उपाय सुचवाल ?

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
11 Mar 2011 - 4:26 pm

मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

समाजराहणीराहती जागासल्लामदत

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

11 Mar 2011 - 8:39 pm | स्पंदना

ह्यॅ !! ५४ प्रतिसाद ! पण एकाही मि.पा.च्या पुताला (पुत्रचा अपभ्रंश) 'ग्यानबाची मेख 'नाही गावली.

ओ उगाच काहितरी उगाच यांच्या नादी नका लागु. मी सांगते तुम्हाला नामी उपाय...

हे बघा 'तो बोका' अन 'ती गाडी' म्हणुन तो रोज रात्री तीथे झोपायला येतो!

तुम्ही कव्हर घाला अन कुलुप लावा, वळणाच पाणी वळणालाच जाणार.

हे व्हायला नको? उपाय हवा?

'ती गाडी 'बदलुन 'गाडा ' घ्या.

मग बघ्घा फिरकतो का बोका त्या गाड्या कडे!

गाडी उलटी पार्क्करून का बघत नाही?
चाके वर असतील आणि सीट खाली असेल तर बोक्याला बसायला अवघड जाईल

रामदास's picture

11 Mar 2011 - 9:02 pm | रामदास

गाडी उलाल होणे असे म्हणतात. गाडी उलाल झाली की आधारासाठी साठी डिमरे (लाकडी ठोकळे ) लावायला लागतात.

पिवळा डांबिस's picture

11 Mar 2011 - 9:39 pm | पिवळा डांबिस

गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा....
रात्री बोक्याला लांडग्याचा वास आला की परत तो तिथे फिरकणार देखील नाही!!!!!
हाकानाका!!!

टारझन's picture

11 Mar 2011 - 10:29 pm | टारझन

गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा....

माझा मित्र गोमंतक लांडगे हा फार मुत्रा आहे , तो मुत्रादान करायला तत्पर असतो , नंबर हवा असल्यास व्यनी करा .

वेताळ's picture

11 Mar 2011 - 10:45 pm | वेताळ

उगा काहीतरीच ला दुसर्‍या दिवशी त्याच गाडीवर बसल्यावर लांडग्याच्या मुत्राचा काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना?

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 9:03 am | पिवळा डांबिस

उगा काहीतरीच ला दुसर्‍या दिवशी त्याच गाडीवर बसल्यावर लांडग्याच्या मुत्राचा काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना?
अजिबात नाही!
उलट सुंदर पोरी गळ्यात पडतील! (असे आम्ही पूर्वी एका "वेअरवुल्फ" नांवाच्या इंग्रजी सिनेमात पाहिले आहे हो!!!)
बोक्याचा त्रास नसलेल्या मिपावरील इतर बोळेकरूंनीही हा उपाय करून पहायला हरकत नाही!!!

निवेदिता-ताई's picture

11 Mar 2011 - 10:17 pm | निवेदिता-ताई

@ गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा....

आणी ते आणायला बोक्याला बरोबर घेउन जा????

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 3:11 am | पिवळा डांबिस

आणी ते आणायला बोक्याला बरोबर घेउन जा????
नको! त्यापेक्षा आपल्या विमुक्तला सांगा...
नाहीतरी उगाच रानोमाळ भटकत असतो!!!

विकास's picture

11 Mar 2011 - 10:43 pm | विकास

(१) How to Make Homemade Cat Repellent

(२) Shake Away Cat Repellent is non-toxic granules that contain urine from coyotes, foxes or bobcats, animals that are predators of cats. (हे स्प्रे केल्यावर बोकाच काय तुमचे शेजारी पण पळून जातील!)

त्याची परफेड तो तूम्हाला त्रास न देण्यात नक्की करेल

भीमाईचा पिपळ्या.'s picture

11 Mar 2011 - 11:25 pm | भीमाईचा पिपळ्या.

वैदाला हजर करा. झिरो मिन्टात बोका पिंजर्‍यात. तुम्ही तुमच्या घरात.
हाय का नाही बेस आयड्या.

'शुक शुक मन्या जातोस का नाही' हे भयाण गाणं त्या बोक्याला ऐकवायची सोय करा. जमलं तर व्हिडोची पण सोय करा.

कुंदन's picture

12 Mar 2011 - 12:26 am | कुंदन

व्हिडोची लिंक मदनबाण देईल.
त्याने न दिल्यास सहजरावांशी संपर्क साधावा. सहजरावांचा नंबर ईंट्याकडे मिळेल.

शिल्पा ब's picture

12 Mar 2011 - 12:27 am | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ

वेदनयन's picture

12 Mar 2011 - 1:20 am | वेदनयन

१. कव्हरवर टार्‍याचा फोटो छापा
२. एक सिडी प्लेयर घ्या. चुचुच्या अस्सल मराठीत कोदांचा किंवा युयुत्सुंचा लेख रेकार्ड करुन गाडीजवळ रात्रभर वाजवा.
३. इथे फुकट नाडी बघुन मिळेल असा बोर्ड लावा

अजुनही फरक पडत नसेल तर मास्तरांना भेटा...

कव्हरवर टार्‍याचा फोटो छापा

कहरावर कहर आहेत सगळी मिपाकर मंडळी.....

अरुण मनोहर's picture

12 Mar 2011 - 2:07 am | अरुण मनोहर

नि३.--->>आणि समजा जर कव्हरला कुलूप असेल तर बोका कसा आत घुसु शकतो??<<

उगा काहीतरी च, पाहिले कव्हर घालून
चोरी थांबवायला टाकले कुलूप लावून
खादाडमाऊला आपल्या बरोबर बोलावून
उपाशी बोका घुसला आत कव्हर खालून

योगी९००'s picture

14 Mar 2011 - 4:17 pm | योगी९००

मस्त हॅ हॅ हॅ..

आयला माझे जुने नाव का ओढले आहे यात? मी तर उपयोग होईल असा प्रतिसाद दिला आहे.. (खालती पहा)...

अरुण मनोहर's picture

14 Mar 2011 - 6:42 pm | अरुण मनोहर

फक्त मनोरंजन म्हणून याकडे पहा!

बोक्याशी संबंधीत मिपावरच्या आय डींना एकत्र आणले!

लीमाउजेट उरली ना मग मागे.... तिचं काय....

गुंड्या बावळा's picture

12 Mar 2011 - 9:56 am | गुंड्या बावळा

aho boka bika kay nay..,.
hyanchyakad honda chi 'twister' gadi hay he te sangayla lagle, an tumhi kas kay bolaylayt.
saral ghas tondat takusa vatat nay mhanun asa lambun takaylet..

योगी९००'s picture

12 Mar 2011 - 12:51 pm | योगी९००

जोक्स अपार्ट..

आम्हालाही हाच प्रोब्लेम होता..नव्या स्कुटीच्या सीटवर बोका यायचा..

शेवटी उपाय म्हणून रोज सीटवर एक पेपर ठेवायचो आणि त्यावर मोठ्ठा दगड ठेवायचो. त्यामुळे बोका यायचा बंद झाला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Mar 2011 - 4:25 pm | निनाद मुक्काम प...

आपणास मासलेवाईक प्रतिक्रिया हवी आहे .
तर ..

बोक्याला गोणपाटात घाला .
हत्या करू नका ( अहिंसा परमो धर्म )
त्याला दूरवर सोडून येऊ नका.
( एक तर तो परत येईन किंवा दुसऱ्या कोणाला त्रास देईन .)

त्याला जंगलात सोडा .
बिबळा किंवा एखादा हिंस्त्र प्राणी आपली क्षुधा शांत करतील .
ह्याने तुम्हास पाप न लागता पुण्य लागेन
बिबळ्याचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देतील (त्यांना भक्ष्याच्या अभावी मनुष्य वस्तीत जावे लागणार नाही .)

बोका आपला देह कारणी लागला म्हणून दधि ऋषींच्या पंक्तीत जाऊन बसेल .
तुम्ही निसर्ग चक्र सुरळीत चालवायला खारीचा.... नव्हे नव्हे बोक्याचा वाटा उचलला म्हणून पंचमहाभूते तुमच्यावर प्रसन्न राहतील
.
बोका आख्यान संपले की
शहरातील भटकी कुत्री ...........

उगा काहितरीच's picture

12 Mar 2011 - 6:39 pm | उगा काहितरीच

धन्यवाद बुवा ९० पैकी १ कामाला आलेला उपाय :) वाईट नाही !!( पेपर ऐवजी ताडपत्री घालतोय)

सस्नेह's picture

28 Feb 2017 - 3:29 pm | सस्नेह

सध्या असाच एक बोका भारी पिडतो आहे. प्लेजरच्या सीटची चाळणी करून ठेवलीय त्यानं .
प्रॉब्लेम असा की मला स्कूटरचं सेन्ट्रल स्टँड लावता येत नाही आणि साईड स्टँड लावल्यावर गाडीची सीट तिरकी होते त्यामुळे मोठा दगड त्यावर बसत नाही...
:(

इंटरनेटस्नेही's picture

14 Mar 2011 - 1:02 am | इंटरनेटस्नेही

तुम्ही माझ्याकडे या.. मी तुम्हाला एक औषध देतो.. गंमत म्हणजे हे औषध एका बाटलीतुन दिवसातुन तीन वेळा घ्यायचे नसुन, एक बाटली एकदा असं दिवसातुन तीन वेळा करायच आहे. हे औषध १:३ या प्रमाणातुन पाण्यातुन घ्यायचे आहे.
एका वेळेस १८० मिली इतके हे औषध पिले पाहिजे.

नंतर सुमारे तासाभराने तुम्ही शेजार्‍यांशी चर्चा करायला जा. शक्यतो हातात एक छोटी काठी अथवा हातोडी असु द्या... त्यांनी जरा जरी टोलवाटोलवी केली की हातातली काठी वापरायची. 'विशेष' अवयांवर वार केलात तर उत्तम! आणि 'अरे ला कारे' करणं मस्ट!

लवकरच तो बोका गायब होईल, आणि कदाचित शेजारी सुद्धा!

-
डॉ. इंट्या माहितीगार, युनिवर्सीटी ऑफ ड्रिंकॉलॉजी, स्टेट ऑफ बेवडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अ‍ॅंटीक्वीटी.

.

.

.

विशेष सुचना: हा प्रतिसाद केवळ गंम्म्त म्हणुन वाचावा, अंमल करु नये. अन्यथा होणार्‍या परिणामांस मी जबाबदार राहणार नाही.

इतक्या कमी वेळात प्रतिसादांची सेन्च्युरी गाठल्याबद्द्ल अभिनन्दन! :)

गणामास्तर's picture

30 Aug 2012 - 6:16 pm | गणामास्तर

मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो.

आयला, काही लोक्स बोका बांधून ठेवतात की काय? बिबट्या बांधून फिरतात हे पाहिले होते. ;)

बरखा's picture

11 Oct 2012 - 7:16 pm | बरखा

मि एक उपाय सा॑गते....
या उपायाचि खात्रि देत नाहि,पण आम्च्याकडे एक कुत्रा पिसाळ्लेला रोज पार्किन्ग मधे येउन बसायचा आणि घाण करायचा,
मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले, त्या दिवसा पासुन तो कुत्रा आता तिथे दिसत नाहि.
तुम्हि पण असे करुन बघु शकता.

मोदक's picture

12 Oct 2012 - 1:07 am | मोदक

>>>मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले

कृपया या प्रोसेसची अधिक माहिती देता का..?

अवांतर - बिचारा कुत्रा.... :-D

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2012 - 1:59 pm | निवेदिता-ताई

हा हा हा.................. ह . ह. पु. वा.

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद

दादा कोंडके's picture

12 Oct 2012 - 2:21 pm | दादा कोंडके

कुणी सांगावं तो बोका वैयक्तीक स्वच्छतेबाबतीत जागरूक असेल तर का प्रयोग केल्यावर 'शी' करून झाल्यावर रोज दारात येउन उभा राहील. ;)

चेतन माने's picture

12 Oct 2012 - 2:06 pm | चेतन माने

१) बहुतेक नव्या गाड्यांची सीट काढता येते, रोज रात्री ती घरातच घेऊन जा.
२) तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना बोक्याशी खेळायला सांगा, लहान मुलं बोक्याचा जीव गळ्यात आणतील.
३) कधी तो बोका दिसलाच तर चांगलीच एक पेकाटात लाथ हाणा! वाटत नाही परत येईल तो.

किसन शिंदे's picture

12 Oct 2012 - 2:33 pm | किसन शिंदे

गायबलेले प्रतिसाद परत आणण्यासाठी योग्य तो धागा वर काढला आहे. ;)

असंच गायबलेले बोके आणि मांजरी परत आणण्यासाठी काय करता येईल ते सांगा.

डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या किबोर्द वर ताकूया? ;-)

"उगा काहीतरीच" करायच म्हणुन लेखकाने काही प्रतिसाद्यांनी सुचविल्याप्रमाणे एक बोकीण आणुन काही रात्र तिला गाडीला बांधुन पाहीली. त्यामुळे बोक्याने गाडीवर बसणे बंद केले, पण नंतर मार्जारकुळ बोकाळल्याने आता इतक्या मांजरांचे करायचे काय असा प्रश्न असलेला धागा काढायच्या विचारात होते पण धोरण आणी मिपाचे उर्ध्वकरण आडवे आले.

अद्द्या's picture

29 Nov 2013 - 12:49 pm | अद्द्या

=)) =))

पिलीयन रायडर's picture

13 May 2014 - 6:17 pm | पिलीयन रायडर

हे काय आहे?!!!!

हसुन हसुन मेले... *lol* *ROFL*

हे बहुतेक जुने मिपा आणी हरवलेले मिपाकर असतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 May 2015 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगगगगगगगगगगगग!!!! मोदकानी लिंक दिली हसुन फुटलोय!!! उचला रे.

लालगरूड's picture

29 May 2015 - 7:12 am | लालगरूड

गाडी विकली असेल बहुतेक.

नूतन सावंत's picture

29 May 2015 - 5:11 pm | नूतन सावंत

ह.ह.पु.झा.

पैसा's picture

9 Feb 2016 - 5:05 pm | पैसा

काय झालं ओ शेवट?

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 5:50 pm | उगा काहितरीच

मधल्या काळात बरंच पाणी गेलं पुलाखालून. ते कुटुंब सरकारी निवासस्थान सोडून गेलं . आमचे पण घर झाले आम्ही पण सरकारी निवासस्थान सोडलं. मी आता पुण्यात असतो. पण अजूनही ती गाडी आहे माझ्याकडे .

मीता's picture

9 Feb 2016 - 5:18 pm | मीता

काय कहर धागा आहे हा ....

चांदणे संदीप's picture

9 Feb 2016 - 6:16 pm | चांदणे संदीप

+१

परत एकदा सगळे परतिसाद वाचून काढले.... लोल तर काही महालोल आहेत!
=))

Sandy

होबासराव's picture

9 Feb 2016 - 5:20 pm | होबासराव

मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले
पेट्रोल, झंडुबाम डेटॉल पेक्षा भारि उपाय आहेत..

जेपी's picture

9 Feb 2016 - 6:21 pm | जेपी

प्रतिक्रीया(माफी मागुन)
सुबोध खरे सर-मी नौदलात असताना मला असा त्रास झालता.मी त्या बोक्याला आणी त्याचा मालकाला समुद्रात फेकायची धमकी दिली.दोघे सरळ झाले.

टक्या-त्या बोक्याच्या मालकाला एखादी मुलगी आहे का ?असल्यास सुत जुळवा .problem slove.
चिमणराव/काळा पहाड-बोक्याला गोळी घाला.
श्रीरंग_जोशी-बोक्याच्या मालकाला मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा.

मुवी-बोक्याला कट्याला आणा.
संदिप डांगे-मेगाबायटी प्रतिसाद.

..
.
.
.
.
जेपी-मला संपादक करा.त्रास संपवु

श्रीरंग_जोशी's picture

9 Feb 2016 - 9:26 pm | श्रीरंग_जोशी

<जेपी>
बोक्याला माझ्याकडे पाठवा, त्याला संन्यास घ्यायला शिकवतो..
</जेपी>

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2016 - 10:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उकाकाका उपाय ब्रेच आहेत त्यातले २-४ सांगतो.

१. गाडी घरात लावा आणि तुम्ही पार्किंग मधे झोपत चला. (बोका माझ्या ढेरीवर झोपतो वगैरे धागा काढाल म्हणुन आधीचं काठी घेउन झोपा.

२. ह्या धाग्याची आणि ह्यावरच्या प्रतिसादांची एक एन्लार्ज्ड प्रिंटाउट काढा आणि गाडीच्या सीटला पिन करुन ठेवा. बोका १०१% येत नाही बघा. (दुसर्‍या दिवशी गाडी चालु करायच्या आधी काढायला विसरु नका नाहीतर मुळव्याधीवर उपाय सुचवा वा तत्सम धागा काढायची वेळ येउ शकते)

३. बोक्याच्या मालकाला पोत्यात घालुन गावाबाहेर सोडुन या नैतर इथे खातं उघडायला भाग पाडा, उरलेलं काम आम्ही कंत्राटावर पुर्ण करु.

४. गाडीवरुन २४*७ हलु नका.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 10:27 pm | उगा काहितरीच

उकाकाका

पाया पडतो मालक काका वगैरे म्हणू नका. तिशी गाठायलाही अजून ५-६ वर्ष बाकीच आहेत राव ! उका , उक्या , आन्न्या , काय वाटेल ते म्हणा पण काका म्हणु नका .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2016 - 10:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गंमत करतोय =))

च्यामारी उक्या, लका वयाच्या विसाव्या वर्शी घोरमेंट क्वार्टर आन होंडा ट्विस्टर देणारी कंची नोकरी मिळवलीस तू?
असूदे. पिताश्रीसुध्दा असू शकतेत सरकारात म्हणा. ;)
एनीवे बोक्याला सरळ इचार तू नास्तिक हायेस का आस्तिक,
नास्तिक ला म्यांव केला की मांत्रिक नायतर तुडतुडीकडं सोड. आस्तिक म्यांव केला की हायेतच यनावाला. बोका शाणा बनून गप्प जरी बसला तरी डांगेआण्णाचा पत्ता दे. अंगावर आला तर पिराताई हायेतच.
.
.
फिनीस.

उगा काहितरीच's picture

10 Feb 2016 - 1:00 am | उगा काहितरीच

च्यामारी उक्या,

हे असं बोललं की बरं वाटते बघा.

होबासराव's picture

9 Feb 2016 - 10:17 pm | होबासराव

वेड्या सारखा ह्सतोय यार ऑफिस्मध्ये.. हा तुमचा प्रतिसाद मात्र सगळ्या प्रतिसादात जबरा आहे :))

चेक आणि मेट's picture

9 Feb 2016 - 11:03 pm | चेक आणि मेट

यावर एक रामबाण उपाय आहे,
तुम्ही मांजरीण पाळा,बोका कंट्रोलमध्ये येईल.

नाखु's picture

10 Feb 2016 - 2:29 pm | नाखु

वर्षभरात आणखी एका धाग्याची भर पडेल ( अत्ताच तो धागा ताजा आहे).

बोका-मांजर (पाळत) नसलेला पण सावध नाखु

नीलमोहर's picture

10 Feb 2016 - 3:52 pm | नीलमोहर

कहर बोका.. त्याहून कहर प्रतिसाद !!

हा धागा मांजराला किंवा त्या पालकर्त्या शेजार्‍याला वाचायला द्या
ते स्वतः होऊन निघून जातील

diggi12's picture

4 May 2024 - 12:01 am | diggi12

रामदास काका एक नं.