नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - रस्ता. जो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. जे छायाचित्र पाहिल्यावर रस्ता हा त्याचा मुख्य विषय वाटेल असे छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे २० एप्रिल. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.
प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतू ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूकव्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषीकृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय ~ फूल
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया
20 Apr 2016 - 9:22 am | साहित्य संपादक
~ हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता ~
अधिक माहिती: ऐन हिवाळ्यात काश्मीर मध्ये गुलमर्ग च्या दिशेने जाताना हा फोटो काढला आहे. सकाळी १० वाजलेले. रात्री झालेली बर्फवृष्टी, त्यात पडलेले धुके आणि वातावरणात कमालीचा थंडावा असे मस्त वातावरण असताना आमची गाडी बर्फात रुतून बसली होती. मी लगेच खाली उतरून मोबाईल मधून हा फोटो टिपला.
.
~ माझ्या गावातला एक रस्ता ~
.
~ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता ~
.
~ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे) ~
फोटोबाबत तांत्रिक माहिती - एफ ८ १/२००; आयएसओ ४००; एअक्पोजर -१.३ स्टेप; कॅनन पॉवरशॉट एसएक्स २२० एचएस
.
~ सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट ~
.
~ ही वाट खोल जाते... ~
.
~ झेड ब्रिजच्या रस्त्यावर ~
.
~ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक ~
.
~ ही वाट दूर जाते.. ~
अधिक माहिती: गावातून नदीकडे जाणारा रस्ता… संध्याकाळच्या उन्हात… फोन कॅमेरा - Samsung Galaxy S Duos
.
~ वळणवाट ~
EXIF: f/9 55mm 1/200 ISO-100
.
~ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो ~
.
~ विमानातून दिसलेला महामार्ग ~
.
~ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट ~
निरव शांतता. पक्ष्यांच्या आवाजाने शांतता अधिकच गुढ वाटत होती.
.
~ ...खंडाळ्याच्या घाटासाठी! ~
.
~ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता ~
.
~ झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल ~
6 Apr 2016 - 9:31 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह व्वा! मस्त विषय आहे.
6 Apr 2016 - 11:10 am | चांदणे संदीप
एक रासता है जिंदगी....
एक रस्ता आहा आहा... दो राही... आहा आहा
इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते
ये हरियाली और ये रासता...
अशी मस्त मस्त गाणी आठवली....इतकीच भारी प्रकाशचित्रे यावेळी अपेक्षित आहेत!
माझाही एक असेलच... ;)
Sandy
6 Apr 2016 - 11:42 am | एस
वा! काय सुंदर विषय आहे... काही टिपा देऊ का?
१. संध्याकाळ वा रात्र वा पहाटेच्या लगबगीच्या वेळचे रस्ते टिपण्यासाठी स्लो शटर इंटर्व्हल वापरून वाहनांचे 'लाईट ट्रेल्स' घेता येतील.
२. बनारस वा वाईसारख्या जुन्या गावांतले गल्लीबोळही 'रस्ता' ह्या विषयाअंतर्गत येत असावेत. त्यांचा निवांतपणा वाईड अॅन्गल लेन्स वापरून टिपता येईल.
३. माथेरानसारख्या ठिकाणी रेल्वेरुळांबरोबरच चढणारा रस्ता पावसाळ्यात वा धुक्यात फार छान टिपता येतो.
४. वाळवंटात मिनिमॅलिस्टिक शैलीत दूरवर जाणारा एकलकोंडा रस्ता टिपता येईल.
५. शहरी भागातला रस्ता टिपताना तिथल्या माणसांच्या व वाहनांच्या गर्दीत रस्ता हा मुख्य विषय हरवून जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी जवळच्या उंच इमारतीच्या छतावरून टॉप अँगल व्ह्यू घेता येईल.
६. प्रत्येक रस्त्याचे स्वतःचे असे एक 'कॅरॅक्टर' असते. उदा. गावाबाहेरील धुळीने भरलेले रस्ते, टापटीप, समृद्धी दर्शवणारे सदैव घाईत असणारे एक्स्प्रेसवे, आद्य रस्त्यांचे प्रतीक असणार्या पाऊलवाटा, नागमोडी घाटरस्ते, आणि असेच असंख्य प्रकार. छायाचित्रकाराच्या लेन्सने हे 'कॅरॅक्टर' दर्शकांना दाखवणे आवश्यक असते.
(टीपः आगावूपणाबद्दल क्षमस्व :-) )
6 Apr 2016 - 11:53 pm | श्रीरंग_जोशी
टिपा आवडल्या. टिपांबरोबर एस यांनी या विषयासंबंधीत काढलेले फोटोज बघायला आवडतील.
6 Apr 2016 - 1:56 pm | समर्पक
जंगल वाटा - मणिपूर, त्रिपुरा व आसाम
हवाई चित्रण (पॅराग्लायडिंग)
लाल खडीचा डांबरी रस्ता
शहरी रस्ता
लोहमार्ग - उदकमंडलं - उटी
प्रदक्षिणा मार्ग, कांची
भुवनगिरी किल्ला, तेलंगण
पर्वतीय महामार्ग
वाळवंटी रस्ता
शरद ऋतूतील रस्ता
6 Apr 2016 - 2:21 pm | स्पा
चायला ह्यांचा नंबर देऊन टाका राव ;)
एक से एक फटू
मजा आली
6 Apr 2016 - 2:26 pm | जगप्रवासी
मी पण हेच टंकायला आलो होतो, सगळे विषय ह्याने आपल्या फोटोत घेऊन टाकले.
6 Apr 2016 - 4:10 pm | नाखु
अश्येच म्हणतो फक्त बर्फातला आणि गुहेतला रस्ता राहलाय तो टाकून रस्ता साफ करून टाका एकदाचा...
जबराट फोटो.
6 Apr 2016 - 2:26 pm | एस
डोळे निवले!
6 Apr 2016 - 4:13 pm | सस्नेह
असेच म्हणते !!
काय एकसे एक फोटो आहेत !!
6 Apr 2016 - 2:27 pm | चांदणे संदीप
मग स्पर्धेसाठी अजून कसले टाकणार मालक?? :)
(वरडा! उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागतोय बहुतेक!) :(
Sandy
6 Apr 2016 - 6:51 pm | राघवेंद्र
+१
6 Apr 2016 - 4:18 pm | पैसा
क्लास!
6 Apr 2016 - 11:52 pm | श्रीरंग_जोशी
शब्दच सुचत नाहीयेत या फोटोजला दाद देण्यासाठी.
वेगळा धागा काढून या फोटोजच्या ठिकाणांविषयी पण लिहावे ही विनंती.
7 Apr 2016 - 4:01 pm | तुषार काळभोर
वेगळा धागा काढून या फोटोजच्या ठिकाणांविषयी पण लिहावे ही विनंती.
30 Jun 2016 - 12:51 am | सही रे सई
+१ अगदी असेच म्हणते.
30 Jun 2016 - 12:57 am | रुपी
त्यांनी एक धागा काढला आहे या विषयावर -"रस्ता" - चित्रलेख. खरे तर मीही नंतर निवांत पाहीन हे ठरवून विसरुन गेले होते. बरे झाले, तुम्ही हा धागा वर आणल्यामुळे लक्ष्यात आले.
7 Apr 2016 - 4:54 pm | नीलमोहर
+१
8 Apr 2016 - 3:41 pm | निशाचर
सुंदर फोटोज!
11 Apr 2016 - 9:43 pm | समर्पक
लेखासाठी प्रयत्न केला आहे, नवीन धाग्याविषयीच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या कि कलादालनात प्रकाशित करतो.
6 Apr 2016 - 2:43 pm | यशोधरा
मस्त!
6 Apr 2016 - 3:08 pm | इशा१२३
अप्रतिम फोटो !
6 Apr 2016 - 3:24 pm | चांदणे संदीप
मग स्पर्धेसाठी अजून कसले टाकणार मालक?? :)
(वरडा! उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागतोय बहुतेक!) :(
Sandy
6 Apr 2016 - 4:02 pm | पेशवा भट
एका वेळ्ला किती फोटॉ देवु शकतो?
6 Apr 2016 - 4:17 pm | खेडूत
प्रत्येकी एकच.
6 Apr 2016 - 4:15 pm | सविता००१
तो लाल खडीचा डांबरी रस्ता कुठे आहे?
मस्त दिसतोय
11 Apr 2016 - 5:59 am | इडली डोसा
असावा बहुतेक
11 Apr 2016 - 9:44 pm | समर्पक
तिथलाच आहे
6 Apr 2016 - 8:15 pm | 'पिंक' पॅंथर्न
7 Apr 2016 - 10:29 am | समर्पक
हवाई चित्रण : दोन देशांना जोडणारा रस्ता
रुक्ष वैराग्य, आसाम
समुद्री रस्ता, रामेश्वर
पुसट पाऊलवाट, ब्रह्मदेश
महामार्ग
हिरवाई, पॅराग्वे
उत्साही लोकजीवनाचा साक्षी
पठारावरचे वळण
ॲस्पेन, कॉटनवूड व पाईनच्या रंगात रंगलेला रस्ता
7 Apr 2016 - 12:07 pm | चांदणे संदीप
___/\___
7 Apr 2016 - 4:51 pm | अजया
_/\_
7 Apr 2016 - 3:04 pm | उल्का
सगळेच मस्त :)
7 Apr 2016 - 3:32 pm | सस्नेह
केवळ अप्रतिम.
19 Apr 2016 - 11:01 am | सुबक ठेंगणी
आसामचं वैराग्य आणि अॅस्पेनची श्रीमंती विशेष आवडली :)
7 Apr 2016 - 3:42 pm | जव्हेरगंज
7 Apr 2016 - 4:55 pm | नीलमोहर
समर्पक यांनी अती समर्पक छायाचित्रे देऊन विषयच मिटवला आहे :)
7 Apr 2016 - 5:45 pm | अनन्न्या
१) जगातला सर्वात सुंदर रस्ता माझ्या माहेराकडे जाणारा.
7 Apr 2016 - 6:03 pm | चांदणे संदीप
हा फ़ोटो चालला असता की ओ!
मोबाइलने काढला म्हणून काय झाले? "माहेराकडे जाणारा" एवढ वाचूनच पुष्कळ मते मिळाली असती. माझे पकडून!
माझ्या माहेरचा रस्ता
वाट काढी आमराईतून
जाई घेऊन मला
माझ्या घरी, सासूराहून!
वरच्या सर्व सुंदर रस्त्यांना फिके पाडले या रस्त्याने! :)
Sandy
8 Apr 2016 - 9:25 pm | असंका
+१
12 Apr 2016 - 11:17 am | तुषार काळभोर
जिकलंस!
7 Apr 2016 - 10:02 pm | उल्का
लाल लाल ह्या रस्त्याला मायेची ओढ,
माहेरीचा रस्ता त्याला कशाची नाही तोड.
:) :)
7 Apr 2016 - 5:50 pm | अनन्न्या
२) माझ्या माहेरच्या घ्रातून बाहेर येताना दिसणारी पायवाटः रत्नागिरीतील एक छोटेसे गाव
३) तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला जाताना काढलेला फोटो.
7 Apr 2016 - 7:52 pm | माहितगार
छायाचित्रे छान आहेत, नेहमीच्या ट्रॅफीक पासून दूर असल्यामुळे आल्हाददायक वाटताहेत.
7 Apr 2016 - 8:12 pm | IT hamal
7 Apr 2016 - 9:15 pm | IT hamal
8 Apr 2016 - 9:01 am | शित्रेउमेश
8 Apr 2016 - 9:04 am | शित्रेउमेश
8 Apr 2016 - 1:51 pm | नंदन
समर्पक यांनी दिलेली सारीच छायाचित्रं सुरेख आहेत. (इतर कोणी वाटेला जायचं कारणच नाही आता :))
तो लाल खडीचा रस्ता अॅरिझोनातला वाटतोय (सेडोना?) आणि शहरी बहुतेक न्यू ऑर्लिन्समधला?
8 Apr 2016 - 2:17 pm | शित्रेउमेश
10 Apr 2016 - 10:03 pm | एकप्रवासी
11 Apr 2016 - 6:01 am | इडली डोसा
स्पर्धेसाठी फोटो द्यायचा विचार मागे घ्यावा वाटतोय हे एवढे भारी फोटो बघून
12 Apr 2016 - 7:35 am | प्रीत-मोहर
+१
12 Apr 2016 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
काही रोचक रस्ते...
स्पर्धेकरिता नाही
इमारतीत शिरणारा दुबई मेट्रोचा एक मार्ग...
.
दुबईच्या एका चौकातून जाताना...
.
बुर्ज खलिफावरून दिसलेला रस्ता...
.
नोर्डकाप्प (पृथ्वीवरील जमिनीचे उत्तर टोक), नॉर्वे च्या दिशेने... (या रस्त्यावर प्रवास करताना, "रोड टू नोव्हेअर" म्हणजे नक्की काय, हे पुरेपूर समजते !)
.
किर्केनेस (नॉर्वे)... रस्त्यातला बर्फ की बर्फातला रस्ता ???!!!
.
ओस्लो(नॉर्वे)तील रस्त्यांचे हिवाळ्यातले विहंगम दृश्य...
.
12 Apr 2016 - 2:43 pm | चांदणे संदीप
थंड झालोय! ;)
Sandy
12 Apr 2016 - 3:34 pm | नाखु
म्हणतात (एक्का) प्रतिसादातच गार करणे !!!!
गारेगार नाखु
12 Apr 2016 - 5:30 pm | असंका
काय जुगल्बंदी!
=))
12 Apr 2016 - 5:45 pm | पिलीयन रायडर
रोड टु नोव्हेअर!!!
संपुर्ण धाग्यातच एकसे एक फोटो आहेत. आजवरचा सर्वात आवडलेला हटके विषय!!
12 Apr 2016 - 4:44 pm | त्रिवेणी
अरे काय हे?गरीबांवर जरातरी दया करा.आता आम्ही काय साधे फोटो टाकायचे? जावु देत नेक्स्ट टाइम.
14 Apr 2016 - 8:38 pm | साहित्य संपादक
नवी प्रवेशिका पहिल्या प्रतिसादात जोडली आहे.
15 Apr 2016 - 9:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
कॅनडा- विनिपेग पोर्टेज अॅव्हेन्युचा २७ व्या मजल्यावरुन काढलेला फोटो
15 Apr 2016 - 10:01 pm | साहित्य संपादक
नवी प्रवेशिका पहिल्या प्रतिसादात जोडली आहे.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत पाच दिवसांनी संपणार आहे. ज्यांना प्रवेशिका पाठवायची आहे त्यांनी कृपया नोंद घ्यावी.
19 Apr 2016 - 10:05 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच स्पर्धेच्या या भागातही मिपाकरांकडून एकाहून एक फोटोजची मेजवानी मिळत आहे.
काही अवांतर फोटोज माझ्याकडूनही.
हा नेटका रस्ता म्हणजे नागपूरमधला वर्धा रोड (डिसें २००६)
ऐन उन्हाळ्यातही हिरवाईने नटलेला हा अमरावतीमधला एक रस्ता (एप्रिल २००७)
बरेच मिपाकर रोज या रस्त्यावरून जात येत असतील (जुलै २००७)
ऑरलॅन्डो आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असताना टिपलेला हा महामार्ग
पाइक्स पील, कोलोरॅडो येथे जात असताना टिपलेला हा पर्वतीय रस्ता
आमच्या घराजवळच्या एका उद्यानातला हा कल्पक हरित-रस्ता
19 Apr 2016 - 10:29 am | चांदणे संदीप
श्रीरंगराव, मस्त फ़ोटो!
लाईकल्या गेले आहे! ;)
Sandy
19 Apr 2016 - 10:24 am | सविता००१
सुरेख आणि अप्रतिम फोटो रस्ता सारखा विषय दिल्यावर येतील असं वाटत होतंच. पण या धाग्यावर आले आणि पार भान हरपून गेलंय. किती अप्रतिम असावेत फोटो?????????????
फार फार छान. डोळे निवले.
कितीहीवेळा पाहिलं तरीही जास्त जास्त आवडतोय हा धागा
19 Apr 2016 - 4:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
विमानांकरिता फ्लायओव्हर असलेले / विमानाच्या धावपट्टीला छेदून जाणारे रस्ते...
स्किफॉल/शिफॉल विमानतळ, अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स / हॉलंड)...
.
लाइप्झिश्-हालं-विमानतळ-५ (Leipzig-Halle-airport-5), जर्मनी...
.
जिब्राल्टर (युके)...
.
फोर्ट लॉडरडेल (युएसए)...
.
आता हे जमिनीवरच्या रहदारीसाठीचे फ्लायओव्हर्स तितकेसे रोमांचक वाटत नाही असे वाटत असेल तर...
हायवेवरून जाणारा हा जलमार्ग पहा... एक लक्झरी बोट (यॉट) त्याचा वापर करत असतानाचा फोटो !!! ...
.
माग्देबुर्ग वॉटरवे, जर्मनी...
.
Pontcysyllte Aqueduct, Wrexham County Borough, ब्रिटन...
*****************************
पहिला फोटो मी काढलेला आहे. इतर सर्व फोटो जालावरून साभार.
19 Apr 2016 - 6:17 pm | साहित्य संपादक
दोन नव्या प्रवेशिका जोडल्या आहेत.
प्रवेशिका पाठवण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे याची इछुकांनी नोंद घ्यावी.
आता पर्यंत प्रवेशिका पाठवणार्या मिपाकरांचे आभार.
20 Apr 2016 - 9:26 am | साहित्य संपादक
काही नव्या प्रवेशिका पहिल्या प्रतिसादात जोडल्या आहेत.
भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री १२ वाजता प्रवेशिका पाठवण्याची मुदत संपत आहे.
30 Jun 2016 - 1:08 am | सही रे सई
या स्पर्धेचा निकाल कुठे आहे?
20 Apr 2016 - 9:55 am | श्रीरंग_जोशी
लोणावळ्याहून अॅम्बी व्हॅलीकडे जाणारा नागमोडी रस्ता
कोकणात माणगावकडे जाणारा एक रस्ता
मल्टनोमाह फॉल्स या उंच धबधब्याशेजारून टिपलेला पायथ्याजवळचा महामार्ग
13 Dec 2017 - 3:06 am | दिपस्तंभ