सूक्ष्मकथा : जंगल

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 8:33 pm

वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले.
शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर.

वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला.
अन घेतला एक सूर. पाणवठ्यात.

ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे.
सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार.

कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर.
अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा.

वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर.
अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत.

माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी.
अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली.

वाघ जंगलात निघून गेला. पाणवठ्यावर गर्दी. वन्यजिवांची.
त्यात होते हरिण, माकड अन गिधाडांची टोळी.

मग पुन्हा दुसरा वाघ आला अन त्याने फोडली डरकाळी...

कथामौजमजाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजकारण लोकांना उद्देशून आहे का?

राजकारनी लोकांना उद्देशून आहे का?

चांदणे संदीप's picture

7 Apr 2016 - 10:54 pm | चांदणे संदीप

खलील जिब्रानला फाईट?? ;)

Sandy

रातराणी's picture

7 Apr 2016 - 11:15 pm | रातराणी

हम्म. नाही कळली. :(

भारीच हां. सकाळी धागा आला आणि संध्याकाळी सूक्ष्मकथा पण?

विवेकपटाईत's picture

8 Apr 2016 - 2:19 pm | विवेकपटाईत

भल्या मोठ्या कवितेला सूक्ष्म कथा नाव काय दिल्ल काहीच कल्ले नाही.

अ-मॅन's picture

9 Apr 2016 - 6:27 pm | अ-मॅन

पाहिला वाट्टे ?

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2016 - 12:57 am | पिलीयन रायडर

रोज धागा काढलाच पाहिजे असं काही नाहीये अहो..

पुर्वी इथे चांगल्या पद्धती होत्या राव.. लोक लगेच अडल्या नडलेल्याला डायरी द्यायचे...
श्या.. पुर्वीचे मिपा राहिले नाही ;)