्हणे.
पहिल्यांदा ज्यावेळी ‘शाळा’ सिनेमात
किशोरवयीन मुलांचे प्रेम दाखवले त्यावेळी
कधी कुणाला भीती वाटली नाही. ‘बी.पी.’
सिनेमात लहान मुलांना porn film पाहताना
दाखवले त्यावेळी कुणाला मुले बिघडण्याची
भीती वाटली नाही. त्यानंतर ‘टाइमपास’
मध्ये पौगंडावस्थेतील मुलांचे प्रेम दाखवले
त्यावेळी कुणाला मुले बिघडण्याची भीती
वाटली नाही. १२-१३ वर्षांची मुले नेट कॅफे
आणि मोबाईलवर porn films बघतात तेव्हा
कुणाला मुले बिघडण्याची भीती वाटत
नाही. पण जसा ‘फॅन्ड्री’ येऊन गेला तशी या
समाजहितचिंतकांना पौगंडावस्थेतील मुले
बिघडण्याची भीती वाटू लागली. आणि
आता अजून ‘सैराट’ रिलीज व्हायचा आहे, त्यात
काय आहे हे अजून समजायचे आहे तोवरच हे
समाजहितचिंतक जागे झाले. लगेच ओरड सुरु
झाली. कारण स्पष्ट आहे. ‘फॅन्ड्री’मध्ये मारलेला
दगड वर्मी लागला आहे. ‘फॅन्ड्री’मधून
जातीव्यवस्थेवर केलेला हल्ला पचनी पडलेला
नाही. म्हणूनच आता ही ओरड सुरु झालीय. ही
फक्त मळमळ आहे. समाजहिताची तळमळ नाही.
तेव्हा सर्वांनी बिनधास्तपणे सैराट होऊन
चित्रपटाला प्रतिसाद द्या.
........ whatsapp
ती 'सैराट' ची शेवटची दोन मिनिटे डोकं सुन्न करणारी आणि ह्रदयाचे ठोके चुकवणारी ......(सोडून)
या जात पाती ने बरबटलेला समाज कुठल्याही थराला जावून असंविधानिक रूपाने पोटच्या अपत्याला कश्या प्रकारे बळी देतो
याचं खुपच छान विश्लेशण मा नागराज पोपटराव मंजुळे यांनी सैराट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
चित्रपट छान वाटला पण चित्रपटाची चिकित्सा करत करत बघायला आणखी छान नक्की वाटेल...!
आम्ही पाहिलेल्या पिंपरी मधील ई~स्कवेर सिनेमा हाॅल फुल्ल होता
प्रेक्षक 2 तास 48 मिनिटं फक्त शिट्या, टाळ्या, आणि आरडा ओरड आनंदाने करत होते पण 170 मिनिटाच्या शेवटच्या 2 मिनिटा मध्ये जे दाखवलं गेलं
अख्खा च्या अख्खा चित्रपट विसरून गंभीरपणे प्रतेक प्रेक्षक चित्रपट हाॅल मधून बाहेर पडत होता
...
त्याला मी ही अपवाद नव्हतो
असो.........
आवश्य बघा छान चित्रपट आहे
.......
.......
...........
2 May 2016 - 10:05 pm | shawshanky
शाळेतली पोरं बिघडतील म्हणुन सैराटला विरोध करण्याऱ्यांनी....
मास्तर बिघडतील म्हणुन पिंजरा ला विरोध का केला नाही.....
4 May 2016 - 12:57 pm | पुंबा
नाय तर काय!!
3 May 2016 - 10:37 am | मितभाषी
आर उर्रात होती धडधड लाली अंगावर आली
अन अंगात भरली हि प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट
फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी perfume मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात
3 May 2016 - 10:37 am | मितभाषी
आर उर्रात होती धडधड लाली अंगावर आली
अन अंगात भरली हि प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट
फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी perfume मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात
3 May 2016 - 8:41 pm | मंदार कात्रे
आज सैराट पाहिला . चांगला चित्रपट आहे . पण एवढा गवगवा केलाय तसा भिडला नाही मनाला . सिनेमॉटोग्राफी उत्तम आहें . दाक्षिणात्य प्रभाव जाणवतो . माझ्याकडून ३*
3 May 2016 - 9:59 pm | याॅर्कर
चित्रपट पाहिला,पाहण्याआधी समर्थन करत होतो,पण पाहिल्यावर त्रुटी जाणावल्या.
अतिरंजितपणा दाखवून एखाद्या समाजाला सरळसरळ टार्गेट केलं आहे.
राजकीय/आर्थिक/सामाजिक उन्माद दाखवलेला आहे.काही ठिकाणी उन्माद आहेच,आणि त्याचं वास्तव दर्शन घडवलेलं आहे.
शेवटची दोन मिनटे सुन्न करणारी आहेत.
माझं वैयक्तिक मत असं आहे कि ग्रामीण भागामध्ये असणारं जे प्रेम असतं ते प्रेम नसून आकर्षण असतं,शारिरीक गरज भागली कि गाशा गुंडाळला जातो,ही डोळ्यासमोर घडलेली उदाहारणे आहेत.
बाकि,कलाकृती उत्तम आहेच,विरोधाचा प्रश्नच नाही,फक्त आपलं मत मांडलं एवढचं!
["निळा दहशतवाद" यावरसुद्धा पुढे नागराज चित्रपट बनवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.]
3 May 2016 - 10:14 pm | तर्राट जोकर
["निळा दहशतवाद" यावरसुद्धा पुढे नागराज चित्रपट बनवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.]
>> तुम्हीच बनवा ना तो चित्रपट. त्याची कशाला वाट बघताय?
बाकी तुमचं ग्रामिण भागातल्या प्रेमाबद्दलचं मत वाचुन अंमळ करमणुक झाली.
त्रुटी असलेली कलाकृती उत्तम आहेचही म्हणत आहात. तुमचं मत मनोरंजक आहे. ;)