अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली.
नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा.
थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं. यावेळी ते तिच्या अपयशाचं होतं. प्रेमातल्या आणि जीवनातल्या अपयशाचं ..डेथ सर्टिफिकेट.
प्रतिक्रिया
8 Apr 2016 - 12:30 pm | वेल्लाभट
जबर.
8 Apr 2016 - 2:30 pm | आतिवास
शशक चांगली जमून आली आहे.
आवडली - असं म्हणवत नाही, यातच तिचं यश आहे.
8 Apr 2016 - 3:55 pm | पैसा
:(
8 Apr 2016 - 4:05 pm | चिनार
जबर्दस्त !!
8 Apr 2016 - 4:38 pm | तुषार काळभोर
यानिमित्ताने दर्जेदार शशकचा सिलसिला पुन्हा सुरू व्हावा
8 Apr 2016 - 5:35 pm | जव्हेरगंज
जबरा!!!!!
8 Apr 2016 - 5:44 pm | नाना स्कॉच
शशक म्हणून जबरी पण थीम म्हणून बोगस वाटली, आत्महतेचे उदात्तीकरण वाटले! :(
8 Apr 2016 - 5:58 pm | खेडूत
सहमत.
आणि आजच्या दिवशी प्रकाशित करायला नको होती (..असं आपलं माझं मत)
8 Apr 2016 - 6:52 pm | बोका-ए-आझम
थरथरत्या हाताने त्याने तिचे डेथ सर्टिफिकेट फाईल केले - असा शेवट केला असता आणि ते अपयशाचं वाक्य वगळलं असतं तर अजून effective झाली असती. आहे छानच. वरती आतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे - छान म्हणवत नाही!
10 Apr 2016 - 11:29 pm | मराठी कथालेखक
पण मला मृत्यू आत्महत्येने झालाय आणि आत्महत्या प्रेमातील अपयशातून केली आहे हे सांगायच होतं. शिवाय बाकी स्मिताच्या आजपर्यंतच्या सगळ्या अव्वल यशाच्या पार्श्वभूमीवर "अपयशाचं सर्टिफिकेट" ठळक करायचं होतं. एकाच वाक्यात हे कदाचित नसतं जमलं.
9 Apr 2016 - 4:11 am | रातराणी
:(
10 Apr 2016 - 11:30 pm | मराठी कथालेखक
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार
आणि सणाच्या दिवशी ही कथा प्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी.
पण अचानकच कथानक सुचलं आणि मग लगेच टंकण्याशिवाय राहवलं नाही.
11 Apr 2016 - 8:27 am | नाखु
असेलही पण स्पर्धेत यश मिळवताना (अपयशाचाही सामना करण्याचा कणखरपणा) शिकवण मिळाली नाही..म्हणूनच पट्ली नाही.
स्पष्टोक्तीबद्दल माफी
11 Apr 2016 - 5:58 pm | जगप्रवासी
आवडली कथा मस्त जमली आहे , सततच्या यशामुळे अपयश काहींना पचवता येत नाहीत त्याच हे उदाहरण म्हणता येईल.
11 Apr 2016 - 6:43 pm | मराठी कथालेखक
हे तर आहेच. पण परीक्षेतलं/स्पर्धेतलं अपयश आणि प्रेमातलं अपयश यात फरकही आहे.
परीक्षेतलं अपयश बहूधा तात्पुरतं असतं, पुन्हा प्रयत्न करुन ते यशात बदलता येतही. पण प्रेमाच्या बाबतीत हे सहसा शक्य होत नाही , म्हणजे तुटलेलं नातं (त्याच व्यक्तीशी) पुन्हा जुळून येत नाही.
इथे माझा लिहिण्याचा अर्थ थोडा वेगळा होता. "यशामुळे अपयश पचवता येत नाहीत" यापेक्षा प्रेमातलं अपयश इतकं मोठं झालं की स्वतःच जीवन, ज्या जीवनात तिने खूप यश मिळवलं आहे असं जीवन तिला नकोसं झालं..
आणि मला आत्महत्येचं उदात्तीकरण करायचं तर नाहीच उलट असं सुचवायचं आहे की आत्महत्या करताना निदान हा विचार तरी करावा की आपण आपल्याच आतापर्यंतच्या सगळ्या कतृत्वाचा अपमान करतोय. (बाकी आई-वडील, इतर सोयरे यांचा विचार तर आहेच पण हा ही विचार करावा). निदान जुनं कतृत्व आठवून तरी स्वतःला क्षुद्र मानण्याचा अपराध करु नये.
13 Apr 2016 - 9:48 am | अपरिचित मी
सहमत!!!
12 Apr 2016 - 1:09 am | पद्मावति
:(
12 Apr 2016 - 7:39 pm | चौथा कोनाडा
सही.
एकीच्या दुर्दैवी पणाची शशक चांगली उतरलीय.
13 Apr 2016 - 9:51 am | अपरिचित मी
छान जमली आहे... पण म्हणावीशी वाटत नाही... वाचून दुखः झाले... !!
16 Apr 2016 - 4:54 pm | भरत्_पलुसकर
जबरी!
16 Apr 2016 - 5:42 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद