सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 Apr 2016 - 5:27 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

२०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

१९ एप्रिलला शतक केल्यानंतर दुस-या दिवशी नांदेडच्या एका सायकलिस्टकडे गेलो. ते रेसची सायकल चालवतात. त्यांनी सायकल दुरुस्तीविषयी, फिटनेस व आहाराविषयी चांगली माहिती दिली. तिकडे जातानाही काही अंतर सायकलने गेलो होतो. बसवर सायकल ठेवण्याची कसरत! सायकल रिपेअरिंग शिकणं तसं मोठं काम आहे. आत्ता मला पंक्चरही ठीक येत नाहीय. रोज ट्युब काढून पंक्चर चेक करण्याचा सराव करतोय. हळु हळु प्रगती होते आहे. एलेन की विकत घेतली ज्यामुळे सायकलचे जवळजवळ सगळे भाग उघडता येतात. आता सायकल पूर्ण सुटी करू शकतो. पण कधी कधी परत बंद करताना थोडी अडचण येते! पुढे कळालं की, फोर्क उघडायला नको. फक्त टायर्स आणि सीट वेगळी करूनही सायकल अगदी वेगळी होते. असो.

छोट्या राईडस सुरू राहिल्या. लदाख़ला जाण्यासाठी फक्त एक महिना राहिला आहे. प्रचंड उत्सुकता आणि थोडा तणावही आहे. इथे कितीही तयारी करेन, पण खरोखर २५००- ३०००- ५००० मीटर अशा उंचीवर सायकल चालवता येईल? आणि लदाख़ला जाण्याआधी एक ५-६ दिवसांची सलग सायकल चालवली जाईल अशी राईडही करायला जमत नाहीय. त्यामुळे तणाव तर आहेच. पण मजाही येते आहे. सायकल चालवणं व तांत्रिक बाबी शिकणं सुरू राहिलं. हळु हळु पंक्चर जमतं आहे.

फिटनेस किंवा सायकिलिंगचा स्टॅमिना सुधारला आहे. त्याचे अनेक इंडिकेटर्स आहेत. आधी लवकर घाम यायचा, आता उशीरा येतो. आधी प्राणायामामध्ये श्वास जास्त लांबायचा नाही, आता होतोय. प्राणायामानंतरचं ॐ सुद्धा जास्त वेळ म्हणू शकतोय. अर्थात् त्यात अजून सुधारणेला खूप वाव आहे.

पुण्यात असताना पुण्यात आणि परभणीकडे असताना तिथे सायकल चालवतोय. परभणीचे काही सायकल मित्र पूर्वी लदाख़मध्ये सायकलिंग करून आलेले आहेत. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. नीरजजींकडून तर सततच मार्गदर्शन घेतोय. किती सामान सोबत घ्यावं, हा फार कठिण मुद्दा आहे. आदर्श स्थितीमध्ये तर सर्व काही न्यायला पाहिजे- सायकलचे सर्व टूल्स, स्पेअर ट्युब, स्पेअर टायर आणि इतर एक्सेसरीज; त्याशिवाय सर्व प्रकारचे कपडे, जॅकेटस, स्वेटर, रेनकोट इ. पण सामान फक्त १४ किलोपर्यंतच घेणार आहे. अत्यंत दुर्गम अशा मनाली- लेह रस्त्याने जायचं आहे. त्यामुळे फक्त अति आवश्यक गोष्टीच घेईन. म्हणजे सायकलच्या संपूर्ण टूल किटवैवजी पंक्चर किट, एलेन की, बेसिक पाने. टेंट न घेता फक्त स्लीपिंग बॅग घेतली. कपड्यांचे दोन- तीन सेट, रेनकोट आणि स्वेटर इ. घेतलं. सूचना देणारे तर अनेक आहेत. मोठी द्विधा स्थिती आहे. तिथे काय काय लागू शकेल असा विचार केला तर 'सर्व काही' लागेल! पण इतकं सगळं नेणं शक्यच नाही. त्यामुळे फार मोजून मापून सामान घेतलं.

पुण्यात सायकलची सर्विसिंग केली. नवीन टायर्स, नवीन ट्युब्ज, नवीन चेन टाकली. गेअर सेटिंग नीट करून घेतली. इनर केबल बदलली. काही दिवसांपूर्वीच हेलमेटसुद्धा घेतलं होतं. सायकल ट्रेनमध्ये कशी न्यावी, हे कळत नाहीय. अनेकदा वाटतं की, सुटी करून पोत्यात घेऊन जावी. पण अनेक प्रयत्न करूनही ते जमलं नाही. टायर्स आणि सीट काढून टाकल्यावर उरलेली सायकल पोत्यात बसते, पण दोन टायर्स कसे ठेवायचे? आणि सामान असं पाहिजे जे मला एकट्याला नेता येईल. शेवटी सायकल पार्सलनेच नेण्याचं ठरवलं.

२६ मे ला अंबालासाठी निघेन. अंबाला ते मनाली बसने जाईन आणि मनालीपासून सायकल सुरू करेन. पण २० मे आला तरी मनाली- लेह रस्ता उघडण्याची चिन्हं नाहीत. तसा हा रस्ता १ जूनला सुरू होतो, पण अजून रोहतांगही सुरू झालं नाहीय. मनाली आणि लेहच्या लोकांकडे अनेकदा चौकशी केली आणि मग हळु हळु कळालं की, बहुतेक मी पोहचेपर्यंत २८- २९ मे पर्यंत मनाली- लेह रस्ता सुरू होणार नाही. अशा वेळी मला कदाचित अंबाला- जम्मू- श्रीनगर- करगिल असं जावं लागेल. करगिलपासून सायकलिंग सुरू करेन. पण अजून वाट बघेन.

परभणीच्या सायकलिस्ट ग्रूपसोबत राईड केल्या. परभणीच्या मित्रांनी खूप उत्साह वाढवला आणि मला नंतर चॉकलेट व ड्राय फ्रूटही दिले. एका छोट्या कार्यक्रमात माझा सत्कारही केला. एका अशा ग्रूप राईडमध्ये परभणीपासून फक्त २० किमी दूर असलेल्या इंद्रायणी मंदीराचा मस्त घाट चढायला मिळाला. एक किलोमीटरचा चढ. छोटाच घाट, पण कच्चा रस्ता असल्याने मस्त वाटला. प्रॅक्टिससाठी चांगला आहे. मे महिन्यात शतक झालं नाही. पण सायकल राईडस सुरू राहिल्या. आता खरी परीक्षा येईल. निघण्याच्या आधी मोबाईल नेमका बंद पडला. धावपळ करून निघेपर्यंत कसाबसा सुरू केला. सायकलही पार्सल केली. पण शेवटच्या क्षणी स्पेअर ट्युब घ्यायला विसरलो. पण सामानाचं गणित पाळलं- १२ किलोपेक्षा कमी वजन ठेवलं. आता एक दिवस ट्रेनचा प्रवास, एक दिवस बसचा प्रवास आणि मग सायकलिंग सुरू! मनाली रोड सुरू होण्याची अंधुक आशा अजून आहे. .


निघत असतानाचा फोटो

लदाख़ सायकलिंगचं वर्णन जून २०१५ मध्येच प्रकाशित झालं आहे.

पुढील भाग २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

8 Apr 2016 - 9:54 pm | राघवेंद्र

अरे वा मस्तच!!!

वा. लदाख मोहिमेचे वर्णन वाचले होतेच. त्याच्या पूर्वतयारीचीही थोडीफार कल्पना या लेखातून आली. पुभाप्र.

मार्गी's picture

9 Apr 2016 - 12:45 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

बाबा योगिराज's picture

9 Apr 2016 - 1:20 pm | बाबा योगिराज

बढिया. मस्तच.

अजया's picture

9 Apr 2016 - 1:28 pm | अजया

वा!पुभाप्र

पैसा's picture

12 Apr 2016 - 1:58 pm | पैसा

मस्तच! लदाख वारीची मालिका वाचली आहेच. पूर्वतयारीही जबरदस्त!

अरिंजय's picture

13 Apr 2016 - 11:41 am | अरिंजय

झकास लेखमाला. पुर्ण वाचली.

वेल्लाभट's picture

13 Apr 2016 - 11:53 am | वेल्लाभट

कड्डक लेखमाला
सलाम आहे तुम्हाला
बेस्ट
बेस्ट
ब्लॉगही वाचलाय. निव्वळ भारी !

मित्रहो's picture

13 Apr 2016 - 7:51 pm | मित्रहो

लेखमाला मस्त झाली