हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!
भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!
शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 3:06 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
जियो संदीपबुवा...!!!
4 Mar 2016 - 3:11 pm | जव्हेरगंज
भारी!!
4 Mar 2016 - 3:15 pm | नाखु
4 Mar 2016 - 3:40 pm | हरिदास
छान आहे कविता. आवडली.
4 Mar 2016 - 3:48 pm | चांदणे संदीप
वल्ली, जव्हेरगंज, नाखुकाका, हरिदास, मस्त वाटल लगेच प्रतिक्रिया वाचून!
:)
धन्यवाद,
Sandy
4 Mar 2016 - 5:25 pm | अभ्या..
सँडीबाबा,
गवसले रे तुला.
जियो
4 Mar 2016 - 5:46 pm | चांदणे संदीप
___/\___
4 Mar 2016 - 5:45 pm | खेडूत
:)
अवडली कविता
हे कळाले वाचल्यानंतर...
4 Mar 2016 - 9:23 pm | एक एकटा एकटाच
वाह संदीप
मस्त
4 Mar 2016 - 9:27 pm | रातराणी
सुरेख !
4 Mar 2016 - 10:54 pm | चांदणे संदीप
खेडूतअण्णा, ३ए, रातराणीतै, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
Sandy
5 Mar 2016 - 6:56 am | अत्रुप्त आत्मा
झकास !