अघळपघळ
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा
श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा
वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला
न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात
तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात
इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला
लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता
जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता
मातीशी मी त्या असा एक करार आहे केला
पांघरूण म्हणून घेणार आहे माती आकाशाला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
तिच्या कातर डोळा असे अलवार आले पाणी
मोत्यांचे त्या घेत चुंंबन मिठीत घेतले कोणी
त्याच्या त्या मिठिशी मी एक करार आहे केला
नको सैलावु आता मी तयार आहे लपायला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
लय भारी झक्कास
अरे वा. बरसात चांदण्याची.
मस्त !
लय भारी
वा! क्या बात है रारा!
आवडली.
छान कवीता
छान कविता ! आवडली !
अॅडीशनल कॉमेंट ;)
खिक्क =)) आणि धन्यवाद!
खासच!
छान आहे!
खूप खूप धन्यवाद सर्वांना :)
छान कविता.
सुरेख कविता.
मस्त छान...
क्या बात है
मस्त
पुन्हा एकदा धन्यवाद.
अप्रतिम. मस्त मस्त मस्त. एक
छान!
जबराट!
मस्त कविता !
सुंदर !
सुंदर कविता.
खूप सुंदर.
कविता आवडली.
छान
आवडली
ओंजळभरून चंद्र आज अंगणात
आवडली कविता !
मस्तच....