नवकविता - ट्रॅफिक जॅम

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
5 Nov 2015 - 12:58 pm

नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D
विडंबन वगैरे समजू नये.
मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे
त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे.
प्लीज रिस्पेक्ट दॅट. इट्स ओरिजिनल.

नवकविता - ट्रॅफिक जॅम

उशीराच तरीही पुन्हा मी निघतो
त्या भयाण प्रवासासाठी
जणू फरफटत नेतं मला माझं नशीब
नशिबाचं काय म्हणा

नशीब त्याचंही असतं जो
खच्चकन चाकूचा वार केल्यासारखा
जातो...
जातो मला कट मारून...
आणि त्या मन गोठवणा-या थंडीत
रागाचा ज्वालामुखी मला चटके देतो...
आतून

मी तसाच...
तसाच माझ्या लेन मधे हताश...
बघत राहतो गाड्या आजूबाजूच्या, पुढच्या
गुदमरत, कुढत, कुजत
डोळे बधीर करणारे ते असंख्य
चमकते एलईडीचे रक्तरंगी तारे बघत

आज काय काल काय उद्या काय
ट्रॅफिक कधीच संपत नाही
फक्त लेन बदलत राहते
कधीतरी मीही असतो
वाढलेल्या ताटासारखा हिरवा सिग्नल मिळणारा
मग हाणतो मी गाडी
त्वेशाने
करतो डाउनशिफ्ट
एखाद्याचा हात पिरगळावा तसं
एक्सिलेटर वर पाय देतो
सिगरेट विझवल्यागत
काही क्षणातच पण कुणीतरी
माझाच गळा आवळावा असा
ब्रेक लावावा लागतो
कारण..

आज काय काल काय उद्या काय
ट्रॅफिक कधीच संपत नाही

मग पुन्हा मी तसाच...
तसाच माझ्या लेन मधे हताश...
बघत राहतो गाड्या आजूबाजूच्या, पुढच्या
गुदमरत, कुढत, कुजत
डोळे बधीर करणारे ते असंख्य
चमकते एलईडीचे रक्तरंगी तारे बघत

कविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितावाङ्मयशेतीबिभत्सरौद्ररसकवितामुक्तकगझल

प्रतिक्रिया

दमामि's picture

5 Nov 2015 - 1:07 pm | दमामि

छान!!!

रातराणी's picture

5 Nov 2015 - 1:44 pm | रातराणी

:) जमलीये.

एस's picture

5 Nov 2015 - 1:50 pm | एस

या कवितेला नवकवितेच्या अंधारजगात कृष्णविवराचे स्थान मिळावे ही सदिच्छा (तारांगणात ध्रुवतार्‍याचे स्थान ह्या नवकवितेच्या लेखी क्लिश असलेल्या प्रतिमेचे विद्रोही रूप, या अर्थाने!) ;-)

वाह!! कं लिवलाय, पन कं लिवलाय? =))

शिव कन्या's picture

5 Nov 2015 - 10:52 pm | शिव कन्या

पिपात मेले .... आठवले.
वास्तव!!

यशोधरा's picture

5 Nov 2015 - 10:54 pm | यशोधरा

वेल्ला, क्या हुई?

वेल्लाभट's picture

6 Nov 2015 - 7:05 am | वेल्लाभट

अशा कविता लिहिणा-यांच्या बुटात पाय घालण्याचा एक दुबळा प्रयत्न बाकी काही नाही.

इट्स व्हेरी इंटरेस्टिंग.

म्हणजे...
'गडगडाटी पाउस पडला' या उक्तीचे विद्रोही रूपांतर करा.
= आकाशाने आपला उर बडवून, वेदनेच्या अश्रूंना वाट करून दिली."

शिकतोय.

संदीप डांगे's picture

5 Nov 2015 - 11:27 pm | संदीप डांगे

ओ अण्णा, णाषिक ला या लवकर राहायला...

वेल्लाभट's picture

6 Nov 2015 - 7:08 am | वेल्लाभट

हाहा. होय थंडी पडूदे जरा.

वेल्लाभट's picture

6 Nov 2015 - 7:08 am | वेल्लाभट

ऑल ना थँक्स