कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्‍या क्रमांकाची भाषा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 11:40 pm

१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्‍या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्‍या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे.

कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे. मात्र २० पंजाबी भाषिक आमदार हे प्रमाण लोकसभेच्या सर्व ३३८ आमदारांमध्ये ६% आहे.

याअगोदरही कॅनडात भारतीय वंशाचे अनेक जण राज्य व राष्ट्र स्तरावर आमदार, खासदार झालेले आहेत. उज्जल दोसंज (Ujjal Dosanjh) हे ब्रिटिश कोलंबिया या कॅनडातील एका राज्याचे २४ फेब्रुवारी २००० ते ५ जून २००१ या काळाकरिता प्रीमियर (फर्स्ट मिनिस्टर उर्फ आपल्या येथील मुख्यमंत्री) होते. मात्र यावेळेस एकदम इतक्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत आणि त्यामुळे भारतीय भाषेला कॅनेडियन लोकसभेत तिसरे स्थान मिळाले हे विशेष !

अजून एक रोचक सत्य असे की कॅनडात अधिकसंखेचे भाषक असलेल्या स्पॅनिश (७५८,२८०), इटॅलियन ६६०,९४५, जर्मन (६२२,६५०) आणि चिनी (६२२,६५०) या भाषांना हा सन्मान अजून प्राप्त झालेला नाही.

==========

*** : उदय यांनी कॅनेडियन पार्लमेंटमध्ये फोनवर केलेल्या चौकशीतून पंजाबीला "अधिकृतरित्या तिसर्‍या भाषेचा दर्जा" मिळालेला नाही. फक्त ती लोकसभेतील पंजाबी भाषिक आमदारांच्या संख्येने लोकसभेतील तिसर्‍या क्रमांकाची भाषा ठरली आहे. त्यामुळे लेखातील व त्याच्या शीर्षकातील "अधिकृत" हा शब्द काढून टाकला आहे व नवीन माहितीला सुसंगत असे बदल केले आहेत.

हे बदल केवळ अयोग्य शब्दप्रयोग वाचून वाचकांची दिशाभूल होऊ नये यासाठीच केलेले आहेत.

भाषासमाजराजकारणमौजमजाअभिनंदनबातमी

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 11:43 pm | टवाळ कार्टा

पुढचा नंबर गुजरातीचा :)

त्या आधी कुठल्या तरी दक्षिण भारतीय भाषेचा लागेल. खुप लोकं आहेत इथे दक्षिण भारतातले. मराठी पण कमी नाहीत पण कुणाला वेळ आहे इथे विलेक्षन्स लढवायला ;)

एक पंजाबी काका आहेत ओळखीचे त्यांनी राणी वर केस ठोकली आणि ती जिंकले. ह्युमन राईटस वर होती ती केस आणि उमेदवारांमध्ये कमी भारतीय असण्याबद्दल च होती. अर्थात ही जुनी गोष्ट आहे.

अभ्या..'s picture

4 Nov 2015 - 12:01 am | अभ्या..

भारीच.
एक्काकाका, लोकसभेत दर्जा मिळणे म्हणजे अभ्यासक्रमात, सरकारी कामकाजात किंवा व्यवहारात (रेल्वेचे बोर्ड टैप) पण दर्जा मिळणे असे असते का? लिपीबद्दल कसे मग?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 12:05 am | डॉ सुहास म्हात्रे

लोकसभेत अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला की ती भाषा लोकसभेच्या व्यवहारात (भाषणे, पत्रव्यवहार, इ) वापरता येते. आतापर्यंत कॅनडात हे फक्त इंग्लिश व फ्रेंचमध्ये होऊ शकत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या प्रतिसादात... (लोकसभेतील भाषणे, लोकसभेतील पत्रव्यवहार, इ) असे वाचावे.

सध्या इथे तसंही व्हॅनकुव्हर सारख्या एअर पोर्ट वर पंजाबी बोर्ड असतात आणि पंजाबी भाषिकांची वेगळी लाईन देखील असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे

ते वेगळे... त्याला आपण ग्राहक सेवा म्हणू शकतो.

त्याच प्रकारे, बाहरेनच्या विमानतळावर सर्व घोषणा अरबी, हिंदी आणि मल्याळम अश्या तीन भाषांत होतात.

सहमत , पण पंजाबी बाहुल्याची दखल आधीच इथे घ्यायला सुरुवात झालेली होती एवढंच लिहायचं होतं.

अभ्या..'s picture

4 Nov 2015 - 12:32 am | अभ्या..

पंजाबी बाहुल्याची

सन्नी बाहुलीने सिध्द केलेय वाटते ;)

स्रुजा's picture

4 Nov 2015 - 12:33 am | स्रुजा

खिक ! केलं ही असेल ;)

प्यारे१'s picture

4 Nov 2015 - 1:09 am | प्यारे१

बाहुल्य रे बाहुल्य. majority.
बाकी सनी लियोनी बाहुली वाटत नाही. धन्यवाद.

तिला कशाची तरी डॉल म्हणतेत ना. ते गाने नै का. बेबी डॉल मै सोने दी.

मला वाटले डॉल म्हणजे बाहुली. :(

एस's picture

4 Nov 2015 - 12:25 am | एस

अरे वा! चांगले आहे!

डॉक्टरसाहेब थोडे टॅक्निकल हां. सोलापुरात औशधे, दवाखाने अन हॉटेल यांचे बोर्ड चार भाषात असतात. मराठी, इंग्लिश, कन्नड अन कधी कधी तेलुगु. ह्या दोन दाक्षिणात्य लिप्यांचे काम करताना आम्हाला बरेच प्रॉब्लेम येतात. म्हण्जे आम्ही पुस्तकी टायपतो पण त्या माध्यमात शिकलेल्या किंवा रोज वापरणार्‍याला समजत नाहीत. आता हे तर वेगळे देश. गुरुमुखीत सर्व मॅनेज करणे कसे जमवणार?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 2:56 am | डॉ सुहास म्हात्रे

पाश्चिमात्य देशांत जेव्हा एखादा नियम केला जातो तेव्हा त्याची उत्तम अंमलबजावणी कशी करायची याचे पूर्ण नियोजन तयार असते... रामभरोसे सोडलेले नसते ;)

एकावेळेस अनेक भाषा वापरल्या जाण्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रसंस्था (यु एन); जेथे सहा अधिकृत भाषा (अरेबिक, चिनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन व स्पॅनिश) आहेत. दुर्दैवाने जगाची एक शष्ठांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी हिंदी भाषा त्यात अंतर्भूत नाही. तरीही, पंतप्रधान मोदींनी हिंदीतून केलेल्या भाषणाचे ऑन-द-फ्लाय भाषांतर इतर भाषांतून ऐकायची व्यवस्था होतीच.

अजून एक उदाहरणच द्यायचे झाले तर, स्कँडिनेव्हियन देशांत (डेन्मार्क, स्विडन, नॉर्वे व फिनलंड) बहुतेक सर्व वैद्यकीय संशोधन त्यांच्या स्थानिक भाषांत केले जाते व ते प्रसिद्धही स्थानिक भाषांत केले जाते. ते प्रसिद्ध होणारी पियर रिव्ह्युव्ह्ड जर्नल्सही स्थानिक भाषांत असली तरी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. पण त्याबरोबरच आंतराष्ट्रिय जर्नल्स स्थानिक भाषेत व स्थानिक जर्नल्स आंतरराष्ट्रिय भाषांत (कमीत कमी इंग्लिशमध्ये तरी) त्वरीत भाषांतरीत करण्याची अत्यंत कार्यक्षम व्यवस्थाही आहे. त्यामुळेच स्कँडेनेव्हियन वैद्यकीय संशोधन जागतीक स्तरावर खूप वरचे स्थान राखून आहे.

उत्तम नियोजन करून बहुभाषिक व्यवहार करणे फार कठीण नाही. अर्थात हे करण्यासाठी प्रमाणभाषा वापरल्या जातात (बोलीभाषा अथवा डायलेक्ट्स नाही) आणि ते काम अर्थातच तज्ञ भाषांतरकार / दुभाषी करतात.

डॉक्टर सुहास,

पंजाबी भाषेला जर्मन वा स्पॅनिश भाषेपेक्षा अधिक प्राधान्य मिळ्ण्याचं एकंच कारण संभवनीय वाटतं. ते म्हणजे क्यानडात शेती करणारे (= प्रत्यक्ष जमीन कसणारे) शेतकरी बहुतांश पंजाबी भाषिक आहेत.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:04 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखात लिहिल्याप्रमाणे तेथे पंजाबीपेक्षा जास्त भाषीक असलेल्या इतर अनेक भाषा आहेत. परंतू, पंजाबीला मिळालेला लोकसभेतल्या अधिकृत भाषेचा दर्जा, कॅनेडियन नियमांप्रमाणे, लोकसंख्येवर आधारीत नसून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंच्या संख्येवर आधारीत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:13 am | डॉ सुहास म्हात्रे

हा नियम एखाद्या भाषेला जास्त महत्व देण्यासाठी नसून, सर्व निर्वाचित सदस्यांना एकमेकाशी संवाद साधणे सोपे जावे व त्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरळीत व्हावे, याकरिता आहे असे वाटते.

(प्रथमतः डॉ इ. ए. यांची माफी मागतो. कारण इथली माझी प्रतिक्रिया, वेगळ्या पेर्स्पेक्टीवची आहे. )

वरील धागा वाचून जर तुम्हाला हर्ष झाला तर, खालील ओळी वाचून तुमच्या मनात काय विचार येतात ते पण जरून पडताळा….

आता भिवंडी व मानखूर्द-शिवाजीनगर या दोन ठिकाणाहून निवडून आलेले सपाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी विधिमंडळ कामकाज पत्रिका हिंदीतून मिळावी अशी मागणी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे केली आहे. अबू आझमी यांच्या मागणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली असून अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे, असा इशारा राज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
महाराष्ट्रात केवळ मराठीच चालणार, असे ठणकावून सांगताना राज म्हणाले की, एवढाच जर हिंदीचा पुळका आला असेल तर अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे. इथे महाराष्ट्रात ही नाटके चालणार नाहीत आणि मनसे हे खपवून घेणार नाही! हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने विधानसभा सदस्यत्वाची शपथही आपण हिंदीतूनच घेणार असून विधिमंडळ कामकाजाची माहितीही आपल्याला हिंदी भाषेतून मिळणे हा आपला अधिकार असल्याचे आझमी यांचे म्हणणे आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेतील मराठी भाषा येत नसलेल्या नगरसेवकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. महापालिकेत सुमारे ५७ नगरसेवक अमराठी भाषक आहेत. त्यातील अनेकांना मराठी भाषेत संवाद साधणे कठीण होते.

अमराठी नगरसेवकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. मात्र यंदा अद्यापही प्रशासनाकडून तशाप्रकारची हालचाल झालेली नाही. आमचे शिक्षणच मराठीतून झाले असल्यामुळे मराठी बोलताना तसेच वाचताना आणि ते समजून घेताना कोणतीही अडचण येत नाही. परंतु अनेक अमराठी नगरसेवक जे सभागृहातही मराठीतून न बोलता हिंदीतून बोलणे पसंत करतात, त्यांना मराठी भाषेतून बोलता यावे, मराठीतून होणारे कामकाज कळावे यासाठी हे प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचे आहे. - मनोज कोटक, नगरसेवक

गॅरी ट्रुमन's picture

4 Nov 2015 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

सहमत आहे. हिंदीतूनच सदस्यत्वाची शपथ घेण्यावर अडून राहिल्याबद्दल अबू आझमीला मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी थोबाडीतही मारली होती आणि तसे केल्याबद्दल रमेश वांजळेंबद्दल अनेकांना काय अभिमान वाटला होता. (त्या अबू आझमीविषयी मला काडीचेही ममत्व नाही.पण हिंदीतून शपथ घेण्याबद्दल त्याला थोबाडीत मारणे-- आणि ते पण विधानसभेच्या सभागृहात मला तरी कधीच समर्थनीय वाटले नाही आणि वाटणारही नाही).

का कुणास ठाऊक हा धागा वाचल्यानंतर मलाही त्या रमेश वांजळे-अबू आझमी प्रसंगाचीच आठवण आली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ पगला गजोधर ;

मुद्दा क्र १ :

तुमच्या पहिल्या मुद्द्याचे उत्तर गॅरी ट्रुमन यांनी दिले आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.

मुद्दा क्र २ व ३ :

अ) दोन्ही बाजू समंजस असल्यासच सुसंवाद होऊ शकतो. आणि हा सुसंवाद महापालिकेचे अंतिम ध्येय उत्तम रितीने साधण्यासाठी असावा. महापालिकेचे अंतिम ध्येय "नागरिकांना आवश्यक त्या सर्व विकसित सोईसुविधा पुरविणे" असे ढोबळमानाने म्हणता येईल.

आ) मुंबई बहुभाषिक असली तरी अजूनही बहुतेक भाग-प्रभागातील लोकसंख्या मराठी भाषिक आहे. निवडून आलेल्या उमेदवारांने केवळ नगरपालिकेत भाषणे देणे, इत्यादी सह आपल्या भागातील सर्व (त्याला मत दिलेले / न दिलेले) जनतेशी संवाद साधून त्यांच्यासाठी काम करणे आवश्यक असते. शिवाय आपली कामे नीट करण्यासाठी बहुसंख्य असलेल्या स्थानिक भाषिक नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक असतेच. यामुळे प्रत्येक नगरसेवकाला बहुसंख्यांची भाषा येणे हे किती फायदेशीर ठरेल हे सांगायला नकोच. किंबहुना मी जर मुंबईतला अमराठी नगरसेवक असतो तर हा मुद्दा मला माझे काम जास्त चांगले करून परत निवडून यायला मदत करतो आहे हे पाहून स्वतःहून स्थानिक भाषा शिकलो असतो !

इ) वरचा मुद्दा पाहता शासनाने / सरकारने अमराठी लोकप्रतिनिधींना मराठी शिकण्यासाठी मदत केली तर ते राजकारण मध्ये न आणता स्वागतार्हच ठरावे. अर्थात, कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये स्वार्थ व राजकारण आणून तिचा विचका केल्याची उदाहरणे पैशाला पासरी आहेतच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

गडबडीत एक मुद्दा राहून गेला...

ज्या संदर्भात तुम्ही प्रश्न उभे केले आहेत त्या संदर्भात हे एक निरिक्षण...

पंजाबीला कॅनेडियन लोकसभेत अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला म्हणून पंजाबी भाषिक आमदार "माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेने आता माझ्याशी पंजाबीतूनच बोलावे" असा आग्रह करणार नाहीत किंवा तसा ग्रहही करून घेणार नाहीत, ते जनतेशी चांगला संवाद रहावा यासाठी इंग्लिश (आणि क्वेबेकमध्ये* असल्यास फ्रेंच) भाषा वापरतील याबाबत माझी खात्री आहे.

======

* : कॅनडाच्या एकुलत्या एक फ्रेंच भाषिक क्वेबेक प्रांतात, फ्रेंच भाषेत परिक्षा देऊन ठराविक पातळीचे नैपुण्य सिद्ध करणे ही तेथे राहणार्‍यासाठी / नागरिकत्वासाठी अर्ज करणार्‍या (व नोकरी करणार्‍या परदेशी) व्यक्तीला आवश्यक अट आहे.

पगला गजोधर's picture

4 Nov 2015 - 4:19 pm | पगला गजोधर

डॉ सर, तुमच्या मुद्दा २,३ मागील तर्क
"अबू आझमी सारख्या प्रभूती, मराठी मतदारांच्या मतावर मुंबईत निवडणूक जिंकतात
अथवा
मराठी मतांअभावी ते निवडणूक हारतील" असा आहे का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मुद्द्याचा मुख्य रोख "हारणे-जिंकणे" यापेक्षा जास्त "नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यामुळे उत्तम काम करणे शक्य होण्याशी" संबंधीत होता.

अर्थात स्थानिक भाषा येत असल्यास त्याचा लोकप्रतिनिधीला निवडून येण्यासहि मदत होईल यात संशय नाहीच... पण ते सगळ्याच मतदारसंघात अत्यंत आवश्यक नसते असे दिसून येते यात संशय नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2015 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा

उत्तम लेख

कोमल's picture

4 Nov 2015 - 8:27 am | कोमल

+१

आणि प्रतिसादही

गॅरी ट्रुमन's picture

4 Nov 2015 - 10:25 am | गॅरी ट्रुमन

अमृतातही पैजा जिंकणार्‍या मायमराठीकडे दुर्लक्ष करून पंजाबी भाषेचा सन्मान करून कॅनडा सरकारने ७ कोटी मराठी भाषिकांच्या मराठी बाण्याला ठेच पोहोचवली आहे. याचा मी कडकडीत निषेध करत आहे.

कॅनडा सरकारने मराठीवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मी कॅनडाला न केलेला व्हिसा अर्ज परत घेत आहे याची नोंद घ्यावी ही विनंती.

पगला गजोधर's picture

4 Nov 2015 - 10:48 am | पगला गजोधर

चला आता एव्हाना, तुमच्या, मनसे शाखाप्रमुखपद (कॅनडा नाका) इथल्या नेमणुकीचे आदेश येतीलच कृष्णकुंजवरून

चला आता एव्हाना, तुमच्या, मनसे शाखाप्रमुखपद (कॅनडा नाका) इथल्या नेमणुकीचे आदेश येतीलच कृष्णकुंजवरून

कुठल्याही ठिकाणचे शाखाप्रमुखपद चालायचे नाही. मला मिस्सिसौगा किंवा व्हॅन्क्युव्हरचेच शाखाप्रमुखपद हवे. नाहीतरी तिथे काम काही नसणारच आहे. मग मिस्सिसौगाहून नायगारा धबधबा जवळ आहे. तिथे जाऊन पडून राहिन म्हणतो. नाहीतर व्हॅन्क्युव्हरची हवा खूपच छान असते-- छान म्हणजे हाडे गोठवणारी थंडी नसते. पाऊस असला म्हणून काय झाले? मुंबईत काय कमी पाऊस असतो? अजून थंडीच्या ठिकाणी-- एडमॉन्टन, कॅल्गरी वगैरे ठिकाणी शाखाप्रमुख म्हणून पाठवलेत तर अजिबात जाणार नाही बघा. त्यापेक्षा आपले मौजे शिरकोलीचे शाखाप्रमुखपद कधीही चांगले :)

चाररंगी झेंडा अन "मी कॅनडाच, कॅनडा माझा" असे रेडियम केलेली लँड रोव्हर मिळेल गॅरीभाऊ. परत टोल नाही ते विचार करा. चांगले डिल आहे. ;)

गॅरी ट्रुमन's picture

4 Nov 2015 - 1:46 pm | गॅरी ट्रुमन

चांगले डिल आहे

खरोखरच छान डिल आहे. एकदा मिस्सिसौगा की व्हॅन्क्युव्हर ते नक्की करा आणि अपॉईंटमेन्ट लेटर द्या बघू. लगेच निघतो कॅनडाला. हाय काय आन नाय काय :)

पगला गजोधर's picture

4 Nov 2015 - 11:51 am | पगला गजोधर

ठीक आहे,मिस्सिसौगा किंवा व्हॅन्क्युव्हरचेच शाखाप्रमुखपदाकरिता, तुमचा एकंदर कल पाहता, तुम्हाला ऐक विनंती करेन की, तुमच्या मागण्यांचे … आपलं.. व्हिजनचे पॉवरपॉइन्ट प्रेसेन्टेशन बनवून, कृष्णकुंजवर धाडोन देणेची तजवीज करणे, तेथे नमूद करणे, की गोदापार्कच्या धर्तीवर, आपणास नायगरापार्क (नायगरा बुद्रुक, कॅनडाबाजू काठ) उभारून कॅनडाचे नवनिर्माण करण्याचा मनसुबा आहे. त्याचंकारणे आपली मिस्सिसौगा किंवा व्हॅन्क्युव्हरचेच शाखाप्रमुखपदाकरिता रुजुवात व्हावी ही राज्यांच्या चरणी विनंती धाडावी.

प्यारे१'s picture

4 Nov 2015 - 1:28 pm | प्यारे१

पृथ्वी हाय गोल गोल
गॅरीभौचा विचार खोल

गॅरी यांना गिरास रुट वर विचार करताना बघून आनंद वाटला.

कितीवेळा आनंद वाटला म्हणे नक्की =))

आता पंजाबी झालीय, उद्या तेलगू, कन्नड आणि तामीळही होईल. गुजरातीतर होईलच होइल. पण मराठी भाषा हा दर्जा मिळवण्याची सुतराम शक्यता नाही. परदेशात एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाला ओळख देणेही टाळतो. भेटल्यास मराठीत बोलणे टाळतो. मला कीती फ्लूएंट ईंग्रजी येते याचा टेंभा मिरवण्यात जास्त गर्क असतात मराठी लोक्स. त्यामुळे राहुद्या.
आधी महाराष्ट्रात न्यायालयात या भाषेचा वापर वाढला तरी खूप झाले.
माझे मत निराशावादी आहे. पण हे आहे हे असेच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा मुद्दा आहेच... जनगणनेत किती मराठी भाषिक कॅनेडियन नागरिकांनी आपली मातृभाषा मराठी व कितिंनी इंग्लिश्/फ्रेंच लिहीली आहे हे जाणून घेणे रोचक (आणि डोळ्यात अंजन घालणारे) ठरेल असा अंदाज आहे ! :( :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुतुहलाने आंजाचा धाडोळा घेतला, तर मराठीबाबत माझा अंदाज खरा आहे असेच वाटते...

कॅनडात नोंद करावी इतक्या मोठ्या सख्येने असलेल्या भाषिकांच्या संख्या :

Spanish (758,280)
Italian (660,945)
German (622,650)
Chinese (472,080)
Punjabi (456,090)
Cantonese (434,720)
Arabic (365,085)
Dutch (350,470)
Tagalog (Pilipino/Filipino) (324,120)
Hindi (299,600)
Mandarin (281,840)
Portuguese (274,670)
Polish (242,885)
Urdu (208,125)
Russian (191,520)
Ukrainian (174,160)
Greek (157,385)
Persian (154,385)
Tamil (138,675)
Korean (133,800)

तुषार काळभोर's picture

4 Nov 2015 - 5:17 pm | तुषार काळभोर

यातले किती मिपावर आहेत?

टपरी's picture

4 Nov 2015 - 8:34 pm | टपरी

मी आहे

बॅटमॅन's picture

4 Nov 2015 - 11:41 am | बॅटमॅन

अरे वा!!! ई तो मस्त हो गया एकदम! :)

होबासराव's picture

4 Nov 2015 - 1:21 pm | होबासराव

ਵਧਾੲੀਅਾਂ ਹੋਣ
ਵਧਾੲੀ ਹੋਵੇ
बधाईंया :)

बॅटमॅन's picture

4 Nov 2015 - 3:00 pm | बॅटमॅन

बधाईयां होण
बधाईयां होवे

होबासराव's picture

4 Nov 2015 - 9:17 pm | होबासराव

:(

बॅटमॅन's picture

5 Nov 2015 - 12:39 pm | बॅटमॅन

ऊप्स दुसर्‍या ओळीत बधाई पाहिजे फक्त. बधाईयां नव्हे.

जबरा अभ्यास आहे बाबा तुझा प्रत्येक भाषेचा...मान गये :))

बॅटमॅन's picture

5 Nov 2015 - 3:17 pm | बॅटमॅन

भाषा नै हो लिपी येते फक्त. भाषा शिकायला लै वेळ लागतो. लिपी शिकणं सोप्पं अस्तंय. :)

पगला गजोधर's picture

5 Nov 2015 - 3:18 pm | पगला गजोधर

你很棒

बॅटमॅन's picture

5 Nov 2015 - 3:24 pm | बॅटमॅन

_/\_

चिनी-जपानी-कोरियन वगैरेंचा अपवाद हो. तेवढं समजून घ्यायचं.

नव्याने निवडून आलेल्या लिबरल पार्टीचा परिणाम का? तशी त्यांची कन्झरवेटीव्ह पार्टीही बर्‍यापैकी लिबरल आहे. भाषेवरून द्वेषाचे राजकारण करणार्‍यांना आणि त्या राजकारणाला बळी पडणार्‍यांना ही बातमी नक्कीच वेगळी वाटेल.

चित्रगुप्त's picture

4 Nov 2015 - 2:05 pm | चित्रगुप्त

पंजाबी लोकांमधे धटिंगणपणाने, निगरगट्ट्पणाने आपले घोडे रेटून दामटवण्याची, आपल्याला हव्या त्या गोष्टीवर 'जबरन' कब्जा करण्याची वृत्ती मुळातच असते. याचा अनुभव मला अगदी लहानपणी सुद्धा आला होता, आगगाडीतच्या प्रवासात मी खिडकीजवळच्या सीट वर बसलेलो असता एक पंजाबी कुटुंब डब्यात आले. त्यापैकी एक माझ्या वयाचा पण अंगाने थोराड मुलगा माझ्या सीट्वर - माझ्या अंगवरच - बिनदिक्कतपणे बसला . त्याचे पालक त्याला काहीच बोललले नाहीत. शेवटी पडखाऊपणाने मी तिथून उठून आईजवळ जाऊन बसलो. पुढे दिल्लीत (आजतागायत) अडतीस वर्षांच्या वास्तव्यात तर याचे असंख्य अनुभव घेतलेले आहेत.
अर्थात पंजाब्यांमधे आपण मराठी लोकांनी घेण्यासारख्या काही चांगल्या सवयी देखील असतात.

चतुरंग's picture

4 Nov 2015 - 10:32 pm | चतुरंग

दोन आठवड्यांखाली आमच्या क्लायंटकडचा एक इंजिनिअर आला होता. पंजाबी होता. तो कॅनडाचा नागरिक आहे पण आता अमेरिकेत राहतो इलिनॉयला. मी भारतीय म्हंटल्यावर दोन दिवस त्याला जेवायला भारतीय ठिकाणीच जायचे होते. घेऊन गेलो. पोटभर तंदूरी चिकन हादडल्यावर त्याला जाम बरं वाटलं. जातायेता हिंदीतून बोलत होता. त्याला बहुतेक बराच वेळ इंग्लिशमधे बोलून अस्वस्थ झालं असावं! :)
जातायेता मी कसा महान, दर दोन वर्षांनी लेटेस्ट मॉडेलची गाडी घ्यायला मिळावी म्हणून मी लीजच कशी करतो, नवीन आयफोन येताच माझ्याकडचा कसा बदलून घेतो वैगेरे टकळी चालली होती. मी म्हंटले "एकदा घेतली की शक्यतोवर मोडेपर्यंत वस्तू वापर्तो मी, गाडीदेखील अपवाद नाही!" त्याच्या चेहर्‍यावर "कसला मिडलक्लास घाटी आहे हा!" असे भाव होते! :)
जेवताना तर तो इतका सुटला की कॅनडात तो कसा आला, बर्‍याच 'लटपटी' करुन अमेरिकेत कसा आला, वगैरे सांगत होता. मी बरीच इल्लीगल कामं करतो असं अभिमानाने सांगत होता! मी फक्त ऐकून घेत होतो.
एकूण बडेजाव मिरवणे, काहीही करुन हवे ते पदरात पाडून घेणे यात कोणताही विधिनिषेध नसतो असा सर्वसामान्यपणे पंजाबी लोकांचा स्वभाव बघितलाय. त्यामुळे त्यांच्या चांगल्या सवयी घेण्यापूर्वी वाईट सवयींचा त्रास होणार नाही याची कल्जी मी जरुर घेतो!
हे जनरायलजेशन असले तरी अनेकानेक अनुभवांती विचारपूर्वक बनवलेले मत आहे. त्यामुळे पंजाबी माणूस संपर्कात आला रे आला की मी सावध होतो! :)

(अनेक पंजाबदा पुत्तरचा अनुभव गाठीशी असलेला घाटी)रंगा

श्रीगुरुजी's picture

4 Nov 2015 - 2:54 pm | श्रीगुरुजी

संयुक्त राष्ट्रसंघात व कॅनडामध्ये दलितांच्या पाली भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिला आहे.

जातवेद's picture

5 Nov 2015 - 4:59 pm | जातवेद

होऊ दे खर्च!

नेक्ष्ट गुजराती थसे!! =))

पद्मावति's picture

4 Nov 2015 - 4:02 pm | पद्मावति

मस्तं बातमी. खूप वर्षांपूर्वीसुद्धा तिथे सार्वजनिक स्थळी गुरुमुखी मधून पाट्या असायच्या. ईंग्लंड मधे सुद्धा पंजाबी नाहीतर गुजराती अधिकृत भाषा होईल बहुतेक किंवा ऑलरेडी असेलही.

नितीनचंद्र's picture

4 Nov 2015 - 4:14 pm | नितीनचंद्र

बर्‍याच हिंदी मालीकातुन/ चित्रपटातुन पंजाबी नाव असलेल्या पात्राचा कॅनडात जाण्याचा उल्लेख असायचा. तो का ? ते आत्ता समजले. कॅनडात वर्क परमिट घेताना फ्रेंच भाषा शिकायची सक्ती का होती/ आहे ? हे अजुन समजले नाही. फक्त इतकाच उल्लेख माहित आहे की जसे उत्तर अमेरिकेवर ब्रिटीशांचे वर्चस्व होते तसे कॅनडावर फ्रेंचांचे होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्वेबेक प्रांत हा कॅनडाचा एकुलता एक फ्रेंच भाषिक प्रांत आहे. तेथे नागरिकत्वासाठी अर्ज करणार्‍यांना व नोकरी करणाची इच्छा असलेल्या परदेशी व्यक्तींना फ्रेंच भाषेची परिक्षा देऊन ठराविक पातळीचे नैपुण्य सिद्ध करणे ही आवश्यक अट आहे.

इतर प्रांतात हीच अट इंग्लिशबाबत आहे.

कॅनडावर फ्रेंचांचे अधिपत्य ( कॉलनी) ब्रिटिशांच्या आधीपासून होते पण जसे ब्रिटीश आले तसे वसाहतीसाठी वारंवार चकमकी घडू लागल्या. प्लेन्स ऑफ इब्राहिम मध्ये नंतर ब्रिटिशांनी निर्णायक रित्या फ्रेंचांचा पराभव केला आणि त्यांचं वास्तव्य कुबेक पुरतं मर्यादित केलं. आज ही बर्‍याच चळवळी चालू अस्तात कुबेक मध्ये. अगदी स्टॉल च्या लायनीत उभं असू तर स्टॉल मालकाशी फ्रेंच मध्ये बोलण्याचा आग्रह करतात. बर्‍यापैकी सेपरेटिस्ट आहे ते राज्य.

टिनटिन's picture

4 Nov 2015 - 5:00 pm | टिनटिन

कनेडा (लोकल पन्जाबी उच्चार) हा द्विभाषिक देश आहे. क्युबेक प्रान्त हा फ्रेन्च अधिपत्याखाली होता त्यामुळे फ्रेन्च भाषा आहे. ८०-९० च्या दशकात क्युबेकला वेगळे राष्टृ घोषित करावे यासाठी आन्दोलन झाले होते. त्यान्चा कायम आरोप असतो की इन्ग्लीश कॅनडा फ्रेन्च भाषेला दडपतो (जसे तमिळ - हिन्दी) त्यामुळे परदेशी व्यक्तींना फ्रेंच भाषेची अट आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2015 - 7:47 pm | टवाळ कार्टा

आणि कन्नड्डा (इथला लोकल पन्जाबी उच्चार) :)

उदय's picture

4 Nov 2015 - 6:29 pm | उदय

ही बातमी खरी आहे असे वाटत नाही. तुम्ही एखादा ऑफिशिअल दुवा देऊ शकाल का? आंतरजालावर शोध घेतला तेव्हा फक्त ही एक बातमी सापडली आणि त्यातसुद्ध्हा लिहिले आहे की With the election of 20 Punjabi-speaking MPs on Oct. 19, the Punjabi language is now the third most common in the House of Commons after English and French. मोस्ट कॉमन म्हणजे ऑफिशिअल होत नाही, म्हणून ऑफिशिअल भाषा झाली याचा दुवा मागत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे शब्दप्रयोग वापरलेले दिसतात... काहीत "third official language" तर काहीत फक्त "third language" असे उल्लेख आहेत. अजून स्पष्ट नवीन माहिती आल्यावर खुलासा होऊ शकेल.

१. Canada Shows Some Love Back. Punjabi Becomes The Third Official Language Of Country's Parliament

२. Punjabi third language in Canada's House of Commons

मी आत्ताच कॅनेडियन पार्लमेंटच्या ऑफिसमध्ये फोन करून खात्री करून घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की इंग्रजी आणि फ्रेंच या दोनच भाषा कॅनडाच्या ऑफिशियल भाषा आहेत. तुम्ही दिलेल्या पहिल्या दुव्यात बातमीच्या खाली कॉमेंटमध्ये पण तसेच लिहिले आहे.
जर पंजाबी ऑफिशियल भाषा झाली असती तर अमेरिकेत कुठेतरी ही बातमी नक्कीच आली असती आणि म्हणूनच मला शंका आली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही कॅनेडियन पार्लमेंटच्या ऑफिसमध्ये चौकशी करून खात्री केली असल्याने शीर्षकातला व लेखात "अधिकृत" हा शब्द योग्य नाही, तो तसा बदलून घेत आहे.

मी पण आज जरा चौकशी केली आणि न्युज पेपर्स पण चाळले. आज तर अजुन शपथविधी होतो आहे, बिल पास तर झालेलं नाही हे नक्की. या नवनिर्वाचित २० पंजाबी सदस्यां मुळे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पंजाबी ही ईंग्लिश आणि फ्रेंच खालोखाल मोस्ट स्पोकन थर्ड भाषा आहे. तिला अधिकृत दर्जा मिळालेला नाहीये हे नक्की. आता शपथविधी मध्ये २३ पंजाबी लोकं शपथ घेऊन गेले. मिनिस्ट्री मध्ये नेमका आकडा किती हे थोड्या वेळाने सांगते.

रमेश आठवले's picture

5 Nov 2015 - 12:54 am | रमेश आठवले

भारतातील आणि पाकिस्तानातील पंजाब असे दोन्ही भागातील पंजाबी कनेडा मध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्यातील किती भारतातील आणि किती पाक मधील याची माहिती मिळते का हे पण पहा. या साठी फाळणी पूर्वी तेथे गेलेल्या शीखाना भारतीय समजावे असे वाटते .

२० जणांची माहिती बघायला जरा वेळ लागेल. पण ३१ जणांच्या कॅबिनेट मध्ये ३ जण पंजाबी आहेत त्यापैकी दोघे जन्माने भारतीय (अमरजीत सोही / सोढी?, हरजीत सिंघ सज्जन) पण आता कॅनडाचे नागरीक आहेत आणि एक जण भारतीय वंशाचा ( नवदीप बैंस ) आहे, जन्माने च कॅनेडियन आहे.

बाकीचे बघायला हवेत पण ट्रुडो कॅबिनेट आणि लिबरल नेते देखील तसे तरुण आहेत. सेकंड जनरेशन कनेडियन अथवा लहानपणी च कॅनडात स्थायिक झालेल्यांपैकी असणार. भारतीयांचा भरणा देखील जास्त च असणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2015 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी या बातमीकडे भारत-पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही दृष्टीने... अगदी भारताचा कॅनडावर प्रभाव वगैरे प्रकारे... पहात नाही तर केवळ एका भारतिय भाषेचे/भाषिकांचे महत्वाच्या पाश्चिमात्य देशात वाढणारे महत्व इतक्याच माफक दृष्टीने पहात आहे.

पगला गजोधर's picture

4 Nov 2015 - 6:35 pm | पगला गजोधर

50 निम्मित्त डॉक्टरांचा 'कॅनडा ड्राय' शीतपेय देऊन सत्कार.
(डूप्लीकेट) जे पी(लेले कार्यकर्ते)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2015 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

या, या. बरोबरच "चियर्स" करू ;)

कॅनडा ड्राय नामक शीतपेय मस्तच लागायचे हो...अलीकडे कुठेच दिसत नाही. मला तर इ.स. २००० नंतर कुठेच पाहिलेले आठवत नाही.

(मिरजेत प्लेन दोसा आणि कॅनडा ड्राय रिचवण्यासाठी हट्ट केलेला) बॅटमॅन.

पगला गजोधर's picture

5 Nov 2015 - 4:27 pm | पगला गजोधर

canda dry

अहाहाहाहा.....नॉस्ट्याल्जिक केलेत राव.

गामा पैलवान's picture

6 Nov 2015 - 7:11 pm | गामा पैलवान

ब्याटोबा, काय सांगताय राव! मीही क्याड्राचा फ्यान होतो. ते मिळायचं बंद झाल्यावर नाराज झालेलो. खरंच सुंदर पेय होतं ते. त्यात वायू कमी असायचा (की नसायचाच?). चवीला अंमळ आल्हादक होतं. का बंद झालं कोणास ठाऊक!
आ.न.,
-गा.पैल

कविता१९७८'s picture

4 Nov 2015 - 8:43 pm | कविता१९७८

मस्त बातमी

विकास's picture

4 Nov 2015 - 9:31 pm | विकास

या निमित्त खालील गाणे डकवत आहे... शिवाय येथे पहा: Mix - Canada punjabi song

गाण्याखालील कॉमेंट्स वाचू नयेत. ;)

म्हसोबा's picture

5 Nov 2015 - 4:41 pm | म्हसोबा

भारतीयांचा नाद नाय करायचा !!!

एक शीख नेते हरजितसिंग सज्जन कॅनडाचे नवे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेताना.

अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात. हेनरी किसिंजर, मॅडेलाईन ऑलब्राईट अशी काही नावे पटकन आठवतात.

विकास's picture

6 Nov 2015 - 10:22 pm | विकास

येथे चित्रफित डकवल्याबद्दल धन्यवाद. मी प्रथमच कॅनेडीयन शपथविधी पाहीला... एक भारतीय वंशाचा शिख ब्रिटनच्या राणीआणि तिच्या कॅनेडावर देखरेख करणार्‍या सहकार्‍यांशी प्रामाणिकपणे वागेन /काम करेन अशा अर्थाची कॅनडाचा मंत्री म्हणून शपथ घेतो! हा प्रकार (यातील अर्थातच राणीशी "लॉयल" रहाणे हा प्रकार) फारच रोचक वाटला.

अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात.

ओ साहेब! आमचा भारत त्यात अजून पुढे आहे. इथे कुठलेच मंत्रीपद नसले तरी प्रधानमंत्र्यापेक्षा अधिक महत्व दिले जाते. ;)

कॅनडा मधे अजुन ही कागदोपत्री मोनार्कीच आहे. इथे घर घेताना, राणीच्या जमिनीवर लीज करताय अशा अर्थाचं करारपत्र तयार होतं. रोज चेंज ऑफ गार्डस सोहळा होतो. दर १ जुलै ला (कॅनडा डे) , राणीकडुन एक प्राणी पाठवला जातो. २०१३ च्या १ जुलि ला मेंढी होती. इकडची सैनिकांची पलटण तो प्राणी घेऊन चेंज ऑफ गार्ड्स ची परेड करते १ जुलै ला. आणि वर्षभर तो प्राणी शाही इतमामात सांभाळला जातो. वर्षाअखेरीस मला वाटते तो पुन्हा ब्रिटन ला दिला जातो.

ब्रिटिश च राज्य आहे हे आणि होतं , सार्वभौमत्व आहे आणी अमेरिका सख्खी शेजारी असल्याने आता संस्कृती इतकी फॉर्मल ( ब्रिटिश फॉर्मल) राहिलेली नाही पण काही परंपरा अजुन पाळल्या जातात च.

पगला गजोधर's picture

6 Nov 2015 - 10:49 pm | पगला गजोधर

अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात.

केस 1: भारतियाशी लग्न केल्यावर 40 वर्षे राहून, इथेच 2 मुलांना जन्म दिल्यावर आणि दहशदवादी हल्ल्यात सासू, नवरा गमावल्यावरही, परदेशी व्यक्ती म्हणून हिणवले जाते व भारतनिष्ठे विषयी टोमणे मारले जातात.
केस 2: भारतामध्ये 50 वर्षे कुष्ठ रोग्यांची सेवा केल्यावर भारत रत्न मिल्याल्यावरहि
काही संघ टना, कुजबुज करून नाराजी व्यक्त करतात, शक्य तिथे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात
त्या देशातील लोकांनी अश्या घटना पाहाव्या मोठ्या कौतुकाने फक्त !

केस १ बद्दल बास च !! काहीच्या काही लॉजिक आहे हे.. हे लोकं सुनेने गमावले म्ह्णता तुम्ही तेंव्हा नकळत वाक्याचा कर्ता सुनेला करता. सुन इथे पॅसिब घटक आहे. आणि ते जे लोकं गेले ना ते आपले पंतप्रधान होते , कुण्या एका व्यक्तीचा नवरा आणि सासू म्हणुन हल्ला नाही झाला त्यांच्यावर. सुन कुणी ही असती आणि नसती देखील तरी या दुर्दैवी घटना घडल्याच असत्या . उगाच याचं श्रेय त्याला द्यायचा आग्रह कशासाठी ब्वॉ ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2015 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे

केस २ : कोण्या एका फ्रिंजने केलेले विधान पकडून सरसकटीकरणाने अख्ख्या देशाला (ज्यात तुम्ही, आम्ही आणि इतर सगळे येतो) दोष देताना पाहून गंमत वाटली :)

या न्यायाने क्लू क्लक्स क्लॅन आहे म्हणून आख्खी अमेरिका राईट विंग रेसिस्ट देश आहे असे म्हटल्यासारखे झाले, असे वाटत नाही का ? =))

अतिशयोक्ती वाङ्मयात शोभून दिसते तार्किक वादात नाही. अर्थात हे सगळे भारतिय राजकारणात सहज खपून जाते म्हणा !

बाकी चालू द्या.

पगला गजोधर's picture

7 Nov 2015 - 7:55 am | पगला गजोधर

कोण्या एका फ्रिंजने केलेले विधान पकडून सरसकटीकरणाने अख्ख्या देशाला (ज्यात तुम्ही, आम्ही आणि इतर सगळे येतो) दोष देताना पाहून गंमत वाटली :)

सर मी अख्ख्या देशाला नावे नाही ठेवली आहे.

भारतामध्ये 50 वर्षे कुष्ठ रोग्यांची सेवा केल्यावर भारत रत्न मिल्याल्यावरहि
काही संघ टना, कुजबुज करून नाराजी व्यक्त करतात, शक्य तिथे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्या देशातील लोकांनी अश्या घटना पाहाव्या मोठ्या कौतुकाने फक्त

इतरवेळी 'आम्हीच काय ते राष्ट्रभक्त, असं मिरवायला पुढे असणाऱ्या संघटना, कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा धर्म केवळ वेगळा आहे म्हणून, त्या व्यक्तीच्या सेवेमागे, धर्मप्रसाराचे आंतर राष्ट्रीय कारस्थान पासून अनेक प्रकारच्या जहरी टीका करण्यात उत्तिष्ठ व अग्रेसर होते, फक्त असे लोकां बद्दल माझे वाक्य होते, बाकीचे लोक (ज्यात तुम्ही आम्ही इतर सर्व ) फक्त कॅनडातील घटनेकडे कौतुकाने पाहून आत्मरंजन करूयात, असे लिहिले.