अवघा महाराष्ट्र सैराटमय

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 9:27 am

नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.

नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.

अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.

कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.

अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.

चित्रपटअभिनंदनआस्वादबातमी

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 9:32 am | प्रचेतस

मी तर क्याप्टन अमेरिका सिव्हिल वॉरमय झालोय. ६ मे ची वाट बघणे आले.

जेपी's picture

28 Apr 2016 - 9:36 am | जेपी

+1 civil war ची वाट बघतोय.

बाकी सैराट ची हिरोईन या वर्षी दहावीत जाईल हे कळालय.

नया है वह's picture

28 Apr 2016 - 4:01 pm | नया है वह

+१

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2016 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

आलेच !!

कुठेही मराठी हिंदी चित्रपटांचा विषय निघाला की वल्ली सर "आम्ही फक्त ईंग्लिश चित्रपट पहातो" असा बॅनर घेवुन तिथे उभे रहायला आलेच म्हणुन समजा !!

=))))

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 4:18 pm | विजय पुरोहित

पण काही म्हणा! 'झिंगाट'ने सध्या धमाल उडवून दिलीय खरी! कुणी काही म्हणो. आपल्याला तर आवडले गाणे.

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2016 - 4:28 pm | प्रमोद देर्देकर

म्हणुनच एक दिवस एखादा इंग्लिश पिक्चर मी वल्ल्लीदांना बरोबर घेवुन बघणार आहे.
पडद्यावर काय संवाद चालले आहेत ते लगेच भाषंतरीत कारायला सांगणार आहे. जल्ला आमाला ती भाषा कलतंच नै. वल्ल्लीदा याल ना.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 4:46 pm | विजय पुरोहित

सहमत ओ काका. साला इतके भराभरा उच्चार करतात. सगळंच नुडल्ससारखं एकमेकांत गुंतलेलं वाटतं. जल्ला काय कल्ला नाय होतं.

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 5:54 pm | प्रचेतस

सोप्पंय.
आजूबाजूच्या लोकांकडे नजर ठेवायची. ते हसले की आपणही हसायचं, त्यांनी शिट्ट्या मारल्या की आपणही मारायच्या. सगळा पिक्चर कळतो.

बाकी हल्ली बऱ्याच थेटरांत इंग्रजी सबटायट्ल्स दाखवतात शिवाय हिंदी डबही असतोच. त्यामुळे कळायचा प्रश्न येत नै फारसा पण मूळ इंग्रजी भाषेतूनच बघणे उत्तम.

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 6:17 pm | सतिश गावडे

ओए…ये र….र…रा कर के मन्ने रागणी ना सुणा ओर सीधी तरिया अपणा नाम बता.

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 6:28 pm | प्रचेतस

क्विकसिल्वर गावडे सर.

नाखु's picture

29 Apr 2016 - 10:12 am | नाखु

शिणेमे "बघण्यासाठी" असत्यात डोयलॉक ऐकण्यासाठी नाही

अशे आमच्ये कालेज सिनेमा गुरु सांगीत असत याची आठवण झाली..

सब घोडे (सिनेमे) बारा टक्के वाला नाखु.

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ

- ल्लुलुबंध.

वल्ली सरांशी शहमत, टुकार शॆराट पाण्यापेक्षा माझा लाडका कप्तान अम्रिका कधी एकदा येतोय असं झालय :D
नागराज मंजुळे ने अता काहीतरी वेगळे करावे सेम विथ अजय अतुल तोच नाशिक ढोल, तोच ठेका, त्याचत्याच चाली

असो

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 9:37 am | सतिश गावडे

खुपच कौतुक ऐकलं होतं "झिंगाट" गाण्याचं. आता पाहीलं. काही विशेष वाटलं नाही.

तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.

हिरोईनच नव्हे, आक्खं गाणं ढिगाने साउथचे पिक्चर पाहून बनवले आहे असे वाटते. :)

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 10:08 am | विजय पुरोहित

मला तरी व्यक्तिशः अतिशय आवडले झिंगाट हे गाणे. चित्रपट बघु या नंतर. पण आत्ता कायप्पा आणि चेपुवर जबरदस्त हाईप निर्माण करण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट. सैराट गाणं पण अप्रतिम आहे.

रघुनाथ.केरकर's picture

28 Apr 2016 - 10:39 am | रघुनाथ.केरकर

मुम्बईत , महरष्ट्रात रेकोर्डींग स्टुडिओज असताना अजय अतुल अमेरिकेत गाणं रेकोर्ड करुन आलेयत,

हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?

चांदणे संदीप's picture

28 Apr 2016 - 11:01 am | चांदणे संदीप

हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?

याऐवजी, हे पुण्याला (पुण्यात नाहीयेत तरीही) पण झालं अस्तं नां? अस म्हटल असतं तर एक वेळ पुणेरी प्रतिसाद ठरून पुण्याच्या मानात तेवढीच भर तरी पडली असती. पण आता काय उपयोग, मुंबैच नाव घेऊन काय मजा नाय येत. ;)

Sandy

वेल्लाभट's picture

28 Apr 2016 - 11:12 am | वेल्लाभट

असतं. केलं अमेरिकेत. काय बिघडलं?

अविनाश लोंढे.'s picture

29 Apr 2016 - 1:21 am | अविनाश लोंढे.
वेल्लाभट's picture

28 Apr 2016 - 11:11 am | वेल्लाभट

गाणी सुंदर आहेत.

झिंगाट ऐकताना 'रिगा डिंग डिंग साँग' (इंग्रजी) आणि याड लागलं ऐकताना ए आर चं प्रेमिका ने प्यारसे ची आठवण प्रकर्षाने आली. फूल माला... दो रुपय्या... तेरी ज़ुल्फ में सजा दूं फूल सा रुपय्या.... याड लागलं.... (अंतरा)

प्रेमिकाने प्यारसे ची बीटस काय होती म्हाराजा. एकतर त्या नग्माला डान्स येत नाही त्यात सोबत कसाही वाकणारा आणी थिरकणारा प्रभुदेवा आणि एसपीआन्ना सुध्दा. अल्टीमेट कोरिओग्राफी. निदान त्या काळात तरी ती क्रांतीकारकच वाटली होती.

तुषार काळभोर's picture

29 Apr 2016 - 11:33 am | तुषार काळभोर

लिरिक्सपन क्रांतीकारकच आहेत.

प्रेमिकाने प्यारसे जो भी दे दिया, तेरे वास्ते है नीलम जैसा.
प्रेमिकाने प्यारसे जो भी छू लिया, तेरे वास्ते है सोने जैसा.
प्रेमिकाको तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो.
प्यारे के... संगीत में...अंहं मोहिनी...सुरागिनी..

वेल्लाभट's picture

29 Apr 2016 - 3:14 pm | वेल्लाभट

ते लिरिक्स बीट्स वगैरे ठीक आहे...ते भारीच होतं.वन ऑफ माय फेवरिट्स आहे हे गाणं.

पण याचा अन याड लागलं चा अंतरा मागोमाग ऐका. लई कन्फूज व्हायला होतं.

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2016 - 3:40 pm | मराठी कथालेखक

मला तरी फँड्री विशेष आवडला नव्हता त्यामुळे सैराट बद्दल उत्सुकता नाही.

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 3:44 pm | सतिश गावडे

टीनेजरच्या प्रेमाचा साचा आहे हा. हमखास हीट होणारा फॉर्मुला. :)

अजया's picture

28 Apr 2016 - 3:56 pm | अजया

बघून मत बनवेन!
आमच्या इथल्या हळदींमध्ये सध्या झिंगाट गाण्यावर नाचून झिंगाट फिरणारे सर्वत्र दिसत आहेत!

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2016 - 4:01 pm | पिलीयन रायडर

याडं लागलं गाणं मला तरी जोगवा / साऊथची गानी / रहमानची गाणी वगैरे सारखंच वाटतं. आपण नवीन काही ऐकतोय असं वाटत नाही. सेम विथ झिंगाट. ऐकायला गाणी चांगली असली तरी हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत.

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2016 - 4:19 pm | मधुरा देशपांडे

अगदी हेच. गाणी छान आहेत पण हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत.

पूर्वाविवेक's picture

2 May 2016 - 10:15 am | पूर्वाविवेक

गाण्यात फारस नाविन्य नाही हे खरय. आधी ऐकल्यासारखी वाटतात. हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत. माझही हेच मत होत. पण जेव्हा मी 'सैराट' मोठ्या पडद्यावर पहिला आणि गाणी अचानक आवडू लागली. आकाश कमालीचा गोड आणि निरागस दिसतोय तर रिंकू एकदम करारी आणि धीट. तांत्रिकदृष्ट्या व छायाचित्रण उत्तम.

वैभव जाधव's picture

28 Apr 2016 - 4:28 pm | वैभव जाधव

प्रत्येक गणपती विसर्जनाला एक गाणं उचललं जातं.
या वेळी झिंगाट असणार.

बाकी चित्रपट आंतरजातीय प्रेमकथा व दुःखद शेवट असणारा असा आहे असे कुठल्याशा महोत्सवात चित्रपटाच्या प्रदर्शनांतरच्या प्रेक्षकांच्या मतानुसार आहे.

रमेश भिडे's picture

28 Apr 2016 - 4:31 pm | रमेश भिडे

अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा
अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण...
अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा....

काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची..
कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा...

अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच.

शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...
सुजाण पालकांनो... भानावर या.

त्यातच सैराट आलाय...
अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला.

या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ?

अहो... निर्मातेसाहेब... तुम्ही सामाजिक प्रबोधन करताय की समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती पसरवताय. ?

या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय.

ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको.

सध्या सर्वत्र सैराटचे प्रमोशन पहायला मिळतेय... लक्षपुर्वक पहा... हे प्रमोशन

यातील मुख्य भुमिका निभावणारे विद्यार्थी दशेतील मुलं पहा...त्यांचा प्रेमाचा खेळ पहा... शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी.. प्रेमप्रकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रीकरण पहा....

असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ?

आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?

महत्वाच.... राज्यात बालकामगार बंदी आहे. 14 वर्षाच्या आतील बालकामगार जिथे असतील तर तिथ कायदेशीर कारवाई करणेत येते ... मग या ठिकाणी सुट कशासाठी....?

पालकांनो सजग रहा...
आदर्श पालक व्हा..
(टिप : मी चित्रपटाविरोधी नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2016 - 4:46 pm | टवाळ कार्टा

खिक्क

निशांत_खाडे's picture

28 Apr 2016 - 5:22 pm | निशांत_खाडे

Sarcasm?

आदूबाळ's picture

28 Apr 2016 - 5:27 pm | आदूबाळ

अरे काय!

प्रेमप्रकरणांची विकृती??

शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय?? या/अशा सिनेमामुळे??

शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी?

असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ?

आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?

नक्कीच समर्थन करेन. असल्या वयातली प्रेमप्रकरणं माझ्या आईवडिलांनी "खपवून" घेतली. मग माझ्या अपत्यांना हे नाकारण्याचा कोणता नैतिक अधिकार माझ्याकडे उरतो?

--------
कमॉन काका, गेट अ लाईफ!

अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2016 - 8:49 pm | चौथा कोनाडा

अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन.

103.5 % सहमत. अश्या भाबडेपणा बद्दल काय बोलावे समजत नाही.
(हेच किंवा असेच पत्र कायप्पावर फिरतेय. हे जर रभि साहेबानी लिहिले असेल तर भारी म्हणायला पाहिजे. )

सिनेमाच प्रतिबिंब समाजात पडते का समाजचे प्रतिबिंब सिनेमात पडते ? नेहमीचाच एव्हरग्रीन विषय !

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2016 - 6:04 pm | llपुण्याचे पेशवेll

भिडे साहेब खरंय तुमचं. हल्ली हे मार्केट मधे खपतंय म्हणून विकलं जातंय.

ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको.

हज्जारदा सहमत. ऐकायला मिळाली नव्हे आत्ता सुधा मिळत आहेत. पूर्वी प्रमाणे अत्याचाराचा वगैरे प्रकार नाही स्वखुषीने पण परिणामाची जाण नसल्यामुळे हे प्रकार होत असतात.
बाकी समाज सध्या याच स्वप्निल नशेत आहे की आपण किती पुढे गेलो आहोत वगैरे वगैरे. दुष्परिणाम दिसतील तेव्हा नशा उतरेल. तोवर तुम्हाला वेडे ठरवले जाईल, मोठे व्हा सांगितले जाईल पण ठीके योग्य तेच बाजारात विकलं जातं असं नाही.

पोरं पोरी कॉलेजमधे लेक्चरला सुद्धा बसायला मागत नाहीत. नापास झाले तरी त्यांना आता काही वाटेनासे झालेय.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2016 - 11:00 pm | चौथा कोनाडा

शिक्षणाच्या "परिक्षार्थी " पॅटर्नचा परिणाम. पालक लाखो रु खर्च करुन खासगी क्लासेस मध्ये घालतात, मग कश्याला पाहिजे कॉलेजात वर्गात बसायला? मार्क्स पडल्याशी कारण.

ज्याला शिक्षणात / करियर मध्ये रस नाही त्याना काय घेणे आहे pपास नापास शी. पालक पैसे देतायतना, मग करा टाईमपास.
या असल्या पार्श्वभुमी वर गरिब, झोपडपट्टीतले, kकष्टकरयांची मुले चमकुन जातात याचे कौतुक वाटते.

काळा पहाड's picture

29 Apr 2016 - 10:21 pm | काळा पहाड

आणि नंतर जिथं काम नसेल अशी 'नौकरी' पण हवी असते. ती नाही मिळाल्यावर 'हेच काय अच्चे दिन' असं बोंबलायचं पण असतं.

तर्राट जोकर's picture

29 Apr 2016 - 10:30 pm | तर्राट जोकर

पहिल्या वाक्याशी सहमत, दुसर्‍या वाक्यात थोडासा बदल : 'मागच्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं'

महासंग्राम's picture

28 Apr 2016 - 6:22 pm | महासंग्राम

हे तुमचं मत आहे कि काय अप्पा वर आलेलं संदेश चीटकवला आहे ते तरी कळू दे

प्रेमाला वयाच बंधन घालणारे आपण कोण ???
देवाने प्रेमलीला केलेल्या चालतात मग सामन्या माणसाचे वावडे का
अजून एक प्रश्न

.

शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात.

सैराट मध्ये हे दाखवलं आहे का ?? अर्थात तुम्ही पाहिला आहे का हा सवाल आहेच

मराठी_माणूस's picture

28 Apr 2016 - 8:15 pm | मराठी_माणूस

मुद्दे निश्चित विचारकरण्याजोगे

अविनाश लोंढे.'s picture

29 Apr 2016 - 1:54 pm | अविनाश लोंढे.

त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा...
- तीच अल्पवयीन मुलगी प्रेमात पडते तेव्हा तिच्या पण मनाची काही किंमत असते , तिला काय वाटत असेल ? तिच्या भावनांचं काय ?
या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय.
- 'गुरु ' बघून किती जन 'अंबानी ' झाले ? अन 'हम साथ साथ है ' बघून किती घर एकत्र आली ? - चित्रपटाचा समाजावर परिणाम हा ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे !
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ?
-TV सेरिअल वर दाखवली जाणारी लग्नाअगोदरचे किंवा लग्नानंतरची अफेअर्स सगळेजन घरात एकत्र बघत असतात तेव्हा किंवा 'बेबी डॉल मै सोने की ' हे गाण एकत्र बघताना असा विचार केला का की आपल्या घरातील मुलांनी अस नाचल तर चालेल का ? लॉजिक बिलकुल पटल नाही
पालकांनो सजग रहा...
आदर्श पालक व्हा..
-आदर्श , सुजाण पालक आपल्या पाल्याशी मैत्री करेल , त्याला /तीला समजून घेईल .

(टिप : मी प्रतिसादाच्या विरोधात नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)

पूर्वाविवेक's picture

2 May 2016 - 10:23 am | पूर्वाविवेक

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून हा मेसेज whatsapp वर फिरतोय.
आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?

मास्तर बिघडतील म्हणून पिंजरा ला विरोध का नाही केला?

- कायप्पावरील एक संदेश. याच्याशी कचकून सहमत!

पूर्वाविवेक's picture

2 May 2016 - 10:45 am | पूर्वाविवेक

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून रमेश भिड्यांची हि प्रतिक्रिया whatsapp वर फिरतेय.
आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?

जानु's picture

28 Apr 2016 - 5:12 pm | जानु

रमेश भिडे यांशी बर्‍यापैकी सहमत आहे.

विटेकर's picture

28 Apr 2016 - 6:05 pm | विटेकर

रमेश भिडे याण्च्याशी सहमत !
ज्याण्च्या घरात वयात आलेली पोर आहे , त्याला हे दु:ख बरोब्बर कळेल.

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 7:26 pm | जव्हेरगंज

गाणी काय विशेष आवडली नाहीत !

पिरतीचा इंचू मात्र झकास डसला होता!!

प्रोमोवरुन सिनेमाही एवढा खास वाटत नाहीये!
पण बघणार आल्यावर !!

चंद्रनील मुल्हेरकर's picture

28 Apr 2016 - 7:50 pm | चंद्रनील मुल्हेरकर

याड लागलं मधील दुसर्या आणि तिसर्या अंतर्यात अजयने जो आवाज लावला आहे तो लाजवाब आहे,सैराट झालं जी मध्ये पण छान आवाज लागला आहे.बाकी कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी यांच्या टुकात चाली असणार्या गाण्यांना प्रमाण संगीत मानणार्यांच्या पोटात सैराटमुळे पोटदुखी झालीए यात काही आश्चर्य नाही वाटले.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 7:52 pm | विजय पुरोहित

असं काही नसावं चंनी साहेब...
पण तुम्ही रसिकतेने सैराट ऐकताय याचा आनंद आहे.
जियो नागराज आणि अतुल अजय...

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 7:58 pm | विजय पुरोहित

बाकी कालपासून मी हेडफोन लावून सतत झिंगाट हे एकच गाणं ऐकतोय. रेवतीतै म्हणताहेत तसं खरंच अगदी झिंग आणणारं गाणं आहे यात दुमत नाही.
मी तेच अनुभवतोय.

रेवती's picture

28 Apr 2016 - 7:54 pm | रेवती

कौशलच्या चाली आवडतात. गुप्तेच्या आवडण्याचा प्रश्नच येत नाही, सलीलच्या बर्‍या असतील पण मी त्याची फ्यान नाही पण म्हणून त्या टुकार आहेत असं तुम्हाला वाटतय. मलाही सैराट गाणं आवडलं पण अजय अतुल जशा जीव गुंगला, रंगला सारख्या सुरेख चाली देतात तसा ते अशक्य गोंगाटही करतात यावर दुमत नसावे.

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 8:21 pm | सतिश गावडे

हा ही प्रतिसाद त्याच वाटेने गेला तर. :)

काळा पहाड's picture

29 Apr 2016 - 11:04 pm | काळा पहाड

कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी

हा बहुजन-बहुजनेतर चित्रपट नाहीये मुल्हेरकर साहेब. मराठा विरुद्ध दुसरी कुठली तरी जात (कोणती ते माहिती नाही) असा संघर्ष आहे. तुम्ही नावं चुकीची.. बहुजनेतर निवडलीयत. तुमच्या गटानुसार विरुद्ध पार्टीची नावं निवडा पाहू.

तरी बाकीचे संगीतकार टुकार संगीत देतात असं मानायचं काहीही कारण नाही. अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच. अजय-अतुल एवढं सातत्य बाकीच्यांनी दाखवलं नाहीये हे मान्य पण म्हणजे ते टुकार आहेत असं अजिबात नाही.

टवाळ कार्टा's picture

2 May 2016 - 6:39 pm | टवाळ कार्टा

अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच.

याबद्दल कच्चकून निषेध

बोका-ए-आझम's picture

5 May 2016 - 12:08 pm | बोका-ए-आझम

कोंबडी पळाल्यावर निषेध हा होणारच.

इतका बोलबाला झाल्यावर ते गाणं पाहिलं. नाच हा झिंग आणणारा असला तरी असे नाच बर्‍याच शिनेमांमध्ये आधीही झालेत. फ्यान्ड्री पाहिला नसल्याने हाही पाहीन की नाही माहित नाही. ती मुलगी वयानं लहान आहे. फारच गोड्ड आहे व मला आवडली. तिचे डोळे बोलके आहेत, खरच गोड मुलगी. त्यातील मुलगा हा पैलवान होता म्हणे! तोही चांगला आहे. यावर परिक्षण येईल ते वाचीन.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 7:53 pm | विजय पुरोहित

+11111 रेवतीतै...

तर्राट जोकर's picture

28 Apr 2016 - 8:02 pm | तर्राट जोकर

[खोचक मोड ऑन]
हे काय संगित म्हणायचे काय? कुणीतरी गातंय, कुणीतरी काहीतरी वाजवतंय, असं आधीही होऊन गेलंय, काही नवीन नाही. कुणीही काहीही गाण्याबजावण्याशिवाय संगित दिलं तर म्हणेन की काहीतरी नवीन आणलंय, क्रिएटीव्हिटी आहे. गाण्यासारखं गाणं , उगाच डोक्यावर घेतात लोक.

[खोचक मोड ऑफ]

प्रदीप साळुंखे's picture

28 Apr 2016 - 9:31 pm | प्रदीप साळुंखे

चपखल

सतीश कुडतरकर's picture

29 Apr 2016 - 11:14 am | सतीश कुडतरकर

AAMHI KADHALI TIKAT SHANIVARCHI. MARATHI PICTURE AAHE, DOKYAVAR GHENARACH. ENGLISH SATHI MAAFI.

वगिश's picture

30 Apr 2016 - 7:18 pm | वगिश

कसा वाटला?

सत्याचे प्रयोग's picture

28 Apr 2016 - 8:11 pm | सत्याचे प्रयोग

पुण्यातील बर्‍याच थिएटर चे शुक्रवारचे शो हाऊसफुल्ल झालेत

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 8:17 pm | विजय पुरोहित

हायला गांधीबाबा तुम्हाला पण झिंगाट् आवडतं?

सत्याचे प्रयोग's picture

28 Apr 2016 - 11:36 pm | सत्याचे प्रयोग

पहिला दिवस पहिला खेळ पहायला जातोय

तसे काही रेव्होलुशनरी वाटले नाही. झिंगाट् चांगले वाटले, तेही एक विशिष्ट मूड असेल तरच. बाकी गाणी फारशी आवडली नाहीत.
कदाचित ओव्हरहाईप झाल्यामुळे असेल.
बाकी - भाषा वगैरे मराठवाड्याची बोलीभाषा असल्यामुळे तिकडच्या लोकांना हे जास्त रिलेट करता येईल, त्यामुळे त्यांना जास्त आवडेल हे समजू शकतो.

पिक्चर बद्दल बोलायचे झाले तर एकंदरच हा थोडासा हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांकडे झुकणारा वाटला. अर्थात पुन्हा जनरल मराठवाड्यावर असलेला तेलगू चित्रपटांचा प्रभाव पाहता यात देखील फारसे आश्चर्य वाटले नाही.

पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.

अस्वस्थामा's picture

28 Apr 2016 - 9:34 pm | अस्वस्थामा

नै बाकी ठिकय. फक्त ती भाषा सोलापूर, करमाळा या बाजूची आहे. मराठवाडा अजून पल्याड राहिला हो.

पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.

पण त्याहीपेक्षा एकंदरीतच so called "ग्रामीण" मराठी चित्रपटांचा सातारा-सांगलीच्या पलिकडे (म्हंजे पूर्वेकडे) होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.

तसे पुण्या-मुंबईच्या लोकांना सगळे "ग्रामीण" सारखेच म्हणा. (आमची मुंबईच्या हापिसातली मुंबईकरीण पुणेकरास तो पुण्याला जात असताना "गावी चाललास काय?" असे विचारायची ते आठवलं.. ;) )

पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये समुद्र दिसतोय. ही काय भानगड आहे?

अस्वस्थामा's picture

28 Apr 2016 - 10:03 pm | अस्वस्थामा

गेले असतील मंबईला फिरायला, काय प्रॉब्लेमय वो..? ;)

राघवेंद्र's picture

28 Apr 2016 - 10:54 pm | राघवेंद्र

उजनी धरणाचे backwater आहे असे वाटते

आदूबाळ's picture

28 Apr 2016 - 10:57 pm | आदूबाळ

ओह्ह्ह, अच्छा. त्वरित बघणे आहे हा सिनेमा.

प्रदीप साळुंखे's picture

28 Apr 2016 - 9:26 pm | प्रदीप साळुंखे

गाणी जबरा आहेतच,सिनेमाही असणारच, अजय-अतुल म्हणजे शेवटच.गाणी गावटी आहेतच पण त्यामध्ये एक वेगळी नशा आहे,ती गावटी लोकांनाच जाणवेल.
ग्रामीण जीवन जगलेल्यांना/जगत असणार्यांना सिनेमा आवडेल.
बाकि नागराजचे सिनेमे वास्तववादी असतात,
एखाद्या सामान्या माणसाला उचलून एका दिवसात हिरो बनवण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात.
मोठ्या कलाकारांशिवायही चित्रपट दर्जेदार बनू शकतो हे त्याने दाखवून दिलयं.
शहरी राहणीमान असणार्यांना फारसा आवडणार नाही.
.
.
---( गावटी )

चंद्रनील मुल्हेरकर's picture

28 Apr 2016 - 9:31 pm | चंद्रनील मुल्हेरकर

साळुखे साहेब अगदी बरोबर ,आम्हा ग्रामिण आणि शेतकरी लोकांना असे चित्रपट चांगले रिलेट करता येतात.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:34 pm | विजय पुरोहित

सहमत चंनी साहेब.
आयला काय जबरा जादू केल्या त्या गाण्याने...

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Apr 2016 - 10:02 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मस्त गाणी!!! जाम आवडली,
"सैराट झालं जी" एक नंबरच!!
बाकि, महाराष्ट्र म्हणजे पुणे,मुंबई अशी मानसिकता असणार्यांना काय ढेकळं समजणार नाही पिक्चरमधलं.


▼एका आर्चीचा परश्या

चंद्रनील मुल्हेरकर's picture

28 Apr 2016 - 10:15 pm | चंद्रनील मुल्हेरकर

पुण्यातले सगळे शो बुक झाले म्हणे ..

तर्राट जोकर's picture

28 Apr 2016 - 10:17 pm | तर्राट जोकर

पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...होणारे संस्कार हे फॅन्ड्री, टाइमपास, शाळा अशा चित्रपटांतून होतात असं मानणार्‍या पालकांना माझा साष्टांग नमस्कार. दंडवत. तुमचे चरणकमलांचे फोटो जरा मला पाठवा. द्येव्हार्‍यात ठेवीन म्हणतो.

तुम्ही (काळजीवाटणार्‍या पालकांना उद्देशून) बालकपालक चित्रपट बघितला काय हो? बघितला असेल तर तुम्ही त्यातून काहीच शिकले नाही असे वाटते. नसेल तर बघून घ्या. पौगंडावस्थेतली पोरं काय काय करतात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला खरंच जागं आणि मुख्य म्हणजे प्रगल्भ होण्याची गरज आहे.

जेव्हा मी दहावीला होतो, अंदाजे १९९५ चा काळ, तेव्हा माझ्या शाळेतली सहावीतली मुलं-मुली एकमेकांना चिठ्ठ्या देत होती हे सोताच्या डोल्यानं बघितल्याव. वीस वर्ष झाली त्याला. तेव्हा कुठे फॅन्ड्री टाइमपास, शाळा होते? तेव्हा तर अधेड उम्रके बेटे, पुलिस इनिस्पेक्टर, बडे बापकी बेटीला पटवत होते, झाडांमधून घिरट्या घालत कवायती करत होते. दोन फुलांना टेकवून सुचित करायच्या हरकती सरेआम पडद्यावर तेही चायागित्त, रंगोली, चित्रहार मधून घरोघरी दिसत होत्या. प्रेमाचं प्रदर्शन आणि शारिरीक संबंधाचे चाळे दाखवणारे चित्रपट तर आठवड्यातून तीनदा दूरदर्शन नामे लोकजागरासाठी वाहलेल्या च्यानलवर लागत होते.

ज्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जाते त्या अनुकरण करु पाहण्याचा पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. फॅण्ड्रीत एका शॉटमधे हे उत्तम दाखवलंय. जब्या कपड्यांच्या दुकानाबाहेर उभा असतो. तिथल्या मोठ्या पोस्टरवरच्या मॉडेलकडे बघुन स्वतःला तसं बघतो असं दाखवलंय. मुलांमधे हे कुठून येतं हे आपल्या आजूबाजूला इतकं ढळढळीत चालू असतांना त्याच गोष्टी टिपणार्‍या चित्रपटांना दोष देणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे बलात्काराच्या बातम्या वृत्तपत्रात येतात म्हणून बलात्कार करण्याची प्रेरणा मिळते व असे प्रकार वाढतात असे म्हणणे आहे.

संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Apr 2016 - 10:40 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे.
हेच्च म्हणतो.काही अडल्ट कंटेट वगैरे बघून परिणाम होत असेल थोडाफार पण तो क्षणिक असतो.

संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.

व्हयं!!!!
ते अणि काय वो???

तर्राट जोकर's picture

28 Apr 2016 - 11:20 pm | तर्राट जोकर

हे राम. हे अ‍ॅडल्ट कन्टेन्टबद्दल आहे असे का वाटलं तुम्हास्नी. भारतीय हिंदी चित्रपटांमधे प्रेमकहान्या एक मोठा पार्ट व्यापुन आहेत. प्रेमकहान्या हळुवारपणे फुलतात, दोघे जीव एकेमेकांसाठी जान की बाजी लावतात, एकमेकांसाठी अलम दुनियेला ठुकारावुन लावतात. पौगंडावस्थेतल्या कावर्‍याबावर्‍या असलेल्या, आपली ओळख, अस्तित्व वेगळं आहे असे जाणवू लागलेल्या पोरांना त्यांचे संसाराच्या कोलूत खंतावलेले आईबाप समजून घेउ शकत नाहीत, ते त्याला/तीला अजूनही कुक्कूलं बाळ समजून त्यांना पाहिजे तसं वागवायला बघतात, अशावेळेस फक्त त्याला/तीलाच महत्त्व देणारं, तिच्या/त्याच्या भोवती आपलं जग विणणारं, तो/ती म्हणेल तसं वागणारं, खास आपल्यासाठी जगणारं, आपलंच स्वप्नं बघणारं कोणी भेटलं तर हवंच असतं. पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Apr 2016 - 11:40 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

I know हे अडल्ट कंटेंट नाहीये,
माझा रोख दुसरीकडेच आहे कि अडल्ट कंटेट पाहिल्यावर त्याचा परिणाम हा क्षणिक असतो,म्हणजे त्याचमुळे माणूस बलात्कारी बनतो अशी धारणा चुकीचे आहे.मी थोडं अवांतर केलं होतं.

तजो तुमच्या वरील प्रतीसादाला १००% सहमत अस लिहीणार होतो, पण या प्रतीसादाला १०००% सहमत. म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पालकानी कसे वागु नये याचा एका अर्थी वस्तुपाठच आहे वरील प्रतीसाद.

बोका-ए-आझम's picture

3 May 2016 - 1:24 am | बोका-ए-आझम

पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.

का चुकीचं? आणि मुळात लैंगिकता हे आणि हेच कारण आहे. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये. अर्थात लोक जेव्हा प्रत्यक्ष आणि कथा यांच्यातली
सीमारेषा विसरतात, तेव्हा गोष्ट गंभीर होते हे खरं आहे. आईवडिलांनी आणि मित्रांनी तेच काम करायला पाहिजे. जमिनीवर आणण्याचं.

तर्राट जोकर's picture

3 May 2016 - 2:14 am | तर्राट जोकर

सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी त्या लैंगिक आहेत हे त्यावेळी मनाला माहित नसतं. 'त्यांच्या मुळाशी लैंगिकता आहे' हे विधान तात्विक चर्चेत, विद्वानांच्या सभेत, वैद्यकिय प्रबंधांत योग्य आणि सत्य आहे पण हे किशोरावस्थेतल्या मुला-मुलीला वळत नसतं. ते न उमगणं समजून घ्यावं असं माझं म्हणणं आहे. 'एखाद्या मुलीचा एखाद्या मुलावर क्रश आहे आणि तीने त्या मुलाचा कुठेतरी पडलेला रुमाल आपल्याजवळ खाजगीत गुप्तपणे लपवून ठेवला' ह्या कृतीला आपण 'तीला त्याच्यासोबत ***चेच होते म्हणून तीने असे केले' इतक्या टोकाला नाही नेऊ शकत.

काही टप्पे (अर्थात माझे निरिक्षण: सॅम्पल गृप बराच मोठा आहे पण आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे शास्त्रिय आधार नाही)
पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना तर आपल्याला एखादं माणूस आवडतंय हेही कळत नसतं, नुसतं ओढलं जाणं, विचारांमधे गुंतत जाणं, भान हरपणं, हे सगळं आतलं, एकतर्फी, एकटं.

ती व्यक्ती गृपमधे, ओळखीत असेल तर नकळत तीला आवडेल असे वागणे, तीची काळजी घेणे, तीच्यासाठी खस्ता खाणे, उपद्व्याप करणे, मदत करणे, स्वतःला व स्वतःचे महत्त्वाचे उद्योग विसरुन तीच्यामागे राहणे हे जरा प्रकट, तरीही अनभिज्ञ.

पुरेसं प्रकट त्या व्यक्तीच्या दर्शनाविना कळवळून जाणं, असुरक्षित वाटणं, ती सतत जवळ असावी असं वाटणं, त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणं आणी ते करणंही, ह्यात प्रत्यक्ष तसं व्यक्त करायची गरज भासते. मुलं-मुली प्रेमाची कबूली देतात.

एकदा रितसर दोन्हीकडून कबूली झाल्यावर सहवास वाढतो, विश्वास, जवळीक वाढते, अजून अजून जवळ येण्याची तृष्णा वाढते, लैंगिकता ह्या टप्प्यावर जाणवू लागते, आणि ती पुढे चटकन मूर्त रुप घेऊ शकते.

लैंगिकता हा एक क्षीण आवेग आहे, अनेक रुपं, पुटं चढवून तो येतो. जसजसा जवळ येतो तशी पुटं गळून पडतात आणि मूळ रुपात भिडतो. आवेग ओसरुन गेल्यावरही ती अधिरता, तो विश्वास, ते प्रेम, ती आपुलकी तशीच राहत असेल तर पुढे संगोपनास आवश्यक ठरते.

आईवडिल आणि मित्रांनी जमिनीवर आणायचे म्हणजे काय आणि कसे ते समजले नाही. उपयोग नसतो असा अनुभव आहे. मुळात अशा काही गोष्टी उपटूच नये म्हणून पालकांनी खूप जागरूक (मुलांचे मित्र बनणे इ.) राहावं लागतं आणि ते पालकांना ज म त नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. कारण मुलांचे मित्र बनण्याच्या ऐवजी अनेक महत्त्वाच्या भूमिका चाळीशी-पन्नाशीतल्या पालकांना पार पाडाव्या लागतात. मुलांना काही शिक्षण देण्याअगोदर पालकांना पालक व्हायचे शिक्षण दिले पाहीजे या मतावर मी येऊन पोचलोय.

असो. अर्थात काही मुलं आजकाल हे वरचे टप्प्यांच्या फंदात पडत नाहीत असेही निरिक्षण आहे. आजकाल 'फ्रेण्शिप देती का', 'लवशिव देती का' किंवा नुसतंच 'देती का' ह्या तीन प्रश्नाचे टप्पे राहिले आहेत. ठळकपणे आढळत असेल तरी हेही सार्वत्रिक नाही हेही तितकेच खरे.

बोका-ए-आझम's picture

3 May 2016 - 10:15 am | बोका-ए-आझम

पालकांना पालक होण्याचं शिक्षण दिलं पाहिजे याच्याशी १००% सहमत. तसं दुर्दैवाने होत नाही. खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) त्यामुळे या पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं निर्माण करायला हरकत नाही. पण त्यासाठी खास प्रयत्न केले जाताहेत का हा संशोधनाचा विषय आहे.
तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. मी त्याच्याकडे ब-याच व्यापक दृष्टीने बघतो. शारीरिक आकर्षण हा मुद्दा आहेच पण या अवस्थेत मुलांना त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम भिन्नलिंगी व्यक्तीवर कसा होतोय हेही बघायचं असतं (gratification). त्यांची स्व-प्रतिमा आणि स्व-मूल्य (self-image and self-esteem) या भिन्नलिंगी प्रतिसादांवर अवलंबून असतात. हाही लैंगिकतेचाच एक भाग आहे.

दिग्विजय भोसले's picture

3 May 2016 - 10:35 am | दिग्विजय भोसले

पौगंडावस्थेतील जाणीवा ह्या लैंगिकच असतात पण तेवढं कळण्याइतकी परिपक्वता त्या वयात नसते.
पण आजकाल ती परिपक्वता इंटरनेटमुळे यायला लागली आहे.
पौगंडवस्था म्हणजे नेमकं किती वय? याचं संशोधन करून नव्याने त्याची परिभाषा याकाळात ठरवायला हवी.

तर्राट जोकर's picture

4 May 2016 - 10:56 am | तर्राट जोकर

खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.)
>> तुमचा अंदाज शंभर टक्के योग्य आहे. त्या पिढीच्या पौगंडावस्थेच्या भोवतालात आणि आज ९५ नंतर जन्मलेल्यांच्या भोवतालात भयंकर फरक आहे. तेव्हा आपली पिढी (३५-४५) शाळा व घर इतक्याच परिघात होती. आपला वेळ घरच्यांशी बोलण्यात, कामे करण्यात, खेळण्यात, अभ्यासात जात असे. संपर्काचे साधने कमी असल्याने, आजसारखे इण्टरनेट-मोबाईलने सगळं जग उघडं पडलेलं नव्हतं. शाळा-क्लासेसमुळे फक्त झोपायला जेवायला घरी असा प्रकार नव्हता. आज वातावरण खुप बदललेलं आहे. मुलं ज्यापद्धतीने व वेगाने जगाला एक्पोज होतायत तेव्हा इथून पुढे आईवडिलांचं कठिण आहे असे जाणवतंय.

तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं.
>> लैंगिकता ही मी पौगंडावस्थेतल्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघत आहे. तुम्ही दिलेलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मान्यच आहे पण हे कोवळ्या, अनभिज्ञ जीवांना कळत नाही हा माझा मुद्दा आहे.

lakhu risbud's picture

3 May 2016 - 1:48 pm | lakhu risbud

तजो,अत्यंत समर्पक शब्दांमध्ये विचार व्यक्त केलेत.

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 10:47 pm | सतिश गावडे

खरं दुखणं यागळंच आहे.

हा शोध कसा लावलात? :)