सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक
सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम
सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!
सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक
सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद
सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!
चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आता मोठी परीक्षा द्यायची आहे- सिंहगड! पण लगेच सिंहगडावर जायची हिंमत झाली नाही. त्याच्या आधी आणखी सराव केला. इतर राईडस सुरू राहिल्या. एनएच ४ वर काही राईडस केल्या. कात्रज बोगद्यामध्ये सायकल चालवली. बोगद्यातले लाईट बंद असल्यामुळे जवळजवळ अंधारात सायकल चालवण्याचा अप्रतिम अनुभव! सिंहगड पायथा- डोणजेपर्यंत जाऊन आलो. इतका वेग वाटत नाहीय, त्यामुळे अशा राईडस सतत सुरू ठेवायला हव्यात.
१६ मार्च २०१५! आज सिंहगडाची परीक्षा द्यायची आहे. पूर्वीपेक्षा स्टॅमिना खूप वाढलेला आहे. नक्की किती हे आज कळेल. राईड सुरू केली. सिंहगडाच्या पायथ्याशी नाश्ता केला आणि पुढे निघालो. काहीच अडचण न येता आरामात घाटात सायकल सुरू केली. अगदी आरामात- एफर्टलेस पुढे जातोय. चढाच्या तुलनेत वेगही चांगला मिळतोय. रस्ता हळु हळु वर चढतोय आणि जमीन खाली दूर जाताना दिसते आहे. जिथे चढ जास्त तीव्र आहे, तिथे खूप डावीकडे वळून किंवा राँग साईडने जातोय ज्यामुळे ग्रेडिएंट कमी होतो. मागे वळून बघितल्यावर खडकवासलाचं पाणी आणि पुण्याच्या बिल्डिंग दिसत आहेत. बघता बघता चाळीस मिनिटात चार किलोमीटर पूर्ण झाले! आता दोन किलोमीटर हलका उतार मिळेल जो पाच मिनिटात पार होईल.
अद्भुत नजारे! आत्तापर्यंत ज्याची वाट बघत होतो तो सिंहगड जवळ येतोय! आता शेवटचे साडेतीन किलोमीटर राहिले आहेत आणि घाट चढायला सुरू करून फक्त पन्नास मिनिटे झाली आहेत! कदाचित मी दिड तासांच्या आतच पोहचू शकेन! हे लक्षात आलं तेव्हा अजून उत्साह वाढला. ह्या शेवटच्या टप्प्यावर चढ थोडा जास्त तीव्र आहे. शिवाय इतका वेळ घाट चढत असल्यामुळे हळु हळु थकवा वाटतोय. स्पीड कमी होते आहे. वारंवार थांबावं लागतंय. पण सायकल चालवण्यात अडचण काहीच नाहीय. फक्त वेग जरा कमी झालाय.
शेवटी जरा जास्त थांबावं लागलं, पण सायकल चालवतच वर पोहचलो! आणि वेळ बघितला तर फक्त सव्वा तास! दोन्ही गोष्टी अतिशय अविश्वसनीय वाटत आहेत! चहा घेतला, वरून दिसणा-या नजा-यांचा आस्वाद घेतला- त्तोरणा आणि दूरवर राजगड! आणि परत सायकल सुरू केली. आता उताराचं थोडं टेन्शन आहे. ह्या राईडमध्ये पहिल्यांदा चढाच्या ऐवजी उताराचं टेन्शन आलं! खरोखर ही राईड माझ्यासाठी माईलस्टोन ठरेल.
सिंहगडाचा क्लाइंब
लदाख़मध्ये सायकल चालवण्यासाठी सिंहगड दिड तासात पार करणं ही पात्रता मानले जाते. म्हणजेच आता मी लदाख़मध्ये सायकल चालवायला पात्र झालो! मी क्वालिफाय झालो! पण आता अजून पुढचा टप्पा गाठायला हवा! शिखरावर पाय ठेवणं सोपं आहे, पण तिथे टिकणं अतिशय कठिण! पूर्वी जेव्हा एकदा गोरखगडाचा ट्रेक केला होता, तेव्हा कसबसं शिखरावर पोहचलो होतो. तिथे सचिन व द्रविडची आठवण आली- शिखरावर दोन मिनिट उभं राहणं इतकं अवघड असताना हे दोघं वर्षानुवर्षे शिखरावर कसे काय राहू शकतात!!
पुढील भाग २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 1:17 pm | कंजूस
भारी.फोटो मस्त.उतारावर कोणत्या प्रकारचे ब्रेक्स खात्रीशिर असतात?
21 Mar 2016 - 12:07 pm | मार्गी
साधे आणि डिस्क ब्रेक दोनही सारखेच उपयोगी असतात. पण अशा तीव्र उतारावर ब्रेक्स नासुद्धा ब्रेक देणं जास्त महत्त्वाचं. डिस्क ब्रेक जास्त वेगामध्ये जास्त नियंत्रण देतात.
21 Mar 2016 - 1:19 pm | कोकणी पुणेकर
तुमच्या चिकाटीला सलाम !
मिसळपाव, मायबोलीवर असलेल्या सायकलिंगच्या लेखांमुळे माझ्यासारख्या आळशी लोकांना जरा प्रेरणा मिळते. कालच कात्रज घाट चढुन जुन्या बोगद्यातुन जाऊन, नव्या बोगद्यातुन परत आलो.
21 Mar 2016 - 1:49 pm | मित्रहो
सिंहगड फत्ते.
फक्त सव्वा तासात सिंहगडावर सायकले घेउन चढलात वा.
21 Mar 2016 - 2:11 pm | मोदक
फक्त सव्वा तासात सिंहगडावर सायकले घेउन चढलात वा
+११११
21 Mar 2016 - 2:11 pm | एस
अभिनंदन! मस्त सफर!
21 Mar 2016 - 2:46 pm | स्पा
एक नंबर
जबरजस्त