✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अघळपघळ

र — रातराणी, Wed, 12/23/2015 - 00:38
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता मातीशी मी त्या असा एक करार आहे केला पांघरूण म्हणून घेणार आहे माती आकाशाला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला तिच्या कातर डोळा असे अलवार आले पाणी मोत्यांचे त्या घेत चुंंबन मिठीत घेतले कोणी त्याच्या त्या मिठिशी मी एक करार आहे केला नको सैलावु आता मी तयार आहे लपायला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला

प्रतिक्रिया द्या
10468 वाचन

💬 प्रतिसाद (32)

लय भारी झक्कास

एक एकटा एकटाच
Wed, 12/23/2015 - 07:31 नवीन
लय भारी झक्कास
  • Log in or register to post comments

अरे वा. बरसात चांदण्याची.

अभ्या..
Wed, 12/23/2015 - 07:39 नवीन
अरे वा. बरसात चांदण्याची. छान.
  • Log in or register to post comments

मस्त !

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/23/2015 - 07:51 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

लय भारी

माहितगार
Wed, 12/23/2015 - 08:01 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

वा! क्या बात है रारा!

अजया
Wed, 12/23/2015 - 08:24 नवीन
वा! क्या बात है रारा!
  • Log in or register to post comments

आवडली.

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 08:26 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

छान कवीता

नाखु
Wed, 12/23/2015 - 08:40 नवीन
आव्डली
  • Log in or register to post comments

छान कविता ! आवडली !

मितान
Wed, 12/23/2015 - 08:41 नवीन
छान कविता ! आवडली !
  • Log in or register to post comments

अ‍ॅडीशनल कॉमेंट ;)

माहितगार
Wed, 12/23/2015 - 09:31 नवीन
चांदण सप्टेंबरात विखुरलेलं होत डिसेंबर येईपर्यंत अघळपघळ झाल दिसतय,:) (ह.घ्या.) काही असो या अघळपघळ कवितेवर बरेच रसिक काव्यवाचक पघळणार नक्कीच.
  • Log in or register to post comments

खिक्क =)) आणि धन्यवाद!

रातराणी
Wed, 12/23/2015 - 10:17 नवीन
खिक्क =)) आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

खासच!

किसन शिंदे
Wed, 12/23/2015 - 09:37 नवीन
खासच!
  • Log in or register to post comments

छान आहे!

चांदणे संदीप
Wed, 12/23/2015 - 10:11 नवीन
चांगली आहे कविता! :) मला फक्त त्या करारांनी अडखळायला झाल! Sandy
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद सर्वांना :)

रातराणी
Wed, 12/23/2015 - 10:18 नवीन
खूप खूप धन्यवाद सर्वांना :)
  • Log in or register to post comments

छान कविता.

एस
Wed, 12/23/2015 - 12:18 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

सस्नेह
Wed, 12/23/2015 - 12:37 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

मस्त छान...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/23/2015 - 12:41 नवीन
आवडली... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

क्या बात है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/23/2015 - 14:27 नवीन
भारीय कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
Wed, 12/23/2015 - 18:30 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा धन्यवाद.

रातराणी
Wed, 12/23/2015 - 18:50 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम. मस्त मस्त मस्त. एक

निनाव
Wed, 12/23/2015 - 18:57 नवीन
अप्रतिम. मस्त मस्त मस्त. एक न्.: नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Wed, 12/23/2015 - 19:12 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

जबराट!

जव्हेरगंज
Wed, 12/23/2015 - 19:33 नवीन
जबराट!
  • Log in or register to post comments

मस्त कविता !

बोका-ए-आझम
Wed, 12/23/2015 - 23:39 नवीन
एकदम संत व्हालंतिन दिवसाला साजेशी!
  • Log in or register to post comments

सुंदर !

सौन्दर्य
गुरुवार, 12/24/2015 - 01:51 नवीन
छान सुटसुटीत, सगळ्यांना सहज समजेल अशी सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता.

Maharani
गुरुवार, 12/24/2015 - 07:30 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर.

पद्मावति
गुरुवार, 12/24/2015 - 16:39 नवीन
खूप सुंदर.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

नाव आडनाव
गुरुवार, 12/24/2015 - 16:43 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान

विश्वव्यापी
Fri, 12/25/2015 - 11:56 नवीन
कविता छानच आहे
  • Log in or register to post comments

आवडली

माहीराज
Fri, 12/25/2015 - 12:48 नवीन
लयं भारी
  • Log in or register to post comments

ओंजळभरून चंद्र आज अंगणात

मनीषा
Fri, 12/25/2015 - 13:20 नवीन
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला छान आहे कविता .
  • Log in or register to post comments

आवडली कविता !

drsunilahirrao
Fri, 12/25/2015 - 20:27 नवीन
आवडली कविता !
  • Log in or register to post comments

मस्तच....

शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 12/31/2015 - 00:03 नवीन
छानच आहे कविता.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा