आज थोडा वेगळा प्रयत्न करुन पाहिला. बघू कसा वाटतो ते... :-)
म्हटलं तर...
म्हटलं तर मी एक प्रियकर हाय, म्हटलं तर येडपट हाय
म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टी खोट्या हायेत, वटवट हाय
म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव ओतून ऐकवलं हाय
म्हटलं तर अजून इतकंच असंल, अर्धं म्या लपवलं हाय
म्हटलं तर तुला खुश करायला म्या कारणं रचली हाय
म्हटलं तर तुझ्या डोळ्यांमधे अजबच नशा भरली हाय
म्हटलं तर हा रोग हाय खोटा, खोटं प्रेम आमचं हाय.
म्हटलं तर ह्या प्रेमाच्या रोगात कठिण जगणं आमचं हाय
म्हटलं तर हे योग-वियोग आम्ही रचलेलं ढोंग हाय
म्हटलं तर फक्त एवढंच खरं बाकी सगळं सोंग हाय
__________________________________________
मूळ काव्य
.
फ़र्ज़ करो : कवी -इब्ने इंशा
फ़र्ज़ करो हम अहले वफ़ा हों, फ़र्ज़ करो दीवाने हों
फ़र्ज़ करो ये दोनों बातें झूठी हों अफ़साने हों
फ़र्ज़ करो ये जी की बिपता, जी से जोड़ सुनाई हो
फ़र्ज़ करो अभी और हो इतनी, आधी हमने छुपाई हो
फ़र्ज़ करो तुम्हें ख़ुश करने के ढूंढे हमने बहाने हों
फ़र्ज़ करो ये नैन तुम्हारे सचमुच के मयख़ाने हों
फ़र्ज़ करो ये रोग हो झूठा, झूठी पीत हमारी हो
फ़र्ज़ करो इस पीत के रोग में सांस भी हम पर भारी हो
फ़र्ज़ करो ये जोग बिजोग का हमने ढोंग रचाया हो
फ़र्ज़ करो बस यही हक़ीक़त बाक़ी सब कुछ माया हो
प्रतिक्रिया
9 Apr 2016 - 4:43 pm | नाना स्कॉच
म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव ओतून ऐकवलं हाय
म्हटलं तर अजून इतकंच असंल, अर्धं म्या लपवलं हाय
जियो !!!
9 Apr 2016 - 4:52 pm | lgodbole
छान
9 Apr 2016 - 5:25 pm | राही
पण तो प्रियकर शब्द खटकला. तसे नेहमीच त्या शब्दापाशी अडखळायला होते. साध्यासोप्या मराठीत 'प्रेमी' साठी चपखल शब्दच आठवत नाही. जुने वग, लावण्या किंवा अन्य जुन्या शृंगारिक साहित्यात एखादा शब्द सापडेल का? सजण, साजण हेही तितकेसे समर्पक वाटत नाहीत.
9 Apr 2016 - 6:58 pm | तर्राट जोकर
हो, प्रियकर शब्द मलाही खटकतो. जो प्रेमात धुंद झालेला आहे, ज्याला प्रेयसीशिवाय काहीच सुचत नाही, रुचत नाही त्याला काय म्हणावे हा प्रश्न पडत आलाय. प्रियकर, प्रेयसी हे दोन्ही शब्द त्या अवस्थेला न्याय देत नाहीत असं वाटतं.
9 Apr 2016 - 7:20 pm | अभ्या..
आवडले. इनपुट भारीच मिळालाय.
.
"म्हणायला जीवाचा जिवलग तुझा, म्हणलं तर यडा हाय
म्हणायला दोन्ही बी अगदी खोटं, फुकाची बडबड हाय"
असे डायरेक्ट फॉर्म्याटानुसार न चालता थोडं गावरान बोलीत मजा येऊ शकेल असे मला वाटते.
बाकी कविता प्रकारात आमचे गिन्यान म्हंजे ह्याह्याह्याह्या.
9 Apr 2016 - 7:31 pm | राही
'जिवलग' भारी आहे. गावरान बोलीत साजून दिसतो.
पण तरीही...
9 Apr 2016 - 7:41 pm | तर्राट जोकर
तुमच्या दोन ओळी खासच. झकास! असाच थोडासा बाज आणायचा होता पण काही वाचकांना गावरान बोली जड जाऊ शकते म्हणुन सोडलं.
बाकी जीवलग हा शब्दही तितका परफेक्ट नाही. का ते सांगतो. जीवलग ह्या शब्दात ज्याला जीव लागलाय असा. परत तो प्रियकर ह्या शब्दाचाच दुसरा अर्थ. एकतर्फी प्रेम करणार्याला जीवलग म्हणू शकत नाही.
मला जो शब्द म्हणायचा आहे त्याचा अर्थ असा आहे की प्रेम करणारा प्रेमी. स्वयंभू प्रेम. जसं मीरा कृष्णावर करत होती. मीरा ही भक्त नाही. प्रेम करणारी आहे पण प्रेयसी नाही.
चला शोधुया शोधुया... :)
12 Apr 2016 - 3:48 pm | अभ्या..
तीन चार दिवस डोस्क्यातून काय उतरंना राव कविता.
आता तड लागल्याशिवाय काय खरं नाही. :(
.
तसं म्हणाया गेलं तर चार ओळी बिना थांगपत्त्याच्या
तसं म्हणाया गेलं तर जखमा फाटल्या काळजाच्या
.
अवघडे अवघडे.
12 Apr 2016 - 3:56 pm | तर्राट जोकर
बाब्बौ, अभ्याभौ,
तुमच्यासाठी आम्ही ल्हिलेल्या खास दोन वळी:
कत्ल कर डालो अब तुम्हारे लब्जों से हमें
जमाना कहेगा के वो शायरी सुना रहा था.
12 Apr 2016 - 4:00 pm | अभ्या..
आह.
जिओ.
12 Apr 2016 - 5:57 pm | राही
आता काय म्हणू! "जगा"!
मराठीत काय खरं नाही. जिओ कुठे आणि जगा कुठे.
9 Apr 2016 - 7:20 pm | समाधान राऊत
+१
12 Apr 2016 - 1:47 pm | पैसा
आवडली
12 Apr 2016 - 3:12 pm | चांदणे संदीप
समज, प्रेमाची व्याख्या आहोत, धुंद आम्ही दिवाणे आहोत...
समज, हे दोन्ही खरे नसून, वार्यावरची विराणी आहोत...
समज, ही सल काळजाची, मनापासून सांगत आहोत...
समज, आत खूप काही आहे, अजून अर्ध्यातच आहोत...
समज, तुझे हसू टिपण्यासाठीच, खेळ रचत आहोत...
समज, तुझ्या डोळ्यातच, आकंठ बुडालेलो आहोत...
समज, हे सारं खोट आहे, प्रीतही खोटीच करीत आहोत...
समज, ह्या दुखण्यात, श्वासही बळेच घेत आहोत...
समज, हे ढोंग आम्ही, जगण्याचं, उगा करीत आहोत...
समज, हेच आहे खरं, बाकी माया पेरीत आहोत...
Sandy
12 Apr 2016 - 3:57 pm | तर्राट जोकर
सँडीभाय, हे पण लय आवडलं. गजब. __/\__
12 Apr 2016 - 5:59 pm | राही
हेही छानच.
12 Apr 2016 - 6:21 pm | अभ्या..
अरे सॅन्डीबाबा,
खतराच लिख्या ना. मै देख्याच नई तो.
12 Apr 2016 - 3:22 pm | एस
माशाल्लाह!
12 Apr 2016 - 4:51 pm | अजया
वा!
प्रतिसादातल्या कविताही खास!
12 Apr 2016 - 5:19 pm | चाणक्य
हे राहिलं होतं वाचायचं. भारीये हे.
12 Apr 2016 - 5:44 pm | अनुप ढेरे
मस्तं! राहिलं होतं वाचायचं.
12 Apr 2016 - 5:56 pm | स्वप्नज
जियो तजोभाऊ...मस्तच...
@ चांदणे संदीप - तुमचीही लाजवाब कविता...