वेळ : आणीबाणीची
काळ : प्यायला उठलेला
स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ
आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना
विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये....
खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!!
विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब
ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या.
जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन. एवढे अत्याचार सहन नाही होत रे आता. उचल रे देवा आता मला उचल आणि नेऊन टाक गोव्यात.
खंड्या : पपा, तुम कायको टेंशन लेरे मै हूँ ना !!
विजु भौ : तू आहेच म्हणून तर टेंशन आहे रे बाळा, जेव्हा पासून तू उद्योगात् लक्ष घातलं, माझं आयुष्यातलं लक्ष उडून जायची पाळी आली आहे.. इथून जायलाच हवं आता, पण जाणार कुठे सगळ्या देशात हिच बोम्बाबोम्ब आहे
खंड्या : डोंट वरी पपा मी एक ठिकाण शोधुन काढलंय जिथे आपल्याला कोणी कोणी काही नाही करू शकणार
विजु भौ : कुठे ते ???
खंड्या : त्या रवी अंकल नी किनै यमुनेच्या तिरावर एक सांस्कृतिक महोत्सव भरवला आहे. तिकडे ते
'Art of leaving' शिकवतात आहे म्हणे !!!
प्रतिक्रिया
14 Mar 2016 - 2:38 pm | भाऊंचे भाऊ
ओके हे डेक्कन पुस्तकाच्या वाट्सअप ग्रुपवर पण तुम्ही टाकलं होत अन प्रत्येक ठिकाण मिपा नाही हे माहीत असल्याने माझ्या WYAKT HONYAAVAR पराकोटीच्या मर्यादा मला पाळाव्या लागतात पण आता इथे लिहलेच आहे तर स्पष्ट बोलतो टुकार धागा
14 Mar 2016 - 2:41 pm | महासंग्राम
भाऊ धन्यवाद पुढे अजून चांगले लिखाण करण्याचा प्रयत्न करेन
14 Mar 2016 - 3:29 pm | बबन ताम्बे
अगदीच टुकार नाही वाटले. ब-यापैकी जमलेय.
14 Mar 2016 - 3:38 pm | भाऊंचे भाऊ
कथाबिज छान होतेच पण पुरेसे न फूलवल्याने KLPD नक्कीच झाला
15 Mar 2016 - 7:54 am | किचेन
➕ १. चांगला आहे.कमी शब्दातला ब्रिटिश नंदी.
14 Mar 2016 - 2:47 pm | नीलमोहर
'Art of leaving' - मिपावर डूआयडींसाठी याचे क्लासेस घ्यायला हवेत :)
14 Mar 2016 - 4:50 pm | मार्मिक गोडसे
फक्त शाब्दिक कोटीसाठी काढलेला धागा.
14 Mar 2016 - 4:57 pm | मराठी कथालेखक
चांगला वाटला.
फार ताणण्यात अर्थ नव्हताच...
14 Mar 2016 - 5:34 pm | टवाळ कार्टा
कर दी ना छोटी बात...तुम्ही टिपिकल मराठमोळ्या मध्यमवर्गीयांपैकी का हो? =))
14 Mar 2016 - 5:43 pm | बबन ताम्बे
करा चैन लेको ! मटारीची उसळ, केळ्याचे शिकरण...- इति पु.ल. :-)
15 Mar 2016 - 8:40 am | भाऊंचे भाऊ
शिबिराची खरी गरज आहे देशाला ;)
15 Mar 2016 - 8:42 am | नाना स्कॉच
"विजु भाऊ" हा आयडी हरकत घ्यायची शक्यता आहे भालेराव साहेब !! :द
बाकी भारी जमले आहे!
15 Mar 2016 - 9:16 am | महासंग्राम
हरकत नाही माफी मागू कि त्यांची…
15 Mar 2016 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
'Art of leaving' चे मठाधिपती श्री श्री रविशंकर नसून ती जागा श्री मल्ल्यांनी घेतली आहे असे कायप्पावरून समजते ;) =))
15 Mar 2016 - 4:24 pm | महासंग्राम
हेहॆहे डॉक खरय अगदी हे म्हणून तर श्री श्री विजू भौ लिहिलं