अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा
श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा
वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला
न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात
तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात
इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला
लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता
जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता
मातीशी मी त्या असा एक करार आहे केला
पांघरूण म्हणून घेणार आहे माती आकाशाला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
तिच्या कातर डोळा असे अलवार आले पाणी
मोत्यांचे त्या घेत चुंंबन मिठीत घेतले कोणी
त्याच्या त्या मिठिशी मी एक करार आहे केला
नको सैलावु आता मी तयार आहे लपायला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
प्रतिक्रिया
23 Dec 2015 - 7:31 am | एक एकटा एकटाच
लय भारी
झक्कास
23 Dec 2015 - 7:39 am | अभ्या..
अरे वा. बरसात चांदण्याची.
छान.
23 Dec 2015 - 7:51 am | अत्रुप्त आत्मा
मस्त !
23 Dec 2015 - 8:01 am | माहितगार
लय भारी
23 Dec 2015 - 8:24 am | अजया
वा! क्या बात है रारा!
23 Dec 2015 - 8:26 am | प्रचेतस
आवडली.
23 Dec 2015 - 8:40 am | नाखु
आव्डली
23 Dec 2015 - 8:41 am | मितान
छान कविता !
आवडली !
23 Dec 2015 - 9:31 am | माहितगार
चांदण सप्टेंबरात विखुरलेलं होत डिसेंबर येईपर्यंत अघळपघळ झाल दिसतय,:) (ह.घ्या.) काही असो या अघळपघळ कवितेवर बरेच रसिक काव्यवाचक पघळणार नक्कीच.
23 Dec 2015 - 10:17 am | रातराणी
खिक्क =))
आणि धन्यवाद!
23 Dec 2015 - 9:37 am | किसन शिंदे
खासच!
23 Dec 2015 - 10:11 am | चांदणे संदीप
चांगली आहे कविता! :) मला फक्त त्या करारांनी अडखळायला झाल!
Sandy
23 Dec 2015 - 10:18 am | रातराणी
खूप खूप धन्यवाद सर्वांना :)
23 Dec 2015 - 12:18 pm | एस
छान कविता.
23 Dec 2015 - 12:37 pm | सस्नेह
सुरेख कविता.
23 Dec 2015 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली...
पैजारबुवा,
23 Dec 2015 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारीय कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
23 Dec 2015 - 6:30 pm | सुमीत भातखंडे
मस्त कविता
23 Dec 2015 - 6:50 pm | रातराणी
_/\_
23 Dec 2015 - 6:57 pm | निनाव
अप्रतिम. मस्त मस्त मस्त. एक न्.:
नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात
तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात
इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला
लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
23 Dec 2015 - 7:12 pm | पैसा
कविता आवडली
23 Dec 2015 - 7:33 pm | जव्हेरगंज
जबराट!
23 Dec 2015 - 11:39 pm | बोका-ए-आझम
एकदम संत व्हालंतिन दिवसाला साजेशी!
24 Dec 2015 - 1:51 am | सौन्दर्य
छान सुटसुटीत, सगळ्यांना सहज समजेल अशी सुंदर कविता. आवडली.
24 Dec 2015 - 7:30 am | Maharani
सुंदर कविता.
24 Dec 2015 - 4:39 pm | पद्मावति
खूप सुंदर.
24 Dec 2015 - 4:43 pm | नाव आडनाव
कविता आवडली.
25 Dec 2015 - 11:56 am | विश्वव्यापी
कविता छानच आहे
25 Dec 2015 - 12:48 pm | माहीराज
लयं भारी
25 Dec 2015 - 1:20 pm | मनीषा
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
छान आहे कविता .
25 Dec 2015 - 8:27 pm | drsunilahirrao
आवडली कविता !
31 Dec 2015 - 12:03 am | शार्दुल_हातोळकर
छानच आहे कविता.....