'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे. भारतातील अल्पसंख्य समुदायातील अत्यल्पसंख्य जकोबाईट सिरीयन चर्च समुदाय आणि त्यातील शतकाभरापुर्वी पुरोगामित्वासाठी फुटून स्वतंत्र झालेला 'मलंकारा मरथोमा सिरीयन' चर्चच्या गाभार्याला मदबहा म्हणतात (मदबहा शब्दाच्या लेखनाबद्दल चुभूदेघे) 'मलंकारा मरथोमा सिरीयन' चर्च समुदाय स्वतःला पुरोगामी म्हणवतो त्यांच्या मदबहा मध्ये स्त्रीयांना प्रवेश वर्जीत आहे.
'मिनु इत्त्यीप्पे'च्या म्हणण्यानुसार स्वतः प्रेषित येशु सुद्धा महिलांशी भेदभाव करत नाही मग चर्चच्या मदबहावर स्त्रीया गेल्याने चर्चचे पावित्र्य कसे काय कमी होऊ शकते? आणि या चर्चचातर येशु मदर मेरीच्या गर्भात असताना पासून पवित्र गाणी म्हणत असे यावर विश्वास आहे तर मग मदर मेरीच्या पोटात बसून येशुने म्हटलेली गाणीतर अपवित्र असू शकणार नाहीत अशीच इतरही उदाहरणे मिनु इत्त्यीप्पे' समोर ठेवतेच त्या शिवाय चर्चचे पुजारी (प्रीस्ट) आणि बिशप लोकशाही पद्धतीने निवडताना स्त्रीयांचाही सहभाग असतो हे चांगले पण पुजारी अथवा बिशप म्हणून महिलांना का निवडून देऊ नये असाही प्रश्न ती विचारते.
येशु एका मुलीला म्हणतो, 'मी म्हणतो मुली तू ऊठ' असे सांगून लेखाच्या शेवटी 'मिनु इत्त्यीप्पे' म्हणते चर्चने येशूचे हे शब्द प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची आता वेळ आली आहे. कुणाला कुठून प्रेरणा मिळेल कसे सांगावे मिनु इत्त्यीप्पेला मात्र लेख लिहून स्त्रीयांना मदबहात आणि बिशपच्या जागेवरही संधी मिळावी या इच्छेची प्रेरणा तृप्ती देसाईंपासून मिळाल्याचे दिसते आणि किमान तेवढ्यासाठी तृप्ती देसाईंचे अभिनंदन केले जाण्या प्रशस्त असू शकेल का.
संदर्भ स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख दिनांक १९/४/२०१६ रोजी दुपारी १५ वाजून २५ मिनीटांनी जसा पाहीला.
.
.
.
.
.
.
.
.
* प्रेषक, DEADPOOL यांच्या कवितेची आपखुषीने धागा जाहीरातः
*देव गाभाऱ्याबाहेर निघाला! :कवि DEADPOOL
: प्रेषक, DEADPOOL हा आयडी आमचा नाही गैरसमज नसावा !
प्रतिक्रिया
19 Apr 2016 - 6:37 pm | यशोधरा
इतरत्र पुरोगामित्व गाजवणारे इथे फिरकले नाहीत, हे अंमळ रोचक वाटले.
19 Apr 2016 - 7:00 pm | माहितगार
हम्म.. ह्या अत्यल्प संख्यांक समुदायाच्या बाबतीत महाराष्ट्रात माहिती नसेलही, पण इन एनी केस आपली ही टिका जेएनयु प्राध्यापिका -प्राध्यापिका एवढ्यासाठी की त्या केरळी आहेत- असोत वा राजकारणात कार्यरत -बंगाली आणि केरळी कम्युनीस्टांना दोघांनाही अगदी लागू पडावी.
22 Apr 2016 - 7:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रोजगार मिळाला नसेल.
19 Apr 2016 - 7:26 pm | सुनील
१३ एप्रिलच्या लोकसत्तात मार्कुस डाबरे यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. यात ते म्हणतात - शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा एका आंदोलनाची नोंद घेत मोडीत काढणे, हे आजच्या प्रगत जगात केवळ हिंदू मंदिरातील विश्वस्तच करू शकतात. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक अपुरेच आहे. ...
शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत मंदिराच्या गाभ्यात महिलांना प्रवेश (सनातन धर्म) लक्षात घेता फार मोठी ऐतिहासिक घटना आहे. याचे सर्वानी अभिनंदन करीत आपल्याही धर्मात असे बदल करण्यासाठी लढे उभारावे.
मी स्वतः देव-देव करणार्यांपैकी नाही. तरीही, तृप्ती देसाई आणि मिनू इथिप्पे यांना पाठिंबा.
तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यासंबंधातही आंदोलन करणार आहेत, असे समजते. त्यांना शुभेच्छा.
19 Apr 2016 - 7:36 pm | एस
या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे आणि मंदिर असो वा मशीद वा चर्च वा अन्य कुठलेही प्रार्थनास्थळ, सर्वांनाच ते खुले असावे. मी तर म्हणेन की अन्य धर्मीयांनाही सर्व प्रर्थनास्थळांमध्ये प्रवेश असावा जेणेकरून माणुसकी वाढीस लागावी.
19 Apr 2016 - 8:49 pm | टवाळ कार्टा
याबाबत काही मिपाकरांचे म्हणणे आहे की जे आहे ते धर्माच्या परंपरा आहेत...का म्हणून मोडाव्या...पटत नसेल तर मंदिरात जाउ नये
19 Apr 2016 - 8:50 pm | टवाळ कार्टा
एसभाउ जे म्हणाले त्याला माझा १००% पाठिंबा आहे
20 Apr 2016 - 7:57 am | अजया
एसभाऊंशी सहमत.
20 Apr 2016 - 11:03 am | बाळ सप्रे
+१०००
हे विशेष आवडले !!
20 Apr 2016 - 6:48 pm | श्रीनिवास टिळक
'सर्व धर्मस्थळ प्रवेश सर्वाना करता यावा जेणेकरून माणुसकी वाढेल' या विधानाशी सहमत. शनि शिंगणापूर नंतर मुस्लिम महिलांना वरळीच्या (मुंबई) हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन झाले होते. तेव्हा एक मुस्लिम महिला 'मंदिर जायेंगे, दर्गाह जायेंगे, किसीके बापका क्या जाता है' अशी पाटी मिरवत होती त्याची आठवण आली.
20 Apr 2016 - 7:23 pm | माहितगार
धर्ममार्तंडांच्या बापाच जात म्हणुनच तर प्रोब्लेम आहे, घोषणा कदाचित '...यंहा जाएंगे,... वहां जाएंगे किसीके बापका कुछ जाता है तो जाने दो मॉ, बहने बेटी बीबी को समान अवसर मिलने दो' अशा स्वरुपाने बदलली तर कदाचित अधिक औचित्यपूर्ण ठरेल का असे वाटते
21 Apr 2016 - 5:35 pm | काळा पहाड
अजिबात सहमत नाही. मुसलमान धर्म हा मूर्तीभंजक धर्म आहे. त्यांना हिंदूंच्या प्रार्थनास्थळात प्रवेश काय गोट्या खेळायला हवा असणार आहे काय?
19 Apr 2016 - 7:48 pm | DEADPOOL
धन्यवाद माहितगार!
आणि आता फुरोगामी काय म्हणतात बघू!
आणि संकलन मस्तच
माहीतगारप्रमाणे!
19 Apr 2016 - 7:48 pm | नाना स्कॉच
क्रिश्चियनिटी अन त्यातही हे प्रकरण म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास भासते, ह्या धर्माच्या एकंदरित बेसिक मधे प्रचंड लोच्या आहे, तो म्हणजे जबरदस्त रेजिमेन्टेशनचा प्रश्न , पॉंटीफ म्हणेल ती पूर्वदिशा म्हणणाऱ्या ह्या धर्मानुसार तर 1991 पर्यंत गैलिलियो सुद्धा चुक होता! काय बोलणार डोंबल! हल्लीच उत्तर मुंबई का कुठून एक फेथ हीलर का तत्सम प्रकार करणारा प्रीस्ट का पास्टर सुद्धा अरेस्ट केलाय म्हणे! एकंदरित कठीण आहे!
19 Apr 2016 - 9:08 pm | माहितगार
ह्म्म आपल्याला त्यांच्यातले लोचे माहित नसतात, या धागा लेखातला प्रकार कदाचित स्वतःला त्यातल्या त्यात पुरोगामी समजणारा म्हणून कदाचित सोबर असेल, 'जेसोवाह विटनेस'- 'वॉच टॉवर' सारखे काही प्रकार आहेत वाचल्या नंतर दचकायला होते.
20 Apr 2016 - 12:04 am | mugdhagode
फेथ हीलर सर्व धर्मात असतात
19 Apr 2016 - 10:23 pm | पैसा
देव एक आहे म्हणतात मग त्याच्या दारात भेदभाव का? अजून कित्येक ठिकाणी स्त्रियाना किंवा काही नीच दर्जाच्या समजल्या गेलेल्या जातीतील लोकांना देवळात प्रवेश नाही. याला कोणताही धर्म अपवाद नाही. कपडे आणि खाण्यापिण्यावरून पुरोगामी भासणारे गोव्यातील कॅथॉलिक लोक खूपदा इतके कर्मठ असतात की बघून आश्चर्य वाटेल. हिंदू लोक कौल लावतात म्हणून कोणी हसत असतील तर कॅथॉलिक लोकांत एखाद्या मुलीशी लग्न करू का यासाठी फादरसमोर चिठ्या टाकाव्या लागतात. आयुष्यातील जवळपास प्रत्येक निर्णय फादरला विचारून घ्यावा लागतो. निवडणुकातही फादर लोकांनी कोणाला मतदान करा म्हणून सांगितले की त्याचा खूप प्रभाव पडतो. हे सगळे जवळून बघितल्याशिवाय आपल्याला माहीतही नसते. कारण त्याविरोधात कोणी एक शब्दही उच्चारत नाही.
20 Apr 2016 - 12:01 am | माहितगार
अशा गोष्टी वाच्यता झाल्याशिवाय खरेच माहित होणे कठीण . -म्हणजे माहित नव्हते- मुलीशी लग्न करू का यासाठी फादरसमोर चिठ्या टाकाणे आई वडलांना विचारुन लग्न करण्यापेक्षाही बेकार आहे. "..आयुष्यातील जवळपास प्रत्येक निर्णय फादरला विचारून घ्यावा लागतो..." ह्या पेक्षा ब्राह्मण बरे आपापली दक्षीणा मिळाली की व्यक्तिगत प्रश्नातील लक्ष कमी करत असत जन्मजात नसेल जानवे नसेल पण एकुण ब्राह्मणगिरीपेक्षा वाईट स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नसावी अर्थात जे अनुभवत असतील तेच ह्याबद्दल अधिक सांगू शकतील.
आणखी काय होते कि या मायनॉरीटीज मध्ये स्वानुभवावर आधारीत कथा कादंबरी नाट्य लेखन सहसा कमी असते त्यामुळे गोष्टींची वाच्यता कमी होते. मायनॉरीटीजना कथा कादंबरी नाट्य लेखन या प्रकारात लेखन करण्यासही प्रोत्साहन द्यावयास हवे, ज्या गोष्टी वाच्यता करण्यासाठी व्यासपीठ अनुपलब्ध असणे अथवा उघडपणे मांडणे शक्य नसते तेव्हा कथा कादंबरीच्या माध्यमातून विचार मंथन प्रक्रीयेस बळ येऊ शकते. उर्दू भाषेत कादंबर्यांचे लेखन खुप कमी असते असे म्हणतात, गोअन कोकणी कॅथॉलीकात स्वानुभवावर आधारीत कथा कादंबरी लेखन कितपत होते ?
20 Apr 2016 - 10:57 am | पैसा
कन्व्हर्ट होण्यापूर्वीच्या जाती वगैरे तर आहेतच आणि लग्न करताना त्या कसोशीने पाळल्या जातात.
लेखकांमधे समकालीन आणि आधीचे लेखक कथा-कादंबर्या लिहिणारे बर्यापैकी आहेत. पण त्यांचे कोंकणी/इंग्लिश वाङ्मय मी वाचलेले नाही त्यामुळे त्याबद्दल सांगू शकणार नाही. एक स्थानिक प्रकाशक ओळखीचे आहेत. पुढच्या वेळी ते भेटतील तेव्हा त्यांना याबद्दल नक्की विचारीन.
20 Apr 2016 - 12:26 am | तर्राट जोकर
हे अगदी इस्लामसारखेच आहे. =))
20 Apr 2016 - 10:36 am | नाखु
झाकली मूठ सव्वा लाखाची हे अंइम सत्य आहे...
कुठलाही गामी नसलेला नामी नाखु
20 Apr 2016 - 2:02 am | उगा काहितरीच
याबाबतीत शीख धर्माचा मला प्रचंड आदर आहे. गुरूद्वार्यात सगळ्या जाती धर्माचे लोक , स्त्री - पुरूष सगळेच जाऊ शकतात. हं फक्त त्यांचे बेसीक नियम (जसेकी डोकं झाकून , पाय धुवून) पाळून मधे जाता येते.
20 Apr 2016 - 10:49 am | तर्राट जोकर
+१००
20 Apr 2016 - 12:18 pm | माहितगार
हम्म.. वर नाखुंनी 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ही म्हण लिहिली आहे. उगा काहितरीच तुमचा प्रतिसाद वाचल्या नंतर आंतरजाल चाळल प्रथम दर्शनी येणारे चित्र इतर धर्मात जसा उदात्ततेचा भाग दाखवातात तेच इथेही काही फरकाने असावे. स्त्रीयांना बरोबरीचे स्थान देण्याबाबतीत थेअरीमध्ये शीख धर्म नक्किच इतर बर्याच धर्मांपेक्षा उजवा आहे - कोणत्याच बाबतित भेदभावाला परवानगी नाही, सर्वात उजवी बाजू स्त्रीयांना चेहर्यावर घुंगट अथवा नकाब वर्ज स्पेसिफीकली वर्ज्य सांगीतला आहे. पण ही थेअरी झाली.
व्यवहार ? इतरत्र असतो तसाच प्रकार काही फरकाने पहावयास मिळतो. सध्या चालू विषयाच्या संबंधाने तांत्रिक दृष्ट्या स्त्रीयांना ग्रंथी अथवा इतर धर्म विषयक सार्वजनीक कार्यात समानता असावयास हवी होती याची गेल्या दशकाभरात थोडी जागरुकता येऊन काही गुरुद्वारातून त्यांना संधी मिळत असावी असे दिसते पण त्यांच्या अमृतसर मधील सर्वोच्च स्थान असलेल्या हरमंदीर साहीब येथे स्त्रीयांना गुरुबाणी किर्तन करण्याची संधी बहुधा अद्याप मिळाली नसावी -शिवाय काही सेवा अद्यापही पुरुषांसाठी राखीव असाव्यात, तेथील सर्वोच्च प्रमुख धार्मीक पदांवर अद्याप स्त्रीयांना संधी मिळाली नसावी.-सावकाशिने मागणी पुढे येताना दिसते- (चुभूदेघे) संदर्भ १ संदर्भ २ संदर्भ ३
शीख समुदाय व्यवहारात पॅट्रीआर्कल या प्रकारात मोडतो, -थेअरीत हुंडा नको व्यवहारात अद्यापही आहेच विवाह अत्यंत खर्चीक असावेत शिवाय भारतात नव्हे परदेशात विशेषतः कॅनडात स्थायिक लोकांमध्येही याचे मोठे प्रमाण असावे की ज्याचा प्रत्यक्ष परिणाम फॅमीलीत स्त्रीला मुलगा असेल तरच मान मिळतो, फिमेल फँटिसाईडचे प्रमाण बरेच मोठे असण्याची शक्यता असु शकते -कॅनडात भारतात आहे तशी सोनोग्राफीवर बंधने नाहीत आणि पंजाबात किती पाळली जातात या बद्दल साशंकता असावी कारण पंजाबातला मेल टू फीमेल रेशो अत्यंत वाईट हजारास ८३० च्या आसपास असावा. प्रॉपर्टित इक्वल हिस्सा असणे अपेक्षीत असले तरी प्रत्यक्षात तसे घडते का हे साशंकीत असावे.
स्वतःची जमीन नसलेल्या कुटूंबातील स्त्रीयांची हरीत क्रांति पुर्वि आर्थीक स्थीती थोडी तरी बरी असावी की शेतीत मेहनत करुन पैसा मिळत असे, शेतांचे यांत्रिकीकरण झाले स्त्रीयांचा रोजगार गेला आणि पुरुषवर्गाचेही उत्पन्न कमी झाले की त्याचा ताण कुटूंबातील स्त्रीवर पडत राहीला असावा. ऑनर किलिंग प्रकारहि काही प्रमाणात होत असावेत खास करुन पंजाब बाहेर आनि युरोपात स्थायीक सुशिक्षीत युवक युवतींना इतर धर्मियांसोबत विवाह करण्याची इच्छा असु शकते पण यात समुदायाकडून हतोत्साहीत केले जाण्याचे प्रमाण बर्या पैकी असू शकेल,
तत्वज्ञानानुसार अंधश्रद्धांना थारा असावयास नको -काळानुसार बदलावयास हवे - पण व्यवहार नक्की तसेच आहेत का ? सहजधारी आणि इतर उपपंथांना सामावुन घेण्या एवजी कट्टरता वाढत जाऊन त्यांना बहीष्कृत अथवा कमी लेखले जाण्या कडे अद्यापही कल असावा असे काही आहे का हे अभ्यासाचे विषय असावेत, याचा वैवाहीक जोडीदारांच्या निवडीवर काय परिणाम होत असेल हा समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय असावा. इतर धर्मीयांप्रमाणे इथेही डिनायल मोड दिसतो शक्यतोवर समस्यांचे अस्तित्व नाकारणे, अगदीच संदर्भा सहीत पुढ्यात ठेवले तर हे दोष आमच्या धर्माचे नाहीत मूळ हिंदू धर्माचे अथवा पंजाबी संस्कृतीतून आलेले आहेत दोष कुठूनही येऊ द्या त्यावर समाजसुधारणेचा उपाय महत्वाचा समाजसुधारणेची कृती शुन्य असेल आणि सारा भर इतरांचे दोष दिग्दर्शनावर असेल तर प्रगती न होता साचलेपणा येणे हे कुठेही व्हावे तसे इथेही व्हावे. असो.
अधिक संदर्भ
* समस्या चर्चा
* www.mrsikhnet.com/2006/11/27/women-in-sikhism-gender-inequality/
* www.mrsikhnet.com/2006/06/04/khalsa-women-panj-piaray/
* http://www.sikhnet.com/news/women-seek-right-do-kirtan-golden-temple
* https://lailayuile.com/2008/01/22/understanding-sikh-gender-inequality/
* https://sikhchic.com/1984/violence_against_women_the_state_of_punjab_part_v
* www.angelfire.com/trek/baldev/res/default/womenabuse.pdf
* उजव्या बाजू
* http://www.wahegurunet.com/role-of-women-in-sikhism
* http://www.bbc.co.uk/schools/gcsebitesize/rs/prejudice/sikhismrev4.shtml
* https://en.wikipedia.org/wiki/Women_in_the_Guru_Granth_Sahib
29 May 2016 - 9:43 pm | माहितगार
अजून एक रोचक किस्सा एका शीख धर्मिय मुलीने भुवया कोरल्या म्हणून ती शीख राहीली नाही म्हणुन तीला एम.बी.बी.एस. ची अॅडमीशन नाकारली गेली होती अशी एक बातमी वाचण्यात आली (चुभूदेघे)
संदर्भ
http://scroll.in/article/807847/nearly-10-million-sikhs-have-lost-their-...
21 Apr 2016 - 4:40 pm | DEADPOOL
मस्त माहिती माहितगार!
यावं फुरोगामीनी!
21 Apr 2016 - 7:27 pm | सूड
मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका ना देवळात. तसंही आपलं शास्त्र देव सगळीकडे असल्याचं सांगतं...मग घरात बसून प्रार्थना करा...पोचेल.
21 Apr 2016 - 8:13 pm | उगा काहितरीच
लाखो लोकांच्या पोटावर का पाय देता हो ? "देव आहे का नाही ? " "देव मंदिरातच आहे का ? " अश्या प्रश्नावर मला बोलण्याची इच्छा नाही. पण जे लाखो लोक मंदिरासमोर बसून फुलं- प्रसाद विकतात त्यांना दुसरा धंदापाणी काय देणार हो ? जाऊद्या जगु द्या त्यांनाही.
21 Apr 2016 - 8:45 pm | तर्राट जोकर
असं तर हर अनैतिक काम योग्यच म्हणायला ल्लगेल.
21 Apr 2016 - 10:36 pm | उगा काहितरीच
अनैतिक ???? देवळाबाहेर हार फुले विकणे यात कुठे अनैतिकता दिसली तुम्हाला ?
21 Apr 2016 - 11:30 pm | तर्राट जोकर
देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट परत दुकानात येते. ते तर फारच सोपं झालं, मुळात देव आहे असे भासवून धंदा करायला बसणे अनैतिक नाही?
22 Apr 2016 - 8:09 am | उगा काहितरीच
नाही. बिलकुल नाही.
22 Apr 2016 - 8:42 am | उगा काहितरीच
देवाला वाहीलेले फूल-हार हे काही फेविकॉल आहे का ? एकदा वापरले आता परत वापरता येणार नाही ? प्रत्येक वेळी नवीन फुलं वापरायची तर निर्माल्य किती जमा होईल ? (मी शाळेत होतो तेव्हा आम्हाला जे हेडमास्तर होते (नाव नीटसं आठवत नाही. ) ते काही कार्यक्रम असला आणी ४-५ पाहुण्यांचं स्वागत करायचं असलं तरी एक हार मागवीत. आणि तोच हार प्रत्येकाच्या गळ्यात घालीत असत. तेव्हा ते विचित्र वाटत होतं पण आता त्यामागची भावना कळते. हार एकच मिळत असला तरी प्रत्येक पाहुण्याला सेपरेट रोपटं मिळत असे. )
22 Apr 2016 - 9:21 am | तर्राट जोकर
म्हणजे लोकांचे पोटपाणी चालावे म्हणून देवळांची* दुकाने चालु द्यावीत असे तुम्हाला म्हणायचे आहे तर. असे असेल तर अजुन काय बोलावे?
*इथे देवळेच नाही तर सर्व प्रकारची प्रार्थनास्थळं जिथे लोक बाहेर काहीना काही घेउन विकायला बसतात. आतही विकायलाच बसलेले असतात. कोणी स्वखुशीने फसत असेल तर फसु देत बापडे.
22 Apr 2016 - 8:16 am | DEADPOOL
मुळात देव आहे असे भासवून >>>>>>
when you can't see reality you may call it an illusion.
धंदा करायला बसणे
अनैतिक नाही?>>>>>>>>
we know our god is exist. so we have our own faith. whenever we purchase something its by our own wish, will, without any cohesion, undue influence,misrepresentation of facts, or in influence of alcohol and unsound mind.
Our whole culture is based on faith on god. The culture gives us difference between UNSCRUPULOUS and ETHICS. so our faith on god never be UNSCRUPULOUS!!!!!!
22 Apr 2016 - 8:19 am | DEADPOOL
मंडळी एन्ग्रजी ग्रामर च्या चुका पोटात घ्याव्या!
लई घाईघाईत टंकण केलय!
22 Apr 2016 - 7:25 am | सुधीरन
नेमकी कुणाची काळजी वाटतेय तुम्हाला?
22 Apr 2016 - 8:05 am | DEADPOOL
बरोबर
मग अल्ला एकच आहे तर सकाळी पाच वाजता भोँगा लाऊन लोकांना माशिदित बोलवायची गरज काय?
गॉड एकच आहे तर चर्चमधून मेणबत्त्या जाळून टाकण्याचा अर्थ काय!
म्हणजे सर्व काही मनुष्य घरात बसूनच करू शकतो!
22 Apr 2016 - 6:29 pm | सुबोध खरे
देवळात मशिदीत किंवा चर्च मध्ये जाणे हे माणसाची भावनिक "गरज" आहे. देव चराचरात आहे अल्ला किंवा येशु "वर" बसलेला आहे असे असताना प्रार्थना स्थळात लोक का जातात? ते या भावनिक गरजे साठी. देवाची मूर्ती, काबाचे फोटो किंवा क्रूस त्या सर्वांच्या घरात असतातच.
असो, देवळाबाहेर मशिदीबाहेर किंवा चर्चच्या बाहेर असणारे मेणबत्त्या किंवा हर फुले किंवा चादरी विकणारे लोक हे स्वताच्या पोटापाण्यासाठी असतात.
देवळे / मशिदी किंवा चर्च हे त्यांना आमंत्रण देत नाहीत.
नवीन हॉटेल निघाले कि बाहेर पानवाला येतो तसा हा प्रकार आहे. पानवाला आवश्यक नाही किंवा हॉटेल वाला त्याला आमंत्रण देत नाही. तो स्वतःच्या पोटापाण्यासाठी येतो हि वस्तुस्थिती.
डॉक्टर ने दवाखाना काढला कि केमिस्ट जवळपास दुकान टाकतो तेच आहे हे डॉक्टर काही केमिस्टला आमंत्रण देत नाही.
जर नंतर त्यांनी "साटे लोटे" केले तर ती काही मूळ धर्माची किंवा वास्तूची( मंदिर , हॉटेल किंवा दवाखाना) यांची गरज किंवा चूक नाही.
22 Apr 2016 - 6:33 pm | DEADPOOL
खरेसाहेब +१११११११११
22 Apr 2016 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
काय संबंध इतर धर्मियांना देवळात प्रवेश द्यायचा? ह्या असल्या थेरांमुळे हिंदुधर्मामधे फुट पडायला लागली आहे.
22 Apr 2016 - 8:45 pm | DEADPOOL
जॅकभाऊ +१११११११११११११