कोवळ्या वयातलं व्यसन

जातवेद's picture
जातवेद in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 4:25 pm

आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?

माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे. या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असाच एक हुशार मुलगा माझ्याबरोबर होता; अगदी इतर पालकांना हेवा वाटवा असा. तो रोज नवनविन आणि रोमांचकारी माहिती सांगायचा. यात काय नसायचं? जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ.

एके दिवशी मला त्याने भलतीच गोष्ट सांगितली. त्याने नुकतीच बीअर टेस्ट कशी केली याची कहाणी तो सांगू लागला. बीअर कुठल्या दादाने आणली होती, ते सगळे त्याच्या गच्चीत बसून कसे प्यायले, त्याला दरदरून घाम कसा फुटला, रात्री गार वारा कसा वहात होता, एकदम भारी कसं वाटलं वगैरे. मला थोडा धक्काच बसला. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. त्यावेळी दारूचे दुष्परिणाम माहिती नव्हते पण दारू पिणार्‍यांचा तिरस्कार कसा केला जातो हे माहित होते. आणि ईथे मी ज्याचे अनुकरण करायचो, ज्याच्या प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटायचे तोच दारू प्यायची तारीफ करतोय! अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते आणि दुसरे म्हणजे अशा गोष्टींचे कुतूहल. त्यामुळे त्याचे काही विषेश वाटले नव्हते. तेव्हा ऐकावं ते नवलच असं वय आणि एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. पण एक मन हे सर्व वाईट आहे असे ठणकावून सांगत होते. हा दारू पितो म्हणल्यावर याचा आदर्श ठेवावा कि ठेवू नये आणि याच्याबरोबर रोज शाळेत ये जा करावी का या विचारात मी पडलो. शेवटी असे ठरवले कि, काही असले तरी तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्यामुळेच माझे ज्ञानवर्धन भरपूर होते आहे तेव्हा आता याचे अनुकरण करण्याची काही गरज नाही पण हे वगळून त्याची संगत करायला काही हरकत नाही. त्यानंतरही त्याने त्याच्या पहिल्या सिगरेटचा किस्सा सांगितला, पहिल्यांदा तंबाखू खाल्याचा किस्सा सांगितला. मी त्याच्या ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि दिनक्रम चालू ठेवला. त्याने हे किस्से बर्‍याच मित्रांना सांगितले असणार कारण त्यांचा एक चांगला ग्रुप जमला जे हे प्रकार सर्रास करू लागले. त्यालाही त्याच्या कुठल्याश्या मित्राने स्वतःचा अनुभव सांगितला असणार आणि माझा मित्र त्याला बळी पडला असणार. हि साखळी अशी किती लांब चालत आलेली आणि अशी किती लांब जाईल कोणास ठाऊक. त्या ग्रुपमधले काहीजण पुढे जाऊन मुलींची छेडही काढू लागले. त्याचीही एक साखळी तयार होतच असणार.

आजचा विचार करता, तो मुलगा स्वतः व्यसनांच्या आहारी गेला का? तर मला तसं वाटत नाही; यापुढे कधी जाईल का? सांगता येत नाही.
या साखळीत त्याला ज्यांनी गोवले, त्याने ज्यांना गोवले असेल तर त्यातली कोणी व्यसनांच्या आहारी गेली असतिल का? निश्चितच.

'रेगे' हा या विषयावरचाच चित्रपट आला होता पण त्यामधे वाईट गोष्टींच्या आहारी जाण्यात मित्र-मैत्रिणींच्या संगतीचा जो सहभाग आहे तो फारसा दाखवण्यात आला नाही. तर नायक हा स्वतःहूनच गुन्हेगारी विश्वाकडे कसा आकर्षित होतो हे दाखवले होते. 'बालक-पालक' मधे मात्र हे अतिशय योग्य पद्धतीने दाखवले आहे.

जिज्ञासा म्हणलं तर चांगली, म्हणलं तर वाईट गोष्ट. ती चांगल्या गोष्टीत दाखवली तर तुम्हाला मोठा संशोधक करू शकते तसच वाईट गोष्टीत दाखवली तर तुम्हाला व्यसनाधिन किंवा गुन्हेगारही बनवू शकते. दारू, स्मोकिंग अशा समाजात वाईट समजल्या जाणार्‍या गोष्टींचे समर्थन करणारे सुद्धा असतील. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेताना बरेचजण केवळ गंमत म्हणून हे सर्व चालू करताना पाहिलय (त्यातले कित्येक हातात पैसा खेळूलागल्यानंतर दर आठवड्याला बसू लागले). कोणतही व्यसन हे तसं वाईटच पण ८ वी-१० वी एवढ्या कोवळ्या वयात जेव्हा यांच्या दुष्परिणामांची माहितीदेखिल नसते तेव्हा यात ओढल्या जाण्याचं कोणीच समर्थन करू करणार नाही.

जीवनमानशिक्षणविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 Nov 2015 - 12:46 am | टवाळ कार्टा

त्याने कै होणार???

सिरुसेरि's picture

8 Nov 2015 - 12:13 am | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख आणी प्रतिक्रिया . यांवरुन एक आठवले - शाळा , कॉलेजमध्ये अशीही मुले असतात कि ती बाहेर वागताना आपण खुप दंगेखोर , वाया गेलेले आहोत असे दाखवतात . आणी घरी गेल्यावर मात्र दाबुन अभ्यास करतात .

सुबोध खरे's picture

8 Nov 2015 - 10:03 pm | सुबोध खरे

व्यसनाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा संबंध नाही.
अतिशय हुशार मुले एकदाच वाचून किंवा अतिशय कमी अभ्यास करून गुण मिळवतात. त्यांच्या सारखा अभ्यास सामान्य मुलाने केला तर त्याला तेवढे गुण मिळणार नाहीत.
आपण कूल आहोत हे दाखवण्यासाठी हुशार मुलांनी सिगारेट हातात धरली तर त्याचे अनुकरण सामान्य मुलाने केले तरी त्याची बुद्धी याला कशी येणार?
थोडक्यात आपली पट्टी काळी दोन पांढरी पाच मध्ये गायचा प्रयत्न करू नये. हुशार मुलगा सिगारेट ओढतो स्मार्ट दिसतो मुलगी पटवतो म्हणून सामान्य मुलगा तसे करायला गेला तर तोंडावर आपटतो.

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 2:41 pm | संदीप डांगे

आपण सामान्य आहोत हे कबूल करायची कुणाचीच तयारी नसते. असामान्य म्हणून ज्यांचे कवतिक सदोदित केले जाते. तसेच कवतिक आपल्यालाही मिळावे म्हणून त्यांचे अनुकरण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच करत असतात. पण स्वतःकडे असामान्य लोकांच्या अमूर्त गोष्टी नसल्यामुळे (बुद्धी, समज, आकलन) त्यांच्या मूर्त गोष्टींची नक्कल मारुन (वागणे, बोलणे, वेषभूषा, केशभूषा, व्यसनं) आपणही त्यांच्या समकक्ष आहोत हे दाखवण्याची खुमखुमी सामान्य जनांत असतेच.

बिहाग's picture

8 Nov 2015 - 9:46 pm | बिहाग

तुम्ही "Thank you for smoking " नावाचा चित्रपट बघा आणि ठरवा खरे काय ते.

लालगरूड's picture

9 Nov 2015 - 5:01 pm | लालगरूड

पहिली सिगारेट @ 8
पहिली दारू @ 18

वाईट सगळे

हे सगळे एखादा पेग मारल्यावर सांगणारे काका लोक्स तर लैच रोचक वगैरे वाटतात.

(हे तुम्हांला उद्देशून नाही.)

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 5:54 pm | संदीप डांगे

खिक्क...!

लालगरूड's picture

10 Nov 2015 - 9:49 am | लालगरूड

हाहाहा ...... first and last होत ते o_O .... उत्सुकता असते प्रत्येक गोष्टी बाबत ....